सध्या सगळ्यांना बराच वेळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरात केक बनवले जात आहेत. पण बऱ्याचदा चॉकलेट केक बनवायचा असेल तर तो घरात व्यवस्थित तयार होत नाही असं वाटतं. पण असं काहीच नाही. गोडवा वाढवणाऱ्या चॉकलेट रेसिपी तुम्हाला माहीत असायला हव्यात. आम्ही तुम्हाला इथे काही वेगवेगळ्या चॉकलेट केक रेसिपी मराठीत देत आहोत. तुम्हीही आता घरच्या घरी सोपे केक बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेऊन कराव्या लागतात. चॉकलेट केक लहान मुलांना खूपच आवडतो. पण घरी कसं करणार किंवा त्याचा खूपच पसारा होईल असा विचार करून आपण सहसा केक ऑर्डर करत असतो. पण तुम्ही पसारा न घालताही चॉकलेट केक घरात तयार करू शकता. तेदखील वेगवेगळ्या प्रकारचे. आम्ही तुम्हाला इथे काही वेगवेगळ्या चॉकलेट केक रेसिपी मराठीमध्ये सांगणार आहोत. कारण बऱ्याचदा असं होतं की सर्च करायला गेलं तर रेसिपी हिंदी अथवा इंग्रजीमध्ये असतात. पण मराठीमध्ये रेसिपी वाचून ते बनवणं सोपं होतं. पाहूया तर कोणकोणते चॉकलेट केक आपल्याला घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येतील (chocolate cake recipes in marathi).
बेसिक चॉकलेट केक रेसिपी (Basic Chocolate Cake Recipe In Marathi)
बेसिक चॉकलेट केकमध्ये तुम्हाला जास्त काही मेहनत करावी लागत नाही. हा बनविण्यासाठी अतिशय सोपा आहे. हा केक बनविण्यासाठी तुम्हाला साधारण 1 तास लागतो.
साहित्य
- कुकिंग स्प्रे
- 1 कप कोको पावडर (नैसर्गिक अथवा डच प्रोसेस)
- 2 ½ कप मैदा
- 2 कप साखर
- 1 ½ चमचा बेकिंग पावडर
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 1 चमचा मीठ
- 3 मोठी अंडी
- ¾ कप व्हेजिटेबल ऑईल
- ½ कप क्रिम
- 2 चमचे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
कृती
- 350 डिग्रीगवर ओव्हन प्रीहीट करून घ्या. त्यामध्ये तुमचे दोन ट्रे कुकिंग स्प्रे च्या सहाय्याने व्यवस्थित कोट करून घ्या
- 1 ½ कप पाणी उकळून त्यात कोको पावडर नीट मिक्स करून घ्या. गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या आणि ते बाजूला ठेऊन द्या
- दुसऱ्या भांड्यात मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ हे सगळं मिक्स करून त्यात अंडी, व्हेजिटेबल ऑईल, क्रिम आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालून नीट 1 मिनिटापर्यंत फेटून घ्या. हे मिश्रण अतिशय सॉफ्ट व्हायला हवं
त्याचप्रमाणे कोको पावडरही नंतर फेटून घ्या. याचे बॅटर थोडे जाड राहू द्या - दोन्ही बॅटर दोन पॅनमध्ये विभागून घ्या. 30-40 मिनिट्सपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा. तुमचा केक तयार आहे हे टूथपिक घालून तुम्ही तपासून घ्या आणि मग बाहेर काढून 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग वरून कोको पावडरचं बॅटर घालून केक सजवून खायला द्या
बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी
चॉकलेट एगलेस केक रेसिपी (Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
Shutterstock
चॉकलेट केक अंड्याशिवाय चांगला होत नाही, सॉफ्ट होत नाही असं बरेच जण म्हणतात. पण असं काहीही नाही. तुम्ही अंड्याशिवायदेखील अप्रतिम चॉकलेट केक बनवू शकता
साहित्य
- 1 कप मैदा
- 1 कप पिठी साखर
- ½ कप कोको पावडर
- 1 चमचा बेकिंग पावडर
- 1 चमचा बेकिंग सोडा
- ½ चमचा मीठ
- ½ कप तेल
- ½ कप गरम पाणी
- ½ कप दूध
- 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- 2 चमचे दही
कृती
- ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहिट करा आणि ट्रे ला व्हेजिटेबल ऑईल लाऊन ठेवा
- एका भांड्यात मैदा, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ एकत्र करा
- त्यात तेल आणि पाणी घालून नीट भिजवा थंड होऊ द्या
- वरून दूध आणि व्हॅनिला इसेन्स मिक्स करा
- त्यानंतर सर्वात शेवटी दही मिक्स करा
- हे सर्व मिश्रण नीट मिक्स झाल्यावर ट्रे मध्ये पसरवा आणि मग 30-40 मिनिट्सपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा. तुमचा केक तयार आहे हे टूथपिक घालून तुम्ही तपासून घ्या आणि मग बाहेर काढून 10 मिनिट्स तसंच ठेवा
ओरिओ चॉकलेट केक रेसिपी (Chocolate Oreo Cake Recipe In Marathi)
ओरिओ चॉकलेट बिस्किट्सपासून तयार होणारा हा केक बनवायला अतिशय सोपा असून अगदी तुमच्या घरातील लहान मुलंही हा केक तयार करू शकतात. हा बनविण्यासाठी वेळही जास्त लागत नाही.
साहित्य
- 2 ओरिओ चॉकलेट बिस्किट्स पॅकेट्स
- ½ कप पिठी साखर
- 1 चमचा इनो
- 2 चमचे तूप अथवा बटर
- दूध
- ½ किलो मीठ
- 1 व्हाईट अथवा ब्लॅक चॉकलेट बार
कृती
- मिक्सरमधून ओरिओ बिस्किट्सचा चुरा करून घ्या
- एका कढईत अर्धा किलो मीठ गरम करायला ठेवा
- दुसऱ्या भांड्यात तूप आणि ओरिओचा चुरा मिक्स करून त्यात दूध घालून व्यवस्थित बॅटर बनवून घ्या. त्यात इनो आणि परत थोडं दूध घालून बॅटर थोडा वेळ तसंच ठेवा
- केक टिनमध्ये बटर पेपर घाला त्यात तूप लावा आणि वरून हे मिश्रण पसरवा
- मीठ गरम केलेल्या भांड्यात हे मिश्रणाचे भांडे ठेवा आणि साधारण 25-30 मिनिट्स मंद आचेवर बेक होऊ द्या
मध्ये मध्ये केक नीट फुगत आहे की नाही याकडे लक्ष द्या - बाहेर काढल्यावर नीट उलटा करा आणि मग त्यावर चॉकलेट बार लावून सजवा अथवा चॉकलेट वितळवून ओता
प्रेशर कुकरमध्ये चॉकलेट केक बनविण्याची रेसिपी (Chocolate Cake In Pressure Cooker)
केक बनविण्यासाठी ओव्हन अथवा मायक्रोव्हेवच असायला हवा असं काहीच नाही. तुम्ही घरी प्रेशर कुकरमध्येही सॉफ्ट चॉकलेट केक बनवू शकता.
साहित्य
- ¾ कप मैदा
- ¾ बेकिंग सोडा
- पाव चमचा मीठ
- 3 चमचे कोको पावडर
- 3 चमचे बटर
- ½ कप पिठी साखर
- 1 अंडे
- ½ कप पाणी
- ½ कप दूध
- ½ चमचा व्हिनेगर अथवा लिंबू रस
- ½ चमचा व्हॅनिला इसेन्स
कृती
- एका भांड्यात मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ नीट मिक्स करून घ्या
- दुसऱ्या भांड्यात क्रिम, बटर आणि साखर एकत्र करून नीट फेटून घ्या
- त्यात नंतर अंडे घालून पुन्हा फेटा हे व्यवस्थित मिक्स झाले की वरून कोको पावडर मिक्स करून नीट फेटा
- त्यात पुन्हा व्हिनेगर अथवा लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा
- हे नीट मिक्स झाल्यावर वरून दूध घालून पुन्हा हळूवार फेटा
- हे सगळं नीट फेटून झाल्यावर मैद्याचे मिश्रण त्यात घालून नीट फेटा आणि त्यात एकही गुठळी राहू देऊ नका
- प्रेशर कुकरमध्ये मीठ अथवा वाळू आधीच गरम करायला ठेवा
- एका ट्रेमध्ये अथवा नॉनस्टिक भांड्यात वरील मिश्रण पसरवा आणि कुकरमध्ये हे ठेवा
- कुकरला शिटी लाऊ नका आणि साधारण 25-30 मिनिट्स मंद आचेवर बेक होऊ द्या
- तुमचा केक तयार आहे हे टूथपिक घालून तुम्ही तपासून घ्या आणि मग बाहेर काढून 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि नंतर तुम्हाला हवं असल्यास, त्यावर चॉकलेट वितळवून घाला आणि खायला द्या
ख्रिसमससाठी मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी
एगलेस चॉकलेट स्पंज केक रेसिपी (Eggless Chocolate Sponge Cake Recipe)
स्पंज केक बनवणं हे काही कठीण काम नक्कीच नाही फक्त त्याचे तंत्र यायला हवे. ते कसं करायचे हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत
साहित्य
- अर्धा कप मैदा
- 1 कप साखर
- 3 चमचे कोको पावडर
- पाव कप व्हेजिटेबल ऑईल
- 1 कप थंड दूध
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- 1 चमचा पांढरे व्हिनेगर अथवा लिंबू रस
- चिमूटभर मीठ
कृती
- ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहिट करा आणि ट्रे ला व्हेजिटेबल ऑईल लाऊन ठेवा
- दूध, तेल, व्हॅनिला आणि व्हिनेगर साखरेसह व्यवस्थित मिक्स करून घ्या. व्हिनेगर मिक्स करताना दूध फाटणार नाही ना याची काळजी घ्या
- एका भांड्यात मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करा. तीन भांड्यात वेगवेगळ्या असलेल्या गोष्टी हळूहळू मिक्स करा. घाई करू नका. गुठळ्या ठेऊ नका
- व्हेजिटेबल ऑईल लाऊन ठेवलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण ओता आणि साधारण 30-40 मिनिट्सपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा.
चॉकलेट बनाना केक रेसिपी (Chocolate Banana Cake Recipe In Marathi)
बऱ्याच जणांना चॉकलेट बनाना केक आवडतो. पण तो कसा बनवायचा याची माहिती नसते. यासाठी लागणारे साहित्य कदाचित वेगळे असते असं वाटतं. पण असं काहीही नाही. तुम्ही घरातच हा केक बनवू शकता.
साहित्य
- 2 केळी
- पाऊण कप साखर
- ½ कप तेल
- 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- 1 चमचा पांढरे व्हिनेगर
- ½ कप मैदा
- ½ कप कोको पावडर
- 1 चमचा बेकिंग पावडर
- पाव चमचा बेकिंग सोडा
- पाव चमचा मीठ
- ½ कप पाणी
- पाव कप अक्रोड (बारीक कापलेले)
- 3 चमचे चॉकलेट चिप
कृती
- ब्लेंडरमध्ये केळी आणि साखर घालून पाणी न घालता वाटून घ्या
- हे बॅटर भांंड्यात काढून त्यात व्हिनेगर, व्हॅनिला आणि तेल घालून व्यवस्थित फेटा
- दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घालून नीट मिक्स करा
- हळूहळू केळ्याच्या बॅटरमध्ये मिक्स करा आणि गुठळ्या ठेऊ नका. हे भिजवताना पाणी घाला आणि हे बॅटर व्यवस्थित जाड राहील याची काळजी घ्या. त्यात अक्रोड मिक्स करा
- टीनला व्यवस्थित तेल लावा आणि हे बॅटर टीनमध्ये ओता त्यावर चॉकलेट चिप पसरवा
- ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहिट करा आणि त्यामध्ये हे ठेवा आणि साधारण 30-40 मिनिट्सपर्यंत ओव्हनमध्ये बेक होऊ द्या. टूथपिकने व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ते नीट तपासून घ्या आणि मग बाहेर काढा
मॉईस्ट चॉकलेट केक रेसिपी (Moist Chocolate Cake Recipe)
मऊसर चॉकलेट केक बघायला आणि खायला कितीही वय वाढलं तरी नक्कीच आवडतो. खरं तर असा मॉईस्ट चॉकलेट केक पाहिला रे पाहिला की तोंडाला पाणी सुटतं. हा केकदेखील तुम्ही घरी करू शकता.
साहित्य
- साधारण पावणेदोन वाटी मैदा
- 2 कप पिठी साखर
- पाऊण कप कोको पावडर
- दीड चमचा बेकिंग सोडा
- पाऊण चमचा मीठ
- 2 मोठी अंडी
- 1 कप ताक अथवा 1 चमचा पांढरे व्हिनेगर
- अर्धा कप वितळवलेले बटर
- 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- 1 कप गरम कॉफी
कृती
- ओव्हन 350 डिग्रीवर प्रिहीट करून ठेवा आणि 9 इंचाचे बेकिंग पॅन्स तेल लाऊन ठेवा
- एका मोठ्या भांड्यात मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, अंडी, ताक, व्हॅनिला आणि वितळवलेले बटर एकत्र करून साधारण 3 मिनिट्स फेटून घ्या. हे बॅटर अतिशय स्मूथ व्हायला हवे यात एकही गुठळी राहता कामा नये.
- त्यानंतर पॅन्समध्ये हे बॅटर पसरवा आणि साधारण 35 मिनिट्स बेक करा. टूथपिकने त्यानंतर बेक झाले आहे की नाही ते पाहा. अतिशय हळूवार हाताने तुम्ही हा केक रॅकमधून काढा आणि मग त्यावर सजावट करा
ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज (Cake Recipes For Christmas In Marathi)
सिंपल चॉकलेट केक रेसिपी (Simple Chocolate Cake Recipe)
काही जणांना केवळ चॉकलेट केक आवडतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुसरे पदार्थ अथवा सुका मेवा आवडत नाही. असा सिंपल चॉकलेट केक बनविण्याची रेसिपी
साहित्य
- 1 कप मैदा
- 1 कप कॅस्टर शुगर
- पाऊण कप कोको पावडर
- पाऊण कप वितळवलेले बटर
- अर्धा कप दूध
- 2 लहान अंडी (फेटलेली)
कृती
- ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहिट करा आणि ट्रे ला तेल अथवा बटर लाऊन बाजूला ठेवा
- सर्व साहित्य एकत्र करून नीट फेटून घ्या आणि मग टीनमध्ये घालून व्यवस्थित 35 मिनिट्स बेक करा. टूथपिकने त्यानंतर बेक झाले आहे की नाही ते पाहा.
- तुमचा सिंपल केक काही वेळातच तयार होतो
ट्रिपल चॉकलेट केक रेसिपी (Triple Chocolate Cake Recipe)
नुसतं चॉकलेट म्हटलं तरीही लगेच खावंसं वाटतं. जर ट्रिपल चॉकलेट एकाच केकमध्ये मिळणार असेल तर असा केक कधी एकदा समोर येतो आहे असं होतं. ट्रिपल चॉकलेट केकची सोपी रेसिपी
साहित्य
- 300 ग्रॅम बटर
- 150 ग्रॅम डार्क चॉकलेट (तुकडे केलेले)
- पाव किलो मैदा
- 30 ग्रॅम कोको पावडर
- 5 मोठी अंडी
- 300 ग्रॅम कॅस्टर शुगर
- 300 ग्रॅम फेटलेले क्रिम
- 4 चमचे दूध
- आयसिंगसाठी 150 ग्रॅम डार्क चॉकलेट (तुकडे केलेले)
- 150 मिली डबल क्रिम
- 100 ग्रॅम बटर
- 100 ग्रॅम आयसिंग शुगर
- दीड चमचा गोल्डन सिरप
- आयसिंगसाठी वेगळी 50 ग्रॅम आयसिंग शुगर
कृती
- 150 ग्रॅम डार्क चॉकलेट वितळवून घ्या आणि ओव्हन 190 डिग्रीवर प्रिहीट करून ठेवा
- एका भांड्यात मैदा, कोको पावडर, मीठ एकत्र करा त्यात अंडी फेटून घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. भांडं वेगळं ठेवा. एका मिक्सरमधून बटर आणि साखर मिक्स करून फेटून काढा. त्याला व्यवस्थित फेस येऊ द्या. त्यानंतर त्यात अंडी आणि क्रिम, दूध घालून पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या
- केक टिन्स वेगवेगळे करून घ्या. त्यात तिन्ही वेगवेगळे भाग करून व्यवस्थित एकमेकांवर ओतून घ्या
- साधारण 35 मिनिट्स बेक होऊ द्या. बाहेर काढल्यानंतर सुरीने स्पंजप्रमाणे आहे की नाही ते नीट तपासा
तीन वेगवेगळे टीन केकचे तयार होऊन आल्यावर थंड करायला ठेवा - दुसऱ्या भांड्यात चॉकलेट वितळवून घ्या आणि त्यात बटर आणि आयसिंग शुगर फेटून घ्या
- एक केक घेऊन त्यावर चॉकलेटचे मिश्रण लावा, मग त्यावर दुसरा केक आणि त्यावर पुन्हा आयसिंग शुगरचे मिश्रण आणि वर तिसरा केक असं करा आणि वर पुन्हा वेगळी आयसिंग शुगर आणि चॉकलेटचा थर लावा तुमचा केक तयार
नो बेक चॉकलेट केक रेसिपी (No Bake Chocolate Cake Recipe)
लहान मुलांना केक खूप आवडतो. पण सतत बेक पदार्थ देणं त्यांच्या पोटासाठी चांगलं नसतं. मग अशावेळी नो बेक चॉकलेट केक हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे
साहित्य
- 2 बोरबॉन चॉकलेट बिस्किट्स पॅकेट्स
- ½ कप पिठी साखर
- 1 चमचा इनो
- 2 चमचे तूप अथवा बटर
- दूध
- ½ किलो मीठ
- 1 व्हाईट अथवा ब्लॅक चॉकलेट बार
कृती
- मिक्सरमधून बोरबॉन बिस्किट्सचा चुरा करून घ्या
- एका कढईत अर्धा किलो मीठ गरम करायला ठेवा
- दुसऱ्या भांड्यात तूप आणि ओरिओचा चुरा मिक्स करून त्यात दूध घालून व्यवस्थित बॅटर बनवून घ्या. त्यात इनो आणि परत थोडं दूध घालून बॅटर थोडा वेळ तसंच ठेवा
- केक टिनमध्ये बटर पेपर घाला त्यात तूप लावा आणि वरून हे मिश्रण पसरवा
- मीठ गरम केलेल्या भांड्यात हे मिश्रणाचे भांडे ठेवा आणि साधारण 25-30 मिनिट्स मंद आचेवर बेक होऊ द्या
मध्ये मध्ये केक नीट फुगत आहे की नाही याकडे लक्ष द्या - बाहेर काढल्यावर नीट उलटा करा आणि मग त्यावर चॉकलेट बार लावून सजवा अथवा चॉकलेट वितळवून ओता
घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज
बेस्ट फजी चॉकलेट केक (Best Fudgy Chocolate Cake Recipe)
फजी चॉकलेट केक बनविण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो मात्र हा बनवणं कठीण नाही.
साहित्य
- साधारण पावणेदोन वाटी मैदा
- 2 कप पिठी साखर
- पाऊण कप कोको पावडर
- दीड चमचा बेकिंग सोडा
- पाऊण चमचा मीठ
- पाव चमचा व्हेजिटेबल ऑईल
- एक मोठे अंडे
- पाऊण कप दूध
- 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- पाऊण कप पाणी
- 2 चमचे इन्स्टंट कॉफी पावडर
- क्रीम
- चॉकलेट चिप
कृती
- ओव्हन 350 डिग्रीवर प्रिहीट करून ठेवा आणि 9 इंचाचे बेकिंग पॅन्स तेल लाऊन ठेवा
- एका मोठ्या भांड्यात मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, अंडी, ताक, व्हॅनिला आणि वितळवलेले बटर एकत्र करून साधारण 3 मिनिट्स फेटून घ्या. हे बॅटर अतिशय स्मूथ व्हायला हवे यात एकही गुठळी राहता कामा नये.
- साधारण 35 मिनिट्स बेक होऊ द्या. बाहेर काढल्यानंतर सुरीने स्पंजप्रमाणे आहे की नाही ते नीट तपासा
वरून फेटलेले क्रीम आणि चॉकलेट चिप लावा आणि तुम्हाला हवं असेल तर चॉकलेट अथवा न्यूटेलाचा वापरही करू शकता
चॉकलेट ट्रफल केक (Chocolate Truffle Cake Recipe)
चॉकलेट ट्रफल केक करण्यासाठी तुम्हाला केकची सोपी रेसिपी तर माहीत असतेच. त्यावरच तुम्हाला काही मॅजिक क्रिएट करायचं आहे.
साहित्य
- एगलेस चॉकलेट स्पंज केक
- 2 कप डार्क चॉकलेट (कापलेले)
- 1 कप फ्रेश क्रिम
- 4 चमचे साखर
- अर्धा कप पाणी
- गार्निशिंगसाठी पाव कप क्रिम
- किसलेले चॉकलेट
कृती
- चॉकलेट ट्रफल आयसिंगसाठी डार्क चॉकलेट नीट गरम करून वितळवून घ्या
- एगलेस चॉकलेट स्पंज केक दोन भागांमध्ये व्यवस्थित कापून ग्या
- प्लेटवर हे तुकडे ठेवा आणि वरून वितळलेले डार्क चॉकलेट ओता
- स्प्रेड करून त्यावर व्हाईट क्रिम लावा आणि किसलेले चॉकलेट टाका
- दुसरा थरही असाच लावा आणि मग केक थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा
- चॉकलेट जमल्यावर केक खायला द्या