ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
हिवाळ्यात असं प्याल ताक तर नाही होणार सर्दीचा त्रास

हिवाळ्यात असं प्याल ताक तर नाही होणार सर्दीचा त्रास

हिवाळ्यात बरेच लोक ताक पिणे टाळतात. कारण त्यामुळे सर्दी अथवा खोकला होईल असं त्यांना वाटत असतं. मात्र ताक कोणत्याही सीझनमध्ये आवर्जून प्यावं. कारण ताक हे शरीरासाठी अतिशय उत्तम आणि पाचक असतं. मात्र उन्हाळ्यात जसं ताक नियमित प्यायलं जातं त्यामानाने थंडीत ताक पिण्याची टाळाटाळ केली जाते. याचं कारण ताक थंड असल्यामुळे त्यामुळे सर्दी, खोकला अथवा ताप येण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्हाला थंडीतही ताक प्यायचं असेल तर ते पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी.  यासाठी थंडीत ताक पिण्याची जाणून घ्या पद्धत…हिवाळ्यात कधी आणि कसं ताक प्यावं हे खूप महत्त्वाचं आहे.

जर तुम्हाला हिवाळ्यातही ताक पिण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ताक पिण्याची पद्धत थोडी बदलायला हवी. जसं की उन्हाळ्यात आपण संध्याकाळी अथवा संध्याकाळनंतरही ताक पितो मात्र हिवाळ्यात तसं करणं तुमच्या  आरोग्यासाठी हितकारक नाही. हिवाळ्यात ताक नेहमी संध्याकाळी सहाच्या आधीच प्यावं. उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासोबत तुम्ही ताक पिऊ शकता मात्र हिवाळ्यात तुम्ही तसं करू शकत नाही. कारण सकाळचा नाश्ता हा बऱ्याचदा सकाळी आठ ते दहा या वेळेत केला जातो. सकाळची ही वेळ थंड वातावरणाची असते. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी दहा आधी ताक पिऊ नये. 

Shutterstock

ADVERTISEMENT

हिवाळ्यात ताक नेमकं कोणत्यावेळी प्यावे –

  • हिवाळ्यात कधीच साधं ताक पिऊ नका. नेहमी ताकात धणे-जिरे पावडर, मिरचीची पेस्ट अशा गोष्टी मिसळून प्या. ज्यामुळे ते बॅलन्स होईल. 
  • त्याचप्रमाणे सुर्योदयाआधी आणि सुर्योदयानंतर ताक पिणे टाळा. दुपारी ताक पिण्यामुळे तुमच्या शरीराला त्याचा चांगला फायदा मिळेल.
  • दुपारी ताक पिताना ताकासोबत थोडा गुळ खा. ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल. शिवाय गुळ उष्ण असल्यामुळे त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता नियंत्रित राहील आणि तुम्हाला सर्दी होणार नाही. 
  • जर तुम्ही मधुमेही  असाल तर तुम्ही ताकाबरोबर गुळ न खाता ताकात जीरे, ओवा, काळे मीठ  आणि हिंग टाकून खाऊ शकता. ज्यामुळे तुमची ब्लडशुगर नियंत्रित राहिल. हे सर्व घटक ताकात मिसळल्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि पोटाचे विकार होणार नाहीत. 

Shutterstock

हिवाळ्यात ताक पिण्याचे फायदे –

  • ताक तुमच्या शरीरातील फॅटवर नियंत्रण ठेवते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते आणि ह्रदयविकाराचा धोका टळतो.
  • ताकामध्ये प्रोबायोटिक असतात ज्यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या कमी होतात.
  • ताकात प्रोटिन, कॅल्शिअम असते. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात आणि मांसपेशी लवचिक होतात. जर तुम्हाला हाडांचे विकार असतील तर हिवाळ्यात ताक पिणं फायदेशीर ठरतं.
  • ताकात व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. थंडीत ताप आणि इतर इनफेक्शन टाळण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरतं. 

ताकाप्रमाणेच आम्ही इतर पदार्थांबाबत दिलेल्या इतर आहार टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्यांचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटद्वारे जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

दूध आणि ताक पिताना पाळलेत हे नियम तर पडणार नाही आजारी

दररोज एक ग्लास ताक पिण्याने होतात हे फायदे

दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असेल… तर तुम्ही राहाल निरोगी

ADVERTISEMENT
01 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT