रिमेक ' साकी साकी' गाण्यावर भडकली कोएना मित्रा, अजिबात आवडलं नाही गाणं

रिमेक ' साकी साकी' गाण्यावर भडकली कोएना मित्रा, अजिबात आवडलं नाही गाणं

ज्या गाण्यामुळे कोएना मित्राला बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली ते गाणं म्हणजे साकी साकी…. ओ साकी साकी रे साकी.. साकी… आ पास आ रह ना जाए कोई ख्बाईश बाकी.. या गाण्यावर आपल्या नृत्याचा अविष्कार दाखवणारी कोएना मित्रा या गाण्याच्या रिमेकवर चांगलीच नाराज आहे. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पण तो कोएनाला रुचला नसावा कारण तिने लगेचच ट्विट करत या गाण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

का आहे गाण्यावर नाराज?

12 जुलैला या गाण्याचा टीझर लाँच करण्यात आला. यामध्ये साकी साकी गाण्यावर नोरा फतेही नृत्याविष्कार करताना दिसत आहे. कोएनाने ट्विट करत असे म्हटले आहे की, हे गाणे सुनिधी, सुखविंदर, विशाल- शेखर यांचे होते. हे गाणं सुंदरच होतं. पण आता बाटला हाऊस या चित्रपटासाठी हे गाणं का? मुसाफिरमधील या गाण्याने अनेक चित्रपटांना मागे टाकले होते. आता फक्त नोरावरच विश्वास आहे की, ती या गाण्याची लाज राखेल.

फायर पान खाऊन या अभिनेत्रीचे झाले हे हाल, व्हिडिओ झाला व्हायरल 

कोणत्या चित्रपटात असणार आहे हे गाणं

Instagram

15 ऑगस्टला जॉन अब्राहम स्टारर ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्या आधी या चित्रपटातील नोरा फतेहीवर चित्रित करण्यात आलेल्या ‘साकी साकी’ गाण्याचे टीझर रिलीज करण्यात आले. 15 जुलै म्हणजे आज हे संपूर्ण गाणं रिलीज करण्यात येणार आहे. गाण्याची पहिली झलक पाहता हे गाणं ब्लॉकबस्टर असेल याची खात्री आहे. पण कोएना मित्राने या गाण्यावर टीका केल्यामुळे हे गाणं आता मन लावून ऐकावे लागणार आहे.

गाण्यापेक्षा चित्रपटावर रोष

कोएनाने केलेल्या ट्विटवरुन एक गोष्ट लक्षात येत आहे ती म्हणजे तिला नोरावर राग नाही. तर तिला या ‘बाटला हाऊस’ या चित्रपटावर विशेष राग असल्याचे दिसत आहे. कारण तिने यामध्ये संगीतापेक्षाही अधिक लक्ष चित्रपटाकडे वेधलेलं दिसत आहे.

धोनीच्या निवृत्तीबद्दल काय म्हणाल्या लता मंगेशकर, वाचा

सोफी चौधरीने केली पाठराखण

कोएना मित्राच्या ट्विटवर रिअॅक्ट होत सोफी चौधरीने देखील कोएनाची पाठराखण केली आहे. प्रत्येक जुन्या गाण्याचे रिमेक होणे गरजेचे नसते. आधीचे गाणे चांगले असताना या गाण्याचे रिमेक करण्याची काहीच गरज नव्हती. तिने असे ट्विट केल्यानंतर सोफी चौधरीलाच अनेकांनी टार्गेट केले आहे. सोफी चौधरीने आतापर्यंत अनेक जुन्या गाण्यांच्या रिमिक्समध्ये काम केली आहेत आणि त्यातूनच स्वत:चे करिअर घडवले आहे.

मान्सूनमध्ये शॉपिंग करताना ही घ्या काळजी

सध्या काय करते कोएना मित्रा?

Instagram

कोएना मित्राचा करिअर ग्राफ इतका मोठा नाही. तिने 10 ते 11 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सध्या कोणत्याच चित्रपटात काम करत नाही.तिच्या प्लास्टिक सर्जरीही तिच्या करिअरपेक्षा जास्त गाजल्या. तिने तिच्या चेहऱ्यात केलेले बदल इतके वाईट होते की, तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. 

पाहा कोएना मित्राचा साकी साकी

जर तुम्ही कोएना मित्राचा साकी साकी गाण्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नोराचा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही कोएना मित्राने मुसाफिरमध्ये केलेला डान्स नक्कीच पाहायला हवा. संजय दत्त या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचीही स्तुती झाली या गाण्यामुळे कोएना मित्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पाहा original व्हिडिओ