आई-वडील होणं ही किती महत्त्वपूर्ण जवाबदारी आहे, हे फक्त पालकांनाच कळू शकतं. आपल्या मुलाचं चांगलं संगोपन करणे, त्यांना आयुष्यात यश मिळावं म्हणून तयार करणे आणि चांगले संस्कार देणे. या मुलांचं आयुष्य घडवणाऱ्या जवाबदाऱ्या आईवडिलांच्या खांद्यावर असतात. त्यांना आपल्या आयुष्यासोबतच आपल्या मुलांनाही आयुष्य जगायला शिकवायचं असतं. पण जर ही महत्त्वपूर्ण जवाबदारी कोणा एकाच्या खांद्यावर आली तर? आजच्या मॉर्डन काळात अनेक सिंगल पॅरेंट्स आपल्याला दिसतात. हा शब्द जितका सहज वाटतो तितकाच कठीण त्याच्याशी निगडीत जवाबदाऱ्या आहेत. त्यातही जर सिंगल पॅरेंट एखादी आई असेल तर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या लेखात आम्ही सिंगल मॉम्ससाठी काही खास पॅरेटींग टिप्स सांगत आहोत.
सिंगल मदर म्हणून जवाबदारी सांभाळताना नेहमी पॉझिटीव्ह राहणं खूप कठीण असतं. पण तरीही तुम्ही कोणत्याही संकटात पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि निगेटीव्ह विचारांना दूर ठेवा. या गोष्टीची काळजी घ्या की, कोणत्याही सिच्युएशला तुम्हाला एकट्यानेच सामोरं जायचं आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या समजूतदारपणे वागाल तितक्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील.
तुम्ही कितीही कमवा, कितीही यशस्वी व्हा, जर तुम्ही टाईम मॅनेजमेटं शिकला नाहीत तर तुम्हाला कोणतीही गोष्ट कठीणच वाटेल. जर टाईम मॅनेजमेंट नसेल तर एका तासात होणाऱ्या गोष्टींसाठी दोन तास वाया जाऊ शकतात. जर तुम्हाला आता सिंगल मदर सर्व जवाबदाऱ्या पार पाडायला लागणार असतील तर योग्य वेळी सर्व काम संपवणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही मुलांनाही वेळ देऊ शकाल. कारण मोठं झाल्यावर सगळ्यांच्या मनात राहतात त्या बालपणीच्या आठवणी. त्यामुळे तुमच्या मुलांनाही सुखद आठवणी नक्की द्या.
सिंगल मदरसाठी मुलांना वेळ देऊ न शकणं यामागचं अजून एक मोठं कारण म्हणजे सर्व काम स्वतः करण्याचा प्रयत्न करणं. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस काम संपवण्यात जातो आणि तुमची मुलं वाट पाहात बसतात. त्यामुळे तुमची काम पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत घ्या किंवा दुसऱ्या कोणाकडून जी काम करून घेता येणं शक्य असल्यास ते करा.
सिंगल मदर्सनी एक गोष्ट नक्की स्वतःशी ठरवावी की, जरी तुमचा संपूर्ण दिवस ऑफिसमधल्या कामात गेला तरी दिवसातला काही वेळ नक्की तुमच्या मुलांसाठी ठेवा. जो वेळ फक्त तुमचा आणि मुलांचा असेल. यामुळे तुमचं मुलांसोबतच बाँंडीग खूप चांगलं होईल.
सिंगल मदर्सनी त्यांच्या रूटीनमध्ये नक्की अॅड करावी जादू की झप्पी. तुमच्या मुलांना सकाळी निघताना आणि संध्याकाळी घरी आल्यावर जादू की झप्पी नक्की द्या. त्यांना घट्ट मिठी मारून हा विश्वास द्या की, तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहात.
मुलांना आई-वडिलांचं दोघांचं प्रेम हवं असतं. पण सिंगल मदर असल्यावर तुम्हाला त्या दोघांचं प्रेम मुलांना द्यावं लागेल. हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही इतर मुलांचं संगोपन पाहाल. तुमच्या मुलांना वडिलांची कमतरता जाणवू लागण्याआधीच सतर्क व्हा.
तुमचं मुलं ड्रॉइंग करत असो वा होमवर्क करत असो त्याच्या प्रत्येक अॅक्टीव्हीटीत त्याला सोबत करा. कधी कधी फक्त सोबतच नाहीतर त्यात सामीलही व्हा. मुलाला शाळेच्या अॅक्टीव्हीटीजमध्ये मदत करा, त्यांच्यासोबत खेळा, एकत्रितपणे प्रोजेक्ट्स बनवा.
सुरूवातीपासूनच पैसे वाचवण्याची सवय लावून घ्या. सेव्हींग्ज करण्यासाठी नवीन नवीन पण सुरक्षित योजना अवलंबवा. यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासारख्या कामांसाठी तुम्हाला मदत होऊ शकेल.
सिंगल मदर्सच्या बाबतीत एक तक्रार नेहमी असते की, त्या आपल्या मुलांना नाही म्हणू शकत नाहीत. याचा साईड ईफेक्ट म्हणजे मुलं हट्टी होतात आणि तुम्हाला नको असूनही त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करावा लागतो.
तुमच्या मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक सांगावा लागण्याची वेळ आणू नका. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना तुमच्यासोबत बसवून हा फरक समजवून द्या.
तुम्ही तुमच्या मुलांच्या आई-बाप दोन्ही आहात. त्यामुळे तुमच्या मुलांमधील तो इमोशनल कनेक्ट कायम ठेवा. त्यांच्या मनातल समजून घ्या आणि आपल्या मनातील विचारही त्यांना सांगत चला.
तुम्ही ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कामात बिझी असलात तरी जेव्हा तुमच्या मुलाला गरज लागेल तेव्हा तुम्ही हजर असायला हवं. याचा फायदा असा होईल की, तुमच्या आणि मुलांमधील प्रेम अजून वाढेल.
राग हा सगळ्यांनाच येतो. पण समजूतदारपणा यातच आहे की, राग आल्यावर तुमचं काम बिघडण्याआधी तो शांत करा. आपल्या मुलांवर दुसऱ्यांचा राग कधीही काढू नका आणि जर मुलांचा राग आल्यास त्यांच्याशी बोला पण त्यांना ओरडू किंवा मारू नका.
गोष्ट खूप छोटीशी आहे पण महत्त्वाची आहे. लोकांच्या म्हणणं बाजूला ठेवा आधी तुमच्या मुलांना समजून घ्या. मुलं कशी वागतात, कोणत्या गोष्टीला कसं रिएक्ट करतात हे जाणून घ्या. त्यांचा स्वभाव बदलावा म्हणून तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. तुमचं मुल जर समजूतदार असेल तर त्याला अजून चांगलं कसं घडवता येईल यावर विचार करा.
फक्त गोष्टी समजवण्यात आणि भविष्य घडवण्यात हे विसरू नका की, एकदा गेलेली वेळ परत येणार नाही. त्यामुळे आज जे आहे त्याचा आनंद नक्की घ्या. मुलांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकवा.
अनेक वेळा मुलांना कुटुंबाची उणीव भासू लागते, अशा वेळी त्यांची नातेवाईकांशी भेट घालून द्या. त्यांना कुटुंब काय असतं ते सांगा. जर तुमचं कुटुंब मोठं नसलं तरी ज्या व्यक्ती आहेत त्यांचं महत्त्व पटवून द्या.
मुलांना कुटुंबाच महत्त्व समजवून सांगण्याचा योग्य पर्याय म्हणजे कुटुंबात चालत आलेल्या परंपराबद्दल मुलांना सांगा. त्यांना सांगा सण कसे साजरे केले जातात, सणांमागील उद्देश काय, त्यांचा अर्थ काय?
स्वीकार म्हणजे एक्सेप्टन्समध्ये मुलांना न बदलण्यापासून कठिण परिस्थितीपर्यंत सगळ सामील आहे. अनेकवेळा आपण फक्त तक्रार करत राहतो. ज्यामुळे आपल्या स्वभावात नकारात्मकता येते. तक्रार करण्यापेक्षा गोष्टींना आणि परिस्थितील स्वीकार करायला शिका.
सिंगल मदर्सना बऱ्याच जवाबदाऱ्या स्वतःच पार पाडायच्या असतात. त्यासाठी कधीकधी दुसऱ्यांची मदतही घ्यावी लागते. पण मदत घेण्याची सवय लावून घेऊ नका. मदत घ्या पण कमीतकमी.
शक्य असेल तेवढं मुलांसमोर आपलं दुःख कमी जाहीर करा. त्यांना प्रत्येक गोष्टीला हसत सामोरं जायला शिकवा. भविष्यासाठी त्यांना तयार करा.
बॉलीवूड अभिनेत्री, माजी मिस इंडिया आणि माजी मिस यूनिव्हर्स सुश्मिता सेन सिंगल मदर्ससाठी परफेक्ट इन्स्पिरेशन आहे. सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं असून ती एकटीनेच त्या दोघींचं पालनपोषण करत आहे. तुम्हीही सुश्मिता सेनकडून तुम्ही सिंगल मदरबाबतच्या काही गोष्टी नक्कीच शिकू शकता.
सुश्मिता सेन नेहमी तिच्या मुलींना प्रेरणा देत असते. मग ते शाळेत चांगलं मार्क मिळवणं असो वा एक्स्ट्रा अॅक्टीव्हीटीजमध्ये भाग घेणं असो. सुश्मिता नेहमीच तिच्या मुली जे करतात त्याचं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही.
सिंगल मदर्ससाठी आपल्या मुलांना यशस्वी बनवण्याचा अजून एक चांगला मार्ग म्हणजे त्यांना नवं नवीन गोष्टी शिकवणं. यामुळे त्यांना नेहमी पुढे असल्यासारखं आणि परिपूर्ण वाटेल.
सुश्मिता सेनच्या इ्न्स्टाग्राम प्रोफाइलनुसार, ती स्वतःचं आपल्या मुलींवर असलेलं प्रेम जाहीर करण्याची एकही संधी सोडत नाही. ती मुलींशी निगडीत प्रत्येक गोष्टीबाबत मनापासून आपल्या भावना व्यक्त करते.
सुश्मिता सेनची अजून एक चांगली सवय म्हणजे प्रत्येकवेळी थँकफुल असणं. कोणतीही व्यक्ती असो, कोणतीही जागा असो किंवा कोणतंही कारण असो सुश्मिता सेन कोणालाही थँक्स म्हणायला विसरत नाही.
सिंगल मदर्सना बऱ्याच गोष्टी एकट्याने कराव्या लागत असल्यामुळे एकट्यानेच हा प्रवास करायची त्यांना सवय लागते. पण सुश्मिताने याबाबतीतही चांगलाच बॅलन्स साधला आहे. तिला चांगलंच माहीत आहे की, मुलांना कधी एकटीचा वेळ द्यायचा आणि कधी सगळ्यांसोबत वेळ घालवायचा.
सिंगल पेरेंट्ससोबत मोठ्या झालेल्या मुलांना खूप कमी लोकांसोबत राहायची सवय असते. पण सुश्मिताने सिंगल मदर असूनही आपल्या कुटुंबातील प्रत्येक नवीन व्यक्तीशी जुळवून घ्यायची कला मुलींनाही शिकवली आहे.
सिंगल मदर म्हणून सुश्मिता सेन अजून एक खास गोष्ट म्हणजे तिने स्वतःची ओळख नेहमीच कायम ठेवली आहे आणि ती सदैव पुढेच जात राहिली आहे. मग ते फिटनेसकडे लक्ष देणं असो बिजनेस सुरू करणं असो. तिने प्रत्येक भूमिका चांगली वठवली आहे.
मुलांप्रती असलेल्या जवाबदारीसोबतच सिंगल मदर्सनी काही गोष्टी स्वतःबाबतही लक्षात ठेवायला हव्या. ज्यामुळे त्या आईची भूमिका चांगली वठवू शकतील आणि बेस्ट मॉम ठरतील.
आजच्या काळात प्रत्येक गोष्टही शरीर आणि मेंदूला थकवा देण्याचं काम करते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 10 मिनिट मेडीटेशन करा आणि स्वतःचा स्ट्रेस कमी करा. असं केल्याने तुमचं फ्रस्ट्रेशन कमी होईल आणि तुमच्या मुलांनाही तुम्हाला चांगला वेळ देता येईल.
आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. आईच्या जवाबदारीसोबतच तुमचं आरोग्यही तुम्हाला चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा किंवा काम करता करता बॉडी स्ट्रेचिंग करा.
स्वतःच आरोग्य आणि खाण्यापिण्याची काळजी स्वतः घ्या. वेळेवर जेवणं, औषधं घेणं, मेडीटेशन करणं किंवा स्वतःची काम करणं. मुलांकडे लक्ष देता देता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
सुट्टीच्या दिवशी किंवा शक्य असल्यास रोज स्वतःसाठी नक्की वेळ काढा. या वेळात पुस्तक वाचणे किंवा पावर नॅप घेणे अशा गोष्टी करा. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल आणि योग्य किंवा चुकीच्या गोष्टींबाबत विचार करता येईल.
आयुष्यात बऱ्याच काळासाठी सिंगल राहणं शक्य नाही आणि कोणी राहूही शकत नाही. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात पार्टनर येईलच. जर तुमच्यासोबतही असं झालं तर तुमच्या मुलांना त्यासाठी तयार करावं लागेल. यासाटी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.