ADVERTISEMENT
home / Family
#MyStory: Birthday च्या दिवशी आलेला त्याचा मेसेज पाहून मला धक्काच बसला

#MyStory: Birthday च्या दिवशी आलेला त्याचा मेसेज पाहून मला धक्काच बसला

सरप्राईजेस कधी कधी नकळत आपला आनंद वाढवतात तर कधी धक्कादायकही ठरतात. नक्की या #MyStory मध्ये असंच झालं की, वेगळं काही घडलं जाणून घ्या.  

बर्थडेचं प्लॅनिंग आणि मूड ऑफ

28 सप्टेंबर आणि माझा 25th birthday, याबाबत मी आधी कधीच एवढी excited नव्हते. कारण याच दिवशी माझ्या आईबाबांनी मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत वीकेंड ट्रिपला जायची परवानगी दिली होती. त्यामुळे मी अगदी जुलैपासून या पिकनिकचं प्लॅनिंग सुरू केलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे ऑगस्ट महिना मला एखाद्या डोंगरासारखा वाटू लागला होता. कधी एकदा हा महिना संपतो आणि सप्टेंबर उजाडतो असं मला झालं होतं. 

अखेर सप्टेंबर महिना उजाडला आणि आमच्या वीकेंड ट्रिपच्या एक आठवड्याआधी माझा बॉयफ्रेंड मला डिनरसाठी घेऊन गेला. मी ऑफिसनंतर त्याला भेटले आणि आम्ही खूप छान वेळ एकत्र स्पेंड केला. किती छान वाटत होतं सगळं. डिनर झाल्यावर त्याने माझ्या पकडला आणि मला म्हणाला की, “Sweetheart! I’m really sorry पण ऑफिसच्या कामामुळे मला सुट्टी नाही मिळणार आहे. त्यामुळे बहुतेक आपल्याला एकत्र लोणावळ्याला नाही जाता येणार. 

काय असं मी जवळजवळ ओरडतच म्हटलं. ते ऐकून मला इतकं वाईट वाटलं होतं की, त्याची कुठल्याच गोष्टीने भरपाई करता आली नसती. आम्ही कारने घरी जात होतो आणि मला त्या long drive चंही काही अप्रूप वाटत नव्हतं. त्याला ऑफिसच्या कामामुळे मुंबईबाहेर जावं लागणार होतं. त्यामुळे माझा बर्थडे आम्हाला मुंबईतही सेलिब्रेट करता आला नसता. काही दिवस मी खूपच उदास होते आणि माझ्या फ्रेंड्ससोबत ही गोष्ट मी शेअर केली. त्यांनी मला लगेच फ्रेंड्स आऊटिंग प्लॅन करूया असं म्हटलं. माझ्या एका फ्रेंडचा लोणावळ्यात बंगलाही होता. आता माझा मूड थोडा चांगला झाला. मी म्हटला चला हा तरी प्लॅन होतोय. हा चान्स मिस नको करायला कारण after-all हा माझा 25th birthday आहे आणि मला तो spoil करायचा नव्हता. 

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील वाचा

Canva

लोणावळा आणि सरप्राईज

लोणावळ्याला जाण्याआधी मी त्याला बाय म्हणण्यासाठी गेले. मला माहीत होतं की, त्याची काहीच चूक नव्हती. तो बिचारा कामामुळे फसला होता. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. फक्त मला वाईट वाटत होतं. पण त्याला भेटायला गेल्यावर त्याची प्रतिक्रिया मात्र sad नव्हती. 

ADVERTISEMENT

मी आणि माझे फ्रेंड्स longdrive करून डेस्टीनेशनला पोचलो आणि मग चेंज वगैरे करून लवकर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण वाईन आणि स्नॅक्स आणण्यासाठी बाहेर पडलो. दिवसभर धमाल करायचा आमचा प्लॅन होता आणि मला तर आदल्या दिवशीपासूनच मेसेजेस येणं सुरू झालं होतं. आम्ही खूप ड्रिंक केलं आणि भरपूर गेम्स खेळले. आता 12 वाजायला काहीच वेळ बाकी होता. रात्र झाली होती आणि मी त्याला खूपच मिस करत होते. मी इकडे आल्यापासून मला एकदाही त्याने कॉल केला नव्हता. मला असं वाटलं की, रात्री 12 वाजल्यावर तरी पहिला फोन त्याचाच येईल. तेवढ्यात त्याचा मेसेज आला की, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मी सरळ विचारलं, काय झालं? 

मी पुन्हा फ्रेंड्समध्ये येऊन बसले. पण माझं मन मात्र लागत नव्हत. त्याचा परत मेसेज आला. मला नाही वाटत की, मी तुझा बॉयफ्रेंड बनून आता राहू शकेन. हे वाचून तर मी shocked झाले आणि फोनकडेच पाहत राहिले.

Shutterstock

ADVERTISEMENT

तो क्षण

जसं मी वर पाहिलं तेव्हा तो दरवाज्यातून आता आला आणि गुडघ्यावर बसून त्याने मला प्रपोज केलं. कारण आता मला तुझा husaband व्हायचं आहे. माझ्याशी लग्न करशील? 

आधी मी त्याला खूप मारलं कारण त्याने मला माझ्या आयुष्यातला खूप मोठा shock दिला होता आणि त्यानंतर मी त्याचं proposal accept केलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. तेव्हा मला कळलं की, या प्लॅनमध्ये माझे फ्रेंड्सही सामील झाले होते. त्यांचं हे एकत्रित प्लॅनिंग माझ्या बर्थडे आऊटींगच्या प्लॅनपासूनच सुरू झालं होतं. हा दिवस अजूनच स्पेशल झाला जेव्हा थोड्या वेळाने माझे आईबाबाही तिकडे आणि तेही दोन केक्स घेऊन. एक माझा बर्थडे केक आणि दूसरा माझ्या engagement साठी. त्याने मला प्रपोज करण्याआधी माझ्या आईबाबांचीही परवानगी घेतली होती. 

अशाप्रकारे आम्ही दोघं engaged झालो. पण मला त्या shock मधून बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागला आणि तोपर्यंत माझा बॉयफ्रेंड गुडघ्यावरच बसून होता.

ADVERTISEMENT

Canva

प्रत्येक मुलीसाठी लग्नासाठी प्रपोज केल्यावरचा तो क्षण अविस्मरणीय असतो. तो आनंदी क्षण अगदी अनपेक्षित आला तर त्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होतं. तुमच्याकडेही अशी एखादी #MyStory असल्यास आम्हाला नक्की पाठवा आणि ही स्टोरी आवडली की नाही तेही कळवा. 

हेही वाचा – 

#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

ADVERTISEMENT

#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….

बॉयफ्रेंडच्या बर्थडेला असं द्या सरप्राईज

09 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT