ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
तुम्ही पाहिला आहे का White Tea , ज्याची किंमत आहे हजारोंमध्ये

तुम्ही पाहिला आहे का White Tea , ज्याची किंमत आहे हजारोंमध्ये

जास्तकरून लोक दिवसाची सुरूवात चहानेच करतात. कोणी साधा चहा घेतं तर आजकाल बरेच जण ग्रीन टी किंवा हर्बल टीने दिवसाची हेल्दी सुरूवात करतात. चहा बनवणं तसं जास्त कठीणही नाही. चहा पिण्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. त्यामुळे चहा आपल्या बहुतेकांच्या जीवनातील भाग आहे. तसंच बाजारात आपल्याला चहाची पत्ती अगदी आरामात विकत मिळते. प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त भावाला चहा पावडर घेतली जाते. पण तुम्ही एखाद्या अशा चहा पावडरबद्दल ऐकलं आहे का, जी पांढरी असून किंमत 10 हजारपेक्षाही जास्त रूपये प्रती किलो आहे.

तुम्ही पाहिली आहे का पांढरी चहापत्ती

Instagram

हो…पांढरा किंवा सफेद चहा (White Tea) जो सध्या पूर्वाैत्तर राज्यांमध्येच पिकवला जातो. या चहाच उत्पादन येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून केलं जात आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच तब्बल 10 हजरा प्रतीकिलो व्हाईट टी विकण्यात आली. या चहाच्या सुगंधामुळे आणि चांगल्या क्वालीटीमुळे या चहाची मागणी वाढत आहे. आश्चर्य म्हणजे या चहाची पानंही पांढरी असतात. तसंच याचं उत्पादन करताना भरपूर काळजीही घ्यावी लागते. 

ADVERTISEMENT

काय आहे पांढरा चहा किंवा पांढरी चहापत्ती

ही चहापत्ती चहाच्या मळ्यातील कळ्या आणि अगदी पालवी फुटलेल्या पानांपासून बनवली जाते. ही चहापत्ती दिसायला फिक्कट ब्राऊन किंवा पांढरी असते. त्यामुळे हिला पांढरा चहा असंही म्हणतात. या चहाबाबत जगभरात वेगवेगळे समज आहेत. 

Instagram

किती गुणकारी आहे हा चहा

  • काळा चहा पिण्याचे फायदे आहेत तर या चहाला अक्षरशः संजीवनी चहा असं म्हटलं जातं.
  • हार्ट पेशंटसाठी हा चहा उत्तम आहे. 
  • हा चहा वजन कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे.
  • हा चहा घेतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर दिसत नाहीत. कारण हा चहा आहे अँटी एजिंग.

इतका गुणकारी कशामुळे

हा चहा इतका गुणकारी आहे, कारण या चहाचं ऑक्सीकरण केलं जातं नाही आणि तसंच या पानांना कुटलंही जात नाही. त्यामुळे इतर चहाच्या तुलनेत किंवा पारंपारिक काळ्या चहाच्या तुलनेत हा चहा हलका आणि आरोग्यदायी आहे. 

ADVERTISEMENT

Instagram

हा चहा कसा बनवावा

असा चहा बनवण्याची कोणतीही वेगळी पद्धत नाही. तुम्ही आपला नेहमीचा चहा जसा बनवता त्याचप्रमाणे तुम्ही हा चहाही बनवू शकता. आश्चर्य म्हणजे या चहाला पेय म्हणून तर मागणी आहेच. पण याचा परफ्युमही मिळतो. ऐकावे ते नवलच.

जांभळा चहा

या चहापेक्षा महाग असतो अरूणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात उत्पादन घेतला जाणारा चहा. ज्याचा रंग तर चक्क जांभळट असतो. असं म्हणतात की, याचं उत्पादन पूर्वी केनियामध्ये घेतलं जायचं. जे आसाममध्ये आणून आसाममधून अरूणाचल प्रदेशला आणण्यात आलं. हा चहाही चांगल्या गुणवत्तेचा मानला जातो. या चहाच्या सेवनाने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. पण या चहाचं उत्पादन फक्त जंगलांमध्येच घेतलं जातं. या चहाची किंमत तब्बल 15000 रूपये एवढी पूर्वी होती. आता अजून महाग झाल्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

Instagram

20 हजार प्रतीकिलो विकली जाणारी दार्जिलिंग टी

जांभळ्या चहापेक्षा थोडी स्वस्त मिळते ती दार्जिलिंगची चहापत्ती. हा चहा पूर्णतः हाताने बनवला जातो. याची किंमत आहे जवळपास 20 हजार रूपये प्रती किलो. 

ADVERTISEMENT

Instagram

मग खिशाला न परवडणारा असला तरी एकदा तरी हा पांढरा चहा नक्की पिऊन पाहा. चहाबाज असणाऱ्यांसाठी हा नक्कीच वेगळ अनुभव असेल. 

हेही वाचा –

तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा

ADVERTISEMENT

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी

31 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT