Long Distance Relationship: कसा साजरा कराल यंदाचा व्हेलेंटाईन

Long Distance Relationship: कसा साजरा कराल यंदाचा व्हेलेंटाईन

दूरी सही जाएना! असे बऱ्याचवेळा Long Distance Relationship असल्यावर होत असते. फोन हा एकमेव आधार असतो जो तुम्हाला एकमेकांपासून बांधून ठेवत असतो. आता व्हेलेंटाईन वीकला सुरुवात होईल तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटण्याची खूप इच्छा असेल. पण दोघांमधील अंतर हे कारण असेल  तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही तुम्हाला व्हेलेंटाईन कसा साजरा करावा याच्या काही आयडियाज देणार आहोत.ज्या फार खर्चिक नाही. हा पण तुम्हाला थोडी पूर्वतयारी नक्कीच करावी लागेल. १४ फेब्रुवारीसाठी तुमच्याकडे आणखी काही दिवस आहेत. लांब पल्ल्याच्या रिलेशनशिप टिप्स वापरून पहा.

surprise2

सरप्राईज द्या

प्रेमात एकमेकांना सरप्राईज द्यायला खूप जणांना आवडते. अगदी साधे साधे सरप्राईजही तुमच्या पार्टनरला पराकोटीचा आनंद मिळवून देतात. व्हेलेंटाईन डेला एकमेकांपासून लांब असलात म्हणून काय झाले. तुम्ही तो दिवस साजरा तर नक्कीच करु शकता. तुमच्या पार्टनरला आनंद देणारी एखादी गोष्ट आठवा आणि ती त्यांना कुरीअर करा. आता यात महागड्या गोष्टी हव्याच असे नाही. तर त्यांचा आवडता पदार्थ पाठवूनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता. शहरांमध्ये ऑनलाईन फूड सर्विस पुरविणाऱ्या साईडवरवरुन तुमच्या पार्टनरच्या घरी किंवा ऑफिसमध्ये हे पार्सल करु शकता. या सरप्राईजला अधिक गोड आणि रोमँटीक करण्यासाठी एखादा फुगा, चॉकलेटचा बॉक्स दिल्यास आणखी उत्तम त्यामुळे तो गोडवा अधिक टिकून राहतो. या झाल्या वस्तू पण शक्य असल्यास सरप्राईज म्हणून तुम्हालाच जाता आलं तर यापेक्षा मोठे गिफ्ट आणि आनंद काहीच असू शकत नाही. कारण तुमच्या एका स्पर्शासाठी  ती/ तो तुमची वाट पाहात असतो. फोनवर जे बोलता येत नाही ते त्यांना समोर येऊन बोलायचे असते.

जीवनावरील मराठी वृत्ती स्थितीबद्दल देखील वाचा

उदा. तुम्ही एकाच राज्यात असाल तर व्हेलेंटाईन नाही पण त्या दरम्यान येणाऱ्या व्हेलेंटाईनला नक्कीच काहीतरी प्लॅन करु शकता. मग ती फक्त मुव्ही डेट असो किंवा डिनर डेट 

प्रेमाने करा दिवसाची सुरुवात

एरव्ही लांब असल्यामुळे सकाळी आवर्जून एकमेकांना गुड मॉर्निंगचा मेसेज करत असाल पण आज तुमचा खास दिवस आहे. दिवसाची सुरुवात ही रोमॅंटिकच व्हायला हवी नाही का? तुम्ही भेटलेला दिवस, तुम्ही घालवलेले चांगले क्षण, फोटोच पुन्हा एकमेकांना शेअर करुन त्यावर बोला. हल्ली तर इतके अॅप आहेत की, तुम्ही तुमच्या फोटोजचा कोलाज करुन त्यावर छान गाणे लावून एखादा व्हिडिओ तयार करु शकता. तो तुम्ही तुमच्या फोनमधून पाठवून शकता. अशा करण्याचा आनंद हा क्षणिक नसेल तर तुमच्या नात्यातील विश्वासही यामुळे अधिक दृढ होईल. कारण Long Distance Relationshipमध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. कोणतीही तक्रार न करता एकमेकांपासून इतके दूर राहून तुम्ही सगळ इतक्या छान पद्धतीने हँडल करत आहात त्यामुळे खरंतरं व्हेलेंटाईन नाही तर प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही छान प्रेमाच्या मेसेजने करायला हवी.

love you msg

किंवा अनेकांना छान कविता करण्याची, लिहिण्याची आवड असते. जर तुमच्या पार्टनरला ते आवडत असेल तर तिला तुम्ही तिच्या/ त्याच्याविषयी लिहिलेले पाठवा.त्यातून तुमचे प्रेम व्यक्त होईलच शिवाय तिला/ त्याला नक्कीच आनंद अधिक होईल.
 
व्हिडिओ कॉल

इतरवेळी तुम्ही तासनंतास जरी व्हिडिओ कॉलवर बोलत असलात तरी व्हेलेंटाईन डे काही खासच असतो. तुम्ही एकमेकांपासून जवळ नसता पण सार्वजनिक ठिकाणी हा दिवस सणासारखा साजरा केला जातो. जिकडे पाहावे तिकडे कपल्स असतात. आपल्या आजूबाजूला असणारी जोडपी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत असतात. अशावेळी तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण येणे साहजिक आहे. अशावेळी वाईट वाटून घेण्यापेक्षा सरळ व्हिडिओ कॉल लावा आणि बोला. इतरवेळी तुम्ही कदाचित कामाबद्दल बोलत असाल पण हा कॉल फक्त तुमच्या दोघांचा आहे. त्यामुळे तुम्ही एखादा प्लॅन करा तेव्हा काय मजा करणार याबद्दल बोला. जर तुम्ही काही गिफ्ट पाठवले असेल तर ते आवडले का?  हे विचारा.तसही बाहेर वातावरण इतकं गुलाबी झालेले असते की, तुम्हाला काय बोलावे असा प्रश्न पडणार नाहीच. हा पण १४ फेब्रुवारीचा व्हिडिओ कॉल हा फक्त प्रेमासाठी, तुम्हा दोघांसाठी केलेला आहे. त्यामुळे तुमच्या दोघांशी संबंधित विषयच बोला.यातून एखादी डेट प्लॅन करण्याचा  एकमेकांसाठी वेळ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा.

face time2

डिनर डेट

आता  Long Distance Relationship मग डिनर डेट कशी शक्य असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ कॉल आहेच ना? दिवस पार्टनरसोबत घालवल्यानंतर आता दिवसाची सांगताही त्याच्यासोबत हवी नाही का? तुम्ही एकटे राहात असाल तर तुमच्या घरी छान कॅडल लाईट डिनरचा सेटअप करा आणि व्हिडिओ कॉलवर एकत्र जेवा. छान गप्पा मारा.

दूरी सही जाएना! असे बऱ्याचवेळा Long Distance Relationship असल्यावर होत असते. फोन हा एकमेव आधार असतो जो तुम्हाला एकमेकांपासून बांधून ठेवत असतो. आता व्हेलेंटाईन वीकला सुरुवात होईल तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटण्याची खूप इच्छा असेल. पण दोघांमधील अंतर हे कारण असेल  तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही तुम्हाला व्हेलेंटाईन कसा साजरा करावा याच्या काही आयडियाज देणार आहोत.ज्या फार खर्चिक नाही. हा पण तुम्हाला थोडी पूर्वतयारी नक्कीच करावी लागेल. १४ फेब्रुवारीसाठी तुमच्याकडे आणखी काही दिवस आहेत. त्यामुळे यातील काही आयडियाज नक्की ट्राय करा.

surprise2

सरप्राईज द्या

प्रेमात एकमेकांना सरप्राईज द्यायला खूप जणांना आवडते. अगदी साधे साधे सरप्राईजही तुमच्या पार्टनरला पराकोटीचा आनंद मिळवून देतात. व्हेलेंटाईन डेला एकमेकांपासून लांब असलात म्हणून काय झाले. तुम्ही तो दिवस साजरा तर नक्कीच करु शकता. तुमच्या पार्टनरला आनंद देणारी एखादी गोष्ट आठवा आणि ती त्यांना कुरीअर करा. आता यात महागड्या गोष्टी हव्याच असे नाही. तर त्यांचा आवडता पदार्थ पाठवूनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता. शहरांमध्ये ऑनलाईन फूड सर्विस पुरविणाऱ्या साईडवरवरुन तुमच्या पार्टनरच्या घरी किंवा ऑफिसमध्ये हे पार्सल करु शकता. या सरप्राईजला अधिक गोड आणि रोमँटीक करण्यासाठी एखादा फुगा, चॉकलेटचा बॉक्स दिल्यास आणखी उत्तम त्यामुळे तो गोडवा अधिक टिकून राहतो. या झाल्या वस्तू पण शक्य असल्यास सरप्राईज म्हणून तुम्हालाच जाता आलं तर यापेक्षा मोठे गिफ्ट आणि आनंद काहीच असू शकत नाही. कारण तुमच्या एका स्पर्शासाठी  ती/ तो तुमची वाट पाहात असतो. फोनवर जे बोलता येत नाही ते त्यांना समोर येऊन बोलायचे असते.

जाणून घ्या व्हेलेंटाईन वीकविषयी

उदा. तुम्ही एकाच राज्यात असाल तर व्हेलेंटाईन नाही पण त्या दरम्यान येणाऱ्या व्हेलेंटाईनला नक्कीच काहीतरी प्लॅन करु शकता. मग ती फक्त मुव्ही डेट असो किंवा डिनर डेट 

प्रेमाने करा दिवसाची सुरुवात

एरव्ही लांब असल्यामुळे सकाळी आवर्जून एकमेकांना गुड मॉर्निंगचा मेसेज करत असाल पण आज तुमचा खास दिवस आहे. दिवसाची सुरुवात ही रोमॅंटिकच व्हायला हवी नाही का? तुम्ही भेटलेला दिवस, तुम्ही घालवलेले चांगले क्षण, फोटोच पुन्हा एकमेकांना शेअर करुन त्यावर बोला. हल्ली तर इतके अॅप आहेत की, तुम्ही तुमच्या फोटोजचा कोलाज करुन त्यावर छान गाणे लावून एखादा व्हिडिओ तयार करु शकता. तो तुम्ही तुमच्या फोनमधून पाठवून शकता. अशा करण्याचा आनंद हा क्षणिक नसेल तर तुमच्या नात्यातील विश्वासही यामुळे अधिक दृढ होईल. कारण Long Distance Relationshipमध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. कोणतीही तक्रार न करता एकमेकांपासून इतके दूर राहून तुम्ही सगळ इतक्या छान पद्धतीने हँडल करत आहात त्यामुळे खरंतरं व्हेलेंटाईन नाही तर प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही छान प्रेमाच्या मेसेजने करायला हवी.प्रेमाचे हे मेसेज करण्यासाठी वापरा नात्याची प्रत्येक भावना मांडणारे कोट्स

love you msg

किंवा अनेकांना छान कविता करण्याची, लिहिण्याची आवड असते. जर तुमच्या पार्टनरला ते आवडत असेल तर तिला तुम्ही तिच्या/ त्याच्याविषयी लिहिलेले पाठवा.त्यातून तुमचे प्रेम व्यक्त होईलच शिवाय तिला/ त्याला नक्कीच आनंद अधिक होईल. 

मुलींचा परफेक्ट बॉयफ्रेंड होण्यासाठी काय कराल?

व्हिडिओ कॉल

इतरवेळी तुम्ही तासनंतास जरी व्हिडिओ कॉलवर बोलत असलात तरी व्हेलेंटाईन डे काही खासच असतो. तुम्ही एकमेकांपासून जवळ नसता पण सार्वजनिक ठिकाणी हा दिवस सणासारखा साजरा केला जातो. जिकडे पाहावे तिकडे कपल्स असतात. आपल्या आजूबाजूला असणारी जोडपी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत असतात. अशावेळी तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण येणे साहजिक आहे. अशावेळी वाईट वाटून घेण्यापेक्षा सरळ व्हिडिओ कॉल लावा आणि बोला. इतरवेळी तुम्ही कदाचित कामाबद्दल बोलत असाल पण हा कॉल फक्त तुमच्या दोघांचा आहे. त्यामुळे तुम्ही एखादा प्लॅन करा तेव्हा काय मजा करणार याबद्दल बोला. जर तुम्ही काही गिफ्ट पाठवले असेल तर ते आवडले का?  हे विचारा.तसही बाहेर वातावरण इतकं गुलाबी झालेले असते की, तुम्हाला काय बोलावे असा प्रश्न पडणार नाहीच. हा पण १४ फेब्रुवारीचा व्हिडिओ कॉल हा फक्त प्रेमासाठी, तुम्हा दोघांसाठी केलेला आहे. त्यामुळे तुमच्या दोघांशी संबंधित विषयच बोला.यातून एखादी डेट प्लॅन करण्याचा  एकमेकांसाठी वेळ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा.

face time2

डिनर डेट

आता  Long Distance Relationship मग डिनर डेट कशी शक्य असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ कॉल आहेच ना? दिवस पार्टनरसोबत घालवल्यानंतर आता दिवसाची सांगताही त्याच्यासोबत हवी नाही का? तुम्ही एकटे राहात असाल तर तुमच्या घरी छान कॅडल लाईट डिनरचा सेटअप करा आणि व्हिडिओ कॉलवर एकत्र जेवा. छान गप्पा मारा.

 dinner date

रोमँटिक होण्यासाठी नेहमीच जवळ असायला हवे असे नाही. काही गोष्टी अशा नात्यांमध्ये शक्य नसतात. त्यामुळे थोडी तडजोड तर करावीच लागते. अशा प्रकारची डिनर डेट तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल तर नक्की करुन पाहा मस्त वाटेल. तुम्हाला प्रेम व्यक्त करण्याची छान संधीही यातून मिळतेच

प्रेम करता ? पण घरी सांगायला घाबरता?

प्लॅन करा छान टूर

इतर कपल्ससारखे तुम्हाला वीकेंडला भेटणे. बाहेर जाणे शक्य नसते. त्यामुळे तुम्ही किमान महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा एखादी टूर नक्कीच प्लॅन करु शकता. या दिवलाचे औचित्यसाधून छान टूर प्लॅन करा.या टूर प्लॅनमध्ये तुम्ही किती पैसा खर्च करता यापेक्षाही महत्वाचे आहे ते तुम्ही एकत्र वेळ घालवणे त्यामुळे तुम्हाला दोघांना आवडेल अशा ठिकाणी एक छोटी टूर प्लॅन करा. त्या प्लॅनिंगचा आनंद तुमच्यामधील भेटण्याची ओढ अधिक वाढवत असतो.

tour plan

टूर प्लॅन करताना छान रोमँटिक ठिकाणे निवडा. शक्यतो खूप गर्दीची ठिकाणे निवडू नका, असे ठिकाण जिकडे शांतता   असेल आणि तुम्हा दोघांना चागंला वेळ घालवता येईल. हल्ली अशी अनेक रिसोर्टस आहेत जिथे तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येतो किंवा एखादे ट्रेकिंग प्लॅन करण्यातही काहीच हरकत नाही.

सगळे दिवस साजरे करा

तुमच्यातील अंतरामुळे प्रत्येकवेळी तुम्हाला भेटता येणे शक्य नसते. पण ज्यावेळी तुम्ही टूरचा प्लॅन कराल. त्या दिवशी आपण सगळे डे साजरे करु असे आश्वासन द्या. त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा.तुम्ही किती दिवस एकत्र नव्हता त्यापेक्षा आता एकत्र येणार आहोत या आनंद साजरा करण्यासाठी तयारी करा. तुम्ही न भेटलेल्या काळात सेलिब्रेशन करायचे राहून गेलेल दिवस आठवा आणि त्यानुसार तयारी करा. 

celebration

उदा. तुमचा मंथली टुगेदर दिवस राहून गेला असेल, वाढदिवस साजरे करायला कपल्सना आवडत असतात. पण अंतरामुळे ते तुम्हाला प्रत्येकवेळी जमत नाही.

वाचा - दीर्घ अंतर रिलेशनशिप टिप्स

हे टाळा 

खूप जणांना हा दिवस साजरा करायला आवडत नाही कारण त्यांच्यासाठी सगळेच दिवस प्रेमाचे असतात. मान्य आहे. पण तुमच्या पार्टनरला या दिवसाची उत्सुकता असेल हा दिवस साजरा करण्याची इच्छा असेल तर तिच्यासाठी नक्कीच या पैकी काहीतरी करा. 

समोरची व्यक्ती समजून घेईल असे गृहीत धरुन काहीही न करणे म्हणजे अगदीच चुकीचे आहे. तुम्हाला कामामुळे वेळ नसेलही कदाचित पण एक फोनही समोरच्याला आनंद देऊ शकतो.

तुला काय हवे? असे प्रश्न विचारुन अनेकदा कपल्स सरप्राईजचा विचका करतात. तसं अजिबात करु नका. स्वत:हून काहीतरी प्रयत्न करा

इतरांना गिफ्ट काय मिळाले? त्या तुलनेत तुम्हाला काय मिळत आहे या गोष्टीची तुलना करणेही वाईट आहे. 

तुमच्या दोघांमधील प्रेम हे तुम्हाला बांधून ठेवत असते. व्हेलेंटाईन डे फक्त प्रेम व्यक्त करण्याचे निमित्त आहे. या दिवशी खरेच काही शक्य नसेल तर गैरसमज करुन नात्यात दुरावा आणू नका. तुमचा प्रत्येक क्षण हा व्हेलेंटाईन आहे हे लक्षात ठेवा.

   (सौजन्य- Giphy,Instagram)