आजकालची जीवनशैली खूपच धकाधकीची आणि कठीण झाली आहे. ज्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी पुरेसा वेळ सर्वांकडे असतोच असं नाही. त्यात वातावरणात होणारे बदल, प्रदूषण, धुळ, माती आणि अति मेकअपमुळे त्वचेवर दुष्परिणाम दिसू लागतात. या समस्येवर सोपा उपाय म्हणजे नियमित असे स्किन केअर प्रॉडक्ट वापरावे हे तुमच्या त्वचेची काळजी तर घेतीलच पण त्यात नैसर्गिक घटक असल्यामुळे त्यांचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होणार नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला असे काही प्रॉडक्ट सूचवत आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेची निगा राखणं होईल खूप सोपं आणि सहज.
अशी घ्या त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी
तुमची त्वचा तुम्हाला सतत फ्रेश आणि टवटवीत ठेवायची असेल तर योग्य पद्धतीने स्किन केअर रूटीन फॉलो करायला हवं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला त्वचेच्या समस्या कधीच जाणवणार नाहीत. मात्र त्याआधी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार नक्कीच ओळखता यायला हवा. कारण त्यानुसारच तुम्हाला तुमच्यासाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्ट निवडता येतील. एकदा तुमची त्वचा ड्राय, तेलकट, कॉंबिनेशन अथवा संवेदनशील अशा कोणत्या प्रकारची आहे हे समजलं की त्यानुसार खालील स्टेप्स फॉलो करत राखा त्वचेची निगा.
क्लिंझिंग
स्किन केअर मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहरा नियमित स्वच्छ धुणे. अंधोळी व्यतिरिक्त तुम्ही दिवसातून एक ते दोन वेळा चेहरा स्वच्छ करायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना चेहरा क्लिन करून चेहऱ्यावरील धुळ, माती, मेकअप योग्य पद्धतीने स्वच्छ करणं. कारण असं केल्यामुळे रात्रभर तुमच्या त्वचेला पुरेसं ऑक्सिजन मिळतं आणि सकाळी त्वचा टवटवीत राहते. यासाठी ऑर्गेनिक हायवेस्टचे फेस क्लिंझर तुम्ही नक्कीच वापरू शकता. लाईटवेट आणि रिफ्रेशिंग अशा या ऑर्गेनिक हारवेस्टच्या व्हिटॅमिन सी फेस क्लिंझरने तुमचा चेहरा दिवसातून कमीत कमी दोन वेळा स्वच्छ करा. यातील घटक पूर्णपणे नैसर्गिक असून यातील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होतं. त्वचेवरील काळे डाग, धुळ, माती, मेकअपचे कण दूर होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
टोनिंग
त्वचा स्वच्छ केल्यावर त्वचेला गरज असते ती टोन करण्याची. कारण क्लिझिंह करताना त्वचेवरील धुळ, मातीसह नैसर्गिक तेल निघून गेलेलं असतं. ज्यामुळे त्वचा अशा वेळी खूप कोरडी होते. जर त्वचेला योग्य प्रमाणात पुन्हा हायट्रेट केलं नाही तर त्वचेच्या समस्या वाढू शकतात. शिवाय कोरडेपणामुळे त्वचेवर दाह आणि जळजळ जाणवते. यासाठी तुम्ही तुमची त्वचा टोन करण्यासाठी ऑर्गेनिक हारवेस्टचे हे व्हिटॅमिन सी युक्त टोनर नक्कीच वापरू शकता. तेलकट आणि अॅक्ने असलेल्या त्वचेसाठी हे उत्तम प्रॉडक्ट आहे. वापरण्यासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे तुम्ही ते तुमच्या धावपळीच्या काळातही सहज वापरू शकता. यासाठी चेहरा धुतल्यावर कॉटनपॅडवर या टोनरचे दोन ते तीन थेंब घ्या आणि चेहऱ्यावर डॅब करा.
मॉईस्चराईझिंग
त्वचेला मऊपणा आणि पोषण मिळण्यासाठी नियमित त्वचेवर योग्य मॉईस्चराईझिंग क्रीम वापरलं गेलं पाहिजे. नियमित वापरासाठी ऑर्गेनिक हारवेस्टचं ब्लश शाईन आणि ग्लो क्रीम खूपच छान आहे. मुळात यामध्ये आयरीश रूट आणि बेरीसारख्या नैसर्गिक गोष्टींचे घटक वापरण्यात आलेले आहेत. शिवाय त्याचं टेक्चर इतर मऊ आणि हलकं आहे की ते तुमच्या त्वचेत सहज मुरतं आणि त्वचा चिकट दिसत नाही. कायम चिरतरूण दिसम्यासाठी आणि एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी तुम्ही हे क्रीम नक्कीच वापरू शकता.
सनस्क्रीन
त्वचेची निगा राखण्यासाठी तिचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण व्हायला हवं. कारण सकाळचं कोवळं ऊन तुमच्या त्वचेसाठी पोषक असलं तरी त्यानंतरच्या उन्हात फिरल्यास सूर्यप्रकाशातील हानिकारक किरणांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी सनटॅन, सनबर्नपासून वाचण्यासाठी नियमित घराबाहेर पडताना , दिवसा घरातदेखील आणि कंम्युटर, लॅपटॉप, मोबाईलवर काम करताना त्वचेवर सनस्क्रिन लावण्याचा कंटाळा करू नका.
ओठांची निगा
चेहऱ्यावरील ओठ आणि ओठांवरील त्वचा अत्यंत नाजूक असते. म्हणूनच अती गारवा अथवा अती उष्णता तुमच्या ओठांना सहन होत नाही. वातावरणात बदल होताच तुमचे ओठ फुटतात. कधी कधी ओठ फाटून त्यातून रक्त येते. यासाठीच नियमित ओठांची निगा राखणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या ओठांच्या काळजीसाठी घरगुती उपाय | Lip Care Tips For Winter In Marathi. खरंतर ओठांची निगा राखण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे नियमित ओठांवर लिप बाम लावणं. कारण यामुळे तुमचे ओठ हायड्रेट राहतात आणि वातावरणातील बदलांपासून त्यांचे संरक्षण होते. तुम्ही यासाठी ऑर्गेनिक हारवेस्टचं लिप बाम नक्कीच वापरू शकता. यामध्ये तुमच्या ओठांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी स्पेशल SPF फॉर्म्युला वापरण्यात आला आहे.
फेशिअल कीट
त्वचेची निगा राखण्यासाठी डेली स्किन केअर रूटिन तर फॉलो करायलाच हवं. पण त्या व्यतिरिक्त महिन्यातून अथवा दोन महिन्यातून एकदा तरी चेहऱ्यावर फेशिअल करायला हवं. यासाठीच जाणून घ्या काय आहे हायड्रेटिंग फेशिअल. पण जर यासाठी पार्लरमध्ये जाण्यासाठी तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी फेशिअल किटवरील सूचना फॉलो करून घरीच फेशिअल करू शकता. ऑर्गेनिक हारवेस्टचं हे फेशिअल किट वापण्यासाठी अतिशय सोपं आणि परिणाम कारक आहे.
आम्ही शेअर केलेल्या या स्कीन केअर टीप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा शिवाय ट्राय करा हे विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड | Cruelty Free Makeup Brands In Marathi