प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा विशेष दिवसच असावा,असा काही नियम नाही. पण 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरात ‘प्रेमाचा दिवस’ म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. पती-पत्नी, प्रेमी युगुल, मित्रमैत्रिणी सर्वच जण या दिवशी व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा (Valentines Day Wishes In Marathi) देऊन साजरा करतात. विशेषतः तरुण-तरुणी आपल्या मनातील भावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करण्यासाठी या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ अविस्मरणीय करण्यासाठी काही जणांची जवळपास महिनाभरापासूनच तयारी सुरू असते. तुम्हालाही आपल्या जोडीदाराला ‘व्हॅलेंटाईन डे’ला हटके आणि भन्नाट पद्धतींनी सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे का? ‘व्हॅलेंटाईन डे’ 20 पद्धतींनी कसा सेलिब्रेट करता येईल, याची माहिती ‘PopXo मराठी‘नं तुमच्यासाठी आणली आहे.
1. लाँग बाईक राईड
बऱ्याच दिवसांच्या अंतरानंतर तुम्ही तुमच्या प्रेयसीला थेट व्हॅलेंटाईन डेला भेटणार आहात, तर मग काही तरी स्पेशल प्लान करा. तिच्यासोबत शांत, निवांत, आनंदी क्षण व्यतित करण्यासाठी लाँग बाईक राईडची योजना आखा. शहरातील गोंधळापासून दूरवर वसलेल्या एखाद्या ठिकाणी निवड करा. पण लाँग ड्राईव्हला जाताना सुरक्षित प्रवासाची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान सोयीस्कर असेल अशी बाईक, ,राईडसाठी परफेक्ट ड्रेस कोडची निवड करा. शरीर हायड्रेटेड ठेवा. ड्राई व्हसाठीचा मार्ग योग्य प्रकारे जाणून घ्या. सलग बाईक चालवण्याऐवजी आवश्यकता वाटल्यास विश्रांती देखील घ्या.
वाचा : ‘व्हॅलेंटाइन्स डे’साठी शुभेच्छा संदेश
2. मुंबई दर्शन
मुंबईमध्ये पाहण्यासारखी कित्येक ठिकाणं आहेत, जेथे तुम्ही आतापर्यंत भेटही दिली नसेल. तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला फिरण्याचं वेड असेल तर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला मुंबईतील न पाहिलेल्या स्थळांना एकत्र भेट द्या. सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा, मुंबई फिल्म सिटी, गेट-वे ऑफ इंडिया, पॅगोडा, हँगिंग गार्डन, कमला नेहरू पार्क, गिरगाव चौपाटी यांसारख्या जागांना भेट द्या.
3. घरातच डिनर डेटची करा तयारी
लोकांच्या गर्दीमध्ये तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करायचा नसल्यास छानपैकी घरातच ‘डिनर आणि मुव्ही नाईट’ डेटची तयारी करा. कोणता सिनेमा पाहायचा आहे? सिनेमा पाहिल्यानंतर कोणत्या पदार्थांचा जेवणात समावेश करायचा आहे? हे आठवड्याभरापूर्वीच ठरून घ्या. म्हणजे डेटला कोणताही गोंधळ होणार नाही. डिनरमधील डिशमध्ये आपल्या पार्टनरसाठी तिच्या/त्याच्याबद्दल एखादी खास गोष्टी सांगणारी चिठ्ठी देखील लिहून ठेवावी. एकूण या डेटची थीम ठरवा.
वाचा : मुलींच्या ‘या’ पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’
4. सूर्योदय/सूर्यास्त पाहा
‘व्हॅलेंटाईन डे’ला तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी न मिळाल्यास ऑफिसला जाण्यापूर्वी सकाळी किंवा ऑफिसमधून थोडंस लवकर निघून संध्याकाळी भेटण्याचा प्लान आखा. सकाळी भेटणं शक्य असल्यास एकत्र सूर्योदय पाहा. अथवा संध्याकाळी रोमँटिक डेटवर जाण्यापूर्वी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सूर्यास्त पाहण्याचा आनंद घ्या. सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी तुम्ही मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच, माहिमचा किल्ला, वरळी सी-फेस यांसारख्या जागांना भेट देऊ शकता.
वाचा : रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला ‘नाही’ म्हणणंही गरजेचं आहे, कारण…
5. एकत्र करा व्यायाम
तुम्ही आणि तुमचा पार्टनर फिटनेस फ्रीक आहात तर ‘व्हॅलेंटाईन डे’ला एकत्र वर्कआऊट करा. योग, जिम, व्यायाम, जॉगिंग यांसारख्या कसरती एकत्र करा. म्हणजे तुम्हाला एकमेकांचा सहवास लाभेल. प्रत्येक वेळेला चॉकलेट, फुले किंवा एखादं गिफ्ट देण्यापेक्षा एकत्र व्यायाम करण्यावर भर दिल्यास तुमचा दुहेरी फायदा होईल. एक म्हणजे तुमचं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य सुधारेल आणि दुसरे म्हणजे पार्टनरसोबत राहण्यास वेळही मिळेल.
6. पार्टनरसोबत करा हवाई सफर
मुंबईच्या वेगवेगळ्या सुंदर छटांचे तुम्हाला विहंगम दृश्य पाहायचे आहे का? तर मग तुम्ही पार्टनरसोबत हेलिकॉप्टर राईडवर जाण्याचे प्लानिंग आखलं पाहिजे. यानिमित्तानं तुम्हाला एक थरारक गोष्ट देखील अनुभवायला मिळेल. हेलिकॉप्टर राईडसाठी सनग्लास, टोपी, पाण्याची बॉटल घेऊन जायला विसरू नका. राईडसाठी कम्फर्टेबल कपडे परिधान करा, वेळेत राईडच्या ठिकाणी पोहोचा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण राईड एन्जॉय करता येईल.
7. दुसऱ्या जोडप्यांसोबत करा सेलिब्रेशन
तुम्हाला नवनवीन लोकांची भेट घेण्यास आवडत असल्यास यंदाच्या व्हॅलेंटाईन तुम्ही एक भन्नाट योजना आखू शकता. ‘फन डेट नाईट’ अशा थीमची एखादी पार्टी होस्ट करा. या पार्टीमध्ये दुसऱ्या जोडप्यांनाही आमंत्रण द्या. या पार्टीमध्ये तुम्ही वेगवेगळे गेम्स खेळू शकता, एखादा सिनेमा किंवा वेबसिरीज एकत्र पाहू शकता, खास जेवणाचाही बेत आखू शकता.
वाचा – व्हॅलेंटाईन डे साठी पॅलाझोस
8. आईस स्केटिंग रिंक
आयुष्यात ठराविक क्रमानुसार नवीन आणि मजेशीर गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करावा. यामुळे जीवनात कंटाळवाणे क्षण येत नाहीत. तुम्हाला देखील व्हॅलेंटाईन डेला जोडीदारासोबत एखादी नवीन गोष्ट शिकायची असल्यास किंवा अनुभवायची असल्यास यंददा मुंबईमधील आर सिटी किंवा फिनिक्स मार्के सिटी मॉलला भेट द्या आणि तेथे आईस स्केटिंगचा आनंद घ्या.
9. ऐतिहासिक स्थळांना भेट द्या
तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला इतिहास तसंच ऐतिहासिक स्थळ, ऐतिहासिक वास्तूंना भेट देणे आवडत असेल. तर मुंबईतील न पाहिलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची नक्की पाहणी करा. राजाबाई क्लॉक टॉवर, टॉवर ऑफ सायलेन्स, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, वरळीचा किल्ला, माउंट मेरी चर्च या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
10. एकत्र घ्या नाश्त्याचा आस्वाद
आपल्या पार्टनरसोबत सकाळचा नाश्ता करणं यापेक्षा दुसरं काही रोमँटिक असूच शकत नाही. मुंबईमध्ये बरीच रेस्टॉरंट केवळ नाश्ता, हलक्या-फुलक्या आहारासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी आपल्या पार्टनरच्या आवडीच्या रेस्टॉरंटची निवड करा. त्याला सरप्राईज द्या. ठरलेल्या वेळेपूर्वीच निश्चित केलेल्या ठिकाणावर पोहोचा. एखादा छान टेबल बुक करा आणि त्यावर एखादं गिफ्ट, लव्ह लेटर ठेवून त्याला/तिला प्रेमाचा धक्का द्या.
11. जहाजवरील रोमँटिक डेट
शांत, निवांत, निरव अशा समुद्राच्या मध्यभागी आपल्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे कोणाला सेलिब्रेट करायला आवडणार नाही. तुम्हाला जोडीदारासोबत असे खासगी क्षण आनंदात साजरा करायचे असल्यास एखाद्या खासगी जहाजाचं बुकिंग करावं. तुमच्यात आयुष्यात त्याला/तिला विशेष स्थान असल्याची जाणीव करून द्या. पार्टनरसोबत जहाजावरून सूर्यादय किंवा सूर्यास्त पाहा. समुद्रातून मुंबई शहराचं रूप पाहा. जहाजावर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणं याहून अधिक रोमँटिक काही असू शकत नाही.
वाचा : ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान
12. शॉपिंगची घ्या मजा
तुम्ही दोघांनी बरेच दिवस एकमेकांच्या सोबतीनं शॉपिंगची मजा लुटली नाहीय का? तर मग वाट कसली पाहताय. ज्या-ज्या गोष्टींची शॉपिंग करायची आहे त्याची यादी लिहा. बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडला कोणते स्पेशल गिफ्ट द्यायचे आहे, ते देखील ठरवा. ‘व्हॅलेंटाईन डे’ला भेटा. नेहमी स्वतःच्या आवडीनं शॉपिंग करता, पण या दिवशी तिच्या/त्याच्या आवडीनं एखादी गोष्टी खरेदी करा. शॉपिंग म्हणजे केवळ कपडे खरेदी करणं नव्हे. घरातील उपयुक्त सामान, भाजीपाला-फळे, सजावटीच्या वस्तू इत्यादींसाठी तुम्ही बाहेर पडू शकता. यावेळेसच एखादं छानसे गिफ्ट त्याच्या/तिच्या नकळत खरेदी करा आणि तुमचं शॉपिंग आटोपल्यानंतर त्याला/तिला ते द्या. त्यावेळेस आश्चर्यचकित होऊन त्याच्या/तिच्या चेहऱ्यावर आलेले हसू तुमच्यासाठी अतिशय अमूल्य असेल. कदाचित हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट ठरेल.
13. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ट्रेक
ट्रेकिंगचं वेड असणाऱ्या कपलनं ‘व्हॅलेंटाईन डे’ला वन डे ट्रेकचं आयोजन करावं. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे बोरिवली नॅशनल पार्क ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही सायकल राईडचा आनंद घेऊ शकता तसंच वनराणी, टायगर सफारी आणि कान्हेरी गुंफेला भेट देऊ शकता. निसर्गरम्य वातावरणात तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ छान साजरा होईल.
वेळ – सकाळी 7:30 वाजेपासून ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत
पत्ता – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400066
14. वाईन-डाईन डेट
तुम्ही सिंगल आहात किंवा तुमच्या स्वीटहार्टसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहात. काहीही असलं तरी स्वतःसाठी आणि पार्टनरसाठी काहीतरी स्पेशल गोष्ट झालीच पाहिजे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेगळं काही करण्याची इच्छा असल्यास वाईन टेस्टिंग आणि लंच डेटचा प्लान तुम्ही आखू शकता. एखाद्या वाईन टेस्टिंग इव्हेंटमध्ये पार्टनरसह सहभागी होण्याची आधीच बुकिंग करून ठेवा. जर तुम्हाला वाईनरीमध्ये जाण्याची इच्छा नसल्यास घरामध्ये वाईनची बॉटल आणा. घरामध्येच वाईन डेटची तयारी करा. वाईन बॉटल, फुलांचा गुच्छ, रोमँटिक मेसेज असलेलं ग्रीटिंग कार्ड, चॉकलेट अशी मस्तपैकी तयारी करून जोडीदाराला आश्चर्यचकित करा.
15. ये खुला आसमां…तरंगत्या हॉटेलची सफर
तुमच्या जोडीदाराला समुद्राची सफर करणं पसंत असल्यास समुद्राच्या मध्यभागी असणाऱ्या हॉटेलमध्ये एखादं टेबल बुक करा. हा पर्याय जास्त खर्चिक असला तरीही तरंगत्या हॉटेलमध्ये तुमचा अविस्मरणीय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होईल, यात काही शंका नाही. मुंबईमध्ये ‘आर्क डेक बार’ आणि ‘एबी सेलेस्टियल’ या हॉटेल्सचा पर्याय आहे.
16. रूफ टॉप हॉटेल डेट
एखाद्या उंच ठिकाणी तुम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला आवडेल? यावर तुम्ही कदाचित म्हणाल की कोण सुट्टी वगैरे काढून हिल स्टेशन फिरायला जाईल. मुंबईतल्या मुंबईमध्ये असा काही पर्याय असता तर बरं झालं असतं. पण चिंता करू नका. कारण हिल स्टेशन नसलं तरीही रूफ टॉप रेस्टॉरंटचे बरेच पर्याय तुमच्याकडे आहेत. जेथे तुम्ही पार्टनरसोबत डिनर डेट एन्जॉय करू शकता.
17. रोमँटिक रिसॉर्टमध्ये करा बुकिंग
बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला पार्टनरसोबत भेटून संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला नसल्यास ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुम्ही दोघं जास्तीत जास्त वेळ एकत्र कसं राहता येईल, यावर विचार करा. यासाठी तुम्ही रोमँटिक वातावरण असलेल्या रिसॉर्टमध्ये बुकिंग करा. काही रिसॉर्टमध्ये व्हलेंटाईन डे निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येते. उदाहरणार्थ : योग, मेडिटेशन, मॅजिक शो, रेन डान्स, कॅमफायर इत्यादी इव्हेंट्समध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमच्या हक्काच्या दिवशी एकत्र राहू शकता.
18. पार्टनरसाठी रेकॉर्ड करा गाणं
जर तुमच्या जोडीदाराला संगीताची आवड असेल तर त्याच्या/ तिच्यासाठी एखाद्या स्टुडिओमध्ये स्वतःच्या आवाजातलं गाणं रेकॉर्ड करा. स्टुडिओमध्ये जाणं शक्य नसल्यास मोबाइलमधील रेकॉर्डवर गाणं रेकॉर्ड करा आणि एखाद्या ऑनलाइन एडिट अॅपवर तुमचं रेकॉर्डिंग एडिट करून तिला/त्याला ऐकवा. तुम्ही दिलेले हे सुंदर गिफ्ट नक्की आवडेल.
19. शेकोटीची ऊब आणि दोघांमधला संवाद
थंडगार वातावरणात शेकोटी करून त्याभोवती पार्टनरचा हात हातात घेऊन बसा. गप्पांची मैफल रंगवा. मौनातला संवाद देखील अनुभवा. रिलेशनशिपमधल्या चांगल्या आठवणी ताज्या करा. शेकोटीभोवतीच तुम्ही ‘डिनर डेट’चीही मजा घेऊ शकता. यानिमित्तानं मुंबईजवळील एखाद्या निसर्गरम्य वातावरणात भ्रमंती देखील होईल. महत्त्वाचे म्हणजे जोडीदाराचा सहवास लाभेल.
20. पहिल्या डेटच्या आठवणी ताज्या करा
2020 मधील व्हॅलेंटाईन डे जरा हटके पद्धतीनं सेलिब्रेट करा. हटके म्हणजे नेमकं काय करायचं ? असा प्रश्न डोक्यात असेल तर तुमच्या पहिल्या डेटच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करा. पहिल्या डेटसाठी तुम्ही जशी तयारी केली होती, तसेच सर्व प्लान यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’साठीही तयार करा. शक्य असल्यास दोघांनी एकसारखे कपडे परिधान करा. पहिल्या डेला ज्या-ज्या ठिकाणांना, रेस्टॉरंटला भेट दिली होती, तेथे पुन्हा जा. जोडीदारासाठी एखादे फुल विकत घ्या.
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.