ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’

उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’

उन्हाळ्यात कितीही पाणी प्या ते कमीच असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर तुम्हाला दमल्यासारखे होते. उन्हाळ्यात हायड्रेटेड नसलो कि मी निरनिराळ्या त्रासांना सामोरे जावे लागते, जसे कि लघवी च्या जागी जळजळ होणे, उन्हाळी लागणे इत्यादी. तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहावे  यासाठी तुम्ही फळांचे सेवन करणेही आवश्यक असते. उन्हाळ्यात तुम्ही कोणती 5 फळे आवर्जून खायला हवी ते आम्ही सांगणार आहोत. शिवाय फळं खाण्याच्या वेळा काय असायला हव्यात हे देखील सांगणार आहोत. मग ही 5 फळं कोणती ते पाहुयात

 कलिंगड (Watermelon)

watermelon-1

तुळशीच्या पानांचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

90% पाणी असलेले फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्याच्या दिवसात लाल चुटूक कलिंगड खाण्याचा मोह होत नसेल असे फारच कमी लोक असतील. आता या फळामध्ये 90% पाणी आहे म्हटल्यावर हे उन्हाळ्यासाठी खास असे फळ आहे. मुळात शरीरातील उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याची क्षमता कलिंगडामध्ये असते. कलिंगड कापल्यानंतरत त्यातील पाण्यामुळे त्यात असणारा थंडावा तम्हाला जाणवतो. म्हणून ठिकठिकाणी बाजारात कलिंगडाचे काप विकत मिळतात. याशिवाय कलिंगडाचे फायदा सांगायचा झाला तर  तुमच्या पोटातील टॉक्झिक मुत्रावाटे बाहेर काढण्यास कलिंगडाची मदत होते. विष्ठा देखील अगदी स्वच्छ होते आणि तुमची त्वचा देखील अधिक तजेलदार दिसते.

ADVERTISEMENT

खरबूज (Musk melon)

muskmelon

आता कलिंगडाचा छोटा भाऊ म्हणजे खरबूज किंवा शक्करकंज… पाण्याचे भरलेला खरबूजाची चव कलिंगडापेक्षा फारच वेगळी असते. याचा गर पिवळ्या रंगाचा असतो. या फळातही भरपूर पाणी असते. त्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. खरबूज अनेक गोष्टींसाठी चांगले असते. उन्हाळ्यात अनेक आजार डोकं वर काढतात. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरबूज हे उत्तम फळ आहे. त्वचा सुधारण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि तुमची पचनक्रिया सुलभ करण्याचे काम खरबूज करतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही खरबूज आवर्जून खायला हवे.

पदार्थांचे असे कॉम्बिनेशन ठरु शकते तुमच्या आरोग्यासाठी घातक

द्राक्षे (Grapes)

ADVERTISEMENT
grapes

साधारण जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात बाजारात द्राक्षे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. द्राक्षांमध्ये पोटॅशिअम आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. या फळामध्ये पाणी असते. जे तुम्हाला हायड्रेट ठेवते. तुमचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ह्रदयविकार नियंत्रमात ठेवण्यास द्राक्ष मदत करतात. याशिवाय तुमच्या मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम द्राक्ष करते. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही द्राक्षे खायलाच हवी.

तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा या गोष्टी

ताडगोळा (Ice Apple)

targola

पाणीदार फळामध्ये आणखी एक महत्वाचे फळ आहे ते म्हणजे ताडगोळा. आता सर्रास नाक्यानाक्यावर ताडगोळावाला तुम्हाला बसलेला दिसेल. ताडगोळ्यांमध्ये पोटॅशिअम असते. जे तुमच्या शरीरातील टॉक्झिक बाहेर काढण्यासाठी खूप चांगले आहे. आता हे फळ खाल्ले तर तुम्ही हायड्रेट राहाल.  उन्हाळ्यात अनेकांना रॅशेश देखील उठतात अशावेळी ताडगोळा रॅशेश झालेल्या ठिकाणी फिरवा. तुम्हाला आराम मिळेल.

ADVERTISEMENT

*ताडगोळा घेताना तो मऊ आणि अाकाराने लहान घ्या. कारण जुन झालेल्या ताडगोळ्यात पाणी नसते. पाणी नसल्यामुळे त्याचा गर चविष्ट लागत नाही. त्यामुळे चांगला पाणीदार ताडगोळा निवडा.

जाम (Water Apple)

water apple

फिक्कट हिरव्या रंगाची फळ अर्थात जाम ही उन्हाळ्यातच जास्त दिसतात. हे फळ  असते लहान पण यात भरपूर पाणी असते. वेगवेगळ्या ठिकाणी याची लागवड केली जाते. त्यानुसार या फळाची चव आणि रंग बदलतो. आपल्या बाजारात फिक्कट हिरव्या रंगाची फळे मिळतात. तर  अनेक ठिकणी यांचा रंग गुलाबी असतो. या फळामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. या फळाची कोशिंबीर करुनही तुम्ही खाऊ शकता.

 फळं सेवन करण्याची योग्यवेळ कोणती?

ADVERTISEMENT
  • फळ खाण्याच्याही वेळा असतात.कधीही उठून फळे खाऊन चालत नाही.  तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये फळे खाऊ शकता. सकाळी फळं खाल्यामुळे तुम्हाला ताकद मिळते शिवाय तुम्ही फ्रेश देखील राहता. या शिवाय जेव्हा 4 ते 5दरम्यान जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा देखील तुम्ही फळं खाऊ शकता.
  • दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर कधीही फळे खाऊ नका. कारण जेवणानंतर तुम्ही  जेव्हा फळ घेता तेव्हा तुमची साखर वाढते. जी साखर वाढ आरोग्यासाठी चांगली नसते.

पुढे वाचा – 

Muskmelon Nutrients in Hindi

(फोटो सौजन्य- Shuttrstock,instaram)

31 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT