ADVERTISEMENT
home / Acne
hormonal acne

हॉर्मोनल ऍक्ने कमी करण्याचे काही सोपे उपाय

हॉर्मोनल ऍक्ने हे आपल्या हार्मोन्समधील चढउतारांशी जोडलेले आहे. जरी हे सामान्यतः पौगंडावस्थेत होणाऱ्या हॉर्मोनल बदलांच्या दरम्यान होत असले तरी, हार्मोनल ऍक्ने कोणत्याही वयोगटातील प्रौढांना होऊ शकतात. हे विशेषतः स्त्रियांमध्ये होणे सामान्य आहे. मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हॉर्मोनल ऍक्नेचा त्रास होऊ शकतो.पण हे हॉर्मोनल ऍक्ने कमी करण्याचे काही सोपे उपाय आहेत. 

हॉर्मोनल ऍक्ने कसे ओळखायचे?

पौगंडावस्थेत जेव्हा शरीरात अनेक बदल होत असतात तेव्हा साधारणपणे चेहेऱ्याच्या टी झोन मध्ये हे हॉर्मोनल ऍक्ने येतात. म्हणजे कपाळ, नाक व हनुवटीवर पिंपल्सचा त्रास होतो. पण जेव्हा प्रौढ स्त्रियांमध्ये हॉर्मोनल ऍक्ने येतात ते साधारणपणे चेहेऱ्याच्या खालच्या भागात म्हणजे जबडा, हनुवटी, मान व गळा या भागांत येतात. काहींना ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, सिस्ट्स व पिंपल्सचाही त्रास जाणवू शकतो. हे सिस्ट्स त्वचेच्या बऱ्याच आतल्या लेयरवर येतात आणि त्याला धक्का लागल्यास वेदना जाणवू शकतात. प्रौढ स्त्रियांमध्ये हॉर्मोनल ऍक्नेचा त्रास होण्याची मासिक पाळी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, रजोनिवृत्ती, अँड्रोजन लेव्हलमध्ये वाढ होणे ही कारणे आहेत.

हॉर्मोनल ऍक्ने कमी करण्याचे उपाय 

तुमचे हॉर्मोनल ऍक्ने जर अतिरिक्त प्रमाणात असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला पोटातून घ्यायला काही औषधे देतील. पण जर हा त्रास अति जास्त प्रमाणात वाढला नसेल तर त्वचेसाठी दिली जाणारी औषधे देखील काम करतात. काही नैसर्गिक घटक जसे टी ट्री ऑइल, अल्फा हायड्रॉक्सि ऍसिड (AHA), ग्रीन टी देखील सौम्य स्वरूपातील हॉर्मोनल ऍक्नेवर परिणामकारक आहेत. 

अधिक वाचा पाळीदरम्यान का येतात चेहऱ्यावर मुरूमं, करा सोपे उपाय

ADVERTISEMENT

रेटिनॉल 

टॉपिकल रेटिनॉइड हे एक जादुई औषध आहे. व्हिटॅमिन ए पासून रेटिनॉइड हे औषध मिळते. बाजारात रेटिनॉइड्स असणारी बरीच मलमं, जेल, क्रीम आणि लोशन्स आहेत. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही औषधे लावू शकता. त्वचेची रंध्रे (पोअर्स) स्वच्छ करणे आणि त्वचेला ब्रेकआउट-मुक्त ठेवणे , त्वचेवरील तेलकटपणा कमी करणे, जळजळ कमी करणे आणि नितळ त्वचेसाठी नव्या पेशींचे उत्पादन वाढवणे हे सगळे रेटिनॉलचे फायदे आहेत. जर तुम्ही नुकतेच रेटिनॉल वापरणे सुरु केले असेल, तर त्याची सवय होईपर्यंत ते एक दोन दिवसांआड लावा. जर तुम्ही रेटिनॉइड लावत असाल तर रोज सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे. 

सॅलिसिलिक ऍसिड (BHA) किंवा लॅक्टिक ऍसिड (AHA)

सॅलिसिलिक आणि लॅक्टिक ऍसिड हे दोन्ही त्वचेला हळुवारपणे एक्सफोलिएट करतात, त्वचेच्या रंध्रात अडकलेल्या मृतपेशी व घाण काढून रंध्रे स्वच्छ करतात. अतिरिक्त सीबम साफ करतात आणि चमकदार, डाग-मुक्त त्वचा तयार करण्यात हातभार लावतात. 

अधिक वाचा सतत एकाच ठिकाणी का येतात पिंपल्स, जाणून घ्या कारण

सनस्क्रीन

सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी अत्यावश्यक आहे. तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असो वा नसो. पण विशेषत: जर तुम्ही रेटिनॉल, AHAs आणि BHAs सारखी स्ट्रॉंग औषधे चेहऱ्याला लावत असाल तर सनस्क्रीन लावलेच पाहिजे. असे सनस्क्रीन वापरा जे तुमच्या त्वचेसाठी अगदी लाईट असेल शिवाय त्याने तुमची त्वचा तेलकट होणार नाही. ज्यांना हॉर्मोनल ऍक्ने आहेत त्यांनी ऑइल बेस्ड सनस्क्रीन वापरण्याऐवजी वॉटर बेस्ड सनस्क्रीन वापरावे म्हणजे त्वचा तेलकट होणार नाही. 

ADVERTISEMENT

सल्फर

तुम्ही जर सॅलिसिलिक किंवा लॅक्टिक ऍसिडपेक्षा त्वचेसाठी अधिक सौम्य पर्याय शोधत असल्यास सल्फर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. सल्फर हे त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक नैसर्गिक औषधांमध्ये सल्फर हा एक मुख्य घटक असतो. सल्फर त्वचेवरील जास्तीचे तेल शोषून घेण्यास मदत करते आणि त्वचेला जास्त कोरडे न करता ब्रेकआउट्स टाळण्यासाठी पोअर्स अनक्लॉग करते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सल्फर सोप, सल्फर फेस वॉश किंवा सल्फर फेस मास्क वापरू शकता. 

या सर्व उपायांनी तुम्ही हॉर्मोनल ऍक्ने कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. 

अधिक वाचात्वचा नितळ व निरोगी ठेवण्याचा सुरक्षित उपाय – नॅचरल ऑईल्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
14 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT