हल्ली सगळ्यांचेच फॅमिली प्लॅनिंग असते. काम, पैसा, स्थिरता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच अनेक जण मुलं ठेवण्याचा विचार करतात. शारीरिक सुखापासून शरीराला लांब ठेवणे अशक्यच असते. अशावेळी तुम्ही मूलं नको म्हणून प्लॅनिंग करत असाल तर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गर्भधारणा होऊ नये किंवा गर्भधारणा थांबवण्यासाठी काही सोपे उपाय हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येऊ शकतात. जाणून घेऊया नको असलेली गर्भधारणा कशी टाळावी या संदर्भात उपयुक्त माहिती
गर्भधारणा थांबवण्यासाठी अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध असतात. पण त्या अपुऱ्या माहितीनिशी घेणे फारच चुकीचे आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला या संदर्भात थोडी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गर्भधारणा टाळण्यासाठी सगळ्यात आधी आणि सोपा असा उपाय सांगितला जातो तो म्हणजे ‘गर्भनिरोधक गोळ्या’. अगदी कोणत्याही केमिस्टमध्ये या गोळ्या सहज उपलब्ध असतात. वेगवेगळ्या ब्रँडमध्ये या गोळ्या आपल्याला मिळतात. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्राॅन नावाचे हार्मोन्स असतात जे महिलांच्या मासिक पाळीदरम्यान (ओव्हुलेशनदरम्यान) स्त्रीबीज तयार करतात त्यांना रोखण्याचे काम गर्भनिरोधक गोळ्या करतात.
अशा घ्याव्यात गर्भनिरोधक गोळ्या: अनेकांना गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्यायच्या याबाबत नेहमीच संभ्रम असतो. कारण या गोळ्या 21 आणि 28 गोळ्यांच्या पाकिटामध्ये मिळतात. जर तुम्ही 21 दिवसांचा कोर्स घेतला असेल तर पाळीच्या पाचव्या दिवसापासून तुम्हाला या गोळ्या घ्यायच्या असतात.28 गोळ्या असतील तर पाळीच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात. या गोळ्या बंद केल्यानंतर तुम्हाला लगेचच मासिक पाळी येते. या गोळ्या घेताना त्याचा दिनक्रम मोडू नका कारण त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.
डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा : गर्भधारणेच्या गोळ्या तुम्ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक असते. कारण या गोळ्यांमुळे तुम्हाला काही त्रासही होऊ शकतात. वजन वाढणं, मळमळणं, चक्कर येणं आणि डोकेदुखी असे त्रास तुम्हाला या काळात होऊ शकतात. गर्भनिरोधक गोळ्यांचा एक कोर्स संपल्यानंतर तो पुन्हा कधी सुरु करायचा हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात. त्यामुळेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असते.
पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा
थोडेसे प्रगत विज्ञान असे यास म्हणण्यास काहीच हरकत नाही. अनेक महिलांनी आतापर्यंत हा शब्द नक्कीच ऐकला असेल. आता व्हजायनल रिंगमध्येही तुम्हाला बरेच प्रकार मिळतात.गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही याचा वापर करु शकता. साधारण 1 वर्षापर्यंत एका रिंगचा उपयोग केला जाऊ शकतो.
असा केला जातो याचा वापर: गोल आकारात असलेली ही रिंग लावण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. तुमच्या व्हजायनाच्या आत ही रिंग लावण्यात येते. महिन्यातील मासिक पाळीचे दिवस वगळता उर्वरीत दिवसांसाठी ही रिंग लावली जाते. या रिंगची खासियत अशी की, या रिंगमधून एक विशिष्ट औषध तुमच्या शरीरात जाते. जे तुमचे स्त्रीबीज बनण्यास अडथळा निर्माण करते. यावर ‘सेजेस्टेरॉन एसिटेट’, ‘एथिनायल एस्ट्राडिओल’ ही औषध असतात. जी गर्भधारणा रोखण्यासाठी दिली जातात. पण यामध्येही 100 पैकी 97 टक्के गर्भधारणा थांबवण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यातही गर्भधारणा होण्याची थोडाफार धोका असतोच.
कंडोम हा शब्द उच्चारणेही अनेक महिलांना आजच्या काळातही व्यर्ज आहे. त्यात महिलांचे कंडोम वापरणे हे अनेक महिलांसाठी दूरवरची गोष्ट आहे. पुरुषांच्या कंडोमप्रमाणेच महिलांच्या योनीसाठीही खास कंडोम येते.त्याला फिमेल कंडोम असे म्हटले जाते. गर्भधारणा थांबवणे हा इतकाच याचा उपयोग नाही. तर सुखी वैवाहिक जीवनासाठीही हे महिलांचे कंडोम फायदेशीर असते.
कसा केला जातो या कंडोमचा वापर: फिमेल कंडोम घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी त्यांची एक्सपायरी तपासून पाहा. या कंडोममध्ये लहान आणि मोठ्या आकाराच्या रिंग्ज असतात. लैगिंक संदर्भादरम्यान पुरुषांचे वीर्य त्यामध्ये जमा होते. अशावेळी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक ते काढावे लागते. त्यामुळे गर्भधारणेचा धोका तर हमखास टळतो. पण त्यापेक्षाही तुम्हाला सेक्स दरम्यान होणारे कोणतेही इन्फेक्शन होत नाही. निरोगी आणि आनंदी सेक्स लाईफसाठी हे कंडोम फारच महत्वाचे असते.
‘प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा’ यासारखे काही गैरसमज आणि त्यामागील तथ्य
मासिक पाळीनंतरचा काळ हा गर्भधारणा करु इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा काळ असतो.कारण त्या दरम्यान तुमचा योनी मार्ग मोठा होता. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता अधिक असते. या कालावधी दरम्यान तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करणे योग्य नाही.तुम्ही असे करत असाल आणि योग्य काळजी घेत असाल तरी तुम्ही गरोदर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मासिक पाळीनंतर साधारण आठवडाभर तरी तुम्ही सेक्स करु नका.
गर्भधारणा थांबविण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग जर असेल तर तो म्हणजे कंडोमचा उपयोग. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. पण अनेकांना आजही कंडोमचा योग्य वापर करा करायचा असतो ते कळत नाही. एका रिसर्चनुसार 94 टक्के पुरुष हा कंडोमचा वापर चुकीचा करतात. त्यामुळे कंडोमचा योग्य वापर जाणून घेणेही फार गरजेचे आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर डॉक्टरांनाही तुम्ही या संदर्भात विचारणा करण्यास काहीच हरकत नाही.
कंडोम वापरताना टाळा या चुका :
तुमचे फॅमिली प्लॅनिंग पूर्ण झाले असेल आणि तुम्हाला या पुढे मूलं नको असेल तर त्यावर कायमचा उपाय म्हणून नसबंदीचा पर्याय दिला जातो. अनेक जण कोणतीही भीती मनात न बाळगता सेक्स करता यावे यासाठी नसबंदी करुन घेतात. पण या नसबंदीबद्दलही अनेकांच्या मनात फारच शंका असतात.
नसबंदी म्हणजे नेमके काय?: नसबंदी ही स्त्री- पुरुष दोघांनाही करता येते. अभ्यासानुसार महिला या नसबंदी अधिक करुन घेतात. तुलनेने पुरुष नसबंदी करायला फारसे पुढे येत नाही. महिला नसबंदीमध्ये बेंबीच्या खाली ओटीपोटातल्या गर्भनलिका बंद करण्यात येतात. यामध्येही बिनाटाक्याची शस्त्रक्रिया असते. जी झटपट होते. पण ऑपरेशन केल्यानंतर साधारण आठवडाभर आराम करणे फारच महत्वाचे असते. तर पुरुषांची शस्त्रक्रिया ही सोपी आणि पटकन होणारी असते. पुरुषाची नसबंदी केल्याने शुक्रपेशी वीर्यात येण्याचा मार्ग हा कायमचा बंद होतो. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता नसते पण तुम्हाला काही कारणास्तव ही शस्त्रक्रिया उलटवायची असेल तर ते देखील केले जाते. पण त्यासाठी तुम्ही योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.
समज गैरमसज : वर सांगितल्याप्रमाणे अनेक पुरुष नसबंदी करायला पाहात नाही यासाठी जबाबदार अशी आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषाने नसबंदी केली तर त्याची ताकद कमी होते. शिवाय पुरुषी अंहकारही दुखावला जातो असे निदर्शनास आले आहे.
भारतात सर्वात प्रसिद्ध असा गर्भधारणा थांबविण्याचा इलाज म्हणजे कॉपर टी. अनेक जाहिराती आणि समुपदेशनाच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती केली जाते.कॉपर टीच्या वापरामुळे तुम्हाला अनावश्यक गर्भधारणा टाळता येते. टी आकारात असलेले हे यंत्र तुमच्या योनी मार्गात येणाऱ्या वीर्याला गर्भाशयापर्यंत पोहोचू देत नाही. तुमच्या स्त्रीबीजापर्यंत वीर्याला जाऊ देत नाही. साधारण 5 वर्षांपर्यंत तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. पण कॉपर टी कोणी आणि कशी लावावी याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहेत
असा होतो कॉपर टीचा फायदा: आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कॉपर टी लावण्याचा सल्ला कोणाला दिला जातो? आई न झालेल्या महिला आणि मुलींना कॉपर टी लावण्यास सांगितले जाते. ज्या महिला गरोदर आहेत त्यांच्या शरीरात आधीच हार्मोनल बदल झालेले असतात. त्याच्या गर्भाशयाचे मुख हे मोठे झालेले असते. त्यामुळे प्रसुतीनंतर अशी महिला कॉपर टी बसवू शकते. प्रसूती न झालेल्या महिलेसाठी कॉपर टी अत्यंत धोकादायक आहे. कारण त्यामुळे कायमचे वंधत्व येण्याचा धोका असतो.
कॉपर टीचे दुष्परिणाम: एखादी नैसर्गिक क्रिया रोखताना त्रास होणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. कॉपर टीच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. तुम्ही कॉपर टी दरम्यान तुमचे सेक्स लाईफ छान आनंदात घालवू शकता. याचा मुळीच त्रास होत नाही. पण जर कॉपर टीच्या दोऱ्याचा त्रास तुम्हाला होण्याची भीती असेल तर हा त्रास तुम्हाला सहज होत नाही. जर ही जागा स्वच्छ करताना तुम्ही जर कॉपर टी आत ढकलायचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हाताने आत किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न मुळीच करु नका. डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. त्याचा अवलंब करा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.
जन्म नियंत्रण रोपण ही आणखी एक महत्वपूर्ण पद्धत आहे. याबद्दल अनेकांना नक्कीच माहिती नसेल कारण ही गोष्ट तुम्ही सगळ्यांचाच बोलण्यात ऐकली नसेल. जन्म नियंत्रण रोपण हे तुमच्या योनी मार्गावर लावले जात नाही. तर ते तुमच्या हाताच्या दंडावर लावले जाते. माचिसच्या एका काडीइतके ते असते. यामध्ये तुमच्या गर्भधारणेला रोखणारे घटक असतात.
कसे लावले जाते जन्म नियंत्रण रोपण: जन्म नियंत्रण रोपण म्हटल्यावर अनेकांना हे मोठ ऑपरेशन तर नाही ना असे वाटेल. पण ही भीती मनातून पहिल्यांदा काढून टाका. कारण ते असे काहीही नाही. अगदी 5 मिनिटामध्ये ते होते. तुमच्या डाव्या हाताच्या दंडामध्ये ते लावले जाते. त्यासाठी तुम्हाला तेवढ्या भागात भूल दिली जाते आणि एका विशिष्ट मशीनच्या साहाय्याने त्याचे रोपण केले जाते. याचे रोपण केल्यानंतर तुम्हाला काही त्रास होणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येणे, डोकेदुखी, थकवा काही काळासाठी जाणवू शकतो. या काडीसारख्या रोपणातून गर्भनिरोधक औषधांचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे ही पद्धतही तुम्ही अवलंबू शकता.
1. नसबंदी खूप दुखते का?
हो, नसबंदी केल्यानंतर तुम्हाला काही शारीरिक तक्रारी जाणवतात. तुम्ही लगेचच काम करु शकत नाही. तुम्हाला साधारण आठवडाभर तरी यामध्ये आराम करणे गरजेचे असते. पण हल्ली महिलांच्या नसबंदीमध्ये विनाटाक्याची शस्त्रक्रियाही आहे.त्यामुळे तुम्हाला मुळीच त्रास होत नाही. पण काही महिलांच्या अनुभवानुसार काही काळ तरी याचा त्रास जाणवतो.
2. नसबंदीचे 3 वेगवेगळे प्रकार कोणते?
महिला नसबंदी करण्याच्या तीन पद्धती आहेत. Tubal Ligation, Tubal Implants, or a Hysterectomy अशा या तीन पद्धती सर्वसाधारणपणे केल्या जातात.
3. गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो का?
गर्भधारणेसंदर्भात कोणतेही पाऊल उचलताना तुम्हाला योग्य सल्ला घेणे आवश्यक असते. प्रत्येकाची शरीरप्रवृत्ती वेगळी असते त्यानुसारच तुम्हाला औषधांटचे सेवन करणे आवश्यक असते.
*गर्भधारणा कशी टाळावी यासंदर्भातील सोपे उपाय तुम्हाला आता माहितीनिशी नक्कीच कळले असतील. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही नक्की या उपयोगात आणा