ADVERTISEMENT
home / आरोग्य
बांगड्या आहेत आरोग्यासाठी फायदेशीर, कसं ते जाणून घ्या

बांगड्या आहेत आरोग्यासाठी फायदेशीर, कसं ते जाणून घ्या

आपलं आयुष्य इतकं धावपळीचं झालं आहे की आपण या धावपळीच्या आयुष्यात काही दागिने तर आपल्या आयुष्यातून हद्दपार केले आहेत. त्यापैकी एक आहे बांगडी. हल्ली बऱ्याच जणींच्या हातामध्ये बांगडी दिसत नाही. सणासमारंभाला मात्र या बांगड्या आवर्जून घातल्या जातात कारण तो सजण्या सवरण्याचा एक भाग असतो. त्याशिवाय सण पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? बांगड्या घालणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. म्हणूनच पूर्वीपासून हातामध्ये भरपूर बांगड्या घातल्या जातात. बांगड्यांचा उपयोग हा केवळ दागिना म्हणून नाही तर आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून करण्यात येतो. आता तुम्ही विचार कराल की, बांगड्या या आरोग्याच्या दृष्टीने कशा काय फायदेशीर आहेत? पण हे खरं आहे. तुम्हाला आतापर्यंत जर या गोष्टी माहीत नसतील तर जाणून घ्या. बांगड्या नक्की तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कशा फायदेशीर ठरतात हे बघूया – 

रक्तप्रवाह राहतो सुरळीत

माणसाला जगण्यासाठी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला की, बांगड्यांमुळे रक्तप्रवाह कसा काय सुरळीत राहू शकतो? पण काम करताना बांगड्या जेव्हा तुमच्या मनगटांना घासल्या जातात त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. त्यासाठीच पूर्वीच्या महिला जास्तीत जास्त बांगड्या हातात घालायच्या. जेणेकरून काम करताना बांगड्या हातात घासल्या जातील आणि रक्तप्रवाह सुरळीत राहील. त्यातही या बांगड्या काचेच्या असतील तर त्याचा जास्त फायदा होतो. 

थकवा जाणवत नाही

Shutterstock

ADVERTISEMENT

बांगड्या घातल्याने तुमच्या शरीरात निर्माण होणारा थकवा शोषून घेतला जातो. त्यामुळे महिलांना सहसा थकवा जाणवत नाही. तसंच बांगड्या घातल्याने गरोदर महिलांना प्रसवकाळात होणाऱ्या वेदनांना सहन करण्याची शक्ती जास्त प्रमाणात मिळते. पण हल्ली सिझर अथवा कोणत्याही प्रकारे बाळाला जन्म द्यायचा असेल तर अंगावर कोणताही दागिना अथवा वस्तू ठेवू देत नाही. पण वास्तविक अशावेळी किमान बांगडी तरी हातात असू द्यावी असं सांगण्यात येतं. 

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी

शरीरातील उष्णता होते कमी

बांगड्या काचेच्या असतात ज्या तुमच्या शरीरातील उष्णता शोषून घेतात. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास कमी सहन करावा लागतो आणि तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्यामुळे हातामध्ये किमान एक तरी काचेची बांगडी घालून ठेवावी असं म्हटलं जातं. आजच्या लाईफस्टाईलमध्ये तर आरोग्याची काळजी घेणं हा खूपच मोठा टास्क झाला आहे. तसंच सतत फास्ट फूड आणि जंक खाऊन शरीरामध्ये अतिप्रमाणात उष्णता निर्माण होते. अशावेळी बांगडी घालण्याचा फायदा होतो. 

आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं

ADVERTISEMENT

हार्मोन्स संतुलित राखण्यास होते मदत

Shutterstock

महिलांना नेहमीच हार्मोन्स संतुलनाचा प्रॉब्लेम होत असतो.  मासिक पाळी असो अथवा नसो. वयाच्या प्रत्येक स्टेजवर प्रत्येक महिलेला हार्मोन्स संतुलनाचा त्रास होतो. महिलांचं शरीर हे पुरूषांच्या तुलनेमध्ये संवेदनशील असतं आणि त्यांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी ही जलद गतीने बदलत असते. बांगड्या घातल्याने हार्मोन्सची पातळी संतुलिन राहण्यासाठी मदत होते. 

मानसिक संतुलनही राहते व्यवस्थित

बांगड्या घातल्याने आरोग्य व्यवस्थित राहतं. हार्मोन्स संतुलित राहतात तसंच शरीरातील उष्णताही नियंत्रित राहाते. त्यामुळे महिलांची चिडचिड होत नाही आणि मानसिक संतुलनदेखील व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. अभ्यासातून बांगड्या घातल्याे मानसिक संतुलन व्यवस्थित राहाते हे सिद्ध झालं आहे. 

ADVERTISEMENT

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

29 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT