आदिशक्तींचा जागर करताना महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे उल्लेख केला जातो. महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तिपीठ आहेत. आदिमाया, आदिशक्तींचा जागर दर नवरात्रौत्सवात केला जातो. तुम्हाला ही साडेतीन शक्तिपीठ माहीत आहेत का? या साडेतीन शक्तिपीठांचा महिमा तुम्हाला माहीत आहे का? मग तुम्हाला ही माहिती जाणून घेण्याची गरज आहे. आज आपण या साडेतीन शक्तिपीठांची सैर करणार आहोत. साडेतीन शक्तिपीठांबद्दल आज आम्ही तुम्हाला सगळी माहिती देणार आहोत. मग करायची का सुरुवात ?
Table of Contents
देशातील शक्तिपीठांबद्दल तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? ( Story Of Shaktipeeth Mandir)
महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठ आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का संपूर्ण देशात 51 शक्तिपीठ आहे. हो हे अगदी खरं आहे. आतापर्यंत तुम्ही केवळ साडेतीन शक्तिपीठांचा उल्लेख केलेला ऐकला असेल पण देशभराचा विचार करता देशात एकूण 51 शक्तिपीठ आहेत. असं म्हणतात की एकूण 108 शक्तिपीठ आहेत . त्यापैकी 51 शक्तिपीठ ही मोठी आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ वगळता विमला मंदिर (पुरी, ओडिसा), तारातरीणी मंदिर (बेहरामपूर , ओडिसा), कामाख्या मंदिर (गुवाहाटी, आसाम), कालीघाट काली मंदिर ( कोलकाता, पश्चिम बंगाल) , मुक्तिनाथ मंदिर (नेपाळ), नैनादेवी मंदिर (हिमाचल प्रदेश), श्री सैलाम (आंध्रप्रदेश), कामाक्षी अम्मा मंदिर (तामिळनाडू), चंडिका स्थान (बिहार) ही काही शक्तिपीठ आहेत. या शिवाय पाकिस्तानमध्येदेखील काही शक्तिपीठ आहेत.
मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे
जाणून घेऊया महाराष्ट्रातील शक्तिपीठांविषयी (Shakti Peetha In Maharashtra)
आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांविषयी. या शक्तिपीठांची माहिती घेताना आज आपण साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास, आख्यायिका तेथील सणउत्सव या संदर्भातील माहिती आपण घेणार आहोत.शिवाय तुम्ही या शक्तिपीठांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यासाठी प्लॅनही करु शकता.
गौरीपुजनात नववधूंसाठी का महत्त्वाचा असतो ‘ओवसा’
1. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर (Mahalaxmi temple, kolhapur)
साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण पीठ म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची ओळख आहे. करविरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाईचे) हे निवासस्थान. पुराणात उल्लेख करण्यात आलेल्या 108 शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रातील या शक्तिपीठांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अनेक पुराण आणि जैन ग्रंथांमध्ये याचा समावेश आहे. त्यामुळेच अंबाबाईंचे हे मंदिर पुरातन असल्याचे म्हटले जाते.
महालक्ष्मी मंदिराचा इतिहास :महालक्ष्मी देवीचे हे मंदिर कोणी बांधले याबद्दलची माहिती निश्चित झालेली नाही. पण देवस्थान समितीच्या माहितीनुसार हे मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले आहेत. या शिवाय ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते. हे सांगण्याचे कारण असे की, देवीच्या डाव्या हातातील अंगठी केली महालक्ष्मीला राष्ट्रकुट राजा प्रथम अमोघवर्ष यांने अर्पण केली आहे. याचा उल्लेख संजान या ताम्रपटात करण्यात आला आहे. हे मंदिर कऱ्हाड येथील सिंदवंशी राजाने बांधले असे देखील म्हटले जाते. पण त्याने हे बांधण्यापूर्वीच हे देवस्थान शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे या मंदिराबाबत इतिहासात अनेक गोष्टी आहेत. देवळाच्या निरनिराळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. या मंदिरापाठी असलेल्या दत्त मंदिराच्या पाठीमागे शके 1940 चा एक शिलालेख कोरलेला आहे. दुसरा शिलालेख हा पटांगणातील खांबावर, तिसरा.मुख्य देवळाच्या नवग्रहाच्या छोट्या देवळातील खांबावर आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या भिंतीवर आहे.
आख्यायिका: कोल्हापूरकरांच्या मनात महालक्ष्मीबद्दल अफाट श्रद्धा आहे.या देवीची कथा अशी सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांच्यात युद्ध सुरु झाले. ते जवळजवळ शंभर वर्ष सुरु होते. यामघ्ये शेवटी इंद्राचा या युद्धात पराभव झाला. महिषासूर स्वर्गाचा राजा झाला. ज्यावेळी ही गोष्ट साक्षात शंकर यांना कळली. त्यावेळी त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडू लागला.या अग्नीतूनच देवी प्रकट झाली. सर्व देवांनी तिची प्रार्थना केली. तिला देवांनी शस्त्रे दिली.देवीचे आणि महिषासुराचे युद्ध झाले. देवीने महिषासुराला आणि इतर राक्षसांना मारले. तीच ती महालक्ष्मी. शिवाय ब्रम्हदेवाचा मानस पुत्र कोल्हापूर त्याच्या मुलाचे नाव करवीर..करवीरने लोकांचा छळ केल्यानंतर शंकराने महालक्ष्मीमुळे त्याला ठार मारले. म्हणून या परीसराला ‘करवीर’ नावाने ओळखतात.
सणोत्सव: दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये भाविकांची फार गर्दी असते. या दरम्यान मंदिरात चमत्कार घडतो असे सांगितले जाते. कारण या कालावधी दरम्यान येणारी सूर्याची किरणे थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. त्यानंतर ती फेब्रुवारी आणि नोव्हेंबर दरम्यान किरणे छातीपर्यंत पोहचतात.मावळतीला ही सूर्यकिरणे संपूर्ण देवीच्या मुर्तीवर पडतो. त्यावेळी देवीचे हे स्वरुप विलोभनीय वाटते. या महोत्सवाला ‘किरणोत्सव’ असे म्हणतात. यावेळी भाविकांची खूपच गर्दी असते.
कसे जाल?: कोल्हापूरला जाणारी कोणतीही बस किंवा ट्रेन पकडून तुम्हाला कोल्हापूरात पोहोचायचे आहे. कोल्हापूरवरुन तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी अनेक बसेस मिळू शकतील. याशिवाय तुम्हाला खासगी वाहनानेदेखील प्रवास करता येईल.
जाणून घ्या अष्टविनायकाची संपूर्ण माहिती
2. तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर (Tuljabhavani Temple, Tuljapur)
पूर्ण शक्तिपीठामंध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा समावेश होतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या शहरामध्ये हे मंदिर वसलेले आहे. सोलापूर शहरापासून फक्त 45 किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून तुळजापूर मंदिरात कानडी भाविक मोठ्याप्रमाणात येतात. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो.
तुळजाभवानी मंदिराचा इतिहास: तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर हे बालाघाट डोंगराच्या पठारावर वसलेले आहे. पुराणात या डोंगराचा उल्लेख यमुनागिरी असा केलेला आहे. कालांतराने या ठिकाणी चिंचेची झाले असल्यामुळे याचे नामकरण चिंचपूर असे करण्यात आले. त्यानंतर या परीसराची ओळख तुळजापूर अशी झाली ती आदिमाया तुळजाभवानी मुळे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला फार मान आहे. पुराणातील दाखल्यानुसार कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुळजाभवानी आशीर्वादरुप ठरली आहे. तुळजाभवानी मंदिरातील काही शिल्प हे हेमाडपंथी आहेत. या मंदिरात काळभैरव, आदिमायाव आदिशक्ती, घाटशीळ, पापनाश तीर्थ, रामवरदायिनी, भारतीबुवाचा मठ, गरीबनाथाचा मठ, नारायणगिरीचा मठ, धाकटे तुळजापूर, मंकावर्ती कुंड या मंदिर परीसरात आणि मंदिरात आहेत.
वाचा – नवरात्रीचे महत्त्व
आख्यायिका: तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासंदर्भात एक आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे. असे म्हणतात कृतयुगात ‘कर्दभ’ नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी ही फार सुंदर आणि पतीव्रता होती. तिला पुत्ररत्न झाले. पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दभ ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला. पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतिसोबत जाऊ नये असे ऋषींनी तिला शास्त्राचा आधार घेऊन सांगितले. त्यामुळेच ती पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरु पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परीसरात गेली. त्याठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरु केली. तपश्चर्या सुरु असताना तेथे कुकर नावाचा एक दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर खुश झाला. त्याच्या मनात वाईट वासना येईल लागली. त्याने तिला वासनेपोटी स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या भंग झाली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिमायेचा धावा केला. त्वावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. त्रिशुळाने दैत्याचे शीर वेगळे केले. देवी त्वरीत धावून आल्यामुळे तिला ‘त्वरीता’ असे नाव पडले. पुढे त्वरीताचे तुळजापूर झाले आणि देवीचे नाव तुळजाभवानी
सणोत्सव: तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला महत्व आहे.याकाळात येथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्यासूरासोबत 9 दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. म्हणूनच नवरात्र संपताच या ठिकाणी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. तसेच प्रत्येक पौष महिन्यात शांकभरी देवीचा उत्सव देखील याठिकाणी साजरा केला जातो. शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच हा उत्सव साजरा केला जातो. ज्यांना नवरात्रीत येणे शक्य होत नाही ते भाविक शांकभरी नवरात्राच्या सोहळ्याला सहभागी होतात.
कसे जाल?: तुळजापूरला जाण्यासाठी तुम्हाला बस, ट्रेन, विमान, खासगी वाहन करुन जाता येईल. तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुम्हाला उस्मानाबाद या ठिकाणी उतरायचे आहे. तेथून पुढे तुम्हाला बसने जाता येईल. विमानाने जाणार असाल तर चिकलथाना विमानतळ या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.शिवाय तुम्हाला सघल्या मोठ्या शहरांमधून थेट तुळजापूरला जाण्यासाठी बस, खासगी वाहन मिळू शकतील.
वाचा – Bhondla In Marathi
3. रेणूका मंदिर, माहूर (Renuka Temple, Mahur)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणून माहूरची रेणुकादेवी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र माहूरचे देवस्थान आहे. माहूर गडावर रेणुकादेवी सोबत दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील मंदिरे आहे. साडेतीन शक्तिपीठांमध्ये रेणुका देवीचे मंदिर हे दुसरे शक्तिपीठ आहे. या देवीला तांबुलाचा प्रसाद दिला जातो. खायची पान घेऊन त्यात कात, चुना, सुपारी असे यामध्ये टाकले जाते. पान कुटून हा प्रसाद देवीच्या मुखात ठेवला जातो.
रेणुका माता मंदिराचा इतिहास: श्री परशुरामाची माता म्हणून रेणुका मातेला ओळखले जाते. रेणुका मातेचे मंदिर हे 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे सांगितले जाते. याच माहूरगडावर श्री दत्तात्रयाचा जन्म झाला.अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुकामातेचे हे मंदिर कमलमुखी असून आनादी काळापासून असल्याचे ते सांगितले जाते. साधारण 800 ते 900 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या मुख्य दरवाज्याची पुर्नबांधणी इ. स. 1546 मध्ये करण्यात आली. या संदर्भातील एक शिलालेख देखील या ठिकाणी आहे. हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधण्यात आले आहे.
आख्यायिका: माहूरच्या रेणुका देवी संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणु असे ठेवण्यात आले. शंकराचाअवताप मानल्या गेलेल्या जमद्ग्नी ऋषींसोबत तिचा विवाह झाला. जमद्गनी ऋषींच्याय आश्रमात सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. राजा सहस्त्रार्जुनाला कामधेनुचा मोह झाला.राजाने कामधेनुची मागणी केली. पण जमद्गनी ऋषींनी ती दिली नाही.त्यामुळेच त्यांनी आश्रमावर धावा बोलला आणि जमद्गनी ऋषींना ठार मारले. कामधेनू हिरावून नेली.हा प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिक्षा केली. जमदग्नी म्हणजेच वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी दत्तात्रयाने द्यांना दाखवली.तो आई आणि जमद्गनी ऋषींचे पार्थिव घेऊन माहूरगडावर पोहोचला. तेथे त्याने मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. जमद्ननी ऋषींवर सगळे संस्कार केले. यावेळी रेणुका माता सती गेली. आपल्या आईचा दुरावा परशुरामाला सहन झाला नाही. तो दु:खी झाला. त्याची ती अवस्था पाहून एक आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीवरुन वर येऊन तुला दर्शन देईल असे सांगितले. फक्त तू मागे पाहू नकोस असे सांगितले. पण पररुरामाला आईला भेटण्याची इच्छा इतकी होती की, त्याने मागे वळून पाहिले त्यामुळे रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले. परशुरामाला रेणुका मातेचे दर्शन याच डोंगरावर झाले म्हणून याला मातापूर असे म्हणतात. आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव. आईचे गाव म्हणून माऊर आणि पुढे त्याचा अपभ्रंश करत माहूर असे नाव पडले. अशी ही रेणुकामातेची कथा आणि गडाचे महत्व सांगितले जाते.
सणोत्सव: शारदीय नवरात्रौत्सव या ठिकाणी फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नवरात्रीच्या काळात देवीचे मंदिर सुंदर सजवण्यात येते. नऊ दिवस येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या शिवाय शाकंभरी नवरात्र देखील साजरी केली जाते. अश्विन शुक्लपक्ष म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या गडावर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी देवीची संपूर्ण पूजा केली जाते. रात्री भजन, किर्तन आयोजित केले जाते. पंचखाद्य टाकून दुध घोटलेला प्रसाद पूर्ण चंद्र पाहून हा नैवद्य देवीस दाखविला जातो. श्रावण शुद्ध त्रयोदशीला रेणुकेची पंचामृताने स्नान घालून विधीवत संपूर्ण पूजा केली जाते.
कसे जाल?: तुम्हाला नांदेडपर्यंत रेल्वेने जाता येईल. रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा मिळतील. या शिवाय नांदेडपासून तुम्हाला नांदेड ते माहूर अशी एसटीची बससेवा आहे. नागपूरवरुनही तुम्ही हा प्रवास करु शकता. नागपूरवरुन बायरोड हे अंतर 220 किलोमीटर आहे. तुम्ही बस किंवा खासगी गाड्या करु शकता.
4. सप्तशृंगी मंदिर, वणी (Saptasrungi Temple, Vani)
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणजे नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर. पुराणात उल्लेख केलेल्या 108 शक्तीपिठांमध्ये याचा उल्लेख आहे.नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ सप्तश्रृंगी किल्लाअसून ती येथील कुटुंबियांची कुलदैवत आहे. सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगावात उत्तम खवा मिळतो. त्याचा आस्वाद घेण्यासाठीही येथे गर्दी असते.पहाटे 5 वाजता हे मंदिर उघडते. येथे काकड आरतीने देवीच्या महापूजेला सुरुवात होते. सप्तश्रृंगी मंदिरासोबतच या ठिकाणी कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शितकजा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम ही ठिकाणे या गडावर आहेत.
सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराचा इतिहास: सप्तश्रृंगी गडावर देवीचे मंदिर असून साधारण पाच- सात किलोमीटरच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा ओलांडून सप्तश्रृंगी गड दिसू लागते. नाशिकचे कोन्हेरे, रुद्राजी आणि कृष्णाजी यांना साधारण 1768-99;मध्ये त्यांनी या गडाच्या पायऱ्या बांधल्या. खंडेराव दाभाड्यांची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी 1710 साली वरील पायऱ्या बांधल्या. याचा उल्लेख संस्कृत आणि शिलालेखातून आलेला आहे. असे म्हणतात पूर्वी गडावर 108 कुंड असल्याचा उल्लेख आहेत त्यातील केवळ 10 ते 15 कुंड सध्या अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे.या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. असं म्हणतात देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला म्हणून येथील पाणी लालसर झाले. या मंदिराला प्राचीन संदर्भ आहेत.
आख्यायिका: सप्तश्रृंग येथे वास्तव्य करणारी सप्तश्रृंगी देवीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दंडकारण्यात राम- सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा बध केल्यानंतर देीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. शिवाय महानुभावी लीळाचरित्रास असा उल्लेख केलेला आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मुर्च्छा येऊल पडला तोच हा सप्तश्रृंगगड होय. आणखी एक गोष्ट सांगायची तर कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून महिषासुराला मिळाला होता. म्हणूनच तो माजला होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करत देव इंद्राला हाकलून दिले. त्यामुळे त्याने त्रिदेवांकडे मदत मागितली. त्या तिघांनी त्यांची शक्ती एकवटून एका तेजाची निर्मिती केली अंबेच्या रुपाने ते तेज पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तश्रृंगी जवळ होता. देवीने त्याचा तेथे वध केला आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले. म्हणूनच या डोंगरावर तिचे स्थान आहे.
सणोत्सव: सप्तश्रृंगीदेवीचा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव साधारण दहा ते बारा दिवस सुरु असतो. गडावर चैत्रोत्सव सुरु झाला की, या ठिकाणी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. अश्विन शुद्ध म्हणजेच नवरात्र येथे साजरी केली. नवरात्रीतल्या सप्तमीला देवी या गडावर वास करते असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी गर्दी अधिक असते. नवरात्रीनंतर येणारी कोजागिरी पौर्णिमादेखील या ठिकाणी साजरी केली जाते. तसेच धनुर्मासात सूर्यनारायण दक्षिणायन करतात. धनुर्मास उत्सवदेखील या ठिकाणी साधरा केला जातो.
कसे जाल?: तुम्ही नाशिकला पोहोचल्यानंतर तुम्हाला दिंडोरी नाका येथून मंदिराकडे जाण्यासाठी गाड्य़या मिळू शकतात. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून गडावर राहण्याची आणि जेवण्याची सोय करण्या आली आहे. तुम्हाला नाशिकपर्यंतचा प्रवास करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बाय रोड सहज जाऊ शकता. वयोवृद्धांना गडावर जाण्याचाशी सोय करण्यात आलेली आहे.
वाचा – महाराष्ट्रातील 15 प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे
शक्तिपीठांविषयी तुम्हाला हे माहीत आहे का? ()
देशातील 51 शक्तिपीठ कुठे आहेत? (Where are the 51 shaktipeeth located?)
देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आद्यशक्तीची मंदिरे आहेत. खरंतरं यांचा आकडा 108 इतका आहे. अशी प्रमुख शक्तिपीठ संपूर्ण देशभर आहेत. यातील साडेतीन शक्तिपीठ ही केवळ महाराष्ट्रात आहे. कोल्हापूरची अंबाबई किंवा महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि वणी येथील सप्तशृंगी देवी ही ती जागरुक शक्तिपीठ आहेत.
शक्तिपीठ म्हणजे नेमकं काय? (What are shaktipeethas)
शक्तिपीठ म्हणजे हिंदू धर्मांच्या देवीचे स्थान. पुराणामध्ये शक्तिपीठ आता ज्या ठिकाणी आहेत तिथे काहीतरी फार महत्वाचे प्रसंग घडले आहेत. त्यानंतर त्यादेवीचे स्थान म्हणून त्या त्या ठिकाणी देवीची मंदिरे उभारण्यात आली. पण याचे अनन्यसाधारण महत्व असल्यामुळेच याला ‘शक्तिपीठ’ असे म्हटले जाते
मिनाक्षी मंदिर हे शक्तिपीठ आहे का? (Is meenakshi temple is shaktipeeth)
मिनाक्षी मंदिर हे तामिळनाडू येथील मधुराई येथे आहे. वैणाई नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर असून हे देखील हे शक्तिपीठ आहे. भगवती शक्तिपीठ हे 13 वे शक्तिपीठ आहे.त्यामुळे देशातील 108 शक्तिपीठांपैकी मिनाक्षी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे.
रेणुका देवी कोण आहे? (Who Is Renuka Devi?)
माहूरवासियांची देवी म्हणून माहूरच्या रेणुका देवी प्रसिद्ध आहे. रेणुका देवीची आख्यायिका ही प्रसिद्ध आहे. माहूरच्या डोंगरावर देवीचे स्थान असून रेणुका देवीची विलोभनीय मूर्ती या ठिकाणी आहे. या ठिकाणी देवीचे फक्त मुख आहे. या देवीला तांबुल अर्थात पानांचा प्रसाद दिला जातो.
सगळी शक्तिपीठ ही देवींची आहेत का? (All Shaktipeeths is of Goddess?)
शक्तिपीठ ही हिंदू देवतेंची आहेत. त्यामुळे देशात असणारी सगळी शक्तिपीठ. आदिमाया आदिशक्तींचे हे स्थान असून या शक्तिपीठांच्या आख्यायिका आणि इतिहास प्रसिद्ध आहे.
आता जर तुम्हालाही या साडेतीन शक्तिपीठांना भेट द्यायची असेल तर लगेचच प्लॅन करा आणि देवीचा आशीर्वाद घ्या. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा (dasara wishes in marathi) आणि साजरा करण्यासाठी तुम्ही अशा ठिकाणांना भेट देऊ शकता.