निरोगी जीवनशैली आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाचे महत्त्व माहीत असूनही बऱ्याचदा आपण व्यायाम करण्याचा कंटाळा करत असतो. इतरांकडून कितीही ऐकलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः व्यायाम करत नाही. तोपर्यंत तुम्हाला व्यायामाचा फायदा अनुभवता येत नाही.
व्यायामाचा कंटाळा करण्याची कारणं काहिही असली तरी प्रयत्नपूर्वक त्यावर मात नक्कीच करता येऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला जीवनातील व्यायाम करण्याचं महत्त्व मनापासून पटलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एक महिना नियमित व्यायाम करता आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे अनुभवू लागता. तेव्हा व्यायाम करण्याचा कंटाळादेखील हळूहळू कमी होऊ लागतो.
दररोज व्यायामाचे हे आश्चर्यकारक फायदे जरूर वाचा
1. ह्रदयरोगाचा धोका कमी होतो
व्यायामाची सवय लावणं हे नेहमीच चांगलं असतं. कारण त्यामुळे तुमच्या छोट्या-मोठ्या आरोग्यसमस्या नक्कीच कमी होऊ शकतात. आजकाल आहारावरील अनियंत्रणामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची समस्या अनेकांना सतावत असते. शिवाय शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे ह्रदयरोगाचा धोकाही वाढू लागतो. जर तुम्हाला ह्रदयरोगांपासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम करण्याचा कंटाळा करू नका.
2.रक्तदाब नियंत्रित राहतो
नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या रक्तदाबावर तुमचे योग्य नियंत्रण राहते. अती कमी अथवा उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करायचा असेल तर व्यायाम करण्याची सवय लावा. कारण रक्तदाब अनियंत्रित असेल तर अनेक आरोग्यसमस्या डोकं वर काढू लागतात.
Also Read: 25 Best Aerobic Exercises For Healthy Body In Marathi
3.संपूर्ण आरोग्य सुधारते
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र जीवनशैलीतील बदलांमुळे ही खरी संपत्ती आजकाल दुर्मिळ झाली आहे. धकाधकीचे जीवन, वाढते प्रदूषण, असंतुलित आहार याचा विपरित परिणाम नकळत तुमच्या शरीरावर होत असतो. मात्र जर तुम्हाला कामाचा ताण दूर ठेवायचा असेल आणि सुदृढ शरीरप्रकृती हवी असेल तर व्यायाम करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.
4. पाठदुखी कमी होते
कामाची दगदग, रोजचा प्रवास आणि धावपळ यामुळे आजकाल अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. तासनतास एकाच जागी बसून केलेल्या बैठ्या कामामुळे रात्री झोपताना अचानक पाठदुखी जाणवू लागते. ज्यामुळे तुम्हाला पुरेशी झोपदेखील मिळत नाही. मात्र जर तुम्ही नियमित सकाळी काही मिनीटे व्यायामासाठी काढू शकला. तर पाठदुखी कायमची कमी होऊ शकते.
5. हाडे मजबूत होतात
व्यायामामुळे तुमच्या हाडांवर आणि स्नायूंवर योग्य ताण येतो. जो शारीरिक हालचालीसाठी गरजेचा असतो. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात. जर तुम्ही खेळाडू, नर्तक अथवा कलाकार असाल तर नियमित व्यायाम करा. कारण त्यामुळे तुमची शारीरिक हालचाल करण्याचा स्टॅमिना वाढू शकतो.
shutterstock
6. मानसिक शांतता मिळते
नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर सुदृढ होते आणि मानसिक शांतता मिळते. मन आणि शरीराचा जवळचा संबंध असतो. मन निरोगी असेल तर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर नियमित व्यायाम करा.
7. रोग प्रतिकारशक्ती वाढते
रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास वातावरणातील बदलांमुळे होणारे आणि संसर्गजन्य आजार लवकर होण्याची शक्यता असते. आजारपणांपासून दूर राहण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते.
8. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो
एका संशोधनानुसार नियमित व्यायाम करणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 20 ते 30 टक्क्यांनी कमी होतो. कर्करोगापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
9. शरीराला योग्य ऊर्जा मिळते
दिवसभर काम आणि कामासाठी लागणारी दगदग सहन करण्यासाठी तुमच्याा शरीराला पुरेशी ऊर्जा गरजेची असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज सकाळी व्यायाम करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी कामाहून घरी आल्यावरदेखील फ्रेश वाटू शकतं.
10. चांगली झोप लागते
निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा झोपेची गरज असते. संशोधनानुसार जी माणसं कमीतकमी सहा ते सात तास पुरेशी झोप घेतात ते दिवसभर फ्रेश राहतात. मात्र काम आणि मानसिक चिंता यामुळे तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत राहतं. यासाठीच नियमित व्यायाम करा. शरीराची योग्य हालचाल झाल्यामुळे तुम्हाला रात्री गाढ आणि पुरेशी झोप मिळण्यास मदत होऊ शकेल.
अधिक वाचा
निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)
ऑफिसमध्ये बसल्याजागी करा ‘हे’ स्ट्रेचिंग एक्सरसाईज
डबलचीनचा त्रास? सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका
फोटोसौजन्य – शटरस्टॉक