ADVERTISEMENT
home / Love
MyStory : मी माझ्या बॉसच्या प्रेमात पडले अन्……

MyStory : मी माझ्या बॉसच्या प्रेमात पडले अन्……

प्रेम कुठेही आणि कोणावरही जडू शकतं. ऑफिसमध्ये जुळणाऱ्या प्रेम जोड्या हे काही नवीन नाही. ऑफिसमध्ये एकत्र काम करता करता अनेकांच्या प्रेमजोड्या जुळल्या आहेत. अशीच एक ऑफिसमधली प्रेमकथा सांगत आहोत आजच्या #MyStory मध्ये. पण ही जरा वेगळी आहे कारण यामध्ये आहे एकमेकांप्रती असलेला आदर आणि कधी व्यक्त न केलेलं प्रेम. 

मला नेहमी आत्मविश्वासाने भरलेली strong माणसं खूप आवडायची. कदाचित त्यांच्या एटीट्यूडमुळे किंवा त्यांच्या कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या स्वभावामुळे अशा व्यक्तींकडे मी आकर्षित होत असे. ही दोन्ही वैशिष्ट्य माझ्या ex-boss मध्ये होती. 

नोकरी की सेलिब्रेशन

त्यांची आणि माझी पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा असं काही होईल याची आशाच नव्हती. कॉलेजच्या परीक्षेचा शेवटचा दिवस होता आणि प्रत्येकजण सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये होता. माझ्या फ्रेंड्सनीही ड्रींक करायला जाण्याचा प्रोग्रॅम केला आणि मला ही सोबत चलण्यास सांगितलं. मी जाण्यासाठी ज्या क्षणी कारमध्ये बसले तेव्हा एका टीव्ही न्यूज चॅनलमधून फोन आला. त्यांनी मला लगेचच इंटरव्ह्यूसाठी येण्यास सांगितलं. त्यांच्या चॅनलमध्ये एक पोस्ट रिकामी होती. मला हे कळताच इतका आनंद झाला की, आनंदाच्या भरात मी एक उडीच मारली. मी त्यांना रिक्वेस्ट केली की, इंटरव्ह्यूची तारीख एका दिवसाने पुढे ढकलू शकता का कारण का आत्ताच माझी परीक्षा संपली आहे. पण त्यांनी सांगितलं की, आज इंटरव्ह्यूजचा शेवटचा दिवस आहे. आता मला दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा होता. एक तर आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन एन्जॉय करणं किंवा माझं आयुष्य बदलणाऱ्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाणं. मी लगेच ट्रेन पकडली आणि अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये पोचले. खरंतर मी खूप जास्त नर्व्हस होते आणि इंटरव्ह्यूसाठी अजिबात तयार नव्हते. त्या ऑफिसमध्ये पोचून मी रिसेप्शनच्या इथे बसले आणि माझा नंबर येण्याची वाट पाहू लागले. तेव्हाच मला एक प्रसिद्ध चेहरा दिसला. ती आमच्या कॉलेजमधली सीनियर होती आणि आता याच न्यूज चॅनलमध्ये काम करत होती. तिला बघून मला जरा हायसं वाटलं. पण आश्चर्य वाटलं की, मला तिला नाहीतर कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला भेटायचं होतं. 

ADVERTISEMENT

Canava

एका इंटरव्ह्यूची गोष्ट

मला इंटरव्ह्यूसाठी एका मोठ्या कॉन्फरंस रूममध्ये नेण्यात आलं आणि बसण्यासाठी सांगितलं. तिकडे बसलेली व्यक्ती लॅपटॉपमध्ये अशी बिझी होती की, माझ्याकडे त्यांनी पाहिलंही नाही. अचानक त्यांनी मला विचारलं की, तुझी आत्तापर्यंतची सर्वात लांब रोडजर्नी कोणती होती? (हा प्रश्न एकदम random होता) मी सांगितलं की, लोणावळा. हे ऐकताच त्यांना जोरदार हसू आलं. (कारण मुंबई ते लोणावळा हा प्रवास कमीतकमी दोन तासांचा होता. त्यामुळे मला कळलं की, त्यांना हसू का आलं.) अचानक त्यांनी हसणं थांबवलं आणि मला विचारलं की, मला कोणत्या प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हायला आवडेल. आता मला कळलं की, हा इंटरव्ह्यू नोकरीसाठी नसून नुसत्या गप्पा सुरू आहेत. नंतर त्यांनी मला विचारलं की, तू ड्राईव्ह करू शकतेस का…मी म्हटलं नाही. त्यांनी मी वेळ दिल्याबद्दल मला थँक्स म्हटलं आणि जाण्यासाठी सांगितलं. आता तर मी अजूनच बुचकळ्यात पडले. म्हणजे हे होतं तरी काय? माझा ईगो दुखावला होता. मी परत आत गेले आणि त्यांना म्हणाले की, “Road trips फक्त ज्यांना ड्राईव्ह करता येतं त्यांच्यासाठी नसतात तर हा प्रवास मैत्रीचाही असतो. कारमध्ये चांगली कंपनी असेल तरच प्रवास अविस्मरणीय होतो.” माझं हे म्हणणं ऐकल्यावर त्यांनी मला थांबण्यास सांगितलं. ते म्हणाले की, माझा rebellious म्हणजेच विद्रोही attitude त्यांना आवडला आणि मला त्यांनी एका वेब शोमध्ये भाग घेण्याची संधी दिली. माझा हा attitude पाहून त्यांनी सांगितलं की मी एक चांगली web jockey बनू शकते.  पण मला journalist बनायचं होतं. संधी मिळाल्यामुळे मी आनंदी होते. माझं टॅलेंट दाखवण्याची संधी मला मिळाली होती. नंतर तो शो मी जिंकला. त्यानंतर मला web jockey होण्याची ऑफर देण्यात आली. पण मी काहीतरी वेगळंच मागितलं. मी त्यांना म्हटलं की, मला डिजीटल कंटेट रायटर म्हणून त्यांच्या टीममध्ये सामील व्हायचंय. हा रोल माझ्या journalism qualification ला मॅच करत होता. त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. अशा पद्धतीने मी त्यांच्या टीमचा भाग झाले. आता त्या ऑफिसमध्ये मी new-comer नव्हते. तर त्यांच्या टीमची मेंबर होते आणि ते माझे Boss. 

Shutterstock

ADVERTISEMENT

नात्याची सुरूवात

त्या दिवसानंतर आमचं नातं एकदम बदललं. आता आमच्यात आधीसारखी माझ्याशी मजा-मस्ती करत नसतं. उलट जसे ते त्यांच्या टीम मेंबर्सशी वागत तसंच माझ्याशी वागत असत. ते मलाही टार्गेट द्यायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रेशरही टाकायचे. आमची पहिली टीम मीटींग त्यांच्या supervision मध्ये झाली आणि तेव्हापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी भावना निर्माण झाली होती. त्या मीटींगनंतर मी त्यांना वेगळ्याच नजरेने पाहू लागले. ते खूप bold होते आणि important निर्णय घ्यायचे. स्वतःची प्रत्येक गोष्ट अगदी impressive पद्धतीने सांगायचे. त्यांची सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असायची. प्रत्येक गोष्टीबाबत त्यांना knowledge असायचं आणि कोणीही त्यांच्याशी वादात जिंकू शकायचं नाही. असं वाटायचं की, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. 

अटेंशन मिळवण्यासाठी धडपड

मीटींगनंतर प्रत्येकवेळी मी त्यांचं अटेंशन मिळवायचा प्रयत्न करायचे. त्यांच्यापुढे नवीन आयडिया ठेवत असे. छोट्याश्या ब्रेकमध्येही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असे. त्यासाठी मी माझं काम लवकर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू लागले. माझी इच्छा होती की, माझ्या कामामुळे त्यांचं लक्ष माझ्याकडे वळावं आणि त्यांनी माझ्या कामाला seriously घ्यावं. आणि तसं घडलं… काही वेळानंतर काही चुकांमुळे अखेर त्यांनी मला नोटीस केलं. त्यांना माझ्या टॅलेंटवर विश्वास वाटू लागला. त्यांनी मला नवीन प्रोजेक्ट हँडल करायला दिला. पण माझ्यावरचं कामाचं प्रेशर वाढू लागलं होतं. तरीही मला हे मान्य होतं. मला त्यांचं अटेंशन मिळत होतं आणि त्यामुळे मला ते प्रेशरही मान्य होतं.

Canava

ADVERTISEMENT

हर तरफ तेरा जलवा

ते माझ्या कामाचा नेहमीच मला फीडबॅक देत असत. त्यामुळे मला खूप चांगलं वाटायचं. त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची होती. त्यांचाप्रती असलेल्या या attraction मध्ये काहीही lustful नव्हतं. याउलट हे attraction त्यांच्या intelligence, त्यांच्या power आणि charm मुळे होतं आणि या तिन्ही qualities त्यांच्यात भरभरून होत्या. मी त्यांना तासंतास पाहू शकत होते आणि त्यांच्या गोष्टी बिना बोअर होता ऐकत असे. आम्ही खूप वेळ अनेक मुद्द्यावर चर्चा करत असू. असं होतं आमचं प्रेम. खरंतर माझ्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्याबाबतीत कोणतीही नरमाई केली नाही आणि यासाठी मी त्यांची ऋृणी आहे. त्यांनी माझ्या प्रत्येक चुकीवर बोट ठेवलं आणि त्या सुधारण्यासाठी मला motivate केलं. ते खऱ्या अर्थाने माझे mentor होते. जेव्हा मला पुढचा ब्रेक मिळाला तेव्हा त्यांनी मला support केला आणि चांगला सल्लाही दिला. आज जरी आम्ही एकत्र काम करत नसलो तरी एकमेकांच्या संपर्कात आहोत. जेव्हा मला motivation ची गरज असते तेव्हा ते माझ्या सोबत असतात. मी देवाचे आभार मानते की, त्याने आम्हा दोघांची भेट घडवली. पण मी आजपर्यंत त्यांना माझ्या feelings बाबत काहीही सांगितलं नाही. कारण काही अनोळखी नात्यांमागे रंजक कहाण्या असतात. आमची कहाणीही तशीच काहीशी आहे. 

हेही वाचा –

#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

ADVERTISEMENT

#MyStory: आजही साखरपुड्याचा तो क्षण आठवला की…

26 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT