ADVERTISEMENT
home / Diet
सुपरफूड अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे (Avocado Benefits In Marathi)

सुपरफूड अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे (Avocado Benefits In Marathi)

अवकॅडो हे फळ आकाराला नासपती फळासारखे असते. हे उष्णकंटीबंध भागातील फळ असून ते आकाराने मोठे असते. अवकॅडोचं झाड हे साधारणतः 65 फीट उंचीपर्यंत वाढतं आणि या फळाचं वजनही अधिक असतं. हे फळ केळ्याप्रमाणेच कच्चं असतानाच झाडावरून तोडलं जातं. तसं तर अवकॅडोच्या अनेक जाती आढळतात. पण याची क्रीमयुक्त अवकॅडो जात ही जास्त लोकप्रिय आहे. याची चव वेगळी असून याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 



आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेक देशात या फळाचे उत्पादन केले जाते. या वरील सालं हे जाडं असतं. ज्यामुळे याला कोणत्याही प्रकारची किड लागत नाही. यासाठी तुम्ही ऑर्गेनिक अवकॅडो घेण्याऐवजी नैसर्गिकरित्या उगवणारं अवकॅडो खरेदी केलं पाहिजे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या किटकनाशक किंवा औषधांचा वापर केलेला नसेल. 

जायफळ म्हणजे काय ते देखील वाचा

ADVERTISEMENT

अवकॅडो म्हणजे काय (What is Avocado)

अवकॅडो हे एक असं फळ आहे, ज्यामध्ये फॅटी अॅसिड खूप प्रमाणात आढळतं. पण यामध्ये कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी असते. जास्तकरून लोकांचं मानणं आहे की, अवकॅडोमध्ये कॅलरीची मात्रा अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे अवकॅडो हे वजन वाढवण्यासाठी आणि आश्चर्य म्हणजे वजन घटवण्यासाठीही उपयोगी पडतं. अवकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. जर अवकॅडोची तुलना एखाद्या डेअरी प्रोडक्टशी केल्यास यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी आढळतात. यामध्ये आढळणारं फॅटी अॅसिड हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानलं जातं. चला जाणून घेऊया अवकॅडो आरोग्यदायी फायदे.  

वजन कमी करण्यासाठी क्विनोआबद्दल देखील वाचा

अवकॅडोचं न्युट्रीशनल महत्त्व – Nutritional Benefits of Avocado

अवकॅडोमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे याला सुपर फूड असं म्हटलं जातं. जेवणातील कॅलरीजमध्ये अवकॅडोचं विशेष स्थान आहे. अवकॅडोमध्ये व्हिटॅमीन आणि मिनरल्ससारखी पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. अवकॅडो हा नोअनसॅचुरेटेड फॅटी एसिडचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. कारण यामुळे शुगरची मात्रा खूप कमी प्रमाणात आढळते.  हे शरीराला उर्जा तर देतंच त्याशिवाय यात अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीनसारखी पोषक तत्त्व शरीराच्या पोषणासाठी चांगली आहेत. अवकॅडोमध्ये कॅल्शिअम, आर्यन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॉपर, मँगनीज, फॉस्फरस आणि झिंकची मात्रा आढळते. तसंच यामध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी6, बी12, व्हिटॅमीन ए, डी, के, ए, थायमिन, राईबोफ्लेविन आणि नियासीनसारखी पोषक तत्त्वही असतात. अवकॅडो हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. अवकॅडोमध्ये दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या फायबरच्या तब्बल चाळीस टक्के भाग तुम्हाला मिळतो. 

ADVERTISEMENT

वाचा – केसांसाठी कापूर तेलाचे फायदे

अवकॅडो कसं खावं (How to Eat Avocado)

अवकॅडो हे शक्यतो कच्चंच खाल्लं जातं. याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर काळी मिरी आणि मीठ घालून सलाडच्या रूपात ते खाता येतं. अनेक ठिकाणी सँडविचमध्येही अवकॅडोचा वापर केला जातो. याशिवाय बटर किंवा तेलाऐवजीही अवकॅडोचा वापर अनहेल्दी कॅलरीज टाळण्यासाठी केला जातो. अवकॅडोमध्ये 14 ग्रॅम फॅट आढळतं तर बटरमध्ये 81 ग्रॅम फॅट आढळतं. त्यामुळे बटरऐवजी अनेक वेळा अवकॅडोचा वापर करण्याला पसंती दिली जाते.

अवकॅडो रेसिपीज आणि वापर (Avocado Recipes and Uses)

अवकॅडो हे जगभरात खूपच प्रसिद्ध असल्याने त्याच्या अनेक रेसिपीज उपलब्ध असून विविध पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. हे सुपरफूड तुम्ही अनेक प्रकारे तुमच्या आहारात सामील करू शकता. पाहूया काही आयडियाज अवकॅडोचा वापर करण्यासाठी आणि त्याचा उपयोग करून घेण्यासाठी –

ADVERTISEMENT

अवकॅडोचा पौष्टीक गर – अवकॅडोच्या गराचा वापर तुम्ही पौष्टीक सूप, अवकॅडो स्मूदी, अवकॅडो सॉस आणि पुडींग अशा अनेक रेसिपी करण्यासाठी करू शकता.

भाजीमध्ये करा अवकॅडोचा वापर – तुम्ही रोजच्या जेवणात ग्रॅव्हीसाठीही अवकॅडोचा वापर करू शकता किंवा त्याचं पौष्टीक सलाड बनवू शकता. उदा. अवकॅडो पास्ता, सँडविच, अवकॅडो चिकन सलाड.

तुमच्या स्वीट टूथसाठीही चांगला पर्याय आहे अवकॅडो.

अवकॅडो स्मूदी : गोड पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतात आणि अवकॅडो तुम्ही तुमच्या स्मूदीमध्येही अॅड करून कॅलरीज कमी करू शकता. शिवाय तुमच्या स्मूदीला वेगळी टेस्टही मिळेल.यासाठी पाहा संजीव कपूर यांनी दाखवलेली ही सोपी रेसिपी

ADVERTISEMENT

चॉकलेट अवकॅडो मिल्कशेक : तुम्ही मिल्कशेकमध्येही अवकॅडोचा वापर करू शकता. अवकॅडोचा गर काढून तो तुम्ही मिल्कशेकमध्ये वापरू शकता. यासाठी पाहा संजीव कपूर यांनी दाखवलेली ही सोपी रेसिपी

बाळासाठी पौष्टीक अवकॅडो – तुमच्या बाळाला प्रोसेस्ड फूड देण्याऐवजी तुम्ही मॅश केलेलं किंवा स्मूदी केलेलं अवकॅडो देऊ शकता. *फक्त बाळाला ते देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits of Avocado)

जर अवकॅडोच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल बोलायंच झाल्यास याचे अनेक फायदे आहेत. वर सांगितल्याप्रमाणे हे फळ पोषक तत्त्वांनी भरपूर असल्यामुळे हे सर्वोत्तम फळ म्हणूनही मानलं जातं. अवकॅडो कच्चं खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊया या सुपरफूडचे आरोग्यदायी फायदे. 

ADVERTISEMENT

पचन होतं सुलभ (Avocado for Digestion)

असं मानलं जातं की, अवकॅडो इंटेस्टाईनचं कार्य सुरळीत करतं आणि ज्यामुळे जेवण आरामात पचतं. यामधील फायबरचे घटक पचनक्रिया सुलभ करतात. हे दोन घटक जेवण पचनासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. कारण हे मल बनवण्यात मदत करतात आणि आतड्यातील भोजन पचनाचे कार्य जलद करतात. हे गॅस्ट्रीक आणि डायजेस्टीव्ह ज्यूस स्टीम्युलेट करतात ज्यामुळे शरीरातील पोषक तत्त्व आरामात शोषून घेतात. यामुळे याचं सेवन करणाऱ्या व्यक्तींना डायरिया आणि बद्धकोष्ठाचा त्रास होत नाही आणि आरोग्य चांगलं राहतं.

वजन घटेल जलद (Avocado for Weight Loss)

नियमित व्यायाम, पोषक आहारसोबतच अवकॅडोचं सेवन केल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. अवकॅडो हे फळ शरीराला पोषण मूल्य देतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत करतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास तुमच्या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही याचा समावेश जरूर करावा.

दातांसाठी उपयोगी (Avocado Benefits of Teeth)

जर तुम्हाला दातांच्या दुर्गंधीची समस्या असल्यास अवकॅडो नक्की खा. यामुळे तुमच्या दातांच्या दुर्गंधीचा त्रास नक्कीच दूर होईल. हा त्रास साधारणतः अपचन आणि पोटातील गडबड या कारणांमुळे होतो. पचनक्रिया योग्य असल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि अवकॅडोमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँंटीऑक्सीडंट फ्लेनाईडमुळे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो. याशिवाय अवकॅडोमुळे तोंडाचा कॅन्सरही होत नाही.

ADVERTISEMENT

लिव्हरसाठी वरदान (Avocado For Liver)

शरीरातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे लिव्हर. अवकॅडो लिव्हर डॅमेज होण्यापासून वाचवतं. यामध्ये आढळणारे ऑर्गेनिक घटक लिव्हरला निरोगी आणि बळकट बनवतात. साधारणतः हेपटाईटीस सीमुळे लिव्हर डॅमेज होतं. एका रिसर्चनुसार, अवकॅडोमध्ये अनेक प्रकारच्या आजारांपासून लिव्हरचं संरक्षण करण्याची क्षमता आहे.

डोळ्यांसाठी आवश्यक

डोळे निरोगी ठेवण्यातही अवकॅडो सेवनाचा लाभ होतो. यामधील ल्यूटीन आणि जियाजॅन्थीन नावाचे कॅरोटीनॉईड घटकांमुळे वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव होतो. 

आर्थराईटीसवर गुणकारी

अवकॅडोमधील अँंटी इंफ्लेमट्री गुणांमुळे आर्थराईटीसच्या आजारांमध्येही याचा खूप उपयोग होतो. याशिवाय यामध्ये फाइटोकेमिकल, फ्लॅनॉईड, कॅरोटीनॉईड, फाईटोस्टीरॉल, फॅटी अल्कोहॉल आणि ओमेगा-3 फॅटी एसिड आढळतं. जे पायांचे सांधे आणि स्नायूंची सूज कमी करतं आणि आर्थराईटीसपासून बचाव करतं. जगभरात लोक आर्थराईटीसपासून बचावासाठी अवकॅडोचं सेवन करतात आणि निरोगी राहतात.

हृदय ठेवा निरोगी (Avocado For Heart)

अवकॅडो हृदय निरोगी ठेवण्यासही खूप उपयोगी आहे. अवकॅडोमध्ये बीटा-सिटोस्टीरॉल आढळतं जे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करून हृदयाला रोगांपासून दूर ठेवतं. एका रिसर्चनुसार, नियमितपणे अवकॅडो खाल्ल्याने एचडीएल कॉलेस्ट्रॉलचे अँटीएथेरोजेनिक गुण वाढतात. जे हृदयाला एथेरोस्क्लेरोसिसपासून दूर ठेवतात. याच्या सेवनाने हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. 

ADVERTISEMENT

वेदनाशामक अवकॅडो

सांधेदुखीवर अवकॅडो एखाद्या जडीबूटीसारखं काम करतं. याच्या सेवनाने हळूहळू सांधेदुखीचा त्रास कमी होत जातो.

ब्लडशुगरवरही गुणकारी

अवकॅडोमध्ये अशी तत्त्व आहेत जी शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यामुळे याचं सेवन केल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना फारच लाभ होतो आणि शुगरही कंट्रोलमध्ये राहते.

रक्तशुद्धीकारक अवकॅडो

आश्चर्यकारक बाब म्हणजे अवकॅडो रक्त शुद्धीकरण करतं. ज्यामुळे आपली अनेक रोगांपासून स्वाभाविकपणे मुक्तता होते.

ADVERTISEMENT

सौंदर्यवर्धनासाठी अवकॅडो (Beauty Benefits of Avocado)

Shutterstock

त्वचा चांगली राहण्यासाठी आणि त्वचेच्या संवर्धनासाठी अवकॅडोचं सेवन, अवकॅडो फेसपॅक आणि अवकॅडोच्या तेलाचा वापर केला जातो.

  • अवकॅडोमधील व्हिटॅमीन आणि खनिज त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतात. 
  • अवकॅडोमधील कॅरोटीनॉईड्स सूर्याच्या संपर्कात आल्यामुळे आलेल्या त्वचेवरील सूजेला कमी करण्यास मदत करतात. 
  • अवकॅडोचं तेल सनबर्नवर रामबाण उपाय आहे. सनबर्नपासून हे तेल त्वचेचं रक्षण करण्यास मदत करतं. 
  • त्वचेच्या विविध समस्यांवर अवकॅडोमधील अनेक पोषक तत्त्वं गुणकारी ठरतात. 
  • त्वचेला तजेलदार बनवतं. याचा लेप बनवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग निघून जातात आणि त्वचा नव्यासारखी भासते. 
  • तसंच अवकॅडोमध्ये आढळतात अँटी एजिंग घटक. ज्याच्या सेवनाने तुमची त्वचा दिसेल तारूण्यमय आणि लपतील वाढत्या वयाच्या खुणा. 

ADVERTISEMENT

केसांसाठी लाभदायी अवकॅडो (Avocado Benefits for Hair)

अवकॅडोमध्ये प्रोटीन, आवश्यक फॅटी अॅसिड, फोलिक अॅसिड, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन सी, डी आणि ई सोबतच अन्य पोषक तत्त्व आढळतात. जी केसांच्या आरोग्यासाठी फारच उपयोगी ठरतात.

  • अवकॅडो कंडिशनिंगच्या रूपात केसांसाठी खूपच उपयुक्त ठरतं. ज्यामुळे केसांची गळती थांबते. 
  • हे केसांना काळेभोर ठेवतं. अकाली पिकू देत नाही. 
  • तसंच याच्या सेवनाने केसांना चमकदारपणा येतो. 
  • स्प्लीट एंड्स असणाऱ्या केसांवर अवकॅडो गुणकारी ठरतं.
  • अवकॅडो तेलही तुम्ही केसांसाठी वापरू शकता. हे तेल खूपच हलकं असल्याने केसांत लगेच शोषलं जातं. यामुळे निर्जीव केस पुन्हा छान दिसू लागतात. 
  • केसांच्या दाटपणासाठी आणि वाढीसाठी अवकॅडोचं सेवन नक्कीच आवश्यक आहे.

अवकॅडोचे साईड ईफेक्ट्स (Side Effects of Avocado)

  • अवकॅडो खाण्याचे अनेक फायदे असले तरी हे खाल्ल्यावर अनेक जणांना अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. 
  • ज्या व्यक्ती लॅटेक्सच्या प्रती संवेदनशील असतील त्यांनी अवकॅडोचं सेवन टाळावं. कारण यामुळे तुमच्या शरीराला अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. 
  • अवकॅडोचं सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. पण याचं अधिक प्रमाणात केल्यास तुमच्या शरीराला नुकसानही होऊ शकतं.

ADVERTISEMENT

अवकॅडोबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दिवसभरात अर्ध अवकॅडो खाल्लंच पाहिजे. कारण हा हेल्दी फॅट्सचाही चांगला स्त्रोत आहे. अवकॅडो हा कार्बोहायड्रेट्सचाही चांगला स्त्रोत आहे.

अवकॅडो रोज खाऊ शकतो का?

कोणत्याही गोष्टीचं सेवन जास्त केल्यास ते अपायकारक ठरतंच. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त दिवसभरात अर्ध्या किंवा एकाच अवकॅडोचं सेवन करावं. एका अवकॅडोमध्ये 322 कॅलरीज आणि 29 ग्रॅम्स फॅट  असतात तर अर्ध्या अवकॅडोमध्ये 161 कॅलरीज आणि 14.5 ग्रॅम्स फॅट आढळतात.

अवकॅडो सेवनाचं प्रमाण किती असावं?

तुम्ही अवकॅडो कोणत्याही वेळी खाऊ शकता. ही गंमत नाहीयं. यातील चांगले फॅट्स आणि प्रोटीन्स तुम्ही ब्लड लेव्हल नियंत्रित करतात. ऑम्लेटमध्ये पालकांसोबत अवकॅडो घालून खाल्ल्यास सर्वोत्तम ठरतं.

अवकॅडो खाण्याची योग्य वेळ कोणती?

अवकॅडो तुम्ही कच्चंही खाऊ शकता. त्यासाठी अवकॅडोचे दोन भाग करून घ्या. त्यातील बी काढून घ्या. नंतर ते तुम्ही थोडंसं मीठ आणि ऑलिव्ह ऑईल घालून खाऊ शकता किंवा अवकॅडोची प्युरी काढून ते ब्रेडवर स्प्रेड म्हणूनही वापरू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे

आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

Health Benefits Of Giloy & Side Effects In Marathi

02 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT