ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर  (Vaseline Uses In Marathi)

ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर (Vaseline Uses In Marathi)

व्हॅसलिन आणि थंडी हे वर्षानुवर्ष ठरलेलं समीकरण आहे. पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन जवळजवळ प्रत्येक घरात वापरलं जात आणि जास्तकरून आपण याचा वापर थंडीत ओठ फुटल्यावर करतो. पण खूप कमी जणांना माहीत असेल की, याचा उपयोग तुम्ही अजूनही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता. रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांसाही व्हॅसलिनच्या वापराने दूर करता येतात. मग ती समस्या त्वचेशी निगडीत असो वा काही दैनंदिन वापरात असलेल्या बाबींसाठी असो. यावेळी आम्ही तुम्हाला काही अशाच व्हॅसलिनशी निगडीत युक्त्या सांगणार आहोत, ज्या तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.

Vaseline-Petroleum-Jelly

व्हॅसलिन ब्यूटी हॅक्स

व्हॅसलिनच्या रोजच्या वापरासाठी काही हॅक्स

ADVERTISEMENT

व्हॅसलिन ब्यूटी हॅक्स (Vaseline Beauty Hacks)

वर्षभर ओठ राहतील मऊ आणि मुलायम (For Soft and Smooth Lips)

थंडीच्या मौसमात व्हॅसलिनचा हा मुख्य उपयोग आहे. पण काहीवेळा इतर मौसमातही ओठ फुटतात तेव्हा ओठ सुकू नये म्हणून व्हॅसलिनचा वापर करू शकता. ज्यामुळे ओठ कायम मऊ राहतील. म्हणूनच रोज रात्री झोपण्याआधी ओठांना जेली नक्की लावा. यामुळे ओठ मऊ आणि मुलायम दिसतात.  

नखांची चमक वाढवा (Make Your Nails Shiny)

जर तुमची नखं निस्तेज दिसू लागली असतील तर आंघोळ झाल्यावर किंवा रात्री झोपताना नखांवर व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीने मसाज करा. यामुळे नख चमकदार होतील आणि मजबूत पण बनतील.  

cracked heels home remedy in marathi

वाचा – कपड्यावरील डाग कसे काढावे

ADVERTISEMENT

पायांवरील भेगा होतील गायब (For Cracked Heels)

तळपायाच्या भेगांवर व्हॅसलिन लावल्यास टाचा मऊ होतील. लिंबाचा रस आणि व्हॅसलिन मिक्स करून रोज रात्री झोपताना पायाच्या भेगांवर हलका मसाज करा, नक्कीच आराम मिळेल. अजून एक उपाय म्हणजे एक चमचा व्हॅसलिनमध्ये अर्धा चमचा बोरीक पावडर घाला आणि चांगलं मिक्स करा. हे मिश्रण भेगांवर लावा. या मिश्रणानेही तुमच्या भेगा लवकर बऱ्या होतील.

आयब्रोज हायलाईट करा (Highlight Your Eyebrow)

बरेचदा मेकअप करून झाल्यावर तुमच्या भुवया मात्र तेवढ्या उठून दिसत नाहीत. अशावेळी पूर्ण मेकअप करून झाल्यावर तुमच्या आयब्रोजवर व्हॅसलिन जेली लावा आणि हायलाईट करा.

हाताच्या कोपरांचा काळेपणा दूर करा (Get Rid Of Dark Elbows)

हाताच्या कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी दोन्ही कोपरांना व्हॅसलिनने चांगला मसाज करा. असं केल्यास 2-3 आठवड्यातच तुम्हाला कोपरांचा रंग उजळलेला दिसेल.

पापण्या होतील दाट (Get thicker Lashes)

पेट्रोलियम जेलीचा वापर केल्यास डोळ्याच्या पापण्या दाट आणि लांब होऊ शकतात. रात्री झोपण्याआधी तुमच्या पापण्यांवर सुक्या मस्कारा ब्रशने व्हॅसलिन लावा. सकाळी उठल्यावर स्वच्छ धूवून टाका. लक्षात ठेवा, मस्कारा ब्रशवर हलकंसच व्हॅसलिन घ्या आणि ते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.  

ADVERTISEMENT

lipstick-guide-7

चमकदार चेहऱ्यासाठी करा व्हॅसलिनचा वापर (Work as a Shiner)

व्हॅसलिनचा वापर तुम्ही चेहऱ्यावर शायनर म्हणूनही करू शकता. पूर्ण मेकअप करून झाल्यावर चेहऱ्यावरील उठावदार पॉईंट्सवर उदा. चीक बोन, नाक, कपाळ आणि हनुवटीवर थोडंसं व्हॅसलिन लावून हाईलाईट करू शकता.

मेकअप रिमूव्हर म्हणूनही उपयोग (Use Vaseline as Makeup Remover)

व्हॅसलिनचा वापर तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणूनही करू शकता. व्हॅसलिनने तुम्ही डोळ्यांचा मेकअप जसं आयलायनर, मस्कारा, आयशॅडो आणि लिपस्टीक आरामात काढू शकता.

केस आणि चेहऱ्यावर कसं वापरावं ग्लिसरीन 

ADVERTISEMENT

स्प्लीट एंडवर ही गुणकारी (Use It To Get Rid Of Split Ends)

जर तुम्हाला स्प्लीट एंडची समस्या जाणवत असेल तर तुम्ही व्हॅसलिनचा वापर करू शकता. यासाठी तुमच्या केसांच्या टोकांना व्हॅसलिन लावा आणि काही वेळाने शँपू करा. लवकरच स्प्लीट एंड नाहीसे होतील.

परफेक्ट नेलपेंटसाठी (To Apply Nail Paint Perfectly)

जेव्हा तुम्ही नेलपेंट लावता तेव्हा नखांच्या बाहेरील क्युटीकल्सलाही ते लागतं. असं होऊ नये याकरता व्हॅसलिन तुमच्या नखांच्या बाहेरील भागाला लावा आणि मग नेलपेंट लावा. ज्यामुळे नेलपेंट लावताना ते पसरणार नाही.

व्हॅसलिन रोजच्या वापरासाठी (Vaseline Daily Routine Hacks)

Lipstick-stain-remover

कपड्यांवरील डाग होतील दूर (Helps to Remove Stains)

जर तुमच्या कपड्यांवर काजळ, लिपस्टीक किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारचे डाग लागले असतील तर व्हॅसलिनच्या मदतीने तुम्ही ते आरामात दूर करू शकता. डाग लागलेल्या भागावर व्हॅसलिन लावा आणि चोळा. मग पाण्याने स्वच्छ धुवा. डाग गायब होतील.

ADVERTISEMENT

चपला-बूट चमकवा (Use it as Shoe Shiner)

फक्त कापडापासून बनवलेल्या चपला सोडल्यास पॉलीश चालणाऱ्या चपला, सँडल्स आणि बूटांना चमकवण्यासाठी व्हॅसलिन हा उत्तम पर्याय आहे. थोडीशी पेट्रोलियम जेली घ्या आणि तुमच्या बूटांवर लावा, मग एखाद्या कपड्याने ती चांगली घासा. बघा तुमचे शूज एकदम चमकतील.

लाकड्याच्या सामानावर डाग पडल्यास (Helps to Remove Stains From Wooden Furniture)

लाकडाचं टेबल, खुर्ची, फ्लोरिंग किंवा इतर सामानावर नेहमीच ग्लासाचे किंवा दुसऱ्या प्रकारचे डाग पडतात. हे डाग तुम्ही व्हॅसलिनच्या मदतीने घालवू शकता. या डागांवर व्हॅसलिन लावा आणि चांगलं घासा. रात्रभर तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ कपड्याने पुसा. तुम्हाला लगेच दिसेल की, डाग गायब झालेत.

जळजळ होईल दूर (Helps to Get Rid of Burns)

जर शरीराच्या कोणत्या भागावर मिरचीचा हात लागल्यास किंवा जळजळ होत असल्यास त्या जागेवर थोडी पेट्रोलियम जेली लावा. तुम्हाला लगेच आराम मिळेल.

दरवाज्यांच्या आवाज येत असल्यास (To Fix a Squeaky Door)

जर तुमच्या घरातील दरवाज्यांचा उघडझाप करताना आवाज होत असल्यास दरवाज्याच्या कडांवर पेट्रोलियम जेली लावा. असं केल्यास दरवाज्याचा आवाज येणार नाही.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

गुळवेल म्हणजे जणू अमृतच – Benefits of Giloy

केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ अँटी हेअर फॉल शॅम्पू

Beauty and Health Benefits of Lemon : बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

त्वचा मॉश्चराईझ करण्यासोबत बॉडीलोशनचे आहेत हे आणखी ‘7’ फायदे

28 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT