बाळासोबत प्रवास करताय, मग या गोष्टींची घ्या काळजी

बाळासोबत प्रवास करताय, मग या गोष्टींची घ्या काळजी

आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण आई होण्यासोबतच तुमच्या जबाबदाऱ्यांमध्येही नक्कीच वाढ होत असते. एका बाळाच्या आईच्या मनात सर्वात आधी तिच्या बाळाचाच विचार येतो. बाळाचं लालनपालन, संगोपन करण्यात ती इतकी व्यस्त होते की कधीकधी तिला तिच्या आजूबाजूच्या जगाचं भानच राहत नाही. 

गरोदरपण आणि बाळाच्या जन्माआधी तुम्ही दरवर्षी वेकेशनवर जाता. मात्र बाळ झाल्यावर साधा प्रवासदेखील तुम्हाला नकोसा वाटू लागतो. याचं कारण बाळ झाल्यावर प्रवास करणं फार कठीण आहे हे मनात कुठेतरी बिबंलेलं असतं. मात्र असं मुळीच नाही. कारण तुम्ही तुमच्या बाळासोबत कुठेही बिनधास्त प्रवास करू शकता. बाळ एक ते दोन वर्षांचं झालं की त्याला घराबाहेर फिरायला नेण्यास काहीच हरकत नाही. कारण यामुळे तुमची फिरण्याची आवडही जपली जाते. शिवाय गरोदरपणापासून कमीतकमी एक ते दोन वर्ष तुम्ही फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नसता. यासाठीच बाळासोबत प्रवास कसा एन्जॉय करायचा हे जरूर वाचा. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा प्रवास सुखकर करू शकता.

Shutterstock

बाळासोबत प्रवास करताना फॉलो करा या टिप्स -

बाळासोबत प्रवास करणं तेव्हाच सोयीचं होईल जेव्हा तुम्ही प्रवासाला जाण्यापूर्वी या खास टिप्स फॉलो करण्याचा प्रयत्न कराल.

सार्वजनिक ठिकाणी आणि अती गर्दीच्या ठिकाणी प्रवास करू नका -

बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्याला लगेचच कोणतंही इनफेक्शन होऊ शकतं. यासाठीच बाळाला अती गर्दी असलेल्या ठिकाणी फिरण्यास घेऊन जाऊ नका. बाळ खूप लहान असताना विमानाने अथवा कारने प्रवास करण्यास काहीच हरकत नाही.

विमानप्रवास करताना काळजी घ्या -

बऱ्याच पालकांची हिच चुक होते की ते नेहमीप्रमाणे विमानाच तिकीट बुक करतात. पण त्याआधी त्याच्या बाळाच्या सोयीचा विचार करत नाहीत. जर तुम्ही  बाळासोबत विमान प्रवास करणार असाल तर खूप वेळ प्रवास करावी लागणारं विमान अथवा रात्री उशीराचा प्रवास करणे टाळा. कारण यामुळे तुमच्या बाळाच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच विमानाचं तिकीट काढण्यापूर्वी तुमच्या बाळाच्या झोपेच्या वेळापत्रकाचा अंदाज घ्या.

Shutterstock

दोन वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी वेगळे तिकीट बुक करा-

सार्वजनिक ठिकाणी लहान बाळासाठी प्रवास विनामुल्य असतं. पण जर तुमचं बाळ बसू शकत असेल तर त्याच्यासाठी एक तिकीट आणखी बूक करा. कारण त्यामुळे तुम्हाला त्याला अंगावर घेऊन प्रवास करावा लागणार नाही. थोडावेळ प्रवासात आराम मिळण्यासाठी ही एक सोपी युक्ती जरूर फॉलो करा.

प्रवासात रेस्टरूमचा वापर करा -

विमान प्रवास असो अथवा इतर कोणताही बऱ्याच ठिकाणी आजकाल रेस्टरूममध्ये बाळासोबत असलेल्या आईसाठी खास सोय केलेली असते. या सोयीचा फायदा घ्या. बाळाचे कपडे बदलण्यासाठी, स्तनपान देण्यासाठी तुम्हाला या सोयींचा फायदा होऊ शकतो.

बाळ आजारी असताना अथवा त्याचे लसीकरण झाल्यावर प्रवास करू नका -

बाळ जर आजारी असेल तर ते चिडचिड करतं. कधी कधी बाळाला लस दिल्यावर दोन ते  चार दिवस ते खूप चिडचिड करतं. म्हणूनच या काळात प्रवास करू नका. कारण यामुळे तुमचा प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता असते. यासाठीच प्रवासाला जाण्याआधी डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. 

कारने प्रवास करताना काळजी घ्या -

जर तुम्ही  प्रवास कारने अथवा एखाद्या खाजगी वाहनाने करत असाल तर काही बाबतीत विशेष काळजी घ्या. कारमधून प्रवास करताना बाळाला घेऊन मागच्या सीटवर बसा. शिवाय सीटबेल्ट लावण्यास विसरू नका. कारमध्ये प्रवास करण्यासाठी लहान मुलांसाठी खास सीट मिळतात त्याचा वापर करा. ज्यामुळे तुमचे बाळ आरामात प्रवास करू शकता. शिवाय जर बाळाला उलटीचा त्रास होत असेल तर प्रवासाला जाण्यापूर्वी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्या. 

प्रवासादरम्यान थोडा वेळ बाळाची जबाबदारी त्याचे बाबा, आजी-आजोबा अथवा नॅनीकडे सोपवा -

बाळ आणि त्याचे संगोपन ही तुमची विशेष जबाबदारी आहे. मात्र तुमच्याप्रमाणे  ही जबाबदारी त्याच्या बाबांची अथवा त्याच्या आजी-आजोबांचीदेखील आहे. त्यामुळे जर तुम्हाला  थोडावेळ प्रवासाचा आनंद लुटायचा असेल तर काही काळासाठी बाळाला त्याचे बाबा, आजी-आजोबा अथवा नॅनीकडे देण्यास काहीच हरकत नाही. ज्यामुळे तुम्ही न थकता तुमचा प्रवास करू शकता. 

बाळासोबत घराबाहेर पडण्यापूर्वी या गोष्टीं तुमच्या बॅगेत जरूर ठेवा -

बाळासोबत प्रवास करणं सोयीचं होतं जेव्हा तुम्ही प्रवासात आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू तुमच्याजवळ ठेवता. या काही अशी गोष्टी आहेत ज्या प्रवासादरम्यान तुम्हाला कधीही लागू शकतात. यासाठी या गोष्टी घेऊनच प्रवासाला निघा. ज्यामुळे तुमचा प्रवास नक्कीच आरामदायक होईल. 

 • तुमचे आणि बाळाचे जास्तीचे कपडे
 • बाळाचे एक दोन जोड स्वेटर
 • बाळाचे लंगोट अथवा इतर अंडर गारमेंट
 • जास्तीचे सॉक्स आणि टोपरं
 • बाळासाठी आरामदायक नाईट वेअर
 • हातरूमाल
 • दूधाची बॉटल
 • सिपर
 • ब्रेस्ट पंप
 • दूधाची बाटली धुण्याचे साहित्य
 • डायपर
 • वेट वाईप्स
 • रॅश क्रीम
 • ट्रॅव्हल पॉटी
 • वापरलेले डायपर ठेवण्यासाठी डिस्पोझल बॅग
 • तुमच्यासाठी आरामदायक शूज आणि स्लीपर
 • बाळाची औषधे
 • बाळाची खेळणी अथवा पुस्तके

 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

बाळाला काळा धागा बांधणं ठरू शकतं, बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या 'या' 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

तुमच्या बाळासाठी अर्थासह आधुनिक श्री गणेशाची नावे