निरोगी आणि फिट राहण्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्ट ची सुरूवात ओट्स(Oats) ने करा असं आहारतज्ञ्ज सल्ला देतात. मात्र अनेकांना ओट्स खाण्याचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे ओट्स खाण्याचा बऱ्याचदा कंटाळा केला जातो. ओटस् मध्ये असे काही आरोग्यकारक गुणधर्म दडलेले असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि सौंदर्यावर ओट्स खाण्याचे चांगले फायदे झालेले दिसून येतात. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो. मात्र एवढंच नाही तर सौंदर्यांत भर घालण्यासाठीदेखील तुम्ही ओट्सचा वापर करू शकता. यासाठीच जाणून घ्या ओट्सचे खाण्याचे फायदे (oats benefits in marathi) आणि करा आहारात ओट्सचा नियमित असा वापर.
रोगप्रतिकारशक्ती वाढते (Immunity Booster)
ओट्समध्ये विरघळणारे फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असतं. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढतात. ज्या तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक संस्थेचा एक प्रमुख भाग असतात. या पेशी आजारपणात एखाद्या योद्धा प्रमाणे तुमच्या शरीराचे संरक्षण करतात. ओट्समधील झिंक आणि सेलेनियम मुळे तुमचे वातावरणातील इनफेक्शन पासून रक्षण होते. सहाजिकच आजारपण दूर ठेवण्यासाठी तुम्ही ओट्स आहारात असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती बळकट होते.
Oats Benefits In Marathi
रक्तातील साखर कमी होते (Lowers Blood Sugar Levels)
जर तुम्ही नियमित ओट्स खात असाल तर तुमची रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण ओटसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असते. तुमच्या शरीराचा ग्लायकेमिक इंडेक्स नियंत्रित ठेवण्यासाठी हे घटक गरजेचे असतात. अती लठ्ठ आणि टाईप 2 मधुमहींसाठी तर ओट्स वरदान ठरतात. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ओट्सचा वापर करणं खूप गरजेचं आहे. यासाठीच तयार करा सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्सच्या ‘या’ स्वादिष्ट रेसिपीज
ह्रदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)
ओट्समध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. शिवाय यात फायबर्सही पुरेसे असतात. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होतो. बीटा ग्लुटेन आणि सोल्युबल फायबर्समुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. ह्रदयावरचा ताण कमी झाल्यामुळे तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो. यासाठीच ह्रदयाच्या समस्या असलेल्या लोकांच्या आहारात ओट्स असायला हवेत.
ओट्स खाण्याचे फायदे
पचनसंस्थेसाठी उत्तम (Good for our Digestive System)
ओट्समुळे पोट साफ राहण्यास मदत होते ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते. शिवाय ओट्समुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते आणि तुम्ही अपथ्यकारक पदार्थ कमी प्रमाणात खाता. याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होतो आणि तुमची पचनसंस्था चांगली कार्यरत राहते. ओट्स खाण्यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यादेखील कमी प्रमाणात होतात. यासाठीच ज्यांना पोटाच्या समस्या अथवा बद्धकोष्टतेचा त्रास असेल अशा लोकांनी आहारात ओट्सचे प्रमाण वाढवावे.
वाचा – विभिन्न प्रकारच्या आमटी रेसिपी
कर्करोगाचा धोका कमी होतो (Reduces Cancer Risk)
ओट्समध्ये lignans नावाचा घटक भरपूर प्रमाणात असतो. ज्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो. शिवाय ओट्समध्ये व्हिटॅमिन सी अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे वातावरणातील फ्री रेडिकल्सपासून शरीराचे संरक्षण होते. ओटसमुळे शरीरातील दाह कमी होतो आणि आरोग्य सुधारते. यासाठीच कर्करोगापासून दूर राहण्यासाठी नियमित ओट्सचा आहार घ्यायला हवा.
हायपरटेंशन कमी होते (Reduces Hypertension)
हायपरटेंशन म्हणजे उच्चरक्तदाब. आजकाल कामाचा अती ताण, काळजी, चिंता यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अगदी कमी वयातही रक्तदाबाची समस्या जाणवू शकते. मात्र जर तुम्ही नियमित ओट्सयुक्त आहार घेत असाल तर तुमची या समस्येपासून नक्कीच सुटका होऊ शकते. ओट्समध्ये असलेल्या फायबर्समुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्त वाहिन्या आणि ह्रदयाचे कार्य सुरळीत झाल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.
वजन कमी करण्यास मदत होते (Helpful in Weight Loss)
ओट्समध्ये कॅलरिज कमी प्रमाणात असतात. तुमचं वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. शिवाय ओट्समध्ये फायबर्सदेखील मोठ्या प्रमाणावर असतात. ओट्स खाण्यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं. सहाजिकच ओट्स खाण्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही अती प्रमाणात आहार घेत नाही. शिवाय यामुळे तुम्ही अपथ्यकारक पदार्थ कमी प्रमाणात खाता. ओट्समधील फायबरमुळे आलेल्या अन्नाचे पचन चांगले होते. त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता अशा आरोग्यसमस्या जाणवत नाहीत. सहाजिकच या सर्व गोष्टींची तुमच्या वजनावर योग्य नियंत्रण राहण्यास मदत होते.
त्वचेसाठी उत्तम (Good for the Skin)
ओटस तुमच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. कारण ओट्सचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि तजेलदार होते. यासाठी ओट्स कच्चा दूधात भिजवून त्याची पेस्ट नियमित त्वचेला लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एकप्रकारचा नैसर्गिक ग्लो येईल. त्वचेवर सतत धुळ, माती, प्रदूषणचा थर बसत असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या आतील छिद्र बंद होतात. या समस्येमुळे पिंपल्स, त्वचेच्या समस्या, इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही ओट्स आणि मधाचा स्क्रब चेहऱ्यावर लावला. तर ओट्समधील फायबर्समुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होण्यास मदत होते. शिवाय त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण कमी होते. ज्यामुळे त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. तुम्ही फ्रेश आणि सुंदर दिसू लागता. सुंदर त्वचेसाठी असा करा ओट्सचा वापर
केसांसाठी पोषक (Good for the Hair)
ओटस त्वचेप्रमाणे केसांसाठीदेखील पोषक ठरते. ओट्सचा हेअर मास्क लावल्यामुळे स्काल्पला येणारी खाज कमी होते. एखाद्या तेलाप्रमाणे ओट्स केसांना मऊपणा देतात. केसांमध्ये कोंडा होणं, केस गळणे, केस कोरडे होणे, केस तुटणे यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केसांवर ओट्सचा हेअर मास्क लावू शकता. शिवाय नियमित ओट्सचा वापर केसांवर केल्यामुळे केस गळणे तर कमी होतेच शिवाय केस मजबूत, लांब, मऊ आणि चमकदार होतात.
हाडांचे आरोग्य सुधारते (Improves Bone Health)
ओट्स खाण्याचे फायदे अनेक आहेत कारण संपूर्ण शरीरावर ओट्स फायदेशीर ठरते. मात्र ओट्स खाण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते. कारण ओट्समध्ये सिलिकॉन हे एक महत्त्वाचा घटक असतो. ज्यामुळे तुमच्या शरीरातील हाडे मजबूत आणि लवचित होतात. महिलांना तिशी आणि चाळिशीनंतर हाडांची झीज झाल्यामुळे अंगदुखीचा त्रास होतो. यासाठीच अशा महिलांनी नियमित ओट्स खावे. यासाठी हेल्दी नाश्ता हवा असेल तर घरीच करा असा झटपट ‘ओट्स उत्तपा’
Oats Che Fayde In Marathi
ओटस् खाण्याचे फायदे बाबत प्रश्न – FAQ’s
ओट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र अती प्रमाणात ओट्स खाण्याचे काही दुष्पपरिणाम होऊ शकतात. ओट्सचा वापर करून तयार केलेले चमचमीत आणि तळलेले पदार्थ खाण्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
ओट्स हेल्दी असले तरी प्रमाणातच खावे. दिवसभरात एक ते दोन ओट्स खाणे आरोग्यासाठी हितकारक ठरेल. शिवाय ते योग्य पद्धतीमध्ये आणि इतर पोषक पदार्थांसोबतच सेवन करावे.
ओट्स खाणं हा निरोगी राहण्याचा एक चांगला मार्ग असला तरी घरी तयार केलेले ओट्सचे पदार्थच नेहमी खावे. कारण इन्संट ओट्ससाठी करण्यात आलेली प्रक्रिया आणि वापरण्यात आलेले इतर पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतीलच असं नाही.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि पिक्सेल्स