एक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना... काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप

एक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना... काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप

आजकाल, अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जर सोबतीला अनेक वर्षांचे अनुभव असतील तर पावलोपावली आपल्याला एक हिंमत आणि प्रेरणा मिळत असते. नवीन काही सुरु करु पाहणा-या अनेक कलाकारांपैकी एक अशी मराठमोळी अभिनेत्री आहे जिने स्वत:च्या टॅलेंटवर बॉलिवूडमध्ये देखील एका पेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत आणि ती अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता आता नक्की पुढे काय पाऊल उचलणार आहे याकडेच सर्वांचं लक्ष आहे. अमृताने आतापर्यंत विविध गोष्टी करून पाहिल्या आहेत. अगदी स्पर्धक असण्यापासून ते परीक्षक होण्यापर्यंत अमृताचा मोठा प्रवास आहे. आता अमृता पुन्हा एकदा नव्या गोष्टी करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

अमृताने केली चित्रपट क्षेत्रात 18 वर्ष पूर्ण

Instagram

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत 18 वर्षे पूर्ण केली आहेत. मराठीमध्ये उत्तम अभिनय केल्यावर अमृताने हिंदी सिनेमांतही काम केले आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राझी’ सिनेमात अमृताने ‘मुनिरा’ची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने साकारली. त्यानंतर अमृताने मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ सिनेमात जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अमृता आता लवकरच एका नवीन प्लॅनेटवर दिसणार आहे. आता नेमकं नवीन प्लॅनेट म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडणं अगदी साहजिक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत अमृता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या मार्गावर आहे. प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्या सहयोगाने अमृता मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्लॅन्स तयार करत आहे. पण याविषयीची माहिती लवकरच अमृता तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे. 

नव्या टॅलेंटला देणार वाव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृताने सांगितलं आहे की, टॅलेंट हे कधीही लपून राहू शकत नाही ते कधी ना कधी बाहेर आणणे आवश्यक असते. लवकरच तुम्हांला माझ्याकडून त्याविषयी जाणून घ्यायला मिळेल, असं म्हणत तिने प्रेक्षकांना कोड्यात नक्कीच पाडलं आहे. त्यामुळे अमृता आता नव्या टॅलेंटला वाव देण्यासाठी काही खास घेऊन येत आहे का असाही अंदाज तिचे चाहते लावत आहेत. नेमकं अमृता आता काय करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे. आतापर्यंत आपल्या इंडस्ट्रीत अमृताने उचलेल्या प्रत्येक पावलावर तिच्या चाहत्यांनी तिला शाबासकीची थाप दिली आहे. अमृताने देखील प्रत्येकाला अभिमान वाटेल असे काम केले आहे, त्यामुळे आता ती नवीन काय घेऊन येत आहे यासाठी देखील अनेकजण उत्सुक असणार यात शंका नाही.

अमृताने जिंकली अनेकांची मनं

Instagram

अमृताने आतापर्यंत मालिका, सिनेमा, रियालिटी शो या सगळ्यातून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे तिने अनेकांची मनं जिंकली आहेत असंही म्हणावं लागेल. नुकतंच ‘जिवलगा’ मालिकेतील काव्या साकारून आपण नकारात्मक भूमिकादेखील चांगली करू शकतो हे दाखवून दिलं. आता ही मालिका संपल्यावर ती नक्की पुढे काय करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अमृताचे नक्की नवे प्रोजेक्ट कोणते असतील याचाही कयास बांधला जात होता. पण आता खुद्द अमृताच याबद्दल सगळ्यांना सांगणार आहे.