Table of Contents
- काय आहे टी ट्री ऑईल (What Is Tea Tree Oil )
- टी ट्री ऑईलचे त्वचेसाठी फायदे (Tea Tree Oil Benefits For Skin)
- केसांवर प्रभावी टी ट्री ऑईल (Tea Tree Oil Benefits For Hair)
- आरोग्यदायी टी ट्री ऑईल (Tea Tree Oil Benefits For Health)
- टी ट्री ऑईलचे साईड इफेक्ट्स (Side Effects Of Tea Tree Oil)
- टी ट्री ऑईलबाबत विचारण्यात येणारे FAQ’s
टी ट्री ऑईल हे टी ट्रीचा पानांपासून काढले जाते. ज्याचा सुवास हा जायफळासारखा असतो. खरंतर अठराव्या शतकाच्या आसपास एका नाविकांच्या समूहाने ऑस्ट्रेलियाच्या तटावर उगवणाऱ्या या झाडाच्या पानांपासून बनणारा चहा प्यायला होता. हे एक वेगळ्याच प्रकारचं झाड होतं. जे औषधी झाड म्हणूनही गणलं जातं. याचे अनेक फायदे आहेत. ज्यामध्ये एक्ने, फंगल इंफेक्शन, कानाचं इंफेक्शन, एथलीट फूट, व्हजायनल इंफेक्शन, रिंगवर्म इ.चा समावेश आहे. सरळ शब्दातं सांगायचं झाल्यास टी ट्री ऑईल हे एक उत्तम अँटीसेप्टीक आहे.
काय आहे टी ट्री ऑईल (What Is Tea Tree Oil )
टी ट्री चं वैज्ञानिक नाव आहे मेलेल्युका ऑल्टरनिफोलिया. टी ट्री एक छोटा झाड आहे, जे फक्त सात मीटर ऊंच आणि झुडपासारखं दिसतं. या झाडाची सालं पांढरी आणि कागदासारखी पातळ असतात. याची पान खूप मऊ आणि गुळगुळीत असतात. ज्यांची रूंदी 1 मिलीमीटर आणि लांबी 10- 35 मिलीमीटर एवढी असते. या पानाचं तेल काढलं जातं. ज्याला टी ट्री ऑईलच्या नावाने ओळखलं जातं आणि वापरलं जातं. या झाडाला उन्हाळ्यात छोटी पांढऱ्या रंगाची फूल येतात.
Shutterstock
काही लोकं या झाडाला चहाचं झाड असंही म्हणतात. जे सामान्य चहाच्या झाडापेक्षा अगदी वेगळं आहे. या तेलाचा वापर अनेक वर्षांपासून उपचारांसाठी केला जातो. या तेलामध्ये टेरपिनेन 4 ऑईल असतं. जे पांढऱ्या पेशींच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. हे बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर हानीकारक प्रभावांशी सुद्धा सामना करण्यास मदत करते. टी ट्री ऑईल प्राकृतिकरित्या एंटी सेप्टीक, एंटी व्हायरल, एंटी मायक्रोबाईल, एंटी इंफ्लेमेटरी, बॅल्सेमिक आणि एंटी फंगल असते.
टी ट्री ऑईलचे त्वचेसाठी फायदे (Tea Tree Oil Benefits For Skin)
वातावरणात जरासाही बदल झाला की, त्याचा परिणाम लगेच तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. आपल्या त्वचेवर रॅशेस येणं आणि ती कोरडी-निस्तेज होण्यासोबतच एक्ने आणि इंफेक्शनचीही बळी ठरू शकते. या सर्व समस्यांवरील उपाय एकच आहे ज्याचं नाव आहे टी ट्री ऑईल.
Also Read Benefits Of Banyan Tree In Marathi
कोरड्या त्वचेसाठी (For Dry Skin)
कोरड्या त्वचेला मऊ करण्यासाठी तुम्ही 5 चमचे टी ट्री ऑईलमध्ये एक चमचा बदाम तेल मिक्स करून हलक्या हाताने त्वचेवर मालीश करा. काही वेळासाठी ते तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने आंघोळ करा. याचा नियमित वापर केल्यास तुमची त्वचा बराच काळ हायड्रेट राहील. त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार राहण्यासाठी टी ट्री ऑईलचा वापर नक्की करा.
एक्ने- पिंपल्स होतील दूर (Removes Acne Pimples)
तुम्ही आतापर्यंत चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी अनेक एंटी एक्ने स्कीन क्रीम आणि फेस वॉश बाजारात पाहिले असतील. ज्यामध्ये नेहमी टी ट्री ऑयलचं सत्व असतं. एका रिसर्चनुसार, एक्ने कमी करण्यासाठी टी ट्री ऑईल बेनजॉली पेरोक्साइड खूपच फायदेशीर आहे. एक्नेला दूर करण्यात हे नैसर्गिकरित्या काम करतं. ज्यामुळे त्वचा सोललीही जात नाही आणि लालही होत नाही. हे त्वचेतून निघणाऱ्या सीबमला कमी करते आणि एक्ने निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाचा सामना करते. एक्नेवरील उपायासाठी 2-3 थेंब टी ट्री ऑईल घ्या. यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दही घाला. तुमच्या बोटांच्या टोकांनी हळूवारपणे एक्नेवर लावा. पण लक्षात घ्या जास्त जाडा थर लावू नका पातळ थर लावा. 15- 20 मिनिटानंतर चेहरा धुवून टाका. हे मिश्रण काही आठवडे लावत राहा. तुमचे पिंपल्स लवकरच नाहीसे होतील.
Shutterstock
जर तुमच्या चेहऱ्यावर काही डाग किंवा खड्डे असतील तर टी ट्री ऑईल बेस्ट आहे. कापसाच्या तुकड्यावर या तेलाचे काही थेंब घ्या आणि त्वचेवरील प्रभावित जागी लावा. तुम्ही हवं असल्यास टी ट्री ऑईलयुक्त फेस वॉश आणि जेलचाही वापर करू शकता. हार्मफुल केमिकल्स आणि अल्कोहोलपेक्षा हे नक्कीच चांगलं आहे.
वाचा – घनदाट केसांसाठी तांदूळाचे पाणी
डिओड्रंट म्हणून टी ट्री ऑईल (As A Deodorant)
अनेकांना शरीराच्या दुर्गंधीचा त्रास होतो. त्यामुळे ते अनेक प्रकारच्या डिओड्रंट्सचा वापर करतात. पण शरीराची दुर्गंधी काही जात नाही. समजा घामाला वास नसला तरी तुमच्या शरीरातील बॅक्टेरियामुळे घामाला वास येऊ लागतो. हे सर्व दूर होऊ शकतं अँटी-बॅक्टेरियल टी ट्री ऑईलने. जे शरीराच्या दुर्गंधाला करतं दूर.
जखम भरेल लवकर (For Wounds)
जर तुमची त्वचा कुठे कापली गेली असेल किंवा जखम झाली असेल तर टी ट्रीट ऑईलचा वापर फायदेशीर ठरेल. अनेकदा शेव्हिंग केल्यावर रेजरमुळे त्वचा कापली जाते. अशावेळी याचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. कापसाच्या बोळ्यावर या तेलाचे काही थेंब घेऊन ते कापलेल्या त्वचेवर किंवा जखमेवर लावा. तुमच्या त्वचेला थंड आणि बरं वाटेल.
फोड (Boils)
तुमच्या शरीरावर एखादा फोड आल्यास त्यावर टी ट्री ऑईल लावणं खूप चांगल आहे. तुमचे ओठ कोरडे किंवा फुटल्यासही तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास हे तेल खूप मदत करते.
किडा चावल्यास किंवा रॅशेस उठल्यास (Protection From Worms And Rashes)
जर तुमच्या त्वचेवर रॅशेस आल्यामुळे खाज येत असेल तर या तेलाचा वापर आवर्जून करा. किडा चावल्यामुळे येणारी खाज आणि होणारी जळजळ हे तेल लावल्यास कमी होते. तुमच्या आंघोळीच्या पाण्यात रोज या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा फंगससंबंधी त्वचेची एलर्जी होणार नाही. हे त्वचेच्या खाज आणि लालसरपणावरही गुणकारी आहे.
निरोगी नखांसाठी (For Healthy Nails)
नखांना अनेकदा फंगल इंफेक्शन होतं त्यासाठी अनेक घरगुती उपचार केले जातात. ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारची औषधं वापरतो. पण याचे अनेक साईड ईफेक्टसही सहन करावे लागतात. नखांना होणाऱ्या इंफेक्शनवर तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर करू शकता. हळू हळू फंगल इंफेक्शन आपोआप दूर होईल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर हा नारळ तेलासोबत समप्रमाणात मिक्स करूनही करू शकता.
एक्झिमाचा नायनाट (Erosion Of Eczema)
हातावर होणारा एक्झिमा हा तुमच्या सौंदर्यात अडथळा निर्माण करतो. हातावर झाल्यामुळे हे वाईट दिसतं. पण जादूई टी ट्री ऑईलच्या साहाय्याने यावर उपाय शक्य आहे. यासाठी टी ट्री ऑईलमध्ये नारळाच तेल आणि लंव्हेंडर ऑईल समप्रमाणात घ्या. आंघोळीला जाण्याआधी या मिश्रणाला प्रभावित भागावर लावा. तुमचा एक्झिमा हळूहळू दूर होईल.
माउथवॉश म्हणून टी ट्री ऑईल (For Mouthwash)
टी ट्री ऑईलमध्ये असणाऱ्या एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरियल गुणांमुळे दात खराब होत नाहीत आणि तोंडाला दुर्गंधीही येत नाही. तुमच्या तोंडाला निरोगी आणि दुर्गंधीपासू दूर ठेवायचं असल्यास एक कप गरम पाण्यात दोन ते तीन थेंब टी ट्री ऑईल मिक्स करा आणि या पाण्याने चूळ भरा. पण लक्षात ठेवा की हे पाणी गिळता कामा नये.
Also Read: Benefits Of Coconut Oil For Skin, Hair & Health In Marathi
रेजर बर्नची जळजळ होईल कमी (For Razor Burn)
शेव्हींग करताना त्वचा सोलल्यास आणि त्या जागी जळजळ झाल्यास त्याला रेजर बर्न असं म्हणतात. हा त्रास त्या पुरूषांना जास्त होतो. जे घरच्याघरी स्वतः शेव्ह करतात. शेव्हींगनंतर होणारी जळजळ काही तास तर कधी कधी दिवसभर पण ही जळजळ जाणवते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही टी ट्री तेलाचा वापर करू शकता. हे तेल खास अँटी सेप्टिक गुणयुक्त आहे. ज्यामुळे रेजर बर्नचा त्रास होत नाही.
त्वचा भाजल्यास (For Burns)
अनेकदा एखाद्या गरम वस्तूचा संपर्कात आल्याने आपल्याला चटका बसतो. ज्यामुळे जळजळ आणि वेदना होतात. अशा परिस्थितीत तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर करू शकता. टी ट्री तेलातील अँटीमायक्रोबियल गुणांमुळे जळजळ आणि वेदनेपासून आराम मिळतो. हे तेल भाजलेल्या त्वचेला लगेच आराम देते.
कांजण्यांच्या डागांवर (For Chickenpox Marks)
चिकनपॉक्स म्हणजेच कांजण्या या वेरिसेला जोस्टर नामक व्हायरसमुळे होतात. हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो सर्दी आणि फ्लूसारखा पसरतो. या रोगाचा प्रभाव 10 ते 21 दिवस राहतो. चिकनपॉक्समुळे त्वचेवर काळे-लाल डाग पडतात. ज्यामुळे जळजळ होते आणि रूग्णाला खाज असह्य होते. या काळ्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही टी ट्री तेलाचा वापर करू शकता. या समस्येवरही टी ट्री तेलातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण उपयोगी पडतात.
केसांवर प्रभावी टी ट्री ऑईल (Tea Tree Oil Benefits For Hair)
Shutterstock
केसांवरही बदलत्या हवामानाचा परिणाम होतो आणि केस निस्तेज व निर्जीव दिसू लागतात. केसांची चमक अचानक गायब होते. सोबतच कोंडा आणि उवासुद्धा केसात होऊ शकतात. टी ट्री ऑईल आपल्या केसांवर चमत्कारी परिणाम करतं आणि त्यांचं पोषणही होतं.
लांब केसांचं रहस्य ( Long Hair Secrets)
रिसर्चनुसार, लांब केस हवं असल्यास त्यांना टी ट्री ऑईल लावावं. हे केसांच्या फॉलिकल्सना मोकळं करतं आणि केसांच्या मुळांना पोषण देतं. या तेलाचे काही थेंब तुम्ही कोणत्याही तेलात मिक्स करून मालीश करा. तुम्हाला नक्कीच ताजंतवान वाटेल.
डँड्रफपासून संरक्षण (Protects From Dandruff)
डँड्रफला हा प्रत्येकालाच नकोसा वाटतो. पण तरीही अनेकदा आपल्याला डँड्रफची समस्या जाणवते. आंघोळ करताना तुमच्या नेहमीच्या शँपूमध्ये टी ट्री ऑईलचे काही थेंब मिक्स करा आणि मग तो शँपू लावा. तुम्ही हा वापर नियमितपणे केल्यास तुम्हाला डँड्रफपासून सुटका मिळेल.
केसांच्या कोरड्या मुळांवर रामबाण उपाय (Best For Dry Roots)
हे तुमच्या केसांना सजीव करून त्यांचं पोषण करते. हे केसांच्या छिंद्रांनाही मोकळं करते. हे जोजोबा ऑईलमध्ये मिक्स करून 10- 15 मिनिटं डोक्याला मालीश करा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग धुवून टाका
केसगळती रोखते (Prevents Hair Loss)
केसगळतीच मुख्य कारण म्हणजे डँड्रफ. वरील मुद्दयात तुम्हाला कळलंच असेल की, डँड्रफच्या समस्येवर टी ट्री ऑईल किती गुणकारी आहे. त्यामुळे तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे टी ट्री ऑईलचा वापर केल्यास डँड्रफ कमी होऊन केसगळतीही कमी होते.
केसांच्या वाढीसाठी उत्तम (Boosts Hair Growth)
रिसर्चनुसार टी ट्री ऑईल हे तुमच्या केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे. कारण हे केसांच्या मुळाचा कोरडेपणा दूर करून त्यांचं पोषण करते आणि केसांची छिद्रही मोकळी करते. त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. परिणामी केसांची वाढ लवकर होते.
आरोग्यदायी टी ट्री ऑईल (Tea Tree Oil Benefits For Health)
Shutterstock
सौंदर्याला वाढवण्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठी टी ट्री ऑईलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
ब्लॅडर इंफेक्शन झाल्यास (For Bladder Infection)
टी ट्री ऑईलमधील एंटी बॅक्टेरियल गुणांमुळे हे ब्लॅडर इंफेक्शन बरं करण्यात मदत करतं. आंघोळ करताना पाण्यात टी ट्री ऑईलचे दहा थेंब टाका आणि या पाण्याने युरिनच्या मार्गाला स्वच्छ करा.
एथलीट फूटवर गुणकारी (Athlete Foot Treatment)
एथलीट फूट इंफेक्शन पायाला होतं जे कंट्रोल करणं कठीण होतं. अनेकदा हे पायानंतर हातालाही होतं. हे बरं करण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर हा एंटी व्हायरल आणि एंटी फंगल घरगुती उपाय म्हणूनही करू शकता. या तेलातील एंटीसेप्टिक गुणांमुळे हे त्वचेशी निगडीत अनेक समस्यांवर गुणकारी आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टी ट्री ऑईलची पानं पाण्यात उकळून किंवा इसेंशियल ऑईलच्या पाण्यात मिसळून मगही लावू शकता. याचा फायदा तुम्हाला लगेच जाणवेल किंवा एक चतुर्थांश अक्रोड पावडर, एक चर्तुथांश कप बेकिंग सोडा आणि वीस-पंचवीस थेंब टी ट्री ऑईल मिक्स करा आणि हे एथलीट फुटवर दिवसातून दोनदा लावा.
वाचा – केसांची काळजी कशी घ्यावी (DryHair Care Tips)
कानाच्या इंफेक्शनवरही गुणकारी (Good For Ear Infection)
कानामध्ये होणाऱ्या इंफेक्शनमुळे अनेकदा वेदना होतात. हे बरं करण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑईल उकळून नंतर त्यात ऑलिव्ह ऑईलचे काही टाकून थेंब टाका. आता हे मिश्रण कानात घाला आणि कापसाने कान बंद करा. दुखरा कान बरा करण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑईलमध्ये नारळाचं तेल मिक्स करून तेही कानाच्या बाहेरील भागाला लावू शकता.
न्यूमोनियावरही प्रभावी (Effective In Pneumonia)
रिसर्चनुसार, टी ट्री ऑईल न्यूमोनिया लक्षणांना कमी करण्यास मदत करते पण अजून याबाबत विश्वासपूर्ण प्रमाण मिळालेलं नाही. त्यामुळे या रोगावर टी ट्री ऑईलचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सेक्सुअल रोगांपासून संरक्षण (Protects From Sexually Transmitted Diseases)
अँटीबायोटीक गुणांमुळे सेक्सुअल आजारांशी लढण्यातही टी ट्री ऑईलचा वापर होतो. शरीराच्या प्रभावित भांगावर कापसाच्या मदतीने टी ट्री ऑईल लावा. असं दिवसातून दोनदा करा. हळूहळू ते बरं होईल. सेक्सुअल इंफेक्शन रोग क्लॅमिडियाच्या इलाजासाठीही टी ट्री ऑईलचा वापर करता येतो.
व्हजायनल दुर्गंधी दूर करा (Removes Vaginal Stink)
काही लोकांच्या व्हजायनाला दुर्गंधी येते. ही दुर्गंधी दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे टी ट्री ऑईलचा वापर आहे. पाण्यामध्ये टी ट्री ऑईलचे काही थेंब कापसावर घेऊन ते व्हजायनाच्या बाहेरील भागावर लावा आणि पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळाही करू शकता.
टी ट्री ऑईलचे साईड इफेक्ट्स (Side Effects Of Tea Tree Oil)
- टी ट्री ऑईलला खरंतर विषारी मानलं जातं. कारण साधारणतः याचं सेवन हे नुकसानकारक मानलं जातं.
- अनेकदा टी ट्री ऑईलचा जास्त वापर केल्याने त्वचेला जळजळ होणं किंवा आग होण्याची शक्यता असते.
- एक्नेसाठी याचा वापर केल्यास त्वचा कोरडी होऊन खाज येऊ शकते.
- व्हजायनल इंफेक्शनदरम्यान टी ट्री ऑईलचा वापर करताना फक्त बाहेरील भागावरच हे तेल लावावे कारण हे विषारी असते.
टी ट्री ऑईलबाबत विचारण्यात येणारे FAQ’s
Shutterstock
तुम्हालाही टी ट्री ऑईलबाबत पुढीलप्रमाणे काही प्रश्न आहेत का, जाणून घ्या त्यांची उत्तर.
टी ट्री ऑईल तुम्ही थेट त्वचेवर लावू शकता का?
टी ट्री ऑईलच्या अँटी-इंफ्लेमेट्ररी प्रभावाने त्वचेला कोणताही त्रास होत नाहीत आणि ती कोमल राहते. त्वचेवरील लाली कमी होते आणि सूज कमी करण्यातही हे तेल गुणकारी आहे. पण तरीही साधारणपणे असाच सल्ला दिला जातो की, टी ट्री ऑईल कोणत्यातरी कॅरियर तेलात मिक्स करून मगच त्वचेला लावावं.
टी ट्री तेलाचीही एक्सपायरी डेट असते का?
ऑस्ट्रेलियन टी ट्री इंडस्ट्री असोसिएशननुसार, टी ट्री ऑईलची बाटली उघडल्यावर सहा महिन्याच्या आतच हे तेल वापरावं.
टी ट्री ऑईलचं कोणत्या बाटलीत ठेवावं?
हे तेल तुम्ही स्टेनलेस स्टील किंवा लाइन्ड अल्युमिनिअमच्या बाटलीत किंवा कोबाल्ट ब्लू काचेत हे तेल ठेवणं कधीही चांगल. कधीही टी ट्री ऑईल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवू नये.
टी ट्री ऑईलचा वापर हा माउथवॉश म्हणून करता येतो का?
माउथवॉश करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, टी ट्री ऑईल गिळता कामा नये. खरंतर टी ट्री ऑईलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्यास कोणताही अपाय होत नाही. कारण ही सर्व उत्पादनं सुरक्षित पॅरामीटरप्रमाणे बनवण्यात येतात.
टी ट्री ऑईलचा किती प्रमाणात वापर करणं योग्य आहे?
टी ट्री ऑईलचा डोस हा वापरण्यांवर अवलंबून आहे. ज्यामध्ये गरजेप्रमाणे आणि उपायाकरता त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला त्वचेची अलर्जी किंवा अजून काही त्रास असल्यास याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
You Might Like These:
केसांसाठी असा करा कडूलिंबाचा वापर (Benefits of Neem Oil For Hair)