सेक्स लाईफ आणि जोडीदाराबरोबर नातं ठेवायचं असेल टिकवून तर या खास टिप्स

सेक्स लाईफ आणि जोडीदाराबरोबर नातं ठेवायचं असेल टिकवून तर या खास टिप्स

आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात रोमान्स आणि ताजेपणा नेहमी टिकून राहातो. तुमची सेक्स लाईफ कितीही चांगली असली तरीही तुम्हाला सेक्स लाईफ अधिक चांगलं करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करावेच लागतात. पण आपल्या जोडीदाराबरोबर हे नातं नक्की कसं टिकवून ठेवायचं आणि आपल्या आयुष्यात रोमान्स कसा टिकवून ठेवायचा यासाठी आपल्याला विचार करावा लागतोच. असं असेल तर जास्त विचार करू नका. आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देत आहोत. तुम्ही या टिप्स फॉलो केल्यात तरी तुमचं सेक्स लाईफ आणि तुमच्या जोडीदाराबरोबर तुमची केमिस्ट्री नक्कीच चांगली होईल. अधिक आकर्षक आणि जोडीदाराबरोबर अधिक चांगलं नातं टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा. 

तणावमुक्त राहणं आहे गरजेचं

दिवसभर घर आणि ऑफिसमध्ये अनेक प्रकारची टेन्शन्स असतात. पण टेन्शनमधून वेळ काढून तुम्ही एकमेकांबरोबर ‘We Time’ नक्कीच काढायला हवा. जेव्हा तुम्ही एकत्र असाल तेव्हा कोणत्याही प्रकारचा ताणतणाव असलेल्या गोष्टींवर अजिबात चर्चा करू नका. लक्षात ठेवा जर तुम्हा दोघांपैकी कोणीही  एक टेन्शनमध्ये असेल तर तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकणार नाही. सेक्स ही मजा घ्यायची गोष्ट आहे. त्यामध्ये कोणताही बोअरिंगपणा अथवा जबरदस्ती असू नये. त्यामुळे आपला ताणतणाव विसरून आपल्या जोडीदाराबरोबर हे क्षण एन्जॉय करण्याची गरज आहे.  

नेहमी सरप्राईज देत राहा

वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अथवा कोणताही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असेल तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काही करणार असल्याचा तुम्हाला नक्कीच अंदाज असतो. पण कोणताही खास दिवस नसेल आणि अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज तयार केलंत तर तुम्हाला त्याबदल्यात नक्कीच दुप्पट प्रेम मिळेल हे लक्षात घ्या. विशेषतः मुलांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. मुलींना सरप्राईज मिळालेलं आवडतं. तसंच तुम्ही जेव्हा सरप्राईज देणार असाल तेव्हा आपल्या जोडीदाराची आवड - निवड आणि वेळेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही सरप्राईज द्याल आणि त्यांना वेळच नसेल तर तुम्हालाच त्याचा मानसिक त्रास जास्त होऊ शकतो. पण तुमचं नातं अधिक स्पाईसी आणि रोमँटिक करायचं असेल तर तुम्ही हे सतत करत राहायला हवं. 

या ‘8’ ‘टिप्स Sex लाईफ करतील अधिक interesting

प्रशंसेइतकं सुंदर गिफ्ट काहीच नाही

तुमच्या लक्षात आहे का? तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रशंसा नक्की कधी केली होती? तुम्हाला जर हे लक्षात नसेल तर तुम्ही आता लक्षात आल्यानंतर लगेच आपल्या जोडीदाराच्या ड्रेसिंग स्टाईल, स्वयंपाकाचं कौशल्य अथवा मॅनेजमेंट कौशल्याची नक्की प्रशंसा करा. प्रशंसा करण्यासह I Love You म्हणायलादेखील विसरू नका. कारण त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या अधिक जवळ येतो. हे तीन जादुई शब्द खरंच कमाल करतात. तुम्ही अचानक जरी फोन करून आय लव्ह यू म्हटलंत तरीही तुमच्या जोडीदाराला तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि काळजी घेता हे पटकन समजून येतं. बऱ्याचदा कोणत्याही गिफ्टची गरज नसते. तुमचा वेळ आणि तुमचे प्रेमळ शब्दच तुमच्या जोडीदारासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. 

वातावरण बदलले तर बदलेल तुमचा मूड

View this post on Instagram

Good morning ❤️ #monkeylove

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

तुम्ही जर एकमेकांबरोबर जर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला घाबरत असाल अथवा कचरत असाल तर तुम्ही स्वतःला बदलण्याची गरज आहे. रोमँटिक आणि उत्तम सेक्स लाईफसाठी तुम्ही घराबाहेर पडून एकमेकांबरोबर काही क्षण एकांतात घालवणं खूपच गरजेचं आहे. जर तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये कँडल लाईट डिनर करायलाही हरकत नाही. अभ्यासातून असं सिद्ध झालं आहे की,  मेणबत्ती, सुगंध आणि मंद प्रकाशाचा तुमच्या रोमँटिक लाईफवर खूपच सकारात्मक प्रभाव पडतो. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

सेक्सपासून थोडा काळ राहा दूर

तुम्हाला माहीत आहे का? काही दिवस जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहिलात तर तुमच्या नात्यात नक्की बदल होतो. तुम्हाला जर तुमच्या सेक्स लाईफमध्ये अधिक चांगला ऑर्गजम हवा असेल तर तुम्ही काही दिवस एकमेकांबरोबर सेक्स करू नका. त्यामुळे तुम्ही एकमेकांकडे अधिक आकर्षित होता. तसंच या काळात एकमेकांना चिडवत राहा. किस करा, मिठी मारा. त्यामुळे तुमचे सेक्सची इच्छा वाढण्यास मदत होते. तसंच तुम्ही जवळ नसाल तेव्हा एकमेकांना नॉटी मेसेज, फोटो अथवा नॉटी व्हिडिओ पाठवा. एकमेकांच्या जवळ आल्यानंतर असा स्पर्श करा जेणेकरून तुम्हाला सेक्स करायची इच्छा होईल. असं केल्यानंतर तुम्ही जेव्हा जवळ याल तेव्हा तुमच्यातील सेक्सचा आनंद काही वेगळाच असेल. कारण तुमच्या जोडीदाराबद्दलचं आकर्षण तुम्हाला त्यावेळी अधिक जाणवेल.

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स

तुमचं बोअरिंग आणि कंटाळवाणं आयुष्य जर स्पाईसी करायचं असेल तर त्यात तुम्हाला थोडी मस्ती आणि मजा अॅड करायलाच हवी. जे कपल्स एकमेकांबरोबर असं मस्ती करत जगतात त्याचं नातं टिकून राहण्यास मदत होते. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.