ADVERTISEMENT
home / Eye Make Up
डोळ्यांना आयशॅडो लावताना या तुम्ही करता का या चुका, मग वाचा

डोळ्यांना आयशॅडो लावताना या तुम्ही करता का या चुका, मग वाचा

डोळ्यांचा मेकअप हा किती महत्वाचा असतो हे आम्ही तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे. डोळ्यांना काजळ लावताना आणि डोळ्यांना आयलायनर मस्कारा लावताना काय काळजी घ्यायची हे आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं आहेच. पण डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलवणारे आयशॅडो ही हल्ली ट्रेंडमध्ये आहेत. अनेकांना आयशॅडो लावायला आवडते. आपल्याकडे सुंदर डोळ्यांसाठी एक चांगला आयशॅडो पॅलेट असणे आवश्यक आहे. पण आयशॅडोची शेड आणि ते कसे लावायला हवे हे तुम्ही जाणून घ्यायला हवे. कारण बरीच जण आयशॅडो डोळ्याला अगदी फासतात. तुम्ही किंवा तुमची मैत्रीण अशा पद्धतीने आयशॅडो लावत असेल तर तुम्हाला या गाईडलाईन्स मदत करु शकतील.

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

रंगाची निवड महत्वाची

आयशॅडोचा रंग निवडताना

shutterstock

ADVERTISEMENT
  • आता तुम्ही जर मेकअप व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की, तुम्ही आयशॅडोची शेड निवडतानाही विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
  • जर तुम्ही लग्नासाठी किंवा अशा कोणत्या मोठ्या कार्यक्रमासाठी मेकअप करत असाल तर तुम्हाला तुमच्या ड्रेसच्या कॉम्बिनेशला साजेसा रंग निवडायचा असतो. म्हणजे जर तुमच्या ड्रेसमध्ये गोल्डनची शेड असेल तर तुम्हाला गोल्डन आणि तुमच्या ड्रेसमधील एखादा शेड निवडायला हरकत नाही.
  • तुम्ही जात असलेला कार्यक्रम सकाळचा असेल तर तुम्ही डोळ्यांना लावणारी आयशॅडोची शेड लाईट ठेवा.  कारण तुम्ही जर डार्क आयशॅडो लावला तर तुमचे डोळे फारच विचित्र दिसू शकतात. ज्यामुळे तुमचे फोटोही अजिबात चांगले नाही. 
  • जर तुम्हाला ऑफिसला जाताना ऑयशॅडो लावायचा असेल तर अशावेळी तुम्ही भडक आयशॅडो निवडू नका. तुम्हाला न्यूड शेडचं पॅलेट सुद्धा मिळतं. हे आयशॅडो लावल्यासारखे वाटत ही नाही. पण त्यामुळे तुमचे डोळे उठून दिसतात.

तुमच्यासाठी ही लिपस्टिकची शेड आहे परफेक्ट -Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

आयशॅडो लावताना

आयशॅडो लावताना

shutterstock

आता आयशॅडोचा रंग निवडायचा कसा हे तुम्हाला कळलं असेल तर आता आयशॅडो लावायचे कसे ते आता पाहुया 

ADVERTISEMENT
  • आयशॅडो लावण्याआधी तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अपर लीडला प्राईमर किंवा बेस लावा. कारण त्यामुळे आयशॅडो छान बसतो. 
  • आयशॅडो हा तुमच्या डोळ्यांच्या क्रिस लाईनपर्यंतच लावायचे असते. क्रिस लाईन म्हणजे डोळे उघडल्यानंतर तुमच्या डोळ्यांच्यावर एक दुमड पडते. हा भाग किंवा ती रेष म्हणजे क्रिस लाईन 
  • आता एक बारीक ब्रश निवडून तुम्हाला तुमचा बेस रंग लावायचा आहे. आता  तुम्ही निवडलेला रंग तुम्हाला आधी क्रिस लाईनवर लावायचे आहे. 
  • त्यानंतर डोळ्यांच्या कडांना तुम्हाला हा रंग लावायचा आहे. मुळात बाहेरुन आत असे आयशॅडो लावायचे असते. त्यानंतर एक थोडा मोठा ब्रश घेऊन तुमचा आयशॅडो छान ब्लेंड करुन घ्यायचे आहे. 
  • जर तुम्ही दोन रंगाचा वापर करणार असाल तर तुम्हाला तर तुम्हाला डोळ्यांचे भुभुळावर दुसरा रंग लावायचा आहे. जर तुम्ही तीन रंगाचा वापर करणार असाल तर तुम्हाला त्याची सुरुवात लाईट रंगापासून करा. डोळ्यांच्या कडांना गडद रंग आणि गोल्डन किंवा ग्लिटरचा उपयोग भुभुळावर करा. त्यामुळे तुमचे आयशॅडो उठून दिसतील. 
  • हल्ली डोळ्यांच्या खालीही आयशॅडो लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे डोळे अधिक खुलून दिसतात. त्यामुळे तुम्ही अगदी बारीक ब्रशने गडद रंगाचे आयशॅडो लावू शकता. 

या चुका टाळा

चुका टाळा

shutterstock

आता तुम्ही करत असलेल्या चुका तुम्हाला कळल्या तर तुम्हाला वरील गोष्टी समजणे फार सोपे जाईल. 

  • जर तुम्हाला रंगाची निवड कळत नसेल तर तुम्ही थोडे मार्गदर्शन घ्या. कॉन्ट्रास रंग निवडायचे म्हणजे काय ते देखील तुम्हाला माहीत हवे. नाहीतर तुमच्या डोळ्यांच्या मेकअपचा लुक उठून दिसणार नाही. 
  • आयशॅडो म्हणजे संपूर्ण डोळे रंगवणे नाही. खूप जण आयब्रोजपर्यंत आयशॅडो लावतात जे खूपच चुकीचे आहे. 
  • आयशॅडो लावताना तुम्हाला बोटांचा वापर करणे जमत नसेल तर तुम्ही ब्रशचा वापर करा. कारण त्यामुळे आयशॅडो व्यवस्थित लागेल. 
  • आयशॉडो किती लावायचे त्याचेही प्रमाण आहे. तुम्ही जर आयशॅडो खूप लावत असाल तर ते  खूप खराब दिसते.

आता बिनधास्त आयशॅडो लावा आणि दिसा अधिक सुंदर!

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

01 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT