ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)

पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद अनुभव असतो. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत करिअरमागे धावताना अनेकींना आई होण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागतो. कधी कधी उशीरा लग्न झाल्यामुळे देखील काहीजणींना वयाच्या पस्तिशी अथवा चाळीशीनंतर गर्भधारणेसाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. वास्तविक निसर्गनियमानुसार स्त्रीने योग्य वयात गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. वयाच्या पंचविशीपर्यंत प्रयत्न केल्यास गर्भधारणा होणे फार सोपे असते. मात्र तिशीनंतर गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण तिशीच्या आतील वयाच्या महिलांची फर्टीलिटी उत्तम असते. वाढत्या वयामुळे तिच्या शरीरात निर्माण होणाऱ्या स्त्रीबीजाची संख्या कमी होते. शिवाय वयाच्या प्रत्येक टप्पावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. त्यामुळे तिशीनंतर तिच्या शरीरातील गर्भधारणेसाठी आवश्यक हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात. ज्यामुळे गर्भधारणा होणे कठीण असते. शिवाय गर्भधारणा  राहिली तरी तो गर्भ टिकण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पस्तिशीनंतरच्या महिलांना वंधत्व अथवा मिसकॅरेजचा सामना अधिक प्रमाणात करावा लागतो.

वैद्यकीय उपचार करून अथवा कृत्रिम पद्धतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करून आज अनेक जोडपी माता-पिता होण्याचा आनंद घेत आहेत. आय.यु.आय, आय,व्ही.एफ अथवा सरोगसीच्या माध्यमातून मातृत्व मिळणे काळानुरूप सोपे झाले असले तरी नैसर्गिक पद्धतीने आई होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकजणी आजही आहेत. शिवाय गर्भधारणेसाठी केले जाणारे हे वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परडवण्यासारखे मुळीच नाहीत. शिवाय या उपचारांसाठी तुमचं शरीर आणि मन दोन्हींच्या तयारीची गरज आहे. मात्र जेव्हा तुम्ही कोणतेही उपचार न घेता सहज आई होणार आहात हे तुम्हाला समजते तो क्षण एक अद्भूत क्षण असू शकतो. या क्षणाला प्रत्येक गरोदर स्त्रीच्या काळजाचा ठोका एका क्षणासाठी तरी चुकतोच. एक जीव आपल्या शरीरात नैसर्गिक पद्धतीने निर्माण होत आहे ही भावनाच अतिशय सुखद असते. म्हणूनच पस्तिशीनंतरही नैसर्गिक पद्धतीने आई होणं कसं सोपं आहे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जीवनशैलीत आवश्यक बदल करून तुम्ही पस्तिशीनंतरही नैसर्गिक पद्धतीने आई होऊ शकता. यासाठी आम्ही दिलेल्या या टीप्स अवश्य फॉलो करा. ज्यांचा तुम्हाला गर्भारपणापासून ते आई होई पर्यंत सर्वच टप्पावर फायदाच होईल.

sameera

पस्तिशीनंतर मातृत्व स्विकारणाऱ्या महिलांसाठी खास टीप्स (How to get pregnant after thirty five)

आई होण्याचा निर्णय घेण्याआधी तज्ञांकडून योग्य समूपदेशन घ्या 

तिशीनंतर जेव्हा तुम्ही आई होण्याचं स्वप्न पाहता तेव्हा तुम्हाला योग्य समूपदेशानाची गरज असते. यासाठी एखाद्या गायनॅकचा सल्ला अवश्य घ्या. गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याआधी तुम्हा दोघांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या जरूर करून घ्या. ज्यामुळे तुमच्या गर्भातील स्त्रीबीजांची संख्या, जोडीदाराच्या शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता, तुमच्या दोघांच्या हॉर्मोन्सची पातळी, तुमच्या गर्भाशयाची क्षमता या सर्व गोष्टींचा तपशील तुमच्या लक्षात येऊ शकेल.

गर्भाचे वजन वाढण्यासाठी पोषक आहार

ADVERTISEMENT

नियमित व्यायाम आणि  योगासने करा

तुम्हाला आई होण्याची प्रबळ इच्छा असेल तर नियमित व्यायामाला सुरूवात करा. कारण व्यायाम आणि योगासनांमुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हींही निरोगी राहील.शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि प्रजननसंस्था सुधारेल.

Post Pregnancy Weight Loss Pranayama 5

संतुलित आहार घ्या

योग्य आहार तुमच्या शरीरासाठी फार गरजेचा आहे. कामाच्या गडबडीत जर तुम्ही दररोज जंक फुड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खात असाल तर ते आता त्वरीत बंद करा. संतुलित आणि योग्य आहार घेण्यास सुरूवात करा.ताज्या भाज्या, फळे आणि धान्यांमधून तुम्हाला पुरेसे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतील.फॉलिक अॅसिड, ओमेगा 3 फॅटी अॅसिड,व्हिटॅमिन्स मिळतील असे पदार्थ खाण्यास सुरूवात करा. जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ खाण्यावर ङर द्या. भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त अन्नाचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. कॉफी अथवा कॅफेनयुक्त पदार्थ खाणे टाळा. कारण अती प्रमाणात कॉफी घेतल्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

pregnancy foods

जोडीदाराला पुरेसा वेळ द्या

कामाच्या गडबडीत जर तुम्ही जोडीदाराला पुरेसा वेळ देत नसाल तर आतापासून याबाबत योग्य विचार करा. वाढत्या वयानुसार स्त्री आणि पुरूष दोघांच्याची शरीरातील लिबीडो अर्थात सेक्सच्या इच्छेचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे आई होण्यासाठी दोघांनी एकमेकांना पुरेसा वेळ देणं गरजेचं  आहे. सेक्स करताना तुम्हाला आनंद मिळावा यासाठी दोघांचा मुड चांगला राहील याची विशेष काळजी घ्या.

pregancy 1

ओव्हूलेशन किट वापरा

आजकाल बाजारामध्ये प्रेग्नसी किटप्रमाणे ओव्हूलेशन किटदेखील उपलब्ध असतात. या किटमुळे तुम्हाला तुमच्या ओव्हूलेशनचा काळ समजू शकेल. कारण गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही योग्य काळात म्हणजेच तुमच्या फर्टायल पिरिएडमध्येच सेक्स करणे गरजेचे आहे.मासिक पाळी सुरू झाल्याच्या आठव्या दिवसापासून ते एकोणीसाव्या दिवसापर्यंत हा काळ असू शकतो. त्यामुळे या दिवसांमध्ये सेक्स केल्यास गर्भधारणेची शक्यता अधिक असते.

ADVERTISEMENT

योनीमार्गातील स्त्रावाचे निरिक्षण करा

ओव्हूलेशन होण्यापूर्वी पाच दिवस आधी तुमच्या व्हजायनामधून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाचा रंग बदलण्यास सुरूवात होते. त्यामुळे या दिवसांमध्ये सेक्स केल्यास शूक्राणू अंडाशयामध्ये पोहचण्याची संधी  अधिक प्रमाणात वाढते. हा काळ ओळखून त्या दिवसांमध्ये शरीर संबध ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही लवकर प्रेगन्ट व्हाल.

वजनावर नियंत्रण ठेवा

जर तुम्हा नैसर्गिक पद्धतीने आई व्हायचं  असेल तर तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. अती वजन आणि चुकीची जीवनशैली यामुळे ओव्हूलेशन होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय वजन अती प्रमाणात कमी असेल तरीही तुम्हाला गर्भधारणेसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमचे वजन तुमच्या वय आणि उंचीनुसार योग्य आहे का हे जरूर पहा.

esha deol 5

ताण-तणावापासून दूर रहा

कामाचा अती ताण असेल तर त्याचा परिणाम तुमच्या झोप आणि मानसिक आरोग्यावर होतो. आई होण्यासाठी तुमचे मन प्रसन्न असणे तितकेच गरजेचे आहे. कामाचा ताणापासून काही दिवसांसाठी दूर रहा.

स्वतःच्या मनाने कोणतेही ओ.टी.सी औषधं घेऊ नका

अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी, ताप आणि सर्दीसारख्या आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधे  घेण्याची सवय असते. ओ.टी.सी अर्थात Over The Counter औषधांचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. शिवाय तुम्हाला गर्भधारणा नेमकी केव्हा होणार हे माहित नसल्यामुळे गर्भ राहिल्यास अशा औषधांचा गर्भावरदेखील चुकीचा परिणाम होऊ शकतो. सुदृढ बाळ हवे असेल तर कोणत्याही आरोग्य समस्येसाठी फक्त डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार करा.

ADVERTISEMENT

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

आजकाल अनेक महिलांना कामाचा ताण कमी करण्यासाठी धूम्रपान अथवा मद्यपान करण्याची सवय असते. बऱ्याच ऑफिसमध्ये यासाठी खास स्मोकिंग झोन तयार करण्यात येतात. शिवाय पार्टीमध्ये थोडे मद्यपान करण्यास काहीच हरकत नाही हा ट्रेंडही सध्या वाढत आहे. विकऐंड सेलिब्रेशनसाठी सहज पब आणि पार्टीला जाण्याची फॅशन आहे. मात्र जर तुम्हाला आई व्हायचं असेल तर तुम्हाला व्यसनांपासून दूर राहण्याची विशेष गरज आहे. कारण याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. संशोधनानुसार धूम्रपानातील घातक निकोटीन घटकामुळे गर्भाशय,फॅलोपाईन ट्युब,अंडाशय आणि पुरूषांमधील शूक्राणूंच्या संख्येवर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतल्यावर मद्यपान आणि धूम्रपान करणे प्रयत्नपूर्वक टाळा.

या सर्व टीप्स सोबतच तुमचा स्वतः बाबतचा दृष्टीकोनही फार महत्त्वाचा आहे. आई होण्यासाठी तुमचे मन प्रसन्न असणे फार गरजेचे  आहे. सकारात्मक विचारसरणी आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास तुम्हाला आई होण्यासाठी प्रेरणा देईल. शिवाय आई होण्याचा निर्णय हा सर्वस्वी तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा असायला हवा. आई होण्याचा निर्णय कोणाच्या दडपणाखाली किंवा इतरांची मर्जी राखण्यासाठी घेऊ नका. मातृत्व ही एक स्त्रीला पूर्णत्व देणारी एक भावना आहे. त्यामुळे आई होण्याची जबाबदारी तुम्ही स्वतःहून स्विकारायला हवी. त्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आई व्हायचे असेल तर जीवनशैलीमध्ये काही सोपे बदल करून या भावनेचा आनंद घ्या. तुम्हाला वयाच्या तिशीनंतर आई होणं सहज शक्य आहे फक्त ते आईपण तुम्ही मनापासून स्विकारलं असेल तरच. आई होण्यासाठी तुम्ही आज जे प्रयत्न करत आहात ते मनापासून आणि सकारात्मक दृष्टीकोनातून करा ज्यामुळे तुम्हाला यात नक्कीच चांगलं यश मिळेल. तुम्हाला आमच्या या टीप्स कशा वाटल्या आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

ADVERTISEMENT

नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Stretch Marks : प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

Pregnency Week By Week In Marathi

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम  आणि शटरस्टॉक

18 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT