तुम्ही कधी हे नोटीस केलं आहे का?, जेव्हा तुमची झोप व्यवस्थित किंवा 8 तास पूर्ण होत नाही. तेव्हा तुम्हाला दिवसभर कंटाळवाणं वाटतं आणि चिडचिडेपणाही वाढतो. असं का होतं, कारण आपल्याला मेंदूला जितका आराम मिळायला हवा तितका मिळत नाही. विशेषतः महिलांना नेहमीच झोपेच्या बाबतीत तडजोड करावी लागते. सकाळी सर्वात आधी उठावं लागतं आणि रात्री सर्वात शेवटी झोपणारी व्यक्तीही तीच असते. मग ती वर्किंग वुमन असो वा गृहीणी असो. दोघींचीही झोप कधीच पूर्ण होत नाही. पण हे योग्य नाही. कारण आपण जितकं काम करतो तितकाच आरामही केला पाहिजे. एका संशोधनानुसार असं आढळलंय की, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते.
काय म्हणतो रिसर्च
पुरूषांच्या तुलनेत महिलांचं मेंदू जास्त जटील असतो आणि याच कारणांमुळे त्यांना 20 मिनिटं जास्त झोपेची गरज असते. हा रिसर्च तब्बल 210 पुरूष आणि महिलांवर करण्यात आलेल्या एका टेस्टनंतर समोर आला.
ही आहेत कारणं
– महिलांच्या मेंदूला दररोज पुरूषांच्या तुलनेत जास्त कसरत असते.
– मुलांना संभाळणं, घरातली महत्त्वाची कामं, काही वेळा अगदी नवऱ्याच्या घोरण्यामुळेही महिलांची झोप पूर्ण होत नाही.
– पुरुषांच्या तुलनेत महिला या पाचपट वेगाने मेंदूच्या सूचनांचं आदान-प्रदान करतात.
– मल्टीटास्कींग असल्यामुळे महिलांचा मेंदू लवकर थकतो.
जाणून घ्या कोणत्या वयात घ्यायला हवी किती तास झोप
– 18 ते 25 वयाच्या मुलींनी जवळपास 7 ते 9 तास झोप घ्यायला हवी.
– 26 ते 45 वयाच्या महिलांनी जवळपास 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. कारण या वयात गाढ झोप लागत नाही आणि कमी झोप घेतल्यामुळे तुमच्या वजनावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
– 45 ते 60 वयाच्या महिलांनी 7 तास झोप घेणं गरजेचं आहे.
– 60 पेक्षा अधिक वयाच्या महिलांनी 7 ते 8 तास झोप घेणं पुरेसं आहे. पण या वयात शक्यतो झोप लागतच नाही किंवा पहाटे लवकर जाग येते.
Also Read About झोपेचे महत्त्व
चांगली आणि शांत झोप घेण्यासाठी टीप्स
– झोपण्याआधी आंघोळ करा. आपल्या शरीराचं तापमान जेव्हा सामान्य असतं तेव्हा झोप चांगली लागते.
– झोपण्याआधी चहा, कॉफी किंवा या प्रकारच्या एनर्जी ड्रींक्सचं सेवन करू नये. हो पण तुम्ही गरम दूध घेऊ शकता. यामुळे झोप चांगली लागते.
– मोबाईल किंवा टीव्ही पाहत झोपण्याची सवय बदलायला हवी. कारण यामुळे झोप लगेच लागत नाही.
– जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये झोपायला जाणार असाल तेव्हा दिवसभरातील गोष्टींबद्दल विचार करू नका. कारण यामुळे शांत झोप लागत नाही. कधीही झोपायच्या आधी एखाद्या सकारात्मक गोष्टींबाबत विचार करा.
मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा छानपैकी झोप घ्या कारण स्ट्राँग वुमन बनण्यासाठी स्ट्राँग ब्रेन असणंही आपल्याच हातात आहे. त्यामुळे मेंदूला आवश्यक तेवढा आराम नक्की द्या आणि स्वतःही करा.
या वीकेंडला नक्की सेलिब्रेट #WorldSleepDay वीकेंड आणि घ्या भरपूर झोप.
हेही वाचा –
‘साईबाबांची ११ वचनं’ जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता दूर करतील
यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज