महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे- Maharashtra Famous Mandir In Marathi

महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे- Maharashtra Famous Mandir In Marathi

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक मंदिर, पुरातन मंदिर, देवाची मंदिर यांचा समावेश आहे. याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत माहिती तर असते पण ही मंदिरे साधारण किती प्राचीन आहेत अथवा त्यांचा इतिहास काय आहे याबद्दल माहीत नसते. अनेक नवीन मंदिर बांधली जातात. देवाचे मंदिर, सुंदर मंदिर, प्रसिद्ध मंदिर, विठ्ठलाचे मंदिर या सगळ्याबद्दल आपल्याला माहीत असते आणि आपल्याला या ठिकाणची अधिक माहिती गोळा करायलाही आवडते. आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर आहे. अनेक देवीदेवतांची मंदिरे आपल्याला माहीत असतात. ही देवस्थान फिरायला प्रत्येकालाच आवडते कारण त्याला एक इतिहास लाभला आहे. त्याशिवाय अनेक मंदिरांवरील कलाकुसर हेदेखील इथे फिरण्याचं कारण आहे. आपल्या वास्तुशिल्पकारांनी बांधलेली ही मंदिरे आपल्या महाराष्ट्रातील अप्रतिम कलाकुसर आहे. अशाच काही प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

Table of Contents

  दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganpati)

  Instagram

  पुण्याची ओळख आहे ती वेगवेगळ्या गोष्टींमुळे. त्यामध्येच एक ओळख पुण्याची आहे ती दगडूशेठ हलवाई गणपती. पुण्यात गेल्यानंतर तुम्ही या मंदिराला भेट द्यायलाच हवी. हे प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरापैकी हे गणपती बाप्पाचे मंदिर आहे. अठराव्या शतकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार हे मंदिर बांधण्यात आले आहे. पुण्याची देवाची मंदिर अनेक आहेत.

  वैशिष्ट्य - 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. या मंदिरात 1896 पासून गणपतीची मूर्ती तयार करण्यात येऊन त्याचा मोठ्या प्रमाणात उत्सव होऊ लागला आणि आजही मानाच्या गणपतीमध्ये पहिलं स्थान देण्यात येते ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीला. याठिकाणी नित्यनियमाने गणपतीची पूजा चालू असते. 

  कसे पोहचावे - ट्रेनने पुणे स्टेशनवर उतरून त्यानंतर बस अथवा रिक्षाने बुधवार पेठेत तुम्ही जाऊ शकता. 

  अष्टविनायकाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या

  भिमाशंकर, पुणे (Bhimashankar Mahadev)

  Instagram

  महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरातन मंदिर, धार्मिक मंदिर, प्रसिद्ध मंदिर आहेत. त्यापैकी अगदी पुरातन मंदिर (Mandir In Marathi) म्हणजे पुण्यातील भिमाशंकर. प्रसिद्ध धार्मिक मंदिर असलेल्यांपैकी हे एक मंदिर आहे. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतावर हे मंदिर असून बारा ज्योतिर्लिंगापैकी हे मंदिर आहे. 3250 फूट उंच असणाऱ्या या मंदिरातील शिवलिंग हे खूप मोठे आहे. त्यामुळे याला मोटेश्वर महादेव असंही म्हटलं जातं. या मंदिराजवळच भीमा आणि कृष्णा या दोन्ही नद्या एकमेकांना मिळतात. 

  वैशिष्ट्य - पुराणात सांगितल्याप्रमाणे लोकांची अशी श्रद्धा आहे की, रोज सकाळी या मंदिराचे दर्शन सूर्योदय झाल्यानंतर केल्यास, तसंच 12 ज्योतिर्लिंगाचे नाव जपल्यास, सात जन्मांचे पाप दूर होते आणि स्वर्गात जागा मिळते. असा समज भक्तांचा आहे. भिमाशंकर मंदिराची रचना ही प्राचीन आणि आधुनिकता याचं सुरेख मिश्रण आहेत. याचा कळस अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी बांधला होता. या मंदिरातील सुविधादेखील शिवाजी महाराजांनी केल्या होत्या असंही सांगण्यात येते. 

  कसे पोहचावे - पुण्यातील शिवाजीनगर स्टेशनवरून तुम्ही बस पकडू शकता. खासगी बसनेही जाऊ शकता अथवा स्वतःच्या वाहनाचा उपयोग करावा. 

  यमाई देवी, औंध (Yamai Devi, Aundh)

  Instagram

  बऱ्याच जणांच्या घरची कुलदेवता असणारी यमाई देवीचं मंदिर औंध येथे आहे. डोंगरावर असणारे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे असणाऱ्यापैकी हे एक आहे. इथे प्रचंड शांतता असते. ज्योतिबाच्या  सांगण्यावरून औंधासुराचा वध करून ज्या ठिकाणी देवी विसावली ते ठिकाण म्हणजे औंध. याच ठिकाणी यमाई देवीचे अप्रतिम मंदिर बांधण्यात आले आहे. सुमारे 432 पायऱ्या चढून गेल्यानंतर हे यमाई देवीचे मंदिर तुम्हाला दिसते. मंदिर पुजारी साधारण सकाळ ते संध्याकाळच्या वेळेत इथे उपस्थित असतात. 

  वैशिष्ट्य - प्रशस्त परिसर आणि तितकीच मनाला मिळणारी शांतता हे या मंंदिराचे वैशिष्ट्य. मंदिराभोवती तटबंदी असून साधारण दहा बुरूज आहेत. या देवीसमोर नंदी आहे. हेच या मंदिराचं आणि देवीचं खास वैशिष्ट्य आहे. अंबिकेची मूर्ती चतुर्भुज असून ही साधारण सहा फूट उंचीची आहे. हे मंदिर पुरातन मंदिर म्हणून ओळखण्यात येते. 

  कसे पोहचावे - सातारा जिल्ह्यात असणारी ही देवी पुण्यापासून जवळ आहे. तसंच पुणे, मुंबईवरून तुम्ही बसनेही जाऊ शकता. स्वतःच्या वाहनानेही जाता येते. 

  बाबुलनाथ, मुंबई (Babulnath, Mumbai)

  Instagram

  मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे बाबुलनाथ. सुंदर मंदिर असलेल्यांपैकी एक हे देवस्थान मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते. याशिवाय दर सोमवारी इथे शंकराच्या भक्तांची रांग लागलेली दिसून येते. 

  वैशिष्ट्य - हिंदू राजा भिमदेवद्वारे साधारण  12 व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. काळानुसार यात बदल झाला असला तरीही पुरातन काळापासूनचे शिल्प आजही या मंदिरात आहेत. पूर्वी हे मंदिर पारशी लोकांच्या अखत्यारीत होते. साधारण नव्वदीच्या दशकात मुंबईतील सर्वात उंच मंदिर म्हणून बाबुलनाथ मंदिराची ओळख होती. येथील मंदिर पुजारी असलेल्या व्यक्तींनाही खूपच मान देण्यात येतो. 

  कसे पोहचावे - या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला चर्नी रोड वा ग्रँट रोड स्टेशनवरून बस वा टॅक्सी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

  फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे

  सप्तश्रृंगी, नाशिक (Saptashrungi, Nashik)

  Instagram

  महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारी देवी म्हणजे नाशिकची सप्तश्रृंगी माता. 4880 फूट उंच सप्तश्रृंग पर्वतावर स्थित असलेल्या मंदिरात या देवीचं मंंदिर आहे. ही देवीची मूर्ती आठ फूटांची असून याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. हे अतिशय प्रसिद्ध मंदिर असून इथे भक्तांची कायम रांग लागलेली दिसून येते. नवरात्रीच्या दिवसात तर इथे तुफान गर्दी असते. खरंतर नाशिक पर्यटन स्थळे अनेक आहेत मात्र त्यापैकी हे मंदीर भाविकांसाठी खास श्रद्धास्थान आहे. 

  वैशिष्ट्य - या मंदिराच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी साधारण 472 पायऱ्या आहेत. या पर्वतावर पाण्याचे एकूण 108 कुंंड असून यामुळे या प्राचीन आणि पुरातन मंदिराच्या सुंदरता अधिक वाढते. महिषासुर राक्षसाच्या विनाशासाठी जेव्हा प्रार्थना करण्यात आली तेव्हा  सप्तश्रृंगी देवीने रूप धारण केले अशी आख्यायिका आहे. सप्तश्रृंगीला अर्धशक्तिपीठ मानण्यात येते. 

  कसे पोहचावे - नाशिकला जाण्यासाठी अनेक ट्रेन्स आहेत. तिथून बस अथवा रिक्षाने जावे. स्वतःचे  वाहन करूनही जाऊ शकता.  

  बाणगंगा, वाळकेश्वर मुंबई (Banganga, Walkeshwar Mumbai)

  Instagram

  बाणगंगा हा मुंबईतील वाळकेश्वर येथील भाग आहे. इथे असणारे मंदिर हे अठराव्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. वाळकेश्वर येथील बाणगंगा मंदिर १८व्या शतकात उभारले गेले असले तरी त्याची आख्यायिका राम आणि परशुराम या अवतारी पुरषांशी निगडीत आहे. या मंदिराचे बांधकाम चालू असताना तेथील जमिनीत जे शिवलिंग सापडले  त्याचीच प्रतिष्ठापना या मंदिरात करण्यात आली असल्याचे म्हटले जाते. 

  वैशिष्ट्य - पूर्वी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असे, तेव्हा मुंबई परिसरातील लोक बैलगाडीने येत असत. बाणगंगेच्या परिक्षेत्रात आणखीन एक जुने महादेवाचे मंदिर आहे. तसेच साधारण जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे इथे सांगितिक बाणगंगा महोत्सवही करण्यात येतो. या महोत्सवात देशभरातून नावाजलेले आणि प्रसिद्ध संगीत क्षेत्रातील दिग्गज सहभागी होतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणगंगेच्या काठावर दीपोत्सवाचंही आयोजन करण्यात येतं. यावेळी संपूर्ण बाणगंगा दिव्याच्या प्रकाशात उजळून निघतं. 

  कसे पोहचावे - या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला चर्नी रोड वा ग्रँट रोड स्टेशनवरून बस वा टॅक्सी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

  महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे (Beaches In Maharashtra)

  हेदवी, दशभुजा गणेश मंदिर (Hedwi, Dasbhuja Ganesh Temple)

  Instagram

  सुंदर समुद्रकिनारा असणारे वेळणेश्वरपासून साधारण 10 किलोमीटरवर दशभुजा गणेश मंदिर आहे. हे मंदिर पेशवेकालीन असल्याचा संदर्भ आढळतो. इतकंच नाही तर पेशव्यांनी या मंदिराच्या  उभारणीसाठी त्याकाळी 1 लाख रूपये दिले असल्याचा उल्लेखही आढळतो. 

  वैशिष्ट्य - मंदिराचा परिसर हा अतिशय शातं आणि प्रसन्न आहे. वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून गाडीसाठीही रस्ता बांधण्यात आला आहे. तसंच याच्या आजूबाजूला रंगीत तटबंदी, आमराई आणि वेगवेगळ्या फुलांनी सजलेल्या बागा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मंदिर दगडी असून मनाला अतिशय प्रसन्नता देते. पेशव्यांच्या काळापासून असणारे हे प्राचीन मंदिर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. 

  कसे पोहचावे - गुहागरवरून तुम्ही बसने जाऊ शकता. मुंबईवरूनही अनेक बस आहेत. ट्रेनने जायचे असेल तर तुम्हाला चिपळूणला उतरून जाणे सोयीस्कर ठरेल. तिथून बसने जाऊ शकता. 

  मार्लेश्वर, रत्नागिरी (Marleshwar, Ratnagiri)

  Instagram

  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असणारे मार्लेश्वर हे अतिशय पुरातन मंदिर आहे. नैसर्गिक निर्माण झालेल्या गुहेत शिवलिंग असून हे जागृत असल्याचे समजण्यात येते. इथे बारमाही वाहणारा धबधबा आहे जो मंदिराची शोभा अधिक वाढवतो. 

  वैशिष्ट्य - इथे मकरसंक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वरचा विवाह हा देवी गिरजाईशी होत असतो. त्यावेळी मोठी पालखी निघते. त्याशिवाय दोन दिवस या ठिकाणी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते ज्यासाठी अनेक भक्त येतात. 

  कसे पोहचावे - मार्लेश्वरला एस. टी. जाते. कोल्हापूरवरून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा मधून खडीकोळवणमार्गे साधारण 20 किलोमीटरवर आहेत. तिथून 500 पायऱ्या चढून तुम्ही या मंदिरात जाऊ शकता. 

  जेजुरी, पुणे (Jejuri, Pune)

  Instagram

  अनेक जणांचे कुलदैवत असणारे खंडेराया हे दैवत वसले आहे जेजुरी, पुणे येथे. जेजुरी हे खरंतर महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचे हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. आता हे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. मात्र पूर्वी  हे कडेकपाऱ्यात होते. नवीन मंदिर बांधूनही आता अनेक वर्ष झाली आहेत. साधारण सतराव्या शतकात हे बांधण्यात आले होते. 

  वैशिष्ट्य - जेजुरीचे हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकलेच्या परंपरेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुमारे 200 पायऱ्या चढून गेल्यानंतर मल्हारी मार्तंड खंडेरायाचं दर्शन होते. हे सुंदर मंदिर असून म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती या मंदिरात आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. हा खेळ गेले कित्येक वर्ष चालू आहे. उंच तलवार धरून जी व्यक्ती जास्तीत जास्त वेळ राहील त्यांना बक्षिस देण्याची पद्धत आहे. दस-याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

  कसे पोहचावे - पुण्यापर्यंत ट्रेनने प्रवास करून त्यानंतर बसने जावे अथवा स्वतःच्या वाहनाने जावे. 

  शनि शिंगणापूर, शिर्डीजवळ (Shani Shinganapur, Shirdi)

  Instagram

  वाचा - लक्ष्मीचा होईल तुमच्यावरही कृपा अक्षय तृतीयेसाठी शुभेच्छा संदेश

  अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ असणारे शनि शिंगणापूरचे मंदिर सर्वांनाच माहीत आहे. अतिशय प्रसिद्ध मंदिर असून हे अतिशय पुरातन मंदिरापैकी एक आहे. इथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान असून या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. हे स्वयंभू देवस्थान असून इथली शनैश्वराची मूर्ती ही साधारण 5 फूट 9 इंच इतकी मोठी आहे. मामा - भाच्याला झालेल्या दृष्टांतानुसार याची स्थापना करण्यात आल्याची आख्यायिका आहे. 

  वैशिष्ट्य - इथे शनिदेवाचे वास्तव्य असल्याने कधीही चोरी होत नाही असे म्हटले जाते. इथली लोकवस्ती साधारण 3000 इतकीच असली तरीही इथे कधीही कुलूप आणि कड्या घातल्या जात नाहीत याचे नेहमीच आश्चर्य वाटते. येथे चोरी केल्यास अंधत्व येते असेही मानले जाते. 

  कसे पोहचावे - शिर्डीवरून बसने जावे अथवा स्वतःच्या वाहनाने जावे. 

  त्र्यंबकेश्वर, नाशिक (Trimbakeshwar, Nashik)

  Instagram

  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर हे नाशिकमधील शंकराचे देवस्थान आहे. येथे नेहमी सिंहस्थ कुंभमेळा भरत असून प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगमही इथूनच होतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे देवस्थान असून दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थानी जी एकूण बारा शिवालये बांधली त्यातील हे एक शिवालय आहे. नाशिक फिरण्याचे ठिकाण तर आहेच पण सोबतच या ठिकाणी असलेली अनेक धार्मिक स्थळेही प्रसिद्ध आहेत.

  वैशिष्ट्य - सतराव्या शतकात नानासाहेब पेशव्यांच्या काळात हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. बारा महिने  इथे भाविक येतात. मात्र श्रावण महिन्यात इथे जास्त प्रमाणात गर्दी होते. भारतात केवळ त्र्यंबकेश्वरच असे ठिकाण आहे जिथे नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली,  उत्तरक्रिया, लघुरूद्र अशा प्रकारचे धार्मिक विधी करण्यात येतात. हे एक धार्मिक मंदिर आहे. याशिवाय गावात अनेक प्राचीन मंदिर असून यावरील कलाकुसरही पाहण्यासारखी आहे. 

  कसे पोहचावे - नाशिकपर्यंत ट्रेनने आणि नंतर बस अथवा रिक्षाने जाता येते. 

  शिव मंदिर, अंबरनाथ (Shiva Temple, Ambarnath)

  Instagram

  अकराव्या शतकात शिलाहार राजघराण्यातील राजाने बांधलेले हे मंदिर हेमाडपंती मंदिराचा उत्कृष्ट नमुना आहे. मूळ मंदिर अजूनही आहे. सध्या हे मंदिर दोनच भागात असून येथे गर्भगृह आणि सभामंडप आहेत. इथे असलेल्या भिंंतींवर एकूण 70 प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव असून यातील कोरीव कामाच्या अभ्यासासाठी अनेक विद्यार्थी येथे येत असतात. 

  वैशिष्ट्य - या पुरातन मंदिरात असणारी कामदेवाची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. या मूर्तीला आठ हात असून याची कमनीयता, अलंकार या सर्वच गोष्टी अतिशय नाजूकपणाने कोरण्यात आलेल्या आहेत. तसेच इथे एक मूर्ती  असून त्याला तीन तोंडे आहेत त्यामुळे त्याला त्रिमुखी असे म्हटले जाते. हे शिल्पही बहुधा शंकर पार्वतीचेच असावे असे म्हटले जाते. 

  कसे पोहचावे - अंबरनाथ स्टेशनला ट्रेनने जाऊन पूर्व बाजूला जावे. तिथून तुम्हाला रिक्षा मिळतील. 

  ढोल्या गणपती, वाई (Dholya Ganpati, Wai)

  Instagram

  सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर आहे. गणपतीच्या  भव्य आणि विशाल मूर्तीमुळे याला ढोल्या गणपती असे म्हटले जाते. साधारण सोळाव्या शतकात या मूर्तीची स्थापना झाली. ही मूर्ती एकसंध अशी काळ्या दगडामध्ये कोरली आहे. तसंच या मूर्तीसाठी लागलेला दगड हा कर्नाटकातून आणण्यात आला आहे. सध्या या मूर्तीला भगवा रंग देण्यात आला आहे. ही मूर्ती बैठी असून अतिशय रेखीव आहे. 

  वैशिष्ट्य - या मूर्तीच्या मागील प्रभावळ ही अर्धचंद्राकृती असून साधारण तीन मीटरची आहे. तर गर्भगृहाचे छत हे स्थापत्यशैलीची किमया आहे. चुना आणि फरशीचा वापर करून योग्य मेळ साधून वास्तुशास्त्रज्ञांन एक अप्रतिम मंदिर बांधले आहेत. याचा कळस हे वाईतील सर्व मंंदिरांमध्ये सर्वात उंच असून याचा उंची 24 मीटर इतकी आहे. 

  कसे पोहचावे - बसने अथवा स्वतःच्या वाहनाने  

  हेमाडपंथी मंदिर (Hemadpanthi Temple)

  Instagram

  हेमाडपंथी स्थापत्यशैली आणि मंदिरांचा उल्लेख आपण नेहमीच ऐकत असतो. अनेक शिवमंदिर हे हेमाडपंथी मंदिर म्हणून ओळखली जातात. त्यामध्ये अगदी अंबरनाथचे शिव मंदिर असो अथवा त्र्यंबकेश्वर असो अनेक मंदिरांचा समावेश आहे. बाराव्या शतकापासून केलेले मंदिराचे काम आजही टिकून राहिले आहे त्यामुळे त्याला हेमाद्री पंडितांनी बांधलेले म्हणून हेमाडपंती असे नाव देण्यात आले. आजही या स्थापत्यशैलीचा अभ्यास केला जातो. अकोले तालुक्यातील रतनवाडीमधील अमृतेश्वर मंदिर याचा उत्कृष्ट नमुना आहे. 

  वैशिष्ट्य - हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेली ही मंदिरे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. आजही वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्रासाठी याचा अभ्यास करण्यात येतो. 

  कसे पोहचावे - या मंदिरांपर्यंत तुम्ही ट्रेन अथवा बसने पोहचू शकता. स्वतःच्या वाहनांचाही उपयोग करू शकता. 

  नरसिंह मंदिर (Narasimha Temple)

  Instagram

  नरसिंह मंंदिर अर्थात नृसिंह मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. नरसिंह हा विष्णूचा अवतार सर्वांनाच माहीत आहे. जळगाव, पुणे, कोपर्णे, निफाड, सिन्नर अशा अनेक ठिकाणी नरसिंंह मंदिराचे दर्शन तुम्हाला घडू शकते. काही ठिकाणी अतिशय प्राचीन लेण्यामध्येही नरसिंहाची मूर्ती आहे. नरसिंहपूरचे ज्वाला नृसिंह हे अतिशय पुरातन मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर भुयारामध्ये आहे. तसेच नीरा - भीमेच्या संगमावरही नरसिंह मंदिर आहे. बऱ्याच जणांना नरसिंह मंदिराबाबत माहिती नाही. पण तुम्ही व्यवस्थित शोध घेतलात तर तुम्हाला नरसिंह मंदिर सापडतील आणि ही मंदिरे अतिशय जुनी असून यापैकी बऱ्याच ठिकाणी जीर्णोद्धार चालू आहे. 

  वैशिष्ट्य - प्राचीन मंदिर असून यामध्ये कोणत्याही प्रकारची आधुनिकता आणि अवाजवता आणलेली नाही. ही मंदिर अतिशय सरळ आणि प्रसन्न आहेत. जिथे भक्त येतात आणि पूजा करून निघून जातात

  कसे पोहचावे - या मंदिरापर्यंत तुम्ही बस अथवा स्वतःच्या वाहनाने पोहचू शकता. 

  2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.