Table of Contents
दारू एक उत्तेजक पेय आहे जे फळ, फूल आणि अनेक सुक्या मेव्याच्या रसांपासून बनविण्यात येते. बाजाराममध्ये अनेक प्रकारच्या दारू उपलब्ध आहेत, जसे व्हिस्की, रम, व्होडका, वाईन, बिअर इत्यादी. आपल्या वाईन फेशियलदेखील माहीत आहे. कदाचित सौंदर्यासाठी याचा जास्त चांगला फायदा होतो. पण दारू प्यायल्यानंतर एक वेगळी नशा अनुभवली जाते आणि त्यामुळे बरेच जण दारू पितात. बऱ्याच जणांना असे वाटते की दारूमध्ये अशी नशा आहे जी आपल्याला एका वेगळ्या दुनियेचा अनुभव देते. दारू प्रमाणात प्यायली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. पण अधिक प्रमाणात दारूचे सेवन हे नक्कीच चांगले नाही. त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. खरं तर अधिक प्रमाणातील दारू ही शरीरासाठी अत्यंत घातक ठरते (side effects of alcohol). सुरूवातीला मजा म्हणून दारू प्यायली जाते. पण नंतर दारू हीच प्राथमिकता होते आणि हळूहळू दारूच्या आहारी माणूस जाऊ लागतो. असे अनेक किस्सेही ऐकू येतात जिथे दारूमुळे घरदार उद्धस्त झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अथवा अनेक जण देशोधडीला लागले आहेत. हा तर दारूचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम आहे. पण दारूमुळे नक्की शरीरावर काय वाईट परिणाम होतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत. अगदी लघुकाळ आणि दीर्घकाळ असे दोन्ही परिणाम शरीरावर दारूमुळे होत असतात.
अति दारू सेवनाची लक्षणे (Symptoms Of Drinking Excessive Alcohol In Marathi)
Shutterstock
दारूची अति मात्रा शरीरामध्ये बराच बदल घडवते. शरीराच्या अनेक समस्या यामुळे उद्धवतात. दारू अतिप्रमाणात प्यायल्याने त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतात. आपण दारूचे सेवन अधिक करत आहोत याची नक्की लक्षणं कशी समजावीत ते जाणून घेऊया. या लक्षणाची जाणीव होऊ लागल्यावर तुम्ही समजायला हवे की तुम्हाला दारूचा डोस अति होत आहे आणि तुमचे शरीर आता दारू सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणे आवश्यक आहे आणि दारू सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. दारू पिण्याचे दुष्परिणाम काय आहेत पाहूया.
- मानसिक स्थिती ढासळायला लागणे
- उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होणे
- शारीरिक असंतुलन
- दारू प्यायल्यावर लगेच उलटी होऊ लागणं
- सतत भीती वाटणं
- दारू पिऊन बेशुद्ध पडणं
- हृदयाचे ठोके अनियमित येणं
- अति घाम येणे
दारूचे त्वरीत होणारे दुष्परिणाम (Short Term Side Effects Of Alcohol In Marathi)
दारूचा अर्थात अल्कोहोलचा प्रभाव शरीरावर तुम्ही पहिला घोट घेता तेव्हापासूनच व्हायला लागतो. दारूचे सेवन तुम्ही जसे करता ती तुमच्या रक्तात मिसळायला सुरूवात करते आणि निर्जलीकरणाचे महत्त्वाचे कारण ठरते. पण जेव्हा तुम्ही चरबीयुक्त जेवणासह अथवा पदार्थसह दारूचे सेवन करता तेव्हा मात्र ही रक्तात लगेच मिसळत नाही. तुम्ही खाण्यासह दारू पित असाल तर त्वरीत रक्तात मिसळत नाही. याचा कमी प्रभाव पडतो. अल्कोहोल मुळे हृदयाची समस्या, यकृत समस्या आणि स्त्रियांमध्ये वारंवार लघवी होणे देखील होते. पण तुम्ही रोज जर दारू जास्त प्रमाणात पित असाल तर दारू पिण्याचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे शरीरावर होतात.
वाचा – Varicose Veins Home Remedies In Marathi
हृदयावर होतो परिणाम (Heart Problem)
Shutterstock
अति दारूचा सर्वात पहिला परिणाम होतो तो हृदयावर. यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका निर्माण होतो. तसंच अति दारू पित असल्यास, हृदयविकाराचा झटका लवकर येण्याची शक्यता असते. हे त्रास होत असताना उच्च रक्तदाब असल्यास, जाणवत नाही आणि त्यामुळे पटकन जीव जाण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे दारूचे नियमित सेवन करत असल्यास, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला हवे अन्यथा लहान वयात तुम्ही तुमचा जीव गमावू शकता. दारू पिण्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.
मूत्रपिंड होते निकामी (Kidney Problem)
हृदयानंतर सर्वात जास्त परिणाम होतो तो यकृतावर. आपण बरेचदा ऐकतो की, किडनी फेल झाली आणि माणसाचा मृत्यू ओढवला. दारूमुळे सर्वात जास्त परिणाम किडनी अर्थात मूत्रपिंडावर होत असतो. जास्त दारू प्यायल्याने जास्त मूत्र निर्माण होते आणि त्यामुळे मूत्रपिंडावर जास्त दबाव पडतो आणि सतत दारूचे सेवन केल्यास, मूत्रपिंड त्याचा भार झेलू शकत नाही आणि काही काळानंतर त्याचा दबाव अति पडून मूत्रपिंड निकामी होते. काम करणे बंद झाल्यामुळे साहजिकच मृत्यू ओढावला जातो. दारू पिण्याचे दुष्परिणाम होण्यात याचा सर्वात मोठा वाटा आहे.
यकृतावरही होतो परिणाम (Liver Problem)
दारूचा यकृतावर प्रत्यक्ष अर्थात डायरेक्ट परिणाम होत असतो. कारण दारू सर्वात पहिल्यांदा पोहचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण अल्कोहोलचे अर्थात दारूचे 90% विघटन हे लिव्हरमध्ये अर्थात यकृतामध्ये होत असते. त्यामुळे तुम्ही जितके अधिक दारूचे सेवन करत तितका भार यकृतावर येऊन यकृत पटकन निकामी होऊ शकते. तुमच्या यकृताला दारूमुळे पटकन हानी पोहचू शकते आणि त्यामुळे त्याचा त्वरीत दुष्परिणाम यकृतावर झालेला दिसतो आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
रक्तामध्ये साखर कमी होणे (Pancreas Problem)
रक्तामध्ये नेहमी विशिष्ट प्रमाणात साखरेचे प्रमाण असणे महत्त्वाचे आहे. पण जास्त दारूचे सेवन केल्यास, त्याचा परिणाम शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी होण्यात होतो. ज्याला हायपोग्लाईसेमिया असं म्हटलं जातं. याचा अग्नाशयावर परिणाम हतो आणि साखर कमी झाल्याने तुम्हाला थरथरणे आणि बेशुद्ध पडण्यासारखी समस्या निर्माण होते. इतकंच नाही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास, मेंदूवरही परिणाम होऊन तुमची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दारूचे अति सेवन करणे हे घातक ठरते.
सेक्स लाईफवरही होतो दुष्परिणाम (Sexual Health Problem)
Shutterstock
सतत दारू प्यायलाने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि त्याचा प्रभाव सेक्स लाईफवर होतो. यामुळे मुलांमध्ये वीर्य उत्सर्जन (sperm) लगेच होते आणि अशावेळी गर्भधारणा लवकर होण्याची भीती राहते. तर महिलांच्या बाबतीत अति दारू प्यायल्याने सेक्स न करण्याची इच्छा अधिक बळावते. तसंच तुम्ही दारू प्यायल्याने अशा नशेत असता की, सेक्सचा आनंद घेऊच शकत नाही. तुम्हाला नक्की आपलं शरीर आणि मेंदू काय काम करत आहे याचं ताळमेळ राहात नाही. दारू पिण्याचे दुष्परिणाम फारच वाईट सिद्ध होतात.
दारूमुळे कायमस्वरूपी राहणारे दुष्परिणाम (Long Term Side Effects Of Alcohol In Marathi)
दारू प्यायल्याने आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. काही परिणाम हे त्वरीत होतात तर काही परिणाम हळूहळू होत जातात आणि ते कायमस्वरूपी आपलं शरीर निकामी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे परिणाम आपल्या नकळत घडत जातात आणि कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. असे नक्की शरीराच्या कोणत्या भागावरदारू पिण्याचे दुष्परिणाम होतात ते आपण जाणून घेऊया.
प्रतिकारशक्तीसाठी हानिकारक (Harmful To Immune System)
दारू प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती प्रणाली बिघडते. प्रतिकारशक्ती हे आपल्या शरीराचे सुरक्षा कवच आहे. जे आपल्याला बाहेरील व्हायरस, बॅक्टेरिया या सर्वांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. पण अत्याधिक दारू सेवनामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोणत्याही रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते आणि अधिकाधिक रोग शरीराशी जोडले जातात. तसंच त्यातून पटकन बरे होता येत नाही कारण त्या रोगांशी लढण्यासाठी तुमच्यामध्ये प्रतिकारशक्ती शिल्लकच नसते. त्यामुळे त्याचा पटकन परिणाम शरीरावर होतो.
मानसिक आरोग्य बिघडते (Mental Health Problem)
Shutterstock
दारूचे नित्यनियमित सेवन हे मेंदूवर परिणाम करते. तुमची विचारशक्ती कमी करण्याचे आणि दारूच्या नशेमुळे तुमची स्मरणशक्तीदेखील कमी होते. तुम्ही सतत नशेच्या अंमलाखाली राहून सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता आणि नैराश्याने ग्रासले जाता ज्याचा डायरेक्ट परिणाम हा मेंदूवर होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी याचा खूप मोठा हात आहे. नैराश्यामध्ये जाण्यासाठी याचा सर्वात जास्त वाटा असतो तसंच तुमच्यासह मानसिक असंतुलनामुळे काहीही घडण्याची शक्यता असते. कारण दारूच्या नशेच्या अंमलाखाली तुम्ही नक्की कसे वागत आहात याची सारासार विचार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये राहात नाही.
हाडे आणि मांसपेशीवरही होतो परिणाम (Harmful To Bones & Muscles)
दारूचे अधिक सेवन केल्यास, कॅल्शियम निर्माण आणि हाडांद्वारे त्याचे अवशोषण होण्याची क्षमता अधिक प्रमाणात होते, ज्याला ऑस्टियोपोरोसिस असे म्हटले जाते. जर गर्भवती महिलांना दारूचे सेवन अधिक केले तर त्यांचे होणारे मूल हे अपंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांना सक्तीने दारू न पिण्याचे सांगण्यात येते. पण आपल्या शरीरातील हाडे ठिसूळ करण्याचे काम दारू करते. त्यामुळे तुम्हाला कुठेही शरीराला लागल्यानंतर ती जखम पटकन बरी होणं शक्य नसते.
आतड्यावर होतो परिणाम (Intestine Problem)
आतड्यांवर दारूचा परिणाम होऊन विटामिन आणि अन्य पोषक तत्वाचे शोषण यामुळे होऊ शकते. अर्थात शरीराला विटामिन पुरविण्यासाठी दारू बाधा निर्माण करते. यामुळे कुषोषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतड्यांवर परिणाम होऊन तुमचे शरीर अधिक बारीक होते आणि तुम्ही सुदृढ न राहता हळूहळू तुमची तब्बेत खालावली जाते आणि त्याचा अधिक वाईट परिणाम शरीर अधिक कुपोषित होऊन नष्ट होण्यामध्ये होतो.
मेंदू आणि मज्जासंस्थेवर होतो परिणाम (Harmful To Brain & Nervous System)
GIF
अधिक दारूसेवनामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊन माणूस नैराश्याने घेरला जातो आणि त्यामुळे त्याच्या स्मृतींंवरही परिणाम होऊन काही जण वेडेही होतात. यामुळे वेड्याचे झटके येणे आणि मानसिक संतुलन बिघडणे असेही घडलेले दिसून येते. त्यामुळे दारूचे अतिसेवन हे अत्यंत घातक ठरते. कारण एकदा मेंदूवर परिणाम झाला की, संपूर्ण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो आणि त्याचा आपल्यासह अन्य आजूबाजूच्या माणसांनाही तितकाच त्रास होतो. परिणाम झालेल्या माणसाला होणारा त्रास हा समोरच्या व्यक्तीला पाहता येणंही शक्य नसतं आणि सहन करणंही शक्य नसतं. अशामुळे आपल्या नात्यांवरही परिणाम होतो हेदेखील तितकेच महत्त्वाचे.
प्रश्नोत्तरे (FAQs)
हो दारू पिणाऱ्या माणसाने मनात आणलं तरी ही सवय हळूहळू सोडवता येते. तुम्ही स्वतः ही सवय कमी करू शकता. नाहीतर तुम्हाला आपल्या जवळच्या माणसांची अथवा नशामुक्ती केंद्राची मदत घेऊनही ही सवय सोडवता येते. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊनही ही सवय कमी करू शकता.
दारूची नशा उतरविण्यासाठी सर्वात सोपा उपाय लिंबाचे पाणी पिणे अथवा संत्र, द्राक्ष अशा फळांचा रस ज्यामध्ये सायट्रिक अॅसिड आहे ते पिणं योग्य आहे. यामुळे पटकन नशा उतरते आणि डोकं दुखणंदेखील बंद होतं. तुम्हाला ज्युस आवडत नसेल तर तुम्ही गरम दूध प्या अथवा थंड दही खाल्ल्यानेही दारूची नशा पटकन उतरते.
दारूचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास, कोणतेही नुकसान होत नाही. कधीतरी दारू पिणं हे योग्य ठरते. पण सतत सेवन केल्याने त्याचा त्रासच होतो. याचे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक आहे. त्यामुळे दारूचे सेवन करण्यापासून दूर राहणे जास्त सोयीस्कर. कारण याची एकदा सवय लागली की, ती बहुतांंशी रसातळाला घेऊनच जाते असे दिसून आले आहे. त्यामुळे मजा म्हणून दारू प्यायला सुरूवात करण्यापूर्वीही बराच विचार करा आणि मगच पाऊल उचला.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक