ADVERTISEMENT
home / नातीगोती
Valentines Day : असं सजवा घर (How To Decorate Home On Valentines Day In Marathi)

Valentines Day : असं सजवा घर (How To Decorate Home On Valentines Day In Marathi)

फेब्रुवारी महिना आहे गुलाबी थंडी आणि प्रेमाचा महिना. हवेत मस्त असा सुगंध आहे आणि त्यातच गार हवेने अंगावर येणारा शहारा. व्हॅलेंटाईन डे आता काही दिवसांवर आला आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी काही प्लॅन केलंत की नाही. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी अगदी नाश्त्यापासून जेवणापर्यंतच सरप्राईज प्लॅन केलं असेलच पण तुम्ही हा विचार केलाय का की, प्रेमाची सुरूवात ही घरापासूनही होऊ शकते. जेव्हा तुमच्या नवऱ्याला किंवा तुम्हाला दिवसभराच्या ऑफिसनंतर आलेल्या थकव्यामुळे बाहेर जावंस वाटलं नाही तर तुम्ही घरच्याघरीही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. सेलिब्रेशनसाठी फक्त बाहेर जाऊनच डिनर किंवा पार्टी करायला हवी असं तर नाही ना. तसंही या दिवशी सगळ्याच ठिकाणी गर्दी असते. अशा वेळी मस्तपैकी घरीच रोमँटीक डेट प्लॅन करा आणि आपल्या पार्टनरला खूष करा. वेळही वाचेल आणि जास्त खर्चही होणार नाही.   

बेडरूममध्ये खास गुलाबी चादर (Pink Sheets In The Bedroom)

1. How To Decorate Home On Valentines Day In Marathi

सर्वात आधी बेडरूममधली चादर बदला. तुम्ही तुमच्या आवडीची चादरही घालू शकता पण प्रेमाचा मौसम आहे म्हंटल्यावर गुलाबी रंग तुमच्या प्रेमाला बहार आणण्यात मदत करेल. तसंच साईड टेबल किंवा खिडकीचे कोपरे वेगवेगळ्या आकाराच्या लाल किंवा पांढऱ्या सेटेंड कँडल्सनी डेकोर पूर्ण करा. पडदे बदलण्याची गरज नाही, फक्त टीश्यू फॅब्रिकने टाय बॅग्स बनवून घ्या. जर तुमचं बजेट जास्त नसेल तर रिबीन्स किंवा ओढण्यांचा वापरही करू शकता.  

Also Read History Of Valentines Day In Marathi

ADVERTISEMENT

हॉलसाठी लाल रंगाच्या कुशन (Red Cushion For The Hall)

2. How To Decorate Home On Valentines Day In Marathi

लाल रंग आणि प्रेम हे एक ठरलेलं समीकरण आहे. सोफ्याचं कव्हर बदलण्याऐवजी लाल रंगाचे कुशन कव्हर्स आणा किंवा तुम्ही सोफ्यावर लाल रंगाचं सोफा कव्हर घालू शकता. छानपैकी बाजारात मिळणारा मातीचा किंवा मेटलची लालटेन आणा. अगदीच ते मिळालं नाहीतर मातीच्या विंडचाईमला लाल रंग देऊन ते लावा. टेबलवर मोठा काचेचा नक्षीदार बाऊल ठेवून त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून डेकोर करा. टेबल किंवा हॉलमधल्या इतर टेबल्स किंवा कॉर्नरवर टी लाईट्स लावल्यास रोमँटीक वातावरण आपोआप निर्माण होईल.

Also Read Valentines Day Plan In Marathi

खास क्षणांची फोटो फ्रेम (Photo Frame Of Special Moments)

3. How To Decorate Home On Valentines Day In Marathi

ADVERTISEMENT

भिंतीवर तुमच्या दोघांचा किंवा कुटुंबाचा छानसा फोटो फ्रेम करून लावा. फोटो फ्रेमचं डेकोरेशन तसंही तुम्हाला नंतरही उपयोगी पडेलच. बाजारात पुठ्ठ्याचे किंवा लाकडाचे ठोकळे मिळतात, ते लाल रंगाने रंगवून घ्या. हे जमीनीवर किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवा, यामुळे हॉलला हटके लुक येईल.

वॉशरूममध्ये ठेवा लाल गुलाब (Red Roses In The Bathroom)

वॉशरूममधल्या कॉर्नर किंवा खिडक्यांच्या इथे लाल गुलाब किंवा गुलाबाच्या पाकळ्या पसरून ठेवा. त्यासोबतच तुम्ही पांढऱ्या रंगाच्या जरबेरा फुलांचा वापरही करू शकता. ज्याची पान लांब असतात.  

मुलांच्या खोलीत ठेवा फुगे (Bubbles In the Children’s Room)

4. How To Decorate Home On Valentines Day In Marathi

जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांची खोलीही सजवा आणि त्यांनाही खूष करा. हार्ट शेपच्या बलून्सनी त्यांची रूम सजवा किंवा पांढऱ्या आणि लाल रंगाच्या बलून्सचा वापर करा. जमल्यास त्यांनाही बलून्सने रूम सजवण्यात सहभागी करा, म्हणजे मुलंही खूष होतील आणि त्यांची रूमही छान सजेल.

ADVERTISEMENT

वाचा : व्हॅलेंटाईन डे वर टाळण्यासाठी गोष्टी

किचन हार्ट शेप्ड डिशेश (Kitchen Heart Shaped Dishes)

5. How To Decorate Home On Valentines Day In Marathi

किचनला सजवणं सोप्पं नाही, त्यामुळे डेकोरेशन करण्याऐवजी डिनरसाठी बनवायच्या डिशेशमध्ये बदल करा. जर तुम्हाल स्वयंपाकाची आवड असेल  आणि केक बनवायची इच्छा असल्यास हार्ट शेपचा केक बनवा. जर दुसरी एखादी डिश बनवणार असाल तर त्यावर सॉसने हार्टशेप टॉपिंग करा. पिण्यासाठी प्लम ज्यूस ठेवा. बिर्यानी केलीत त्यात लाल रंगाचा वापर करा किंवा बीट आणि गाजर घाला. त्यामुळे रंगही येईल आणि डिश पौष्टीकही होईल.  

(मिराबेल इंटीरियर डेकोर स्टूडिओच्या इंटीरिअर डिझाईनर अनुपमा बिहानी यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित)

ADVERTISEMENT

हेही वाचा 

Valentines Day: व्हॅलेंटाईन डे ला दिसायचंय सुंदर तर असा करा ‘गुलाबपाण्याचा वापर’

Long Distance Relationship: कसा साजरा कराल यंदाचा व्हेलेंटाईन

Valentine’s Day Quotes: नवविवाहित दाम्पत्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’चे कोट

ADVERTISEMENT
08 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT