रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज जरूर ट्राय करा

रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज जरूर ट्राय करा

रताळी हे एक गोडसर चवीचे कंदमुळ आहे.  पांढऱ्या आणि लाल अशा दोन रंगात रताळी मिळतात. मात्र यापैकी लाल रंगाची रताळी बाजारात सहज मिळतात. रताळी हे एक स्वस्तातील कंदमुळ असल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असते. शिवाय उपवासाच्या दिवशी आवर्जून रताळे खाल्ले जाते. त्यामुळे सणासुदीला अथवा श्रावणात उपवासाला रताळ्याचे अनेक पदार्थ केले जातात. रताळ्यात भरपूर प्रमाणात फायबर्स  आणि पोषक घटक असल्यामुळे उपवासाच्या दिवशी रताळ्याचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. रताळ्यामधील नैसर्गिक साखरेचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. ज्यामुळे मधुमेहींनीदेखील रताळी खाण्यास काहीच हरकत नाही. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी रताळी उकडून अथवा रताळ्याचा कीस करून खाल्ला जातो. रताळ्यामध्ये फासबर्स, व्हिटॅमिन  ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, लोह असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. रताळी शरीरासाठी फार पौष्टिक असतात. रताळयांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाणे वाटू शकते.

यासाठीच उपवासाच्या दिवशी रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज नक्की ट्राय करा. 

रताळ्याचे काप -

साहित्य - रताळी, मीठ  आणि तूप

कृती - रताळ्याचे साल काढून त्याचे काप करावे. तुपावर ते चांगले खरपूस तळून घ्यावेत. तळलेल्या  रताळ्याच्याय कापांवर मीठ भुरभरावे. कुरकुरीत काप लगेच खाल्यास अगदी मस्त लागतात. 

स्प्राउट्सचे दुष्परिणाम देखील वाचा

रताळ्याचे कटलेट-

साहित्य - एक ते दोन रताळी, राजगिऱ्याच्या लाह्या, मिरचीचा ठेचा, चवीपूरते मीठ, तूप


कृती - रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. रताळ्याचा गर काढून त्यात राजगिऱ्यांच्या लाह्या, मिरचीचा ठेचा  चवीपूरते मीठ टाका आणि या मिश्रणाचे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या. कटलेट पॅनवर शॅलो फ्राय करा आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खा.

रताळ्याचा किस

साहित्य- रताळी, तूप, मिरची, जिरे, ओलं खोबरं, चवीपूरतं मीठ आणि साखर


कृती - रताळी स्वच्छ धुवून त्याचा किस करून घ्या. एका कढईत तूप गरम करून मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्या. त्यात किसलेलं रताळं टाका. वरून चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून चांगलं परतून घ्या. ओलं खोबरं पेरून वाफेवर किस शिजवून घ्या.

तसेच अंकुर भेळ बद्दल वाचा

रताळ्याची खीर

साहित्य - 4 ते 5 रताळी, तूप, दूध, सुकामेवा, 

कृती - रताळी किसून तो किस तुपावर परतून घ्यावा. त्यात दूध टाकून रताळ्याचा गर चांगला शिजू द्या. या खीरीमध्ये साखर आणि सुकामेवा टाकून एक वाफ आणावी. थंड झाल्यावर सुकामेव्याने सजवून खीर खाण्यास द्यावी. 

रताळ्याच्या गोड पुऱ्या

साहित्य - उकडलेली रताळी, गुळ, गव्हाचे पीठ, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल

कृती - गव्हाच्या पीठात उकडून स्मॅश केलेली रताळी, मीठ, गुळाचे पाणी आणि त्यात भिजेल इतपत गव्हाचे पीठ मिसळा. सर्व मिश्रण चांगले मळुन घ्या. हे मिश्रण दहा ते वीस मिनीटे ओल्या कापडात गुंडाळून ठेवा. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या. कढईत तूप गरम करा आणि पुऱ्या तळून घ्या. 

अधिक वाचा -

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी

पिस्त्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित हवेत

फोटोसौजन्य - इन्साग्राम