बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या डोळ्यांनी जिंकली आहेत अनेकांची मनं

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या डोळ्यांनी जिंकली आहेत अनेकांची मनं

‘डोळे हे जुल्मी गडे’..;; डोळ्यांचे सौंदर्य शब्दात व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे अनेक कविता, उपमा आणि गाणी आहेत. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्यासाठी, अभिनयासाठी ओळखल्या जातात. पण त्याचसोबत काही अशा अभिनेत्री आहेत. ज्यांचे डोळे फारच सुंदर आहेत. त्यांच्या सौंदर्यांबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांचा नेहमी उल्लेख केला जातो. आज आपण अशाच काही अभिनेत्री पाहणार आहोत ज्याचे डोळे हे फारच सुंदर आहे. त्यांच्या सुंदर डोळ्यांमुळेच त्यांचा अभिनय पडद्यावर अधिक उठून दिसतो. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्री

सुंदर असूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करु शकल्या नाहीत या अभिनेत्री

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

Instagram

सगळ्यात आधी ज्या अभिनेत्रीचे नाव घेतले जाते. ते म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. निळ्या डोळ्यांमुळे ऐश्वर्या नेहमीच बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींमध्ये उठून दिसते.  भारतात आतापर्यंत चॉकलेटी, करड्या रंगाच्या डोळ्यांचा रंग पाहिला असेल. पण ऐश्वर्याच्या डोळ्यांच्या वेगळ्या रंगामुळे ती अगदी लहानपणापासूनच कायम वेगळी दिसत आली आहे. मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकल्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या घरोघरी पोहोचलेली ऐश्वर्या आणि तिच्या कमालीच्या सुंदर डोळ्यांमुळे तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. आजही तिच्या डोळ्यांचे चाहते आहेत. 

काजोल (Kajol Devgn)

Instagram

खळखळून हसणारी आणि सौंदर्याची खाण असलेल्या काजोलच्या अभिनयाची, सौंदर्याची जितकी तारीफ करु तितकी कमीच आहे. काजोलच्या डोळ्यांचा रंगही वेगळा आहे. तिचा चेहरा पाहताना आपले लक्ष तिच्या डोळ्यांवर सगळ्यात आधी जाते. तिचे डोळे चॉकलेटी असून ते करड्या रंगाकडे झुकणारे आहेत. डोळ्यांचा टपोरा आकारच अनेकांना काजोलकडे आकर्षित करतो. त्यामुळे सुंदर डोळ्यांच्या अभिनेत्रींमध्ये काजोलचे नाव अगदी हमखास घेतले जाते. 

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)

Instagram

दीपिका पदुकोणच्या सौंदर्याची तारीफ करावी तितकी कमीच आहे. दीपिकाच्या डोळ्यांचा रंगही फार वेगळा आहे.  तिच्या डोळ्यांचा रंग साधारण तांबूस रंगाचा असून तिच्या बोलक्या डोळ्यांमुळे ती अधिकच सुंदर दिसते. दीपिका पदुकोणचा डोळ्यांचा मेकअपही अनेकदा वेगळा असतो. त्यामुळे तिच्या डोळ्यांकडे चटकन लक्ष जाते. दीपिकाच्या याच सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. 

मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी या अभिनेत्री करत होत्या बी ग्रेड चित्रपटात काम

करीना कपूर (Kareena Kapoor)

Instagram

सौंदर्याची तारीफ होतेय आणि करीना कपूरचे नाव घेतले जाणार नाही असे होणार नाही.  तिच्या डोळ्यांचा रंगही फार वेगळा आहे. मुळात कपूर घराण्यात प्रत्येकाच्या डोळ्यांचा रंग हा थोडा वेगळाच आहे. करीनाची बहीण करिश्मा कपूर हिचे सुंदर डोळे हा कायमच प्लस पॉईंट होता आणि करीनाचाही. करीनाच्या डोळ्यांचा रंग हिरव्या रंगाकडे झुकणारा आहे. तिचे डोळेही नेहमीच आकर्षित करतात.

कतरिना कैफ (Katrina Kaif)

Instagram

अभिनयाच्या बाबतीत इतर अभिनेत्रींच्या तुलनेत कतरिना थोडीशी मागे असली तरी तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहे. तिचा चेहरा इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फारच वेगळा आहे. तिचे डोळे तुम्ही नीट निरखून पाहिले तर तिच्या डोळ्यांचा रंग हा थोडासा फिक्कट चॉकलेटी रंगाकडे झुकणारा आहे.  तिच्या गडद भुवया आणि  खोल अशा डोळ्यांमुळे ती नेहमीच वेगळी दिसते.  


तर आज आपण पाहिल्या बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री ज्यांचे डोळेच त्यांच्या सौंदर्याची खरी ओळख आहे. 

 बॉलीवूड सेलिब्रेटीज जे आहेत अजूनही अविवाहित