प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमेन मुकेश अंबानी यांची लाडकी कन्या ‘ईशा’चा विवाहसोहळा 12 डिसेंबरला होणार आहे. मुकेश अंबानी यांची गणना भारतातील ‘श्रीमंत’ उद्योगपतींमध्ये केली जाते. पिरामल उद्योगसमूहाचे प्रमुख ‘अजय पिरामल’ यांचे सुपूत्र ‘आनंद पिरामल’ यांच्यासोबत ईशाचा विवाह होणार आहे. अर्थातच हा विवाहसोहळा अगदी ‘दिमाखदार’ असणार यात शंकाच नाही.
पाहुणे मंडळींची रेलचेल सुरू
या लग्नसोहळ्याच्या आधी असलेल्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. 8 आणि 9 तारखेला उदयपूरमध्ये संगीत, मेंहदीचा कार्यक्रम रंगणार आहे. प्रि-वेडींग सेलिब्रेशनसाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये उपस्थित झालं आहे. भारतातील नामांकीत व्यक्ती, राजकारणी, प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूडमधील सेलिब्रेटीदेखील या प्रि-वेडींग कार्यक्रमांसाठी उदयपूरमध्ये दाखल झालेत. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटनदेखील भारतात आल्या आहेत.
उदयपूरमध्ये अंबानी-पिरामल कुटुंबाचं ‘अन्नदान’
या लग्नसोहळ्याला उदयपूरातील जनतेचे आर्शीवाद मिळावेत यासाठी दोन्ही कुटुंबाकडून अन्नदान करण्यात येत आहे. 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत दररोज 5100 नागरिकांना अन्नदान करण्यात येणार आहे.
प्रि-वेडींग सेलिब्रेशसाठी ‘हॉटेल ओबेरॉय उदयविलास’ सज्ज
प्रि-वेडींग सेलिब्रेशनसाठी अंबानी कुटुंबाने उदयपूर येथील ‘हॉटेल ओबेरॉय उदयविलास’ बूक केलं आहे. पन्नास एकरवर उभारण्यात आलेलं हे हॉटेल जगभरातील बेस्ट हॉटेल पैकी एक आहे. हॉटेल शेजारी अतिशय सुंदर तलाव आहे. या हॉटेलच्या काही भागात वाईल्ड लाईफ सेन्चुरीदेखील आहे. राजस्थानी क्युझीन ही या हॉटेलची स्पेशलिटी आहे.
फोटोसौजन्य-इन्टाग्राम