ADVERTISEMENT
home / Periods
पीरियड पँटी म्हणजे काय आणि तिचा वापर  (Period Panties And Its Uses In Marathi)

पीरियड पँटी म्हणजे काय आणि तिचा वापर  (Period Panties And Its Uses In Marathi)

पीरियड पँटी किंवा पीरियड अंडरवेयर (period panties or period underwear) ही नव्याने लोकप्रिय होत असलेली संकल्पना आहे. मात्र भारतातील महिलांमध्ये पाळीच्या दिवसात वापरण्यात येणाऱ्या या पँटीबद्दल अजूनही बऱ्याच जणींना माहिती नाही. पीरियड पँटी ही विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात वापर करण्यासाठी बनवण्यात आलेली पँटी आहे. पीरियड पँटीच्या वापराने महिलांना निश्चितपणे मासिक पाळीच्या दिवसात कंफर्टेबल वाटेल. पीरियड पँटीचे अनेक फायदे आहेत.

01 period tracker- period

जर तुम्हीही याचा वापर मासिक पाळीच्या दिवसात नक्कीच करू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला पीरियड पँटीबाबत सर्व माहिती देणार आहोत. मग जाणून घ्या पॅड किंवा मॅन्स्ट्रुअल कपपेक्षा वापरण्यासाठी जास्त आरामदायक असणाऱ्या पीरियड पँटीबद्दल.

1. पीरियड पँटी म्हणजे काय?

ADVERTISEMENT

2. पीरियड पँटीचा वापर कसा केला जातो?

3. पीरियड पँटीचे फायदे

4. पीरियड पँटीचे तोटे

5. कुठे कराल पीरियड पँंटीची खरेदी?

ADVERTISEMENT

6. पीरियड पँटीबाबत विचारण्यात येणारे प्रश्न

पीरियड पँटी म्हणजे काय? – What are Period Panties in Marathi

period-panty-2

पीरियड अंडरवेअर किंवा पीरियड पँटी हे एक शोषक अंडरवेअर (absorbable underwear) आहे, जे पातळ पदार्थ शोषून घेते. या निर्मिती मासिक पाळीसाठी जास्तकरून केली जाते. याशिवाय ज्या महिलांना सतत लघवी मू (leaky bladder) चा त्रास असतो त्याही या पँटीचा वापर करू शकतात. पण पीरियड पँटीचा वापर यावर अवलंबून आहे की, तुमच्या मासिक पाळीतील ब्लीडींगचा प्रवाह किती जास्त आहे. पीरियड पँटी बनवण्याऱ्या एका कंपनीने दावा केला आहे की, पॅड आणि टेम्पोनच्या तुलनेत पीरियड पँंटी महिलांच्या वापरासाठी खूपच सोयीस्कर आहे. या पँटीमध्ये रक्त शोषून घेण्याची तब्बल 12 टक्के जास्त क्षमता आहे.  

पीरियड पँटीचा वापर कसा केला जातो – How to use Period Panties in Marathi

साधारणतः पीरियड पँटीचेही अनेक प्रकार असतात. पण प्रत्येक पीरियड पँटीच्या वापराची पद्धत एकच असते. तुमच्या माहितीसाठी पीरियड पँँटीच्या मधोमध दोन थरांचं पॅड लावलेलं असतं. ज्याचं कापड विशिष्ट प्रकारचं असतं. याशिवाय या पँटीमध्ये एक स्ट्रीप लावलेली असते आणि या पँटीसोबत दोन पॅडही देण्यात येतात. ज्यांचा वापर तुम्ही स्ट्रीपच्या आत लावून करू शकता. चला जाणून घेऊया कसा करायचा या पँटीचा वापर –

ADVERTISEMENT

period-blood-colours norml

– सर्वात आधी चेक करा की, तुम्हाला कितपत (bleeding) होत आहे जास्त किंवा कमी
– जर रक्तस्त्राव कमी होत असेल तर तुम्ही पीरियड पँटी आपल्या नेहमीच्या पँंटीप्रमाणे घालू शकता.
– जर तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असेल तर तुम्ही पीरियड पँटीसोबत मिळणाऱ्या पॅड्सचा वापर करू शकता.

पीरियड पँटी घातल्यावर करा आरामात काम. पीरियड पँटी घातल्यावर तुम्हाला तुमची नेहमीची पँटी घातल्यासारखंच वाटेल. जसं पॅड सरकण्याची भीती असते. तशी भीती या पँटीमध्ये वाटणार नाही. पीरियड पँँटी तुम्ही निश्चितपणे तुमची दैनंदिन काम मासिक पाळीच्या दिवसातही करू शकता.

पीरियड पँटीचे फायदे – Period Panties use benefits in Marathi

period-panty-1

ADVERTISEMENT

साधारणतः महिलांना मासिक पाळीच्या दिवसात फारच त्रास होतो. जास्तकरून शाळेत जाणाऱ्या किंवा कॉलेज युवतींना तसंच नोकरी करणाऱ्या महिलांना सतत जास्त ब्लीडींग झाल्यास कपड्यांना डाग लागण्याची भीती वाटत असते. यावरील उत्तम उपाय म्हणजे पीरियड पँटीचा वापर करणे. चला जाणून घेऊया पीरियड पँटीचे फायदे.

पीरियड पँटीमध्ये नाही दुर्गंधाची शक्यता – Period Panties benefits Fights odours in Marathi

पीरियड पँटी बनवण्यासाठी प्रगत टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. ज्यामुळे यातून कोणतीही दुर्गंधीही येत नाही. साधारणतः जास्त काळ एखादं पॅड वापरलं गेल्यास त्यातून दुर्गंधी येऊ लागते. पण पीरियड पँटीच्या बाबतीत ही शक्यताच नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तणावही पँटीच्या वापराने जाणवत नाही.  

जास्त ब्लीडींग व्यवस्थित शोषून घेते पीरियड पँटी – Period Panties for more absorbtion in Marathi

पीरियड पँटीच्या शोषणाची क्षमता साहजिकच जास्त असते. असं मानलं जातं की, मॅन्स्ट्रुअल कप किंवा टेम्पोनच्या तुलनेत पीरियड पँटीची शोषणाची क्षमता ही दसपट असते. तसंच महिलांच्या वापरासाठीही सोपं आहे. पीरियड पँटीला विशेषतः पाळीसाठी डिझाईन केलं जातं. त्यामुळे तुम्हाला वारंवार ती बदलावीही लागत नाही.

पीरियड पँटी प्रवासातही वापरणं सोयीस्कर – Period Panties Ideal for traveling in Marathi

मासिक पाळीदरम्यान प्रवास करताना पीरियड पँटीचा वापर फारच आरामदायक आहे. तुमचा प्रवास लांबचा असो वा जवळचा ब्लीडींग यात व्यवस्थित शोषलं जातं आणि दर दोन तासांनी बदलण्याची आवश्यकताही नसते. पीरियड पँटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रवास करतानाही सरकत नाही. त्यामुळे ते सारखं नीट करायची चिंता नसते. मॅन्स्ट्रुअल पँटी प्रवास करताना वापरण्यासाठी एक वरदान आहे.  

ADVERTISEMENT

पीरियड पँटीमध्ये नाही सरकण्याची चिंता  – Period Panties stays in place in Marathi

साधारणतः महिलांना सतत असं वाटतं असतं की, पीरियडदरम्यान वापरत असलेलं पॅड किंवा टेम्पोन लावल्यावर काही वेळाने सरकत. ज्यामुळे महिलांना कंफर्टेबल वाटत नाही आणि ते नीट करण्यासाठी सतत वॉशरुममध्ये जावं लागतं किंवा दुसरी जागा शोधावी लागते. पण पीरियड पँटीच्या बाबतीत मात्र असं होत नाही. पीरियड पँटी ही पँटीच्या रूपात असल्याने बऱ्याच काळासाठी व्यवस्थित राहते. ज्यामुळे तुम्हाला बैचेनी जाणवत नाही. त्यामुळे अनेक महिला पीरियड पँटीला पसंती देतात.

पीरियड पँटी डिस्पोजेबलसाठी सोयीस्कर – Period Panties for Disposable benefits in Marathi

साधारणतः पीरियड्सदरम्यान वापरले जाणारे पॅड हे नंतर कचऱ्यात फेकले जातात.पण पीरियड पँटीच्या बाबतीत असं नाहीयं. पीरियड पँटीचा हा सर्वात मोठा फायदा आहे की, ती स्वच्छ करून तुम्ही वारंवार तिचा वापर करू शकता. पॅड्सचा वापर पीरियड्समध्ये जास्तीत जास्त चार तास करता येतो पण पीरियड पँटीचा वापर तुम्ही 12 तासांपर्यंत करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर डिस्पोजेबल मॅन्स्ट्रुअल पँटी खरेदी करा जी तुम्हाला बऱ्याच काळासाठी वापरता येईल.  

ब्लीडींगदरम्यान त्रासदायक न ठरणारी पीरियड पँटी – Period Panties for Free bleeding in Marathi

पीरियड्सच्या दरम्यान पॅड किंवा टेम्पोन लावल्यावर काही वेळाने दोन्ही जाघांच्यामध्ये घासल्यासारखं होतं आणि त्रास होऊ लागतो. ज्यामुळे तुम्हाला कंफर्टेबल वाटत नाही. याशिवाय भीती असते की जास्त ब्लीडींग होऊन कपड्यांना डाग तर पडणार नाही ना. याबाबतीत पीरियड पँटी फारच आरामदायक आहे. ज्यामध्ये कपड्यावर रक्ताचे डाग लागण्याची भीतीच नसते आणि तुम्हाला ब्लीडींगदरम्यान कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत नाही.  

पीरियड पँटीचे तोटे – Period Panties Side effects in Marathi

टेम्पोन किंवा पॅडच्या तुलनेत पीरियड पँटी खूपच महाग असते. खरंतर पँटीसाठी एकदाच पैसे खर्च करावे लागतात आणि हीचा वापर तुम्ही बऱ्याच काळासाठी करू शकता. मॅन्स्टुअल पँटीचा दरवेळी धुवून वापर करावा लागतो. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्नही उपस्थित होतो. कारण दरवेळी पँटी स्वच्छ धुणं तसं त्रासदायक आहे. तसं तर टॅम्पोन किंवा पॅड वापरल्यावर नेहमी ओलेपणा जाणवतो. पण पीरियड पँटीच्या वापराने तुम्हाला असं जाणवणार नाही. जर तुम्ही आत्तापर्यंत सॅनिटरी पॅडचा वापर करत आला असाल तर तुम्हाला पीरियड पँटी वापरताना सुरूवातीला थोडा त्रास जाणवू शकतो.

ADVERTISEMENT

कुठे कराल पीरियड पँंटीची खरेदी – Where u can shop Period Panty in Marathi

पीरियड पँटी ही तुम्हाला ऑनलाईन कोणत्याही शॉपिंग वेबसाईटवर सहज खरेदी करता येईल. या पँटीजची किंमत ही कमीत कमी 299 रूपयापासून आहे. तुमच्या आवडी आणि गरजेप्रमाणे तुम्ही पँटीची निवड करू शकता.

FAQs पीरियड पँटी

period-panty-3

1. पीरियड पँटीज बनवण्यासाठी कोणत्या फॅब्रिकचा वापर केला जातो?

PUL म्हणजेच पॉलीयुरेथन लॅमिनेट आणि अशाच प्रकारच्या लॅमिनेटेड मटेरिअलचा वापर हा पीरियड पँटी बनवण्यासाठी केला जातो. सर्व पीयुएल (PUL) कापड ही वॉटरप्रूफ असतात. या कापडाचा वापर पीरियड पँटीमध्ये लायनिंगसाठी केला जातो.

2. पीरियड पँटीजचा वापर गरोदर बायका करू शकता?

पीरियड पँटीजचा वापर गरोदर महिलांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे. प्रेग्नंट महिला प्रेग्नसीआधी आणि प्रेग्नसीनंतरही पीरियड पँटीचा वापर करू शकतात. प्रेग्नसीनंतर होणाऱ्या ब्लीडींगसाठी पीरियड पँटी ही खूपच चांगला पर्याय आहे. कारण या पँटीज खूपच मऊ आणि पॅड्सपेक्षा कमी त्रासदायक असतात.

ADVERTISEMENT

3. पीरियड पँटीजचा वापर स्वीमिंगपूलमध्ये करता येतो का?

पीरियड पँटीजचा वापर स्वीमिंगपूलमध्ये करता येत नाही. कारण या पँटीज स्वीमवेअर म्हणून वापरण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या नाहीत.

4. पीरियड पँटीज किती वेळ टीकतात?

पीरियड पँटीज या तुमच्या इतर पँटीजप्रमाणेच टीकतात. फक्त यासोबत मिळणारे पँटीपॅड्स हे डिस्पोजेबल असतात. फक्त लक्षात ठेवा की, पीरियड पँटीज या तुम्ही हाताने धुऊ शकता किंवा ड्राय क्लीनही करू शकता.

5. पीरियड पँटीजवर डाग पडत नाहीत का?

अनेक ब्रँड्सच्या पीरियड पँटीज या स्टेन प्रूफ म्हणजेच खास डाग न पडणाऱ्या फॅब्रिकपासून बनवलेल्या असतात. तसंच या जंतूविरहीत राहतील, याचीही विशेष काळजी घेतली जाते.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

उन्हाळ्यात तुम्हालाही नकोसे होतात पिरेड्स, मग वाचाच

PCOD Problem And Solution In Marathi

ADVERTISEMENT
13 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT