जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि तर तुम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळणं आवश्यक असते. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट जितका महत्वाचा आहे. तितकाच महत्वाचा तुमचा आहार आहे. काही जणांना चुकीच्या वेळी खाण्याची सवय असते. म्हणजे नेमका कोणता पदार्थ कधी खावा हे आपल्याला कळत नाही. मग काय चुकीच्या वेळी चुकीचा पदार्थ खाल्ला जातो आणि वजन वाढता वाढता वाढे होतं. मग काय पुन्हा वजन कमी करण्यासाठी डाएट केलं जातं. पण हे सगळं न करता जर तुम्ही थोडी काळजी घेतली योग्य आहार घेतला तर बऱ्याच गोष्टींचा त्रास तुम्हाला होणार नाही.
एकाच ठिकाणी बसून काम करणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक
संध्याकाळची भूक
संध्याकाळची भूक म्हणजे साधारण 4 ते 5 वाजता अशी काय भूक लागते की, यावेळात सगळे काही खावेसे वाटते. अगदी पिझ्झा, बर्गर, शेवपुरी, पाणीपुरी, सँडवीच असे जे काही मिळेल ते पोटात ढकलावेसे वाटते.कितीही काहीही केलं तरी या वेळात आवर्जून काहीना काही खाल्लं जातं.अशी भूक लागल्यानंतर नक्कीच तुम्ही खायला हवं. भूक मारणं नक्कीच चांगली गोष्ट नाही. पण जर तुम्ही या वेळात काही योग्य खाल्लं तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. शिवाय वजनही कमी होण्यास मदत मिळेल.
केसांना मजबूती देण्यासाठी वापरा हे हेअर ऑईल्स
संध्याकाळी हे पदार्थ अजिबात खाऊ नका
पाव असलेले पदार्थ
shutterstock
वडापाव, भजीपाव, पावभाजी, सँडवीच असे पदार्थ दिसले की, ते खाण्याचा मोह अजिबात आवरता येत नाही. चटपटीत चमचमीत असे हे पदार्थ असतात. पण त्यासोबत दिला जाणारा पाव हा तुमच्यासाठी घातक आहे. मुळात डाएटच्या नियमांमध्ये पाव खाणे हे बसत नाही. संध्याकाळी पाव खाल्ल्यानंतर तो पचण्यास ही कठीण जातो. हे पदार्थ खाल्यानंतर जेवण जेवावेसे वाटत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या भुकेला पाव अजिबात खाऊ नये.
मांड्यांचा काळपटपणा दूर करायचा असल्यास, जाणून घ्या सोपे उपाय
चीझ असलेले पदार्थ
shutterstock
हल्ली नाक्या नाक्यावर आणि गल्लीबोळात चमचमीत पिझ्झा, बर्गर, फ्राईज असे पदार्थ मिळतात.यामध्ये भरभरुन चीझ घातलेलं असतं. डाएटमध्ये असताना चीझ खाऊ शकत नाही असे नाही. तुम्ही नक्कीच चीझ खाऊ शकता. पण संध्याकाळी चीझचे सेवन केल्यानंतर ते पचायला कठीण जाते. शिवाय संध्याकाळी शरीराच्या सगळ्या क्रिया मंदावलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी चीझ खाणे टाळायला हवे.
मैदा असलेले पदार्थ
shutterstock
मैदासुद्धा तुमच्या शरीरातील फॅट वाढवू शकतं. फॅटसोबतच मैदा पचायलाही फार वेळ लागतो. मोमोज, नुडल्स असे काही पदार्थ संध्याकाळच्या भुकेला पोटभरीचे वाटतात खरे पण हेच पदार्थ अधिक त्रासदायक ठरु शकतात. हल्ली अनेक पदार्थांमध्ये मैद्याचा वापर केला जातो. पण हा मैदा पचण्यास कठीण जातो. त्यामुळे तुम्ही हे पदार्थ अजिबात खाऊ नका. याशिवाय मैद्याशी संबधित अनेक पदार्थ हे तेलकट असतात हे तेलकट पदार्थही तुमचे वजन भरभरुन वाढवू शकतात.
जर तुम्हाला काही खायचे असेल तर तुम्ही या वेळात चणे शेंगदाणे, सुकी भेळ असे पदार्थ खाल्ले तरी चालू शकतील.तुम्हाला या वेळात पोटभरीसाठी नाही तर पोटाला आधार म्हणून काही गोष्टी खायच्या आहेत. म्हणजे तुमचे जेवण ही लवकर होईल आणि ते पचेलही शिवाय वजन ही वाढणार नाही.