आकर्षक ओठ असलेले कोणाला आवडत नाहीत? खरं तर आपण आपल्या ओठांना आपल्या त्वचेप्रमाणेच जपत असतो. ओठ हा आपल्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. पण हेच ओठ सतत कोरडे होत असतील आणि फुटत असतील तर याचा नक्कीच आपल्याला त्रास होत असतो. या त्रासातून बाहेर येण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय सुचवत असतात. पण कोरड्या ओठांमुळे आपल्याला सतत ओठांवरून जीभ फिरवायची सवय लागू शकते आणि त्याचप्रमाणे ओठांवर निघालेलं साल दातांनी चावत बसण्याचीही सवय लागते. पण ही सवय चांगली नाही. त्यामुळे ओठ लवकर खराब होतात. मग अशावेळी नक्की काय करायचं किंवा त्यावर काही घरगुती उपाय करता येतील का? असे प्रश्न आपल्याला पडतात. तर आपल्याला यावर नक्कीच घरगुती उपाय करता येतात. या लेखातून आम्ही तुम्हाला या सगळ्याची माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेऊ शकता.
ओठ फुटण्याची आणि कोरडे होण्याची नक्की कारणं काय? (What Causes Chapped Lips)
Shutterstcok
ओठ फुटण्याची आणि कोरडे पडण्याचीही काही विशिष्ट कारणं असतात. ती कारणं जाणून घेण्याचा आपण आधी प्रयत्न करूया.
महत्त्वाची कारणं नक्की काय आहेत?
- सतत ओठ चावण्याची अथवा जीभ फिरवण्याची सवय
- सूर्यकिरण
- धुम्रपान आणि दारूसेवन
- टूथपेस्टमधील त्वचेला त्रासदायक घटक
- अलर्जी
- काही औषधं ज्यामध्ये केमोथेरपी ड्रग्ज असतात
ओठ फुटण्याची आणि कोरडेपणाची ही काही महत्त्वाची कारणं आहेत. त्यासाठी सर्वात पहिला उपाय म्हणजे आपण उपयोग करतो तो लिप बामचा. पण हा उपाय काही बऱ्याच कालावधीसाठी टिकून राहणारा नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या ओठांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यावं लागेल.
Also Read: How To Make Petroleum Jelly At Home In Marathi
कोरड्या आणि फुटलेल्या ओठांसाठी नक्की कशी काळजी घ्यायची (How To Prevent Dry And Chapped Lips)
तुम्हाला जेव्हा कोरड्या आणि फुटलेल्या ओठांचा त्रास होत असतो तेव्हा तुम्ही अशा ओठांसाठी नक्की कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया
1. तुमचे ओठ कव्हर करा – तुमचे हातपाय कोरडे पडतात तेव्हा तुम्ही ते व्यवस्थित कपड्यांनी कव्हर करता. तुम्हाला ओठांच्या बाबतीतही हेच करायचं आहे. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा खूप प्रदूषण असल्यानेही तुमचे ओठ खराब होत असतात. त्यामुळे बाहेर जाताना नेहमी कॉटनचा कपडा तुमच्या ओठांभोवती व्यवस्थित गुंडाळून घ्या.
2. भरपूर पाणी प्या – काही लोकांना जास्त घाम येत नसल्यामुळे तहान लागत नाही आणि त्यामुळे असे लोक पाणी कमी पितात. पण असं करू नका. तुमच्या शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे किमान आठ ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच हवं. सतत पाणी प्यायलाने तुमचे ओठ व्यवस्थित मॉईस्चराईज्ड राहतात. त्यामुळे कोरडे पडण्याची शक्यताही कमी असते. पाणी पिणं ही यावरची योग्य काळजी घेणं आहे.
3. ओठ चावू नका – तुमचे ओठ कोरडे पडतात तेव्हा त्यावरील साल निघायला लागते. असं असेल तेव्हा काही जणांना ओठ चावायची अथवा दातांनी साल काढायची सवय असते. पण असं करणं योग्य नाही. असं केल्यामुळे तुमचे ओठ खराब तर होतातच शिवाय त्याचा कोरडेपणा अधिक वाढतो आणि ते अधिक फुटायला लागतात. त्यामुळे याची काळजी घ्या.
कोरड्या आणि फाटलेल्या ओठांसाठी काय वापरावं (What to Use for Chapped Lips)
बऱ्याचदा आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे आपण घरच्या घरी कोरड्या आणि फाटलेल्या ओठांसाठी उपाय नाही करू शकत. अशावेळी आपल्याकडे इतरही उपाय असतात जे वापरून आपण यावर उपाय करू शकतो. जाणून घेऊया आपण यासाठी कोणत्या गोष्टी वापरू शकतो.
1. लिप स्क्रब्स (Lip Scrubs)
कोरड्या ओठांसाठी तुम्ही अगदी माईल्ड स्क्रब अर्थात साखर अथवा अस्कोर्बिक असिड अशा वस्तूंचा वापर करू शकता. कोरड्या ओठांना ओलसर ठेवण्यासाठी स्क्रब्सचा उपयोग होतो. तुमचे ओठ अतिशय कोरडे असतील तर तुम्ही आठवड्यातून किमान दोन वेळा तर तुमच्या ओठांना स्क्रब करायला हवं. स्क्रबिंग करून झाल्यानंतर ओठ ओलसर ठेवण्यासाठी लिप बाम लावायला विसरू नका.
वाचा – चॅपड आणि ड्राय ओठांची कारणे
2. लिप बाम (Lip Balm)
लिप बाम हा अत्यंत सहज आणि सोपा उपाय आहे. बाजारामध्ये तुम्हाला अनेक लिप बाम मिळतात. तुमच्या आवडीचा आणि तुमच्या त्वचेला सूट होईल असा लिप बाम तुम्ही नेहमी वापरा. तसंच तुम्ही लिपस्टिक लावत असाल तर तुम्ही त्याआधी ओठांना लिप बाम किंवा ओठाचा तकाकी लावायची गरज आहे. ज्यामुळे तुमचे ओठ व्यवस्थित राखण्यास मदत होते. तसेच कोरड्या ओठांसाठी लिप बाम लावा. ज्यामुळे तुमचे ओठ कोरडे पडणार नाहीत आणि ओठांमध्ये मॉईस्चराईजर टिकून राहील.
3. लिप मास्क (Lip Mask)
तुम्ही झोपताना तुमचे ओठ सुकतात. त्यामुळे अशावेळी रात्रभर तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही विविध लिप मास्कचा वापर करू शकता. अशा ओव्हरनाईट लिप मास्कमध्ये तेल आणि ओठांना गरजेचे असलेले विविध घटक असतात. ज्यामुळे दिवसभर ओठ मॉईस्चराईज राहण्यास मदत होते.
4. लिप पॅचेस (Lip Patches)
याबद्दल जास्त लोकांना माहीत नाही. पण हायड्रोजेल लिप पॅचेस लावणं ही एक मजादेखील आहे. तुमच्या ओठांचं यामुळे संरक्षण तर होतंच शिवाय तुम्ही लिप पॅचेस लावताना ती प्रक्रिया एन्जॉयदेखील करू शकता.
5. लिप ऑईल्स (Lip Oils)
लिप ऑईल्स हा सर्वात चांगला पर्याय आहे. कारण काही तेलांमध्ये ओठांना उपयुक्त असणारे विटामिन ई, मध यासारखे घटक असतात. तेल तुमच्या त्वचेप्रमाणेच ओठांसाठीही उपयुक्त आहे. याचा वापर तुमचे ओठ दिवसभर मॉईस्चराईज आणि मऊ राहण्यासाठी करू शकता.
फुटलेल्या आणि कोरड्या ओठांवरील रामबाण उपाय (How To Get Rid Of Chapped Lips)
फुटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी तुम्ही घरच्या घरीदेखील रामबाण उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल. पण याची सामग्री मात्र तुम्हाला घरच्या घरी मिळू शकते.
1. नारळ तेल (Coconut Oil)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- नारळ तेल वा ऑलिव्ह तेल वा बदाम तेल वा जोजोबा ऑईल
- 1 किंवा 2 थेंब लिंबाचा रस वा टी ट्री ऑईल
तुम्हाला काय करायला हवं
- तुमच्याकडे कोणतं कॅरियर तेल यापैकी उपलब्ध आहे त्यावर तुम्ही त्या तेलाचे 1 किंवा 2 थेंब एसेन्शियल ऑईलमध्ये मिसळा
- त्यानंतर तुमच्या ओठांवर हे मिक्स्चर लावा आणि काही काळ तसंच राहू द्या. नंतर तुमचे ओठ पुसून घ्या.
तुम्ही किती वेळा करायला हवं
दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे मिक्स केलेलं तेल तुमच्या ओठांवर लावू शकता. तसंच तुम्ही तुमच्या ओठांवर झोपण्यापूर्वी हे लावून संपूर्ण रात्र तसंच ठेवून झोपू शकता. याचा परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसायला लागेल.
मध आणि वॅसलिन (Honey And Vaseline)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- कच्चा मध
- वॅसलिन
तुम्हाला काय करायला हवं
- तुमच्या ओठांवर पहिले मधाचा थर लावून घ्या
- त्यावर वॅसलिनचा थर लावा
- 10 ते 20 हे तसंच ओठांवर लावून ठेवा
- टिश्यू अथवा कोरड्या फडक्याने नंतर पुसा
तुम्ही किती वेळा करायला हवं
आठवडाभर तुम्ही रोज दिवसातून हे एकदा करू शकता आणि त्याचा परिणाम तुम्हाला आठवड्यातच दिसून येईल
गुलाबाच्या पाकळ्या (Rose Petals)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- 5 – 6 गुलाबाच्या पाकळ्या
- पाव कप कच्चं दूध
तुम्हाला काय करायला हवं
- 2 ते 3 तासांसाठी गुलाबाच्या पाकळ्या दुधात भिजवून ठेवा
- त्यानंतर या पाकळ्या हळूवारपणे दुधात मॅश करा
- ही पेस्ट साधारण 20 मिनिट्स तुमच्या ओठांना लावून ठेवा
- नंतर थंड पाण्याने धुवा
तुम्ही किती वेळा करायला हवं
आठवडाभर तुम्ही रोज दिवसातून हे एकदा करू शकता
काकडी (Cucumber)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
काकडीचे स्लाईस
तुम्हाला काय करायला हवं
- साधारण एक ते दोन मिनिट्स तुम्ही काकडीचे स्लाईस तुमच्या ओठांवरून अगदी हळूवारपणे फिरवा
- काकडीचा तुमच्या ओठांना लागलेला हा रस साधारण 10 मिनिट्ससाठी तुम्ही ओठांवर ठेवा आणि नंतर गार पाण्याने ओठ धुवा
तुम्ही किती वेळा करायला हवं
दिवसातून तुम्ही एक ते दोन वेळा हा प्रयोग करून पाहू शकता.
कोरफड (Aleo Vera)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
कोरफड
तुम्हाला काय करायला हवं
1. कोरफड घेऊन त्याला मध्ये छेद द्या आणि त्यातील जेल एका वाटीत काढून घ्या
2. ही जेल तुमच्या ओठांना लावून रात्रभर तशीच राहू द्या
3. सकाळी उठल्यावर गार पाण्याने धुवा. तसंच उरलेली जेल एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि मग त्याचा उपयोग करा
तुम्ही किती वेळा करायला हवं
रोज झोपताना कोरफड जेल ओठांना लावून झोपा. त्यामुळे तुमचे ओठ कोरडे होणार नाहीत
ग्रीन टी बॅग्ज (Green Tea Bags)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- 1 ग्रीन टी बॅग
- 1 कप गरम पाणी
तुम्हाला काय करायला हवं
1. गरम पाण्यात ग्रीन टी बॅग काही वेळ ठेऊन द्या
2. त्यानंतर ही बॅग काढून तुमच्या ओठांवर ठेवा
3. काही मिनिट्स ही बॅघ ओठांवर तशीच राहू द्या
तुम्ही किती वेळा करायला हवं
दिवसातून रोज एक वेळ तरी हा प्रयोग करा. त्याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल
कोको बटर (Cocoa Butter)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
ऑर्गेनिक कोको बटर अथवा शिया बटर अथवा पिनट बटर अथवा तूप अथवा लोणी
तुम्हाला काय करायला हवं
1. थोडंसं कोको बटर घेऊन तुम्ही तुमच्या ओठांना लावा आणि रात्रभर तसंच ठेवा
2. कोको बटर नसल्यास पर्याय म्हणून तुम्ही शिया बटर, लोणी अथवा तूपाचाही असाच प्रयोग करू शकता
3. जर तुम्ही पिनट बटर अथवा दही लावायचा विचार करत असाल तर ते केवळ 10 मिनिट्सच लावा. (यामुळे तुमची गादी वा उशी खराब होईल)
तुम्ही किती वेळा करायला हवं
दिवसातून रोज एक वेळ हे काही दिवसांसाठी करा
लिंबू रस (Lemon Juice)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- 1 चमचा लिंबू रस
- 1 चमचा मध
- अर्धा चमचा कॅस्टर ऑईल
तुम्हाला काय करायला हवं
1. सर्व घटक मिक्स करून तुमच्या ओठांना लावा
2. साधारण 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुवा
तुम्ही किती वेळा करायला हवं
साधारण 7 ते 10 दिवस हा प्रयोग तुम्ही करत रोज करत राहा
साखर (Suger)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- 1 चमचा ब्राऊन शुगर अथवा पांढरी साखर
- काही थेंब ऑलिव्ह ऑईल
- अर्धा चमचा मध
तुम्हाला काय करायला हवं
1. सर्व घटक मिक्स करा
2. हे मिक्स्चर तुमच्या ओठांना लावून हळूवारपणे तुमच्या ओठांवर स्क्रब करा
3. कोमट पाण्याने काही वेळाने हे स्क्रब धुवा
तुम्ही किती वेळा करायला हवं
एक दिवस आड तुम्ही हा प्रयोग तुमच्या ओठांवर करू शकता. त्यानंतर काही दिवसांनी आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करा
व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट (Vanilla Extract)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- 2 चमचे साखर
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 2 चमचे जोजोबा ऑईल अथवा ऑलिव्ह ऑईल
- पाव चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
तुम्हाला काय करायला हवं
1. सर्व घटक मिक्स करून घ्या
2. हे मिक्स्चर तुमच्या ओठांना बोटाने हळूवारपणे लावा
3. एक मिनिट तुम्ही हे स्क्रब करत राहा आणि नंतर थंड पाण्याने धुवा
तुम्ही किती वेळा करायला हवं
काही दिवस तुम्ही हे रोज करा पण आठवड्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसांनी तुम्ही करू शकता
साखर आणि मध (Suger and Honey)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
- 2 चमचे साखर
- 1 चमचा मध
तुम्हाला काय करायला हवं
1. सर्व घटक मिक्स करून घ्या
2. हे मिक्स्चर तुमच्या ओठांना बोटाने हळूवारपणे लावा
3. एक मिनिट तुम्ही हे स्क्रब करत राहा आणि नंतर थंड पाण्याने धुवा
तुम्ही किती वेळा करायला हवं
काही दिवस तुम्ही हे रोज करा पण आठवड्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसांनी तुम्ही करू शकता
बदाम तेल (Almond Oil)
Shutterstock
तुम्हाला काय लागेल
बदाम तेल
तुम्हाला काय करायला हवं
1. तेल तुमच्या ओठांना लावून घ्या
2. त्यानंतर काही काळ तसंच राहू द्या. नंतर तुमचे ओठ पुसून घ्या.
तुम्ही किती वेळा करायला हवं
रोज रात्री झोपताना तुम्ही हा प्रयोग करू शकता.
प्रश्नोत्तर (FAQs)
1. ओठ फुटण्याचं प्रमाण जास्त थंडीमध्येच असतं का?
एखाद्याचे ओठ उन्हाळ्यातही फाटू शकतात. त्यासाठी थंडीच असावी लागते असं नाही. काही जणांची त्वचा कोरडी असते तसंच त्यांचे ओठही कोरडे राहतात. मॉईस्चराईजेशन नीट न झाल्यामुळे ओठ कोणत्याही ऋतूमध्ये फाटू शकतात आणि त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.
2. केवळ लिप बाम लावून ओठांची काळजी घेता येईल का?
बऱ्याच जणींना लिप बाम लावायची सवय असते. पण लिप बाम तुम्ही काही तासांसाठीच लावू शकता. तुम्ही वर दिलेल्या काही घरगुती उपायांपैकी उपाय ट्राय केल्यास, तुम्हाला लिप बामची सतत गरज भासणार नाही.
3. ओठ कोरडे असतील तर जखमा होतात का?
ओठ कोरडे झाल्यावर बऱ्याच जणांना चावायची सवय असते. त्यामुळे यामध्ये ओठांवर जखमा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओठ कोरडे पडल्यास, वेळेवर त्यावर उपाय करावेत.
हेदेखील वाचा
ओठ काळे पडले असतील तर करा 10 घरगुती उपाय
फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक
ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती