हेल्दी राहण्यासाठी साखरेऐवजी ‘या’ नैसर्गिक गोड पदार्थांचा करा वापर

हेल्दी राहण्यासाठी साखरेऐवजी ‘या’ नैसर्गिक गोड पदार्थांचा करा वापर

भारतीय स्वयंपाकात गोड पदार्थांना फार महत्त्व आहे. लग्न अथवा सणसमारंभात पंचपक्वान्नांशिवाय स्वयंपाक पूर्णच होत नाही. गोड पदार्थ तयार करण्यासाठी बऱ्याचदा साखरेचा वापर केला जातो. दररोज सकाळचा चहा करण्यासाठीदेखील साखर वापरण्यात येते. मात्र दिवसेदिवस मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहींना साखर आणि साखरेपासून तयार केलेले पदार्थ वर्ज्य असतात. शिवाय निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी डॉक्टर प्रत्येकालाच आहारातून साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात. फिटनेसचा विचार करता जरी आहारातून साखर कमी केली तरी गोड पदार्थांची आवड स्वस्थ बसू देत नाही. लहानपणापासून गोड पदार्थ खाल्लेले असल्यामुळे सणासुदीला गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. यासाठीच आम्ही तुम्हाला साखरेला पर्यायी नैसर्गिक गोडी वाढवणारे काही पदार्थ सांगत आहोत. ज्यामुळे तुम्हाला गोड पदार्थांची चवही मिळेल आणि तुमचे आरोग्यदेखील चांगले राहील.

आहारात साखरेचे अती प्रमाण का ठरू शकते घातक

साखरेमुळे आजकाल विविध गंभीर आजारपणांना आमंत्रण मिळत आहे. वास्तविक साखरेत प्रोटिन्स, इसेंसिअल ऑईल, व्हिटॅमिन अथवा मिनरल्स असं काहीच नाही. ज्यामुळे साखर खाण्याने कोणताही विशेष फायदा होत नाही. शिवाय साखरेमुळे तुमची  भुक वाढते ज्यामुळे तुम्ही अती प्रमाणात गोड पदार्थ खाता. ज्याचा परिणाम तुमच्या कॅलरिज आणि वजनात प्रचंड वाढ होण्यावर होतो. वाढलेले वजन तुमच्या मेटाबॉलिझम साठी मुळीच योग्य नाही. यामुळे इन्शुलिनचे प्रमाण अनियंत्रित होते आणि तुम्ही मधुमेही होता. मधुमेह आणि लठ्ठपणाचे महत्त्वाचे कारण आहारात साखरेचे प्रमाण अती असणं असू शकतं. यासाठी साखर खाण्यावर वेळीच बंधन आणणं गरजेचं आहे. 

सेंद्रिय मध

मध हा एक गोडसर आणि नैसर्गिक पदार्थ आहे. ज्याचा वापर तुम्ही साखरेला पर्याय म्हणून करू शकता. मधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळू शकते. दररोज  मध खाण्यामुळे तुमच्या रक्तातीस अॅंटि ऑक्सिडंटची पातळी सुधारते. ज्यामुळे आजारपण येण्याचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार दोन महिने नियमित मध खाल्यास तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराचा दाह कमी होऊ शकतो. मधामुळे तुमच्या मेटाबॉलिझम आणि रक्तातील साखरेच्या पातळीत जास्त फरक होत नाही. त्यामुळे साखरेला पर्याय म्हणून मध खाण्यास काहीच हरकत नाही. तुम्ही मधापासुन विविध गोड पदार्थ तयार करू शकता. 

खजूर

खजूर हा एक नैसर्गिक पदार्थ असून तुम्ही साखरेऐवजी त्याचा वापर करू शकता. खजूरामध्ये लोह, मिनरल्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे खजूर शक्तीवर्धक, अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे. खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. खजूराला 'वंडरफूड' असंही म्हटलं जातं. खजूरामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, ह्रदयाचे कार्य चांगले होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, अशक्तपणा कमी होतो, सेक्सलाईफ वर चांगला परिणाम होतो. दृष्टी आणि दात मजबूत होतात. यासाठी तुम्ही साखरेऐवजी खजूर पदार्थांमध्ये नक्कीच वापरू शकता. खजूराची पेस्ट तयार करण्यासाठी तुम्ही एक कप कोमट पाण्यात तीन ते चार खजूर भिजवून त्यातील बिया काढून मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट तयार करू शकता. स्मुदी, शिरा, केक, बिस्किट, सॉस, सलाडमध्ये याचा वापर नक्कीच करता येईल.

Shutterstock

गुळ

गुळ हा साखरेप्रमाणेच ऊसापासून तयार करण्यात येतो. मात्र असं असलं तरी गुळ शरीरासाठी नक्कीच चांगला असतो. कारण गुळात चांगले पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला फायदाच होतो. गुळामुळे खोकला, बद्धकोष्ठता आणि अपचन असे आजार बरे होतात. गुळ वापरून अनेक पदार्थ तयार करता येतात. कोणत्याही गोड पदार्थांत गुळ वापरून तुम्ही तो पदार्थ रूचकर करू शकता. चहात मध्ये गुळ वापरल्यास तुम्हाला तुमची नेहमीची गोड चहा साखर न घालताही नक्कीच घेता येऊ शकते.

Shutterstock

गोड फळे

गोड पदार्थ साखरेचा वापर न करता कसे करावे हा एक मोठा प्रश्नच असतो. मात्र जर तुम्हाला पदार्थांतील गोडवा वाढवायचा असेल आणि त्यासाठी साखर वापरायची नसेल तर तुम्ही फळांचा वापर नक्कीच करू शकता. शिरा अथवा खिरीसारख्या इतर गोड पदार्थांमध्ये आंबा,  केळी, पपई, सफरचंद, अननसाचा वापर करू शकता. या फळांमुळे पदार्थांचा गोडवा तर वाढतोच. शिवाय फळांमधील पोषक घटकदेखील शरीराला मिळतात. फळांच्या माध्यमातून नैसर्गिक साखर तुमच्या शरीरात जाते. 

अशा प्रकारे गोड पदार्थांमध्ये साखरेचा कमी वापर करून तुम्ही तुमचे आरोग्य चांगले आणि निरोगी ठेवू शकता. आम्ही दिलेले नैसर्गिक गोड पदार्थ साखरेप्रमाणे हानिकारक तरी हेल्दी राहण्यासाठी ते प्रमाणातच खा. 

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

अधिक वाचा -

‘या’ 6 पद्धतीने साखर देते तुमच्या त्वचेला रोज नवी चमक

सुंदर आणि काळेभोर केस हवे असतील तर असा करा मधाचा वापर

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांपासून सुटका देईल मध