हे फायदे वाचाल तर रोज प्याल 'गवती चहा'

हे फायदे वाचाल तर रोज प्याल 'गवती चहा'

चहा आरोग्यासाठी चांगली की वाईट हा एक वादाचा मुद्दा होऊ शकेल. कारण अनेकांची सकाळ ही एक कप चहा घेतल्याशिवाय होऊच शकत नाही. वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातकच ठरते. त्याप्रमाणे चहादेखील अतीप्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होतो. मात्र दररोज एक ते दोन कप चहा घेण्यास काहीच हरकत नाही. उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. पावसाळ्यात गवती चहा मोठ्या प्रमाणावर उगवतो. त्यामुळे पावसाळा ते हिवाळा गवती चहा मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. घराच्या बाल्कनीतही तुम्ही गवती चहाचं रोप लावू शकता. यासाठीच गवती चहाचे हे आरोग्यदायी फायदे अवश्य वाचा.

Shutterstock

एक कप गवती चहात दडले आहेत हे गुण

मानसिक ताणापासून आराम मिळतो

बरेचदा आपण सकाळी फ्रेश वाटण्यासाठी अथवा दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोप येण्यासाठी काही लोक लेमनग्रास ऑईलचा वापरदेखील करतात. 

कॉफी बॉडी स्क्रब देखील वाचा

कोलेस्ट्रॉल कमी होतं

एका संशोधनानुसार गवती चहा पिण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नक्कीच नियंत्रित राहू शकतं. मात्र ते प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जर तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फारच अनियंत्रित असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी औषधोपचार घेणंच गरजेचं आहे. मात्र सुरूवातीच्या काळात तुम्ही त्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी गवती चहा घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. 

ओरल हेल्थ चांगली राहते

आजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. बऱ्याचदा घरातील कुंडीतच गवतीचहा लावला जातो. जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या तर तुमचे दात आणि हिरड्या स्वच्छ  आणि मजबूत होण्यास मदत होऊ शकते. कारण त्यामुळे तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

Shutterstock

वेदना कमी होतात

दिवसभराच्या कामाची  दगदग , धावपळ यामुळे वरचेवर जर तुम्हाला डोकेदुखी, कंबरदुखी, अंददुखी जाणवत असेल तर गवती चहा  नक्की प्या. कारण अशी दुखणी कमी करण्यासाठी सतत पेनकिलर घेण्यापेक्षा एक कप गवती चहा तुमच्या फायद्याची ठरू शकते. मासिक पाळीत येणाऱ्या क्रॅंम्पमधुन आराम मिळण्यासाठी तुम्ही या काळात गवती चहा घेऊ शकता. 

फंगल इनफेक्शनचा धोका कमी होतो

पावसाळ्यातीस सततचा ओलावा आणि उबदारपणा जीवजंतूंसाठी पोषक असतो. या काळात फंगल इनफेक्शनचा त्रास वारंवार होऊ शकतो. या फंगल इनफेक्शनला टाळण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. गवतीचहा मधील पोषक घटक तुमची रोगप्रतिकारशक्ती  वाढवतात. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका कमी होतो. 

Shutterstock

गवती चहा कसा तयार करावा ?

बाजारात गवती चहा विकत मिळतो तो आणून स्वच्छ करून त्याचे तुकडे एका डबीत भरून ठेवा. जर तुमच्या घरच्या बाल्कनीत कुंडीतच तुम्ही गवती चहा लावला असेल तर तो ताजाच काढा म्हणजे चहा सुंगधित होईल. 

  • एक कप पाणी चहाच्या भांड्यात उकळत ठेवा. 
  • पाणी उकळल्यावर त्यात गवती चहाच्या पानांचे तुकडे टाका आणि थोड्यावेळ उकळू द्या. ज्यामुळे चहाला मस्त सुवास येईल.
  • चहात तुमच्या आवडीप्रमाणे चहापावडर आणि साखर टाका. वजन कमी करायचं असेल तर साखर टाकणे टाळा. 
  • चहा उकळल्यावर तो कपात गाळून घ्या. दूध हवे असल्यास टाका अथवा ब्लॅक टी सुद्धा चांगला लागतो

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

अधिक वाचा

तुम्ही पाहिला आहे का White Tea , ज्याची किंमत आहे हजारोंमध्ये

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी