ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रेग्नेंसीदरम्यान  ‘या’ मेकअप प्रॉडक्टचा चुकूनही करू नका वापर

प्रेग्नेंसीदरम्यान ‘या’ मेकअप प्रॉडक्टचा चुकूनही करू नका वापर

सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी, चार चौघांमध्ये उठून दिसण्यासाठी बहुतांश जणी कमी-अधिक प्रमाणात मेकअप करतात. पण गर्भावस्थेत मेकअप करताना महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये काही रासायनिक घटकांचाही समावेश असतो. यामुळे ब्युटी प्रॉडक्टचा वापर केल्यास त्यातील घटक त्वचेद्वारे शरीराच्या आत जातात. यामुळे गर्भाशयात असणाऱ्या बाळाच्या आरोग्यवर वाईट परिणाम होऊ शकतात. संशोधनानुसार ज्या महिला गर्भवस्थेदरम्यान जास्त प्रमाणात मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करतात, त्या महिलांची मुदतपूर्व प्रसुती (Premature Baby) होण्याची अधिक शक्यता असते. याव्यतिरिक्त बाळाचं वजन आणि शारीरिक आकारावरही परिणाम होतो.

(वाचा : हिवाळ्यात करा तिळाचं सेवन, गंभीर आजारातून होईल सुटका)

Instagram

ADVERTISEMENT

गर्भावस्थेदरम्यान मेकअप प्रॉडक्टचा वापर करणं टाळा

1. परफ्युम किंवा डिओड्रंट   

गर्भावस्थेदरम्यान अधिक प्रमाणात सुगंध असणारे प्रॉडक्ट टाळावेत. उदाहरणार्थ परफ्युम डिओड्रंट, रूम फ्रेशनर इत्यादींचा वापर करणं टाळावं. या प्रॉडक्टचा वापर कमी प्रमाणात करावा अन्यथा करूच नये. डिओमध्ये जास्त प्रमाणात हानिकारक केमिकल्सचा वापर केला जातो. यातील हानिकारक घटक शरीरात प्रवेश करून पोटातील बाळावर वाईट परिणाम करू शकतात. यामुळे बाळाच्या हार्मोन्सवरही दुष्परिणाम होऊ शकतो. 

2. सनस्क्रीन/मॉइश्चरायझर  

बहुतांश महिला सनस्क्रीन किंवा बॉडी लोशन लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. पण प्रेग्नेंसीदरम्यान सनस्क्रीन किंवा बॉडी लोशनचा वापर कमी करावा. बहुतांश सनस्क्रीनमध्ये रॅटिनील पाल्मेट किंवा व्हिटॅमिन पाल्मेटचा समावेश असतो. हा घटक उन्हाच्या संपर्कात आल्यास त्वचेवर अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असतो. शिवाय, यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी सनस्क्रीन/मॉइश्चरायझर खरेदी करताना रॅटिनील पाल्मेट/ व्हिटॅमिन पाल्मेटचा त्यात समावेश आहे की नाही, हे तपासून घ्यावे. 

ADVERTISEMENT

3. लिपस्टिक 

गर्भवती महिलांनी लिपस्टिकचा वापरणं करणं टाळलंच पाहिजे. कारण लिपस्टिकमध्ये शिसे (Lead -लीड)असतात. शिसे हे आई तसंच पोटातील बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर एखादा अन्नपदार्थ खातापिताना त्यातील लीड पोटात जाते. यामुळे बाळाची वाढ होण्यात अडचणी निर्माण होतात. यादरम्यान अनेक समस्या देखील उद्भवण्याची भीती असते.

(वाचा : सावधान! तणावामुळे तुमच्या ‘या’ शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम)

4. हेअर रिमूव्हर क्रीम

ADVERTISEMENT

हेअर रिमूव्हर क्रीममध्ये थियोग्लायकोलिक अ‍ॅसिड या घटकाचा समावेश असतो. हा घटक गर्भवती महिलेसाठी हानिकारक ठरू शकतो. गर्भावस्थेदरम्यान शरीरात कित्येक प्रकारच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो, ज्यामुळे केमिकलयुक्त हेअर रिमूव्हिंग क्रीमचा वापर केल्यास त्वचेची अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते आणि बाळाचंही यामुळे नुकसान होऊ शकतं. यासाठी स्वतःची आणि बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. बाळ गर्भाशयात असतानाही त्याचं योग्य प्रकारे संरक्षण करणं गरजेचं आहे.  

5. फेअरनेस क्रीम

प्रेग्नेंट असताना फेअरनेस क्रीमचा वापर करणं शक्यतो टाळावं. गर्भवती महिला तसंच बाळासाठी फेअरनेस क्रीम वापर हानिकारक ठरू शकतो. अशा प्रकारच्या क्रीममध्ये हायड्रोक्यूनोन नावाचं रसायन असते, ज्यामुळे जन्मापूर्वीच बाळावर वाईट परिणाम होऊ शकतात.  

6. टॅटू देखील करू नये 

ADVERTISEMENT

प्रेग्नेंसीच्या काळात तुम्ही शरीरावर एखादं टॅटू करून घेण्याचा प्लान करत असाल तर त्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. कारण टॅट करून घेण्याची प्रक्रिया तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. टॅटूमुळे संसर्ग होण्याची भीती असते. टॅटू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान वापरले जाणारे केमिकल्स त्वचेसाठी सुरक्षित मानले जात नाहीत. 

(वाचा : सावधान ! ‘या’ 5 गोष्टी चेहऱ्यावर चुकूनही लावू नका)

Instagram

ADVERTISEMENT

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

16 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT