सुंदर त्वचा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. चेहरा चांगला राहावा म्हणून आपण बरेच काही करतो. क्लिनिंग, मॉश्चरायझिंग, फेशियल, स्क्रब हे काहींचे डेली रुटीनच असेल. पण तुम्ही तुमच्या या सगळ्यामध्ये ‘टोनर’ चा वापर केला आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत टोनरचा वापर केला नसेल तर तो आताच करणे सुरु करा. कारण टोनर वापरण्याचे भरपूर फायदे आहेत. तुम्हाला हवी असलेली नितळ त्वचा तुम्हाला याच्या वापरामुळे हमखास मिळू शकते. म्हणूनच आज आपण टोनरविषयी सगळे काही माहीत करुन घेणार आहोत….करुया सुरुवात
टोनर या शब्दाचा शब्दश: अर्थ हा टोन करणे असा होता. पाण्याप्रमाणे दिसणारे हे टोनर तुमच्या त्वचेमध्ये तजेला आणण्याचे काम करत असते. ज्याप्रमाणे तुमच्या शरीरासाठी पाणी आवश्यक असते. त्याप्रमाणे तुमच्या त्वचेसाठी हे मिरॅकल वॉटर आवश्यक असते. टोनरला विशेष असा काही रंग नसतो. ते तुम्हाला पाण्यासारखेच दिसेल.फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घातल्या जातात. तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून त्याचा वापर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला टोनर वापरायचे नसेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी फेस सीरमचा उपयोगही करु शकता. त्यासाठी तुम्हाला फेस टोनर आणि फेस सीरममधील फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
सुंदर नितळ त्वचा ही सगळ्यांनाच मिळते असे नाही. काहींची त्वचा चांगली असते. पण त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते कळत नाही. तुम्हाला त्वचेसाठी फार काही करण्यासाठी वेळ नसेल तर तुमच्यासाठी टोनर हे अमृताप्रमाणे आहे. कारण तुमच्या रोजच्या वापरात टोनर आणल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्वचेसंदर्भातील तुमच्या तक्रारीसुद्धा कमी होतात. ज्या प्रमाणे तुमच्या त्वचेसाठी क्लिंझिंग महत्वाचे असते. त्याचप्रमाणे टोनरही महत्वाचे असते. टोनरचे हेच फायदे आता जाणून घेऊया.
टोनर त्वचेसाठी चांगले हे आता आपल्याला कळलेच असेल. पण त्याचे तुमच्या त्वचेला होणारे नेमके फायदे माहीत हवेत.टोनरचे 10 फायदे तुमची त्वचा करतील परफेक्ट
त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवरील ओपन पोअर्स येतात. ओपन पोअर्स हे कधीही जात नाहीत. ओपन पोअर्स म्हणजेच तुमच्या त्वचेची छिद्र मोठी होणं. त्वचेवर होणारा हा त्रास त्रासदायक असतो कारण त्यामुळे त्वचेच्या अन्य समस्या निर्माण होतात.त्यामुळे ओपन पोअर्स नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. त्वचेवर टोनर लावल्यामुळे ओपन पोअर्सचा आकार लहान होण्यास मदत मिळते. तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण बाहेर निघून तुमची त्वचा चांगली दिसू लागते.
त्वचा काळवंडणे आणि त्वचेचा रंग यामध्ये फरक आहे. त्वचेचा रंग कोणताही असला तरी त्यामध्ये तजेला असणे आवश्यक असते. कामाचे स्वरुप, सतत उन्हात असणे किंवा ताण-तणाव याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. तुमच्या त्वचेचा PH बॅलन्स बिघडतो. तुमच्या त्वचेचा रंगही तुम्हाला बदललेला दिसत असेल तर तुम्हाला टोनर वापरण्याची गरज आहे. तुम्ही रोज टोनर लावले तर तुम्हाला तुमच्या त्वचेत झालेला सुधार दिसून येईल. तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागेल.
तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे कामही टोनर करत असते. तुमच्या त्वचेवर टोनर लावल्यानंतर त्याचा एक थर तुमच्या त्वचेवर तयार होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. काहींचा चेहरा अगदीच कोरडा असतो किंवा काहींचा चेहरा फारच तेलकट असतो. अशावेळी तुमच्या चेहऱ्याला योग्य प्रमाणात तजेला देण्याचे काम आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे काम टोनर करते.
टोनरमधील घटक त्वचा मॉश्चराईज करायचे काम देखील करत असते. प्रत्येक त्वचेसाठी मिळणारे टोनर हे वेगळे असते. तुम्ही योग्य टोनरची निवड केली तर तुमची त्वचा त्यामुळे मऊ राहते. तुमची त्वचा जर अतिरिक्त कोरडी असेल तर त्याला तजेला आणण्याचे काम टोनर करते.
पिंपल्स सगळ्यांनाच येतात. ते आल्यानंतर चेहऱ्यावरुन घालवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. जर तुम्हाला होणाऱ्या पिंपल्सचा त्रासच कमी करायचा असेल तर मग तुम्ही टोनर अगदी हमखास वापरायला हवे. कारण जर तुम्ही टोनरचा वापर केला तर तुमचे पोअर्स कायम स्वच्छ राहतील आणि तुमचे पिंपल्स कमी होतील.
काहींची त्वचा इतकी शुष्क असते की, ती रुक्ष दिसते. तुम्हालाही तुमची त्वचा फारच कोरडी वाटत असेल तर तुम्ही टोनरचा वापर करायला हवा. कारण तुम्ही टोनरचा वापर केला तर तुमच्या त्वचेतून गायब झालेला तजेला तुम्हाला मिळेल. तुम्ही सातत्याने या वापर करणे यासाठी आवश्यक असते. त्यामुळे कोरडया त्वचेसाठी तुम्ही टोनर अगदी हमखास वापरायला हवे.
वय परत्वे तुमच्या त्वचेवर सुरुकुत्या येणं. त्वचा सैल पडू लागते. चेहऱ्यावरील पोअर्स मोठे होऊ लागतात.अशावेळी तुम्हाला टोनरची गरज असते. कारण टोनर स्किन टाईटनिंग करण्यासाठी मदत करते. टोनरच्या वापरामुळे तुमची सैल त्वचा पूर्ववत होण्यास मदत मिळते. त्यामुळे टोनरचा हा आणखी एक फायदा तुमच्या त्वचेसाठी आणि सौंदर्यासाठी महत्वाचा आहे.
तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेवर त्वचेवरील तेल किती घातक असते ते तुम्हाला माहीत असेलच.तुमचीही त्वचा सतत तेलकट दिसत असेल तर मग तुमच्यासाठी टोनर फार महत्वाचे आहे. कारण टोनर तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करुन तुमची त्वचा चांगली करते.
तुमच्या शरीरासाठी डिटॉक्स म्हणजेच वाईट पदार्थ बाहेर काढणे किती महत्वाचे असते हे तुम्हाला माहीत आहे. त्वचेसंदर्भातही तसेच काही आहे. तुमच्या त्वचेतून वाईट गोष्टी बाहेर निघणे गरजेचे असते. टोनरच्या वापरामुळे तुमच्या त्वचेत अडकलेले धुळीचे कण, माती निघण्यास मदत होते. क्लिनझरही न काढू शकणारे धुळीचे कण आणि माती त्यामुळे काढण्यास मदत होते.
त्वचेसंदर्भातील तक्रारी कमी झाल्यामुळे आणि तुमच्या त्वचेला योग्य तजेला मिळाल्यामुळे तुमची त्वचा मुलायम जाणवू लागते. टोनरचा योग्य वापर केल्यामुळे तुम्हाला अपेक्षित त्वचा मिळते.
टोनरचे इतके फायदे पाहिल्यानंतर जर तुम्ही टोनरचा वापर करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे माहीत करुन घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत असेल तर तुम्ही घरच्या घरी टोनर बनवू शकता. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार टोनर खास तुमच्यासाठी.
तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचा या टीप्स
कॅमोमाईल टी टोनर (Chamomile Tea Toner)
कॅमोमाईल टी ही अनेक कारणांसाठी चांगली आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर तिला तजेला आणण्याचे काम ही कॅमोमाईल करते. कॅमोमाईल टीचा उपयोग करुन त्यापासून टोनर बनवू शकता.
कृती: कॅमोमाईल टी बॅग गरम पाण्यात साधारण पाच मिनिटांसाठी ठेवा. टी बॅग काढून तुम्हाला हे पाणी थंड करायचे आहे. तयार टोनर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावून 20 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. त्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे.
अॅलोवेरा टोनर (Aloe Vera Toner)
कोरड्या त्वचेला तजेला देण्याचे काम अॅलोवेरा करु शकते. त्यामुळे तुम्ही कोरडी त्वचा असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता.
कृती: अॅलोवेराचा गर काढून घ्या. तो तुम्ही तसाही लावू शकता किंवा तुम्ही त्याचा अर्क पाण्यासोबत वाटून घ्या. चिकट मिश्रण तयार होईल. ते तुमच्या चेहऱ्याला लावा. किमान 20 मिनिटे ते चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा धुवून टाका.
पुदिना टोनर (Mint Toner)
पुदिन्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. जगभरात पुदिन्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जातो. तेलकट त्वचेसाठी पुदिन्याचे टोनर चांगले काम करते. तुमच्या चेहऱ्यातील अतिरिक्त तेल कमी करण्यास पुदिना मदत करते.
कृती: पुदिन्याची पाने स्वच्छ करुन ती पाण्यात उकळून घ्या. पाण्यात पुदिन्याचा अर्क उतरल्यानंतर भांडे आचेवरुन उतरवा. थोडे थंड झाल्यानंतर त्यावर तुरटी फिरवा. तयार पाणी गाळून तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये हे टोनर भरुन ठेवा. रोज हे टोनर लावायला विसरु नका.
ग्रीन टी टोनर (Green Tea Toner)
वजन कमी करण्याचे काम ग्रीन टी उत्तम करते. या सोबतच तुमच्या त्वचेला तजेला देण्याचे कामही ग्रीन टी करते. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर मग तुम्ही ग्रीन टी टोनरचा वापर करायला हवा.
कृती: एक कपभर पाण्यात ग्रीन टी चांगली उकळून घ्या. पाण्यात ग्रीन टी चा अर्क उतरल्यानंतर हे पाणी थंड करुन घ्या. एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरुन सकाळ संध्याकाळ तुमच्या चेहऱ्याला लावा.
कडुनिंब टोनर (Neem Toner)
जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर तुमच्यासाठी काही कडुनिंब हे चांगले आहे. कडुनिंब तुमच्या त्वचेवर असलेल्या पिंपल्समधील बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत करते. तुम्हाला पिंपल्स असतील तर त्याचे डागही हे टोनर कमी करते.
कृती: कडुनिंबाची काही पाने घेऊन तुम्ही ती पाण्यात उकळवा. पाण्यात उकळल्यानंतर हे पाणी झाकून ठेवा. पाणी थंड झाल्यावर त्याचा टोनर म्हणून तुम्ही वापर करा.
अॅपल सायडर व्हिनेगर टोनर (Apple Cider Vinegar Toner)
तुमच्या त्वचेशी निगडीत अॅपल सायडर व्हिनेगरचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पिंपल्ससाठी त्याचा वापर करु शकता.
कृती: अॅपल सायडर व्हिनेगर आणि त्यात तितकेच पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला ते लावायचे आहे. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते
टोमॅटो टोनर (Tomato Toner)
जर तुमची त्वचा फार नाजूक असेल तर तुम्हाला काहीही करताना फार विचार करावा लागतो. जर तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा उपयोग केला तर तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही. टोमॅटो हे त्यासाठीच उत्तम टोनर असून तुम्ही त्याचा वापर करु शकता.
कृती: एक टोमॅटो घेऊन त्याचा रस काढा.जर तुम्ही जास्त रस काढून ठेवणार असाल तर तो तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
गुलाब पाणी (Rose Water)
गुलाब पाण्याचे भरपूर फायदे आहेत. बाजारात रेडिमेड गुलाब पाणी मिळत असले तरी तुम्ही घरी गुलाब पाणी बनवणे नेहमीच चांगले
कृती: तुमच्या आवडीच्या गुलाबाच्या पाकळ्या घेऊन तुम्हाला त्या पाण्यात उकळून घ्यायच्या आहेत. पाणी गाळून तुम्ही त्याचा थेट वापर टोनर म्हणून करु शकता.
जर तुम्ही चांगले टोनर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हे 10 टोनर बेस्ट असू शकतात.
जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर तुम्ही हे टोनर वापरु शकता. टी ट्री ऑईल असल्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी हे वापरले तरी देखील हरकत नाही.
ओपन पोअर्सचा त्रास तुम्हाला असेल तर मग तुम्ही काया स्किन क्लिनिकचे हे टोनर नक्की वापरुन पाहा. तुमचे पोअर्स लहान होण्यास मदत मिळेल.
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे काम हे टोनर करु शकते. तुम्ही याचा रोज वापर करु शकता.
कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी हे टोनर चांगले आहे. हे टोनर लावल्यानंतर तुम्हाला चेहरा धुण्याची गरज नसते. तुम्ही याचा बिनधास्त वापर करु शकता.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला हे टोनर वापरता येईल या शिवाय तुम्ही पिंपल्स असणाऱ्यांनाही या टोनरचा वापर करता येईल.
गुलाबांचा अर्क असल्यामुळे हे टोनर अगदी कोणालाही वापरता येईल. याची किंमत जास्त असली तरी त्याचे अनेक फायदे आहेत.
जर तुमची त्वचा acne prone असेल तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे. शिवाय खिशाला ही परवडण्यासारखे आहे.
तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही अशाप्रकारचे टोनर वापरु शकता. हे टोनर vitamin C चे असल्यामुळे कोणत्याही त्वचेला चालू शकते.
कोणत्याही त्वचेसाठी चालू शकेल असे हे टोनर आहे. बजेट फ्रेंडली असल्यामुळे तुम्हाला वापरताना फार त्रासही होणार नाही.
तुमचे कोलॅजन बुस्ट करण्याचे काम हे टोनर करते. किमतीच्या तुलनेत याचे फायदेही अनेक आहेत.
गुलाब पाणी हे एक उत्तम टोनर आहे. गुलाब पाण्याचा उपयोग तुम्ही टोनर म्हणून करु शकता. गुलाब पाणी हे एक नैसर्गिक टोनर असून तुम्ही त्याचा वापर करु शकता. रोज सकाळी आणि रोज रात्री तुम्ही त्याचा वापर करुन सुंदर त्वचा बनवू शकता.
टोनरचा वापर करण्याची ठराविक अशी वेळ नाही. तुम्ही त्याचा वापर कधीही करु शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्याचा वापर केल्यास ते दिवसभर तुमच्या त्वचेवर राहील. पण तुम्ही त्याचा वापर केल्यानंतर उन्हात किंवा बाहेर प्रवास करणार असाल तर तसे करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला अन्य काही त्रास असण्याचीही शक्यता आहे. जर तुम्हाला टोनर वापरायचे नसेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी फेस सीरमचा उपयोगही करु शकता. त्यासाठी तुम्हाला फेस टोनर आणि फेस सीरममधील फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.