ईशा - आनंदची अफलातून केमिस्ट्री

ईशा - आनंदची अफलातून केमिस्ट्री

लग्नाच्या या हंगामातील सर्वात मोठं आणि गाजणारं लग्न म्हणजे ईशा अंबनी आणि आनंद पिरामल यांचं. 12 डिसेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकत आहेत आणि सध्या राजस्थानमधील उदयपूरमध्ये प्रि - वेडिंग सोहळा धुमधडाक्यात सुरु आहे. या प्रि - वेडिंग सोहळ्यात पूर्ण बॉलीवूडच नाही तर भारतातील मोठमोठे उद्योगपतीदेखील सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर हिलरी क्लिंटन, बियॉन्से यासारख्या प्रसिद्ध लोकांनीही या लग्नाला उपस्थिती लावली आहे. ईशा आणि आनंद हे बियॉन्सेचे चाहते असल्यामुळे त्यांच्यासाठी बियॉन्सेचा लाईव्ह परफॉर्मन्सही ठेवण्यात आला होता. केवळ बियॉन्सेसाठी अंबानी यांनी 15 कोटी रूपये खर्च केल्याचंही आता वृत्त येत आहे. ईशा आणि आनंद यांचा प्रेमविवाह असून मागच्या वर्षी महाबळेश्वरला आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातल्यानंतर दोघांच्याही घरून आनंदाने या लग्नाला होकार देण्यात आला आहे.ईशा - आनंदचा डान्स


ईशा आणि आनंदची केमिस्ट्री आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या व्हिडिओतून दिसून येत आहे. अर्थातच संपूर्ण बॉलीवूड थिरकल्यानंतर दोघांनी एकमेकांबरोबर डान्स केला आणि दोघंही प्रेमात असल्याचं त्यांच्या केमिस्ट्रीतून दिसून येत आहे. आनंद आणि ईशा यांनी एकमेकांबरोबर एक रोमँटिक डान्स केला. आनंद आणि ईशा एकमेकांबरोबर अतिशय आनंदी दिसत असून डान्स करतानाच आनंदने ईशा उचलून घेत तिच्या गालावर किस करत आपलं प्रेम सगळ्यांसमोर दर्शवलं. ईशादेखील हा डान्स करताना अतिशय आनंदी दिसत असून नव्या नवरीची लाजही तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

प्रि - वेडिंगची धमाल


ईशा आणि आनंदच्या प्रि - वेडिंगमध्ये सर्वच सध्या धमाल करत आहेत. अगदी करण जोहरपासून ते ऐश्वर्या - अभिषेक यांनीही डान्स केला. इतकंच नाही तर बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान आणि गौरी खानही ईशासाठी स्टेजवर नाचले. तर सलमान खान अनंत अंबानीच्या मागे नाचत होता. सर्वच जण ईशा आणि आनंदच्या आनंदात सहभागी झालेले पाहायला मिळत आहे. सध्या या सर्वांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. ईशा आणि आनंदच्या लग्नासाठी अजिबात कोणतीही कमतरता अंबानी आणि पिरामल कुटुंबाने ठेवलेली नाही. उदयपूरसारख्या नयनरम्य ठिकाणी अगदी भव्यदिव्य स्वरुपात पाहुण्यांची योग्य व्यवस्था ठेवत अंबानी कुटुंबीयाने प्रि - वेडिंग सोहळा धुमधडाक्यात केला आहे.


फोटो सौजन्य - Viral Bhayani, Instagram