ब्लॅकहेड्स म्हणजे चेहऱ्यावरील सौंदर्यावर एक डागच. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करून ब्लॅकहेड रिमूव्हर नीडलाचा वापर केला जातो. तर कधीतरी खूपच त्रास सहन करावा लागतो. कितीही प्रयत्न केला तरीही हे ब्लॅकहेड्स पूर्णपणे जात नाहीत. धूळ, माती, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल यामुळे चेहऱ्यावर येणारे हे ब्लॅकहेड्स संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. ब्लॅकहेड्स त्वचेमधील पोर्स बंद होण्याचे मुख्य कारण ठरतात. यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही आणि परिणामी त्वचेवर डाग आणि पिंपल्स तयार होऊ लागतात. पण तुम्हाला या ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवायची असेल तर आता पार्लरमध्ये जायची अथवा कोणत्याही त्रासातून जायची नक्कीच गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या घरीच यावर सहज आणि सोपे उपाय करू शकता. आपल्या ब्लॅकहेड्सपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. पण त्याआधी ब्लॅकहेड्स म्हणजे नक्की काय हे पाहूया –
Table of Contents
ब्लॅकहेड्स म्हणजे नक्की काय? (What is blackheads)
ब्लॅकहेड्स त्वचेवर येणारे छोटी छोटी छिद्र असतात, जी आपल्या त्वचेवर असणारे हेअर फॉलिकल्स बंद झाल्यामुळे दिसू लागतात. याच छिद्रांना ब्लॅकहेड्स असं म्हटलं जातं. साधारणतः ब्लॅकहेड्स हे चेहऱ्यावरच दिसातात. पण कधीकधी काही लोकांच्या शरीराच्या इतर भागांवर अर्थात मान, छाती, पाठ, हात आणि खांद्यावरही दिसतात. त्वचेवर डागाप्रमाणे दिसणाऱ्या या ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवणं नक्कीच शक्य आहे. त्यामुळे या ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य उपायांवर लक्ष द्यायला हवं. पण त्याआधी ब्लॅकहेड्स आपल्या त्वचेवर कसे आणि का निर्माण होतात याची कारणं जाणून घेऊया.
वाचा – घरच्या घरी या सोप्या पद्धतीने काढता येतील ब्लॅकहेड्स
ब्लॅकहेड्स होण्याची मुख्यं कारणं (Reasons of Blackheads)
ब्लॅकहेड्स होण्याची अनेक कारणं असू शकतात…
1- वय आणि हार्मोनल परिवर्तन ही ब्लॅकहेड्सची मुख्य कारणं आहेत. वास्तविक हे कोणत्याही वयात दिसतात. पण पिंपल्सच्या लक्षणाप्रमाणेच ब्लॅकहेड्सदेखील तरूणपणात जास्त असतात. तरूणपणाशिवाय मासिक पाळीसंबंधित हार्मोनल परिवर्तन, गर्भावस्था आणि बर्थ कंट्रोल पिल्स अर्थात गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोगदेखील महिलांमध्ये ब्लॅकहेड्स होण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
2- अधिक मेकअप उत्पादनांचा वापरदेखील त्वचेवरील छिद्र बंद करू शकतात आणि त्यामुळे ब्लॅकहेड्स तयार होतात.
3- जास्त प्रमाणात घाम येणं हेदेखील ब्लॅकहेड्सचं मुख्य कारण आहे. त्यामुळेच तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना या समस्येला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं.
4- जास्त प्रमाणात औषधांचं सेवन केल्यासदेखील ब्लॅकहेड्स येतात.
ब्लॅकहेड्स येण्यापासून कसं थांबवायचं (How to stop blackheads)
तसं तर तुम्ही ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी बरेच घरगुती उपाय आणि उपचार करू शकता. पण ते येऊ न देणं हे जास्त चांगलं आहे. हो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लॅकहेड्स येण्यापासून थांबवू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो हे नक्की कसं
1- नियमित स्वरूपात रोज चेहरा धुवा
आपल्या चेहऱ्यावरली घाण आणि तेल घालवण्यासाठी रोज नियमित स्वरूपात आपला चेहरा धुवायला हवा. वास्तविक केवळ दोन वेळा चेहरा दिवसातून धुवावा. कारण यापेक्षा अधिक वेळा चेहरा धुतल्यास, त्वचा कोरडी होऊ शकते. चेहरा धुण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रोमछिद्र बंद होणार नाहीत आणि ब्लॅकहेड्स होण्याची शक्यतादेखील कमी होईल.
2- ऑईल फ्री क्लिन्झरचा वापर
चेहरा धुताना केवळ पाण्याचाच वापर करू नका. तर तुम्ही चेहरा धुत असताना ऑईल फ्री क्लिन्झरचा वापर करा. यामुळे त्वचा ऑईल फ्री राहील आणि ब्लॅकहेड्सदेखील कमी होतील.
3- झोपण्यापूर्वी मेकअप काढा
कधीही झोपताना आपल्या चेहऱ्यावरील मेकअप काढायला विसरू नका. कारण मेकअप लाऊन तसंच झोपल्यास, रोमछिद्र बंद राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लॅकहेड्स येण्याला संधी मिळते. त्यामुळे तुम्ही मेकअप काढून झोपा. शिवाय मेकअप काढण्यासाठी चांगल्या दर्जाचा मेकअप रिमूव्हर वापरा. याशिवाय महिन्यातून एक वेळ फेस क्लिनअप नक्की करून घ्या.
4- व्यायाम अथवा खेळानंतर नक्की आंघोळ करा
तुम्ही शारीरिक श्रम अधिक प्रमाणात करत असाल, अर्थात व्यायाम अथवा कोणत्या खेळामध्ये सहभागी असाल तर त्यानंतर आंघोळ करणं आवश्यक आहे. कारण आंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीरातील घाम निघून जाईल आणि ब्लॅकहेड्स तुमच्यापासून लांबच राहतील. याशिवाय जास्त हार्ड साबणाचा वापर करू नका. तुमच्या त्वचेसाठी सॉफ्ट आणि पीएच बॅलेन्स्ड असणारे स्किन वॉश जास्त चांगले आहेत. त्यामुळे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा.
5- पोषणयुक्त आहार खा
पोषणयुक्त आहार तुमच्या त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्या तुमच्यापासून दूर ठेवतो. तुम्ही जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. यामुळे ब्लॅकहेड्स येण्यापासून तुम्ही थांबवू शकता. साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळा. तळलेले पदार्थ आणि मिठाई खाऊ नका. दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी प्या. हिरव्या भाज्या आणि फळं जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा.
वाचा – स्क्रबिंग करायची योग्य वेळ काय आहे: त्वचेची काळजी आणि रूटीनसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
ब्लॅकहेड्स दूर करण्याचे घरगुती उपाय
उपाय 1– लिंबू, मध आणि ऊस घ्या. अर्ध्या लिंबाच्या रसामध्ये मध आणि ऊसाचा रस मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लाऊन काही वेळ सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. असं तुम्ही आठवड्यातून एक वेळा करा. काही आठवड्यातच तुम्हाला तुमच्या त्वचेवरील ब्लॅकहेड्स निघून गेलेले दिसतील.
उपाय 2– व्हॅसलिन आणि प्लास्टिक रॅप. ब्लॅकहेड असलेल्या भागावर व्हॅसलिन लावा आणि त्यावर प्लास्टिकने रॅप करा. आता प्लास्टिक रॅप केल्यावर त्यावर गरम टॉवेल तोपर्यंत ठेवा जोपर्यंत तो टॉवेल खोलीच्या तापमानाइतका थंड होत नाही. आता टिश्यू पेपरच्या मदतीने चेहऱ्यावर लावलेलं व्हॅसलिन साफ करून घ्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर लोशन लावा. आंघोळ केल्यानंतर तुम्ही हा उपाय केल्यास, तुम्हाला याचे परिणाम जलद मिळतील. कारण आंघोळ केल्यावर तुमचे पोर्स ओपन होतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स निघायला सोपं जातं.
उपाय 3– नारळ तेल आणि इसेन्शियल ऑईल. नारळाचं तेल तुमच्या त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. तुम्हाला ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी इतकंच करायचं आहे की, एका भांड्यात साधारण पाव चमचा तेल घ्या आणि ते 10 ते 15 सेकंसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. आता त्यात लिंबू, लव्हेंडर आणि ट्री टी ऑईलचे 10- 10 थेंब घाला. आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिक्स्चर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या सहाय्याने लावा. लक्षात ठेवा की, हे मिश्रण बंद बाटलीत भरून ठेवा. तसंच खोलीच्या तापमानात हे मिश्रण ठेवा.
उपाय 4– दालचीनी आणि ओट फ्लोअर. 1 चमचा दालचीनी पावडरमध्ये एक चमचा ओट फ्लोअर मिक्स करून घ्या. आता यामध्ये थोडं कोमट पाणी घालून त्याची जाडी पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या चेहऱ्याला लावा. एक मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर या पेस्टने स्क्रब करा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवा. असं केवळ महिन्यातून दोन वेळा करा.
उपाय 5– ओटमील, दही, मध आणि ऑलिव्ह ऑईल. कपामध्ये पाव कप ओटमील, दोन चमचे दही, त्यात दोन चमचे मध आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. हे सर्व नीट मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर 1- 2 मिनिट्स लाऊन स्क्रब करा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तुमची त्वचा जर जास्तच संवेदनशील असेल तर स्क्रब करू नका. तसं असेल तर ही पेस्ट मास्कप्रमाणे लावा आणि चेहऱ्यावर 5 ते 7 मिनिट्स लाऊन ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. असं तुम्ही आवठड्यातून दोन वेळा करू शकता.
उपाय 6– अंड्याचा सफेद भाग. त्यासाठी तुम्हाला एका अंड्याचा सफेद भाग घेऊन त्यात एक चमचा मध नीट मिसळून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या चेहऱ्यावर हे मिश्रण लावा. सुकल्यानंतर धुवा. हा फेस मास्क आठवड्यातून एक अथवा दोन वेळा तुम्ही लाऊ शकता. अंड्याचा सफेद भाग त्वचेमध्ये टायटनिंग आणतो आणि मध त्वचेमध्ये चमक आणण्याचं काम करते.
उपाय 7– कोरफड त्वचेची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक आणि चांगला घरगुती उपाय आहे. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून रोमछिद्र उघडली जातात. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला ताजी कोरफड घेऊन त्याची जेल घ्या आणि ती चेहऱ्यावर लावा. जेव्हा चेहऱ्यावर जेल सुकेल तेव्हा कोमट पाण्याने त्वचा साफ करा. तुम्ही रोज हा प्रयोग दिवसातून एकदा करू शकता. नैसर्गिक गुणांनी युक्त कोरफड असल्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान पोहचू देत नाही.
उपाय 8– बेकिंग सोडा आणि पाणी. बेकिंग सोडा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतोच. तुमच्या त्वचेमधील घाण आणि डेड स्किन काढून टाकण्याचं काम बेकिंग सोडा चांगल्या प्रकारे करतो. त्यासाठी दोन मोठे चमचे बेकिंग सोडा आणि दोन मोठे चमचे पाणी घेऊन मिक्स करा. आपल्या चेहऱ्यावर या पेस्टने मालिश करा आणि हलक्या गरम पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर त्यावर मॉईस्चराईजर लावणं विसरू नका. हे मिश्रण तुमच्या त्वचेला कोरडं करू शकतं. त्यामुळे आठवड्यातून दोन अथवा तीनापेक्षा जास्त वेळा हा प्रयोग करू नका.
वाचा – त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान
उपाय 9– ब्राऊन शुगर, मध आणि लिंबू. या तीन वस्तूंच्या मिश्रणांनी तुम्ही तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स काढूण टाकण्यासाठी वापर करू शकता. त्यासाठी एक चमचा ब्राऊन शुगर, दोन मोठे चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून घ्या. हे मिश्रण नीट तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिट्स मालिश करा. त्यानंतर चेहरा धऊन मॉईस्चराईजर लावा.
उपाय 10– हळदीचा वापर केल्याने त्वचा सुंदर तर होतेच पण त्याशिवाय ब्लॅकहेड्सदेखील निघून जातात. त्यासाठी एक चमचा हळद घेऊन त्यामध्ये एक चमचा पाणी आणि नारळाचे तेल घालून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिट्सनंतर चेहरा पाण्याने साफ करून घ्या. असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता.
उपाय 11– जर तुमच्या नाकाजवळ व्हाईट हेड्स असतील तर ते हटवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात साखर घालून हा स्क्रब बनवून घ्या. हा स्क्रब त्वचेवर हळूहळू लावा. त्वचेची डेड स्किन काढून टाकण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे उपाय करू नका
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरगुती उपाय करणं योग्यच आहे. पण बऱ्याचदा ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी लोक काहीही उपाय करतात जे त्यांच्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अजिबात करू नका. त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त नुकसान पोहचू शकतं.
1- ब्लॅकहेड्स कधीही हात दाबून काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण ब्लॅकहेड्सला सतत हात लाऊन ते काढण्याचा प्रयत्न केल्यास, त्वचा अधिक तेलकट होण्याचा धोका असतो. परिणामी ब्लॅकहेड्स निघून न जाता अधिक वाढतात.
2- तुम्हाला जर वाटत असेल की, स्क्रबर करण्याने तुमचे ब्लॅकहेड्स निघतील तर तुम्ही अयोग्य आहात. सारखं सारखं स्क्रब केल्याने त्वचा अधिक कोरडी पडण्याचा धोका असतो.
3- स्वतःकरिता जेव्हा तुम्ही मेकअपची उत्पादनं विकत घेता तेव्हा ती काळजीपूर्वक निवडा. तुम्हाला जो ब्रँड सूटेबल आहे तोच ब्रँड निवडा. तसंच तुम्ही जास्त मेकअप केल्यास, तुमचे ब्लॅकहेड्स वाढतात. कमी होत नाहीत. त्यामुळे मेकअप करताना काळजी घ्या.
4 – ब्लॅकहेड्स काढण्यासाठी स्क्रबचा अत्याधिक वापर करू नका. तुमची चेहऱ्याची त्वचा ही अतिशय सौम्य असते. त्यामुळे ब्लॅकहेड्स असतील तर स्क्रबिंगचा वापर अतिशय हलक्या हाताने करा. जास्त स्क्रब करू नका. त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी पडून खराब होण्याचा धोका असतो.
ब्लॅकहेड्समुळे चेहरा काळवंडलेला आणि निस्तेज दिसत असेल तर तुम्ही सतत पार्लरला न जाता हे दिलेले उपाय घरीच करून पाहू शकता. त्याने कोणताही वाईट परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाही आणि तुम्हाला चमकदार आणि तजेलदार त्वचा परत मिळते.
फोटो सौजन्य – Shutterstock
You might like this: Uses Of Glycerin For Removing Blackheads In Marathi