साधारणतः हातापायावरील केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंगचा (Waxing) चा वापर करतो. पण तुम्ही चेहऱ्यावरही वॅक्सिंग (Face Waxing) करता का? जर तुम्ही चेहऱ्यावर वॅक्सिंग करत असाल तर हे किती सुरक्षित आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? ज्या महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस असतात त्या महिला चेहऱ्यावर ब्लीच, थ्रेडिंग अथाव वॅक्सिंग करतात. पण ज्या महिला चेहऱ्यावर वॅक्सिंग करून घेतात त्यांना त्याचे तोटेही माहीत असायला हवेत. त्यामुळे चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी नक्की कोणत्या आहेत ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते तुम्हाला माहीत करून देण्यासाठी आम्ही हा लेख लिहित आहोत. तुम्ही या गोष्टींची नक्की काळजी घ्या आणि स्वतःच्या चेहऱ्याचीही. जाणून घेऊया चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत –
1. विचारपूर्वक निर्णय घ्या
चेहऱ्यावर वॅक्सिंग करत असताना जराही चूक झाली तर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर वॅक्सिंग कराल तेव्हा तुम्ही अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. मुळात तुम्हाला वॅक्सिंगची चेहऱ्यावर गरज आहे का? हे आधी विचारपूर्वक ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही हे पाऊल उचला.
2. सुरकुत्या लवकर येतात
Shuttterstock
चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत मऊ आणि मुलायम तशीच संवेदनशील असते. त्यामुळे तुम्हाला अगदीच खरंच गरज असेल तर चेहऱ्यावर वॅक्सिंग करा. अन्यथा जर तुम्ही सतत चेहऱ्यावर वॅक्सिंग करण्याचा पर्याय निवडलात तर तुम्हाला कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात आणि त्याशिवाय चेहऱ्यावर काळे डागही पडण्याची शक्यता असते.
3. सूज, डाग पडण्याचा धोका
चेहऱ्यावरील वॅक्सिंग हे हेअर फॉलिकल्सना नुकसान पोहचवते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सूज येणे, डाग पडणे अथवा चेहऱ्यावर इन्फेक्शन येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
4. केस कमी असल्यास, ब्लीच करा
Shutterstock
तुमच्या चेहऱ्यावर जर कमी केस असतील तर तुम्ही वॅक्सिंग हा पर्याय निवडण्याऐवजी ब्लीच हा पर्याय निवडणे योग्य आहे. सहसा चेहऱ्यावर वॅक्सिंग हा पर्याय निवडू नका
5. केस जाड असल्यास
तुमच्या चेहऱ्यावरील केस जर दाट अथवा जाड असतील तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील केसांसाठी लेझर हेअर रिमूव्हल उपचारांची मदत घ्या. यासाठी तुम्ही वॅक्सिंग हा पर्याय निवडू नका. कारण वॅक्सिंग करताना चेहरा ओढला जाऊन तुम्हाला त्याचा अधिक त्रास होतो आणि चेहरा खराब होण्याची शक्यता जास्त निर्माण होतो.
6. स्वतः कधीही वॅक्सिंग करू नका
Shutterstock
तुम्ही तुमच्या हातापायावर स्वतः वॅक्सिंग करत असाल पण तुमच्या चेहऱ्यावर वॅक्सिंग करण्याची जोखीम अजिबात उचलू नका. कारण चेहऱ्याचं वॅक्सिंग करणं हे अतिशय कठीण असतं. चेहऱ्याचे वॅक्सिंग करताना वॅक्सचे टेंपरेचर, वॅक्सिंग स्ट्रिपचा दर्जा इत्यादी गोष्टीचीही खूप काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे नेहमी तज्ज्ञांची मदत जर चेहऱ्याचे वॅक्स करायचे असेल तर घ्यावी.
Waxing केल्यावर टाळा ‘या’ 7 गोष्टी!! – Post Waxing Care in Marathi
7. स्किन टाईपकडे लक्ष द्या
वॅक्सिंग करताना तुम्ही आपल्या स्किन टाईपकडे लक्ष द्यायला हवी. या गोष्टीची काळजीही तुम्ही घ्यायला हवी. तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या पार्लरवाल्या तज्ज्ञांशी याबद्दल आधी चर्चा करायला हवी. अन्यथा चेहऱ्यावर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तसेच तुम्ही हायजिनचीदेखील काळजी घ्यायला हवी. अन्यथा यानेही इन्फेक्शन होऊ शकते.
8. त्वरीत ब्लीच करू नका
तुम्ही जर चेहऱ्यावर वॅक्सिंग केले असेल तर त्यानंतर त्वरीत काही दिवसात ब्लीच करू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहचू शकते. तुम्ही साधारण कधी ब्लीच करू शकता याची माहिती तुमच्या पार्लरमधून जाणून घ्या . स्वतःहून कोणतेही पाऊल चेहऱ्याच्या बाबतीत उचलू नका.
9. लोशन वा सिरमचा करा वापर
Shutterstock
चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही फेस सिरम अथवा वॅक्सिंग लोशन लावायला विसरू नका. अन्यथा चेहऱ्यावर रॅश येण्याची शक्यता असते. हे सिरम अथवा लोशन तुमचे यापासून संरक्षण करते. तसंच चेहऱ्याची जळजळ होण्यापासूनही थांबवते. तसेच वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही त्वरीत उन्हात जाऊ नका अथवा गॅसजवळ जाऊन काम करू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.
वॅक्सिंग (Waxing) जास्त वेळ टिकून ठेवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय
10. सतत वॅक्सिंग करू नका
तुम्हाला गरज नसेल तर मुळात चेहऱ्यावर वॅक्सिंग करूच नका. जरी केलं तरी सतत चेहऱ्यावर त्वरीत वॅक्सिंग करू नका. अन्यथा तुमच्या त्वचेला नुकसान पोहचून तुमचा चेहरा अधिक खराब दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या चेहऱ्याची अधिक काळजी घ्या.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा