ADVERTISEMENT
home / आरोग्य
लिपस्टिक लावण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)

लिपस्टिक लावण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)

काही जणांसाठी लिपस्टिक (Lipstick) हा अगदी आवडीचा विषय. मेकअप पाऊचमध्ये कितीही लिपस्टिकच्या शेड असल्या तरी अजून एक अजून एक म्हणत आपण लिपस्टिकचे प्रकार आणि वेगवेगळे शेड्स घेत असतो. लिपस्टिक लावण्याची आवड आणि ओठ सुंदर दिसण्याची हौस जरी चांगली असली तरी देखील लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणामही आहेत. हे दुष्परिणाम तुम्हाला माहीत हवेत. तुम्ही जर लिपस्टिकचा वापर सासत्याने करत असाल तर तुम्ही तुमची ही सवय बदलून योग्य त्यावेळीच लिपस्टिकचा वापर करण्याची सवय लावायला हवी.तुम्हीही लिपस्टिकचा वापर सतत करत असाल तर तुम्हाला दुष्परिणामांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणाम

तुमच्या लिपस्टिकमध्ये नेमकं असतं तरी काय? (What Lipstick Contains?)

लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणाम

Instagram

ADVERTISEMENT

लिपस्टिकचे वेगवेगळे रंग आणि टेक्शचर पाहिले की अनेकांचे मन त्याकडे आकर्षित होते. हल्ली इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक आल्या आहेत की, त्याचा सुंगध,रंग, टेक्शचर आपल्याला प्रेमात पाडण्यास भाग पाडते. तुमच्या लिपस्टिकमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर लिपस्टिकमध्ये पिग्मेंट(Pigments), तेल (Oils), वॅक्स (Waxes), इमोलिएंटस (Emollients), लिप बाम (Lip Balm), लीड (Lead) असते. यामधील काही घटक एकमेकांना पोषक जरी असले तरी देखील त्याचे प्रमाण प्रत्येक लिपस्टिकमध्ये कमी जास्त प्रमाणात असते.  कोणत्याही चांगल्या ब्रँडची लिपस्टिक असली तरी देखील तुम्हाला त्यामध्ये या गोष्टींचे प्रमाण हे वेगवेगळे असते. त्यामुळेच लिपस्टिकच्या सातत्याच्या वापरामुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतात. ते दुष्परिणाम किंवा शारीरिक त्रास कोणते ते आता आपण जाणून घेऊया. चला करुया सुरुवात

परफ्युम लावत असाल तर तुम्हाला माहीत हवेत त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Perfume)

लिपस्टिक लावण्याचे हे आहेत दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)

लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणाम - Side Effects Of Lipstick In Marathi

ADVERTISEMENT

Instagram

लिपस्टिकमध्ये अनेक हानिकारक केमिकल्सचा समावेश असतो. त्याचा त्रास अप्रत्यक्षरित्या तुमच्या आरोग्यावर होतो. तुम्ही लिपस्टिकचा अति वापर करत असाल तर तुम्हाला लिपस्टिकचे दुष्परिणाम माहीत हवेत.

जाणून घ्या केसतोडवर घरगुती उपाय (Home Remedies For Hair Follicle Boils In Marathi)

शरीरात विषारी घटक वाढतात (Increase Toxic Ingestion)

लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल्स तुमच्या ओठांचे सौंदर्य जरी वाढवत असले तरी देखील त्यामधील काही हानिकारक घटक विषारी असतात. उदा. लिपस्टिकमध्ये लीड असते. या शिवाय bismuth oxychloride असते जे विषारी असते. तुमच्या शरीरासाठी ते घातक असतात. या व्यतिरिक्त यामध्ये असलेले केमिकल्स तुमच्या शरीरात विषारी घटक वाढवतात. ज्यावेळी तुम्ही सतत लिपस्टिक लावता त्यावेळी तुमच्या शरीरात केमिकल्सचे घटक वाढत असतात. तुम्ही पाणी पिताना किंवा खाताना याचा सतत वापर करत असाल तर तुम्हाला शरीरात लिपस्टिक जात राहते आणि ती कालांतराने परिणाम करते.त्यामुळे तुम्ही लिपस्टिकचा वपर करताना अगदी जपून करायला हवा.

ADVERTISEMENT

मज्जासंस्थेवर परिणाम (Effects On Nervous System)

लिपस्टिकचा परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवरही होतो. लिपस्टिक तुमच्या शरीरात सतत जात राहिले तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवर होतात. लिपस्टिकमध्ये असलेले लीड जास्त प्रमाणात पोटात गेले तर तुम्हाला पोटांमध्ये ट्युमर होण्याची शक्यता असते. लीडमध्ये न्युरोटॉक्झिन नावाचा हानिकारक घटक असतो. जो या लीडच्या माध्यमातून तुमच्या शरीरात जातो आणि तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. जर तुम्ही अगदी स्वस्त मस्त अशा लिपस्टिकचा वापर करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये असलेले लीडचे प्रमाण जास्त असेल तर ते तुमच्या शरीरासाठी अधिक घातक ठरु शकतात.

कॅन्सरची वाढवते शक्यता (Causes Cancer)

लिपस्टिक टिकवण्यासाठी त्यामुळे अनेक प्रिझरव्हेटिव्ह घातले जातात. शरीरासाठी अत्यंत घातक असे पॅराबिन आणि formaldehyde हे घटक त्यामध्ये असतात. लिपस्टिक तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये जाते. तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये जाऊन तुम्हाला काही आजार जडावण्याची शक्यता असते. त्यामध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचाही समावेश आहे. लिपस्टिकच्या एका वापरानंतर तुम्हाला लगेचच हा त्रास जाणवणार नाही. पण अनेक अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की, लिपस्टिकमधील केमिकल्स शरीरावर असा परिणाम तरतात की, तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

सौंदर्य आणि आरोग्यासाठी ठरतं कॅस्टर ऑईल वरदान

वाढीवर करते परिणाम (Growth is Affected)

लहान मुलांना लिपस्टिक हौस म्हणून लावत असाल तर लहान मुलांना लिपस्टिक लावू नका. शिवाय गरोदर महिलांनीही लिपस्टिक लावू नये. कारण लिपस्टिकच्या हानिकारक घटकांमुळे बाळाची बाढ खुंटू शकते. त्यामुळे लहान मुलांना किंवा गरोदर असताना तुम्ही लिपस्टिकचा मुळीच वापर करु नका. कारण ते तुमच्या बाळासाठी आणि त्याच्या वाढीसाठी चांगले नसते. तुम्ही कितीही चांगल्या प्रतीची लिपस्टिक वापरत असाल पण त्याचा परिणाम तुमच्या बाळावर होऊ शकतो. म्हणून काही गोष्टींची खबरदारी म्हणून तुम्ही लिपस्टिकचा वापर या कालावधीत टाळायला हवा. 

ADVERTISEMENT

मूत्रपिंड होऊ शकते निकामी (Renal Failure)

लिपस्टिकमध्ये अनेक हानिकारक घटक असतात. जसे की, कॅडिअम (cadmium), मॅग्नेशीअम (magnesium) आणि क्रोमिअम (chromium) हे घटक शरीरासाठी फारच हानिकारक असतात. जे तुमचा एखादा अवयव निकामी करु शकता. जर लिपस्टिकमध्ये कॅडिअम (Cadium) प्रमाण जास्त असेल तर मूत्रपिंड रिकामी होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त लिपस्टिकमुळे तुम्हाला पोटाचा ट्युमर किंवा पोटाचे इतर त्रास होण्याचीही शक्यता असते. 

ह्रदय आणि मेंदूवर करते परिणाम (Affects Heart And Brain)

आपल्या शरीरात लीड (Lead) हे वेगवेगळ्या माध्यमातून जात असते. हवा, पाणी आणि श्वसानाच्या माध्यमातून कळत नकळतपणे शरीरात लीड जात असते. लिपस्टिकमध्ये असलेले लीडही तुमच्या शरीरात असेच कळत नकळत जात असते. तुम्ही सातत्याने लिपस्टिक लावत असाल तर लिपस्टिकमधील लीड तुमचे शरीर शोषून घेते. लीड शरीरात गेल्यामुळे तुमच्या रक्ताला अडथळा निर्माण होतो. तुमच्या ह्रदयावर आणि मेंदूवर लीड परिणाम करते. त्यामुळे याचा वापर तुम्ही अगदी योग्य पद्धतीने करायला हवा. 

स्तनांचा कर्करोग (Breast Cancer)

लिपस्टिक मधील अनेक हानिकारक घटक असतात. जे कॅन्सरसारखे गंभीर आजार तुम्हाला देऊ शकतात. महिलांना कॅन्सरमध्ये सर्वाधित जास्त भीती असते ती म्हणजे स्तनांच्या कॅन्सरची. लिपस्टिकमध्ये असणारे प्रीझरव्हेटिव्ह तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात गेले तर कॅन्सरची शक्यता अधिक बळावते. विशेषत: स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता यामध्ये जास्त असते.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

तुम्हाला पडलेत का प्रश्न

Instagram

1. जुन्या लिपस्टिकचा वापर करणे हनिकारक असते का? 

मेकअप किंवा कॉस्मेटिक्सचे कोणतेही साहित्य वापरताना तुम्ही एक्सपायरी पाहणे फारच गरजेचे असते. एखाद्या वस्तूवर लिहिलेली एक्सपायरी ही त्या वस्तू कधी खराब होतील याचा संकेत देत असते. कॉस्मेटिक्स जुने झाल्यानंतर त्यामधील हानिकारक केमिकल्स विपरीत परिणाम दाखवू लागतात. जुन्या झालेल्या लिपस्टिकचे वॅक्स विरघळू लागते. त्यावर पाणी साचू लागते. तुमचे प्रोडक्ट जुने झाले की नाहीत हे तुम्हाला कळत नसतील तर तुम्हाला या काही गोष्टी माहीत हव्यात जेणेकरुन तुम्हाला तुमचे प्रोडक्ट जुने झाले की नाही ते कळेल.

ADVERTISEMENT

2. गरोदर महिलांनी लिपस्टिक लावू नये का? 

लिपस्टिक ओठांवर जरी लावत असलो तरी ती ओठांवाटे पोटांमध्ये जाण्याची शक्यता असते. बाळाच्या वाढीसाठी लिपस्टिकमध्ये असलेले काही घटक घातकी असतात. त्यामुळेच गरोदर महिलांनी त्यांच्या या काळात लिपस्टिक शक्यतो लावू नये.जर तुम्हाला लिप बाम लावायचा असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता. 

3. लिपस्टिकचा जास्त वापर केल्यामुळे ओठ काळे होऊ शकतात का? 

अनेक कारणांमुळे ओठ हे काळे पडतात. पिग्मेंटेशन,उन, टुथपेस्टची रिअॅक्शन यामुळेही ओठ काळे पडतात. लिपस्टिकही ओठ काळे पडण्याचे एक कारण आहे. लिपस्टिकचा अति वापर तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याचा वापर टाळा. लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही ते योग्यपद्धतीनेही काढणेही तितकेच गरजेचे असते. तुम्हाी एखाद्या समारंभासाठी लिपस्टिक लावत असाल ती ओठांवरुन निघून गेली असे जरी तुम्हाला वाटत असले तरी ओठांवर असलेल्या बारीकबारीक सुरकुत्यांमध्ये लिपस्टिक अडकून राहते. अशावेळी योग्य अशा मेकअप क्लिनझरचा उपयोग करुन तुम्ही ती लिपस्टिक काढायलाही हवी. 

ADVERTISEMENT

आता तुम्ही लिपस्टिकचा वापर करत असाल तर तुम्हाला लिपस्टिकचा वापर करताना काही गोष्टींची काळजी ही घेता यायली हवी. तरच तुम्हाला लिपस्टिकचे होणारे दुष्परिणाम टाळता येतील. 

10 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT