ADVERTISEMENT
home / आरोग्य
स्वयंपाक करताना त्वचा भाजली तर करा हे नैसर्गिक उपाय

स्वयंपाक करताना त्वचा भाजली तर करा हे नैसर्गिक उपाय

स्वयंपाक करताना अथवा इतर काही गोष्टींमुळे त्वचा भाजली अथवा पोळली तर त्यावर लगेच उपाय करायला हवेत. कारण जखम लहान असो वा मोठी भाजल्यामुळे तिथे जळजळ, दाह आणि वेदना तर होणारच. जर तुमची त्वचा फक्त पोळली असेल तर यामुळे तुमच्या त्वचेच्या वरच्या थरावर दुखापत होते. मात्र जर त्वचा अती प्रमाणात भाजली असेल तर त्वचेच्या मुळापर्यंत याचा त्रास जाणवतो. त्यामुळे जर जखम खोलवर झाली असेल तर सर्वात आधी डॉक्टरांकडून उपचार घ्या. मात्र किरकोळ अथवा फक्त पोळण्यामुळे झालेली त्वचेवरील जखम तुम्ही घरातच काही उपाय करून बरी करू शकता. यासाठी जाणून घ्या हे नैसर्गिक उपाय

थंड पाण्याखाली जखम धरा –

कोणत्याही भाजलेल्या त्वचेला जास्त दुखापत होऊ नये यासाठी हा प्रथमोपचार करणं नक्कीच फायद्याचं ठरतं. त्यामुळे जर स्वयंपाक करताना तुमची त्वचा भाजली तर सर्वात आधी नळाखाली तो भाग धरा. पंधरा ते वीस मिनीटे जखम पाण्याखाली स्वच्छ केल्यावर ती कॉटन पॅडने कोरडी करा. त्यानंतर त्यावर एखादे मलम लावा. ज्यामुळे जखम चिघळणार नाही अथवा त्या भागावर सूज येणार नाही. तुम्ही जखमेवर बर्फ  लावून ती शेकवू शकता. ज्यामुळे त्वचेखालील रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि इतर भाग सुरक्षित राहील.

ADVERTISEMENT

नारळाचे तेल –

प्रत्येकाच्या घरात नारळाचे तेल असतेच. नारळाचे  तेल त्वचेच्या कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे जर तुमची त्वचा छोट्या प्रमाणावर भाजली असेल तर त्यावर शुद्ध नारळाचे तेल लावा. कारण यामध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे तुमची त्वचा लवकर बरी होऊ शकते. नारळाचे तेल अॅंटि फंगल असल्यामुळे यामुळे जखमेवर होण्याऱ्या इनफेक्शनचा धोका टाळता येतो. 

अॅपल सायडर व्हिनेगर-

व्हिनेगरमध्ये त्वचेचा दाह कमी करणारे घटक असतात. त्यामुळे तुम्ही भाजलेल्या अथवा पोळलेल्या त्वचेवर व्हिनेगर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेला जखमेमुळे होणाऱ्या वेदना, दाह, खास कमी होऊ शकते. यासाठी कॉटनपॅडवर एक चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि तो त्वचेवर फक्त डॅब  करा. 

ओट्स-

ओट्समध्ये त्वचेला थंडावा देणारे घटक असतात. ज्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो. त्यामुळे भाजलेली त्वचा बरी करण्यासाठी ओट्स फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी  घ्या आणि त्यामध्ये एक कप ओट्स टाका. वीस मिनीटे ते पाण्यामध्ये चांगले भिजू द्या. हा पॅक तुमच्या जखमेवर लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल आणि खाज कमी होईल. नियमित हा उपाय करून तुम्ही तुमची पोळलेली त्वचा बरी करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवरील भाजलेले व्रणही कमी होतील. 

ADVERTISEMENT

जखमेवर दूध लावा –

दुधामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेला योग्य पोषण मिळते हे तर तुम्हाला माहीतच असेल. मात्र एवढंच नाही तर यामुळे तुमची पोळलेली त्वचा बरी देखील होऊ शकते. यासाठी फुल फॅट दूध अथवा दुधाची साय तुमच्या जखमेवर लावा. ज्यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल आणि त्वचा हायड्रे़ट राहील. 

मिंट टुथपेस्टने करा जखम बरी –

हा उपाय ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हा एक उत्तम उपाय आहे. कारण यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. जर गरमपाणी अथवा चटका लागल्यामुळे तुमची त्वचा पोळली असेल तर त्यावर तुम्ही पुदिन्याची टुथपेस्ट लावू शकता. घरच्या घरी करण्यासारखा हा एक उत्तम उपाय आहे. 

ADVERTISEMENT

नेहमीच प्राथमिक उपाययोजना करणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे घरातच त्वरीत हे उपाय करा ज्यामुळे तुमच्या भाजलेल्या त्वचेचं अधिक नुकसान होणार नाही. मात्र जर जखम गंभीर असेल तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

भाताच्या पेजेचा करा आरोग्यासाठी उपयोग, वाढवा ऊर्जा

या पदार्थांच्या सेवनामुळेही होऊ शकतो अॅसिडिटीचा त्रास

ADVERTISEMENT
12 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT