ADVERTISEMENT
home / सौंदर्य
डोळ्यांसाठी बेस्ट अंडर आय क्रीम्स (Best Cream For Dark Circles In Marathi)

डोळ्यांसाठी बेस्ट अंडर आय क्रीम्स (Best Cream For Dark Circles In Marathi)

सुंदर दिसायला तर प्रत्येकालाच आवडतं आणि जेव्हा कोणी आपल्या सुंदर दिसण्याचं कौतुक करतं तेव्हा तर छानचं वाटतं. पण तुमच्या सुंदरतेत बाधा आणण्याचं काम करू शकतात. तुमच्या डोळ्याखालील डार्क सर्कल्स म्हणजेच काळी वर्तुळ. काही महिला मेकअप करून ती लपवतात तर पुरूषांच्या डोळ्याखालील वर्तुळ चष्म्याने लपतात. काहीजणी काळी वर्तुळं कमी करण्यासाठी क्रीम्सचा वापर करतात. पण बाजारात इतकी क्रीम्स उपलब्ध आहेत की, नक्की कोणतं निवडायचं ही एक समस्याच आहे. म्हणून या लेखात आम्ही तुमच्यासाठी बेस्ट डार्क सर्कल क्रीम्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला निवड करणं नक्कीच सोपं जाईल.

Himalaya Under Eye Cream

हिमालयाचं अंडर आय क्रीम पिगमेंटेशन, काळी वर्तुळ आणि डाग कमी करण्याचा दावा करतं. हे तुमच्या डोळ्याच्या आसपासची त्वचा चमकदार आणि मुलायम बनवतं. 

Pros: हे क्रीम खूपच हलकं आणि सहज त्वचेवर पसरवून लावल्यावर शोषलं जातं. तसंच याची किंमतही कमी आहे. या क्रीम पॅकेजिंग चांगलं असून प्रवासात नेण्यासही उपयुक्त आहे. तसंच हे सर्व प्रकारच्या त्वचा प्रकारासाठी उपयुक्त आहे. 

Cons: या क्रीमचा एक महत्त्वाचा तोटा म्हणजे यात आहे पॅराबेन.  

ADVERTISEMENT

वाचा – त्वचेसाठी बेस्ट बीबी क्रीम

Biotique Almond Under Eye Cream

हे क्रीम तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळ आणि पफीनेस दूर करण्याचा दावा करतं. तसंच हे डोळ्याखालील नाजूक त्वचेचं रक्षणही करण्याचा दावा करतं.

Pros: हे क्रीम डोळ्याखालील त्वचेला उजळवून डोळ्याची सुंदरता वाढवतं. हे क्रीमसुद्धा बजेटमधलं आहे. 

Cons: या क्रिमचं पॅकेजिंग मात्र हायजिनिक नसून टब पॅकिंग आहे.  

ADVERTISEMENT

वाचा – सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग

KAYA Lighten and Smooth Under Eye Gel

हे क्रीम नाहीतर जेल फॉर्ममध्ये आहे. जे तुमच्या डोळ्याखालील पिगमेंटेशन आणि काळी वर्तुळं कमी करून नाजूक त्वचा टोनही करतं. याचा वापर तुम्ही डोळ्याला मेकअप करण्याआधीही करू शकता. 

Pros: हे क्रीम त्वचेत लगेच शोषलं जातं. हे सर्व त्वचा प्रकारांसाठी चांगल आहे. 

Cons: फक्त हे थोडं महाग असून कायाची उत्पादनं बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.

ADVERTISEMENT

Forest Essential Intensive Eye Cream With Anise

हे क्रीम मुख्यतः डोळ्याखालील नाजूक त्वचेसाठी बनवण्यात आलं आहे. हे फक्त काळी वर्तुळंच नाहीतर त्वचा टोनही नीट करतं. 

Pros: या हर्बल उत्पादनात पपई आणि बटाट्याचा स्टार्च आहे. हे दोन्ही घटक त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करतात. 

Cons: पण हे इतर क्रीम्सच्या तुलनेत महाग आहे. तसंच याची बाटली काचेची असल्याने प्रवासात नेणं थोडं जिकीरीचं आहे. हे क्रीम लावल्यावरही थोडा वेळ चिकटपणा जाणवतो. मात्र नंतर तसं वाटत नाही. याची किंमत आहे तब्बल 2,625 रूपये.

Khadi Naturals Ayurvedic Under Eye Gel

नैसर्गिक उत्पादनांना नेहमीच पसंती असते. त्यामुळे खादी ब्रँडच्या उत्पादनानांही नेहमीच मागणी असते. 

ADVERTISEMENT

Pros: हे क्रीम तुमच्या डोळ्याखालील त्वचेला मॉईश्चराईज  करून थंडावा देतं. तसंच हे त्वचेत लवकर शोषलंही जातं. याला कोणताही सुंगध नसून ते तेलकटही नाही. 

Cons: फक्त या क्रीमचा परिणाम दिसायला थोडा वेळ जातो. तसंच याचं पॅकेजिंगसुद्धा अनहायजिनिक आहे.

वाचा – डार्क सर्कल्स दूर करा घरगुती उपायांनी!

Mama Earth Under Eye Cream for Dark Circles

हे आय क्रीम ऑफ व्हाईट कलरमध्ये असून ते तुमच्या डोळ्याखालील त्वचेला हायड्रेट करतं. तसंच डोळ्याखालील काळी वर्तुळंही कमी करतं. 

ADVERTISEMENT

Pros: यामध्ये कोणतीही टॉक्सीन्स आणि पॅराबीन नाही. तसंच हे बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. 

Cons: फक्त या क्रीमचा परिणाम लगेच दिसून येत नाही. तसंच याचं पॅकेजिंग अनहायजिनीक आहे.

Clinique All About Eyes Rich

क्लिनिकचं हे ऑल अबाऊट आईज रिच क्रीम खूपच हलकं आहे. जे त्वचेला मॉईश्चराईज करून डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या कमी करतं. 

Pros: या क्रीममधील घटक त्वचेतील कोलेजन उत्पादनाला चालना देतात. हे क्रीम नेत्ररोग विशेषज्ञांनी प्रमाणित केलं आहे. 

ADVERTISEMENT

Cons: फक्त यांची किंमत खूपच जास्त आहे. या क्रीमची किंमत आहे 3,300 रूपये.

Innisfree Green Tea Seed Eye Cream

हे क्रीम अँटीऑक्सीडंट्सयुक्त आहे. जे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारे नुकसान करत नाही. यामधील ग्रीन टीच्या बियांचा रस तुमच्या डोळ्याखालील त्वचेला मॉईश्चराईज करून पोषण देतो. 

Pros: या क्रीममध्ये सर्व नैसर्गिक घटक वापरण्यात आले असून ते थोड्या प्रमाणात लावल्यासही त्वचेवर नीट लागतं. याला वासही नाही.

Cons: हे क्रीम महाग असून याचं पॅकिंग अनहायजिनिक आहे. तसंच हे महाग आहे.

ADVERTISEMENT

वाचा – चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फॉलो करा हे ‘मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन’

VLCC Almond Under Eye Cream

व्हीएलसीसीच्या या क्रीममध्ये आहे कॅमोमाईलचा रस, ऑलिव्ह तेल आणि व्हिटॅमीन ई. हे तुमच्या डोळ्याखालील त्वचेला आराम देतं आणि मॉईश्चराईज करतं. तसंच डोळ्यांची सूज आणि काळी वर्तुळंही कमी करतं.

Pros: या क्रीमचा वापर तुम्ही प्राईमर म्हणूनही करू शकता. हे खूप हलकं आणि त्वचेत लवकर शोषलं जातं. हे डोळ्याच्या आसपासच्या नाजूक त्वचेला चांगल मॉईश्चराईज करतं. 

Cons: याचं पॅकेजिंग जारचं असून ते अनहायजिनिक आहे.

ADVERTISEMENT

L’Oreal Paris White Perfect Magic White Eye Cream

हे क्रीम त्वचेच्या खोलवर जाऊन डार्क सर्कल कमी करण्याचा दावा करतं. हे क्रीम डोळ्याच्या आसपासच्या त्वचेला चमकदार बनवतं. हे मेलनिनची निर्मिती रोखून पिगमेंटेशनची समस्याही नियंत्रित करण्यास मदत करतं. 

Pros: हे त्वचेत शोषलं जातं आणि अगदी सहज पसरतं. याचा सुगंधही मनमोहक आहे. 

Cons: हे क्रीम ट्यूब पॅकेजिंग असलं तरी या क्रीमची ट्यूब खूपच छोटी आहे. तसंच काही वेळा त्वचेवर लावल्यावर थोडी जळजळही जाणवू शकते.

You Might Like This:

ADVERTISEMENT

ब्लॅक कॉफी डोळ्याखालील काळ्या वर्तुळांसाठी गुणकारी

Best Face Cream in Hindi

10 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT