सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. खरंतर बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग आदल्या दिवशीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की, पुराणात अनालसुराला गिळून गणपतीने देवांची असूरांपासून सुटका केली होती. मात्र या असूराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला. तेव्हा गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला होता. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत सुरू झाली. शिवाय बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत असंही म्हटलं जातं. या काल्पनिक कथेमधील सत्य जरी आपल्याला ठाऊक नसलं तरी दुर्वा आपल्या जीवनात वरदान नक्कीच आहेत. दुर्वा या एक प्रकारचं औषधी गवत असतात. या दुर्वांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी त्या नक्कीच हितकारक असतात. यासाठीच दुर्वांचे महत्त्व अवश्य जाणून घ्या.
दुर्वांचे आरोग्यदायी फायदे
त्वचाविकार दूर होतात
आजकाल धुळ, माती, प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, आहाराबाबत असलेल्या चुकीच्या सवयी यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होत असतो. जर तुम्हाला अंगावर पुरळ येत असेल, रॅशेस आले असतील आणि त्यामुळे त्वचेचा दाह होत असेल तर तुम्ही दुर्वांचा वापर करू शकता. कारण दुर्वांमध्ये अॅंटिसेप्टिक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचे हे त्वचा विकार यामुळे नक्कीच कमी होऊ शकतात. यासाठी दुर्वांची पाने स्वच्छ करून त्याची वाटून पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या ता भागावर लावा.
नेत्र विकारांवर उपयुक्त
डोळ्यांसाठी दुर्वा फारच गुणकारी असल्याचं म्हटलं जातं. जर तुम्हाला सतत डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे दुखत असल्यामुळे झोप न येणं असा त्रास होत असेल तर तुम्ही एका कापडात दुर्वा गुंडाळून तुम्ही ती त्या कापडाची पट्टी डोळ्यांवर बांधून ठेवू शकता. दुर्वांचा स्पर्श झाल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या समस्या नक्कीच कमी होऊ शकतात.
डोकेदुखी होते दूर
अनेकांना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. कामाचा ताण, सततची दगदग, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. मात्र डोके दुखत असल्यास अनेकजण एखादी पेनकिलर अथवा डोक्यावर बाम लावतात. ज्याची पुढे त्यांना एकप्रकारे सवयच लागते. जर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम हवा असेल तर दुर्वांची पाने वाटून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. शिवाय याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्कीच होत नाही.
बद्धकोष्ठतेवर परिणामकारक
अनेकांना अपचनाच्या सवयीमुळे मलावरोधाचा त्रास होत असतो. ज्यामुळे दैनंदिन शौचविधी करणे त्यांना फारच कठीण जाते. शिवाय या समस्येमुळे पोट स्वच्छ होत नसल्यामुळे उतर अनेक आरोग्यसमस्या यातून निर्माण होत असतात. जर तुम्हाला यातून सुटका हवी असेल तर तुम्ही दुर्वांचा रस घेऊ शकता. या उपायामुळे अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याधीसारख्या समस्या कमी होऊ शकतात.
तोंड आल्यास करा हा उपाय
अनेकांना उष्णतेमुळे तोंड येणं, तोंडात फोड अथवा अल्सर होण्याचा त्रास होत असतो. बऱ्याचदा यावर अनेक उपाययोजना करूनही काहीच परिणाम होत नाही. कारण हा त्रास वारंवार होतच राहतो. तोंड येणे अथवा तोंडातील अल्सरच्या समस्येमुळे खाताना अथवा पाणी पिताना खूप त्रास जाणवतो. बोलणे, तोंड स्वच्छ करणे, खाणे अशा गोष्टी करणं कठीण जातं. अशावेळी दुर्वा स्वच्छ धुवून रात्रभर एका भांड्यांत पाणी घालून बुडवून ठेवाव्यात आणि सकाळी त्या पाण्याने चुळ भरावी. ज्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
हे ही वाचा –
POPxo मराठी यावर्षी खास तुमच्यासाठी एक स्पर्धा घेऊन येत आहे. तुम्हाला फक्त तुमच्या बाप्पाबरोबर सेल्फी काढून आम्हाला टॅग करायचं आहे. तुमच्यापैकी अप्रतिम सेल्फी असणाऱ्याला विजेत्याला मिळेल POPxo मराठीकडून आकर्षक बक्षीस.
लक्षात ठेवा. तुमच्या सेल्फीसह #SelfieWithBappa #popxomarathibappa आणि #popxomarathi हे तीनही हॅशटॅग असणं आवश्यक आहे. तेव्हा बाप्पाच्या आगमनाच्या तयारीबरोबरच आता तयार व्हा बाप्पाबरोबर सेल्फी काढून आमच्याशी शेअर करायला.
बोला गणपती बाप्पा मोरया!
अधिक वाचा –
गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती
गणपतीसाठी वेगळ्या आणि सोप्या Modak Recipes
DIY: या गणेशोत्सवाला घरच्या घरी स्वतःच तयार करा अशी इकोफ्रेन्डली सजावट
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम