ADVERTISEMENT
home / Diet
दूध आणि ताक पिताना पाळलेत हे नियम तर पडणार नाही आजारी

दूध आणि ताक पिताना पाळलेत हे नियम तर पडणार नाही आजारी

आहाराचा आणि आरोग्याचा अगदी घनिष्ठ संबध असतो. आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी आहारावर योग्य नियंत्रण असायला हवं. तुम्ही जे आणि जेव्हा खाता त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. जर आजारपण टाळायचं असेल तर काही गोष्टी योग्य वेळीच खाणं गरजेचं आहे. याचे कारण आपलं शरीर पंचतत्वापासुन तयार झालेलं आहे. जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ चुकीच्या वेळी खाता तेव्हा  त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जसं की, शरीराच्या योग्य पोषणासाठी आहारात दूध, दही अथवा ताक या पदार्थांचा समावेश असणं फार गरजेचं आहे. मात्र हे पदार्थ कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी खाऊ नयेत हे जर माहीत नसेल तर नुकसान होऊ शकतं. यासाठी जाणून घ्या दूध आणि ताक कधी प्यावं आणि कधी पिऊ नये. 

Shutterstock

दूध पिण्याची योग्य वेळ कोणती

आर्युवेदामध्ये दूध हे संपूर्ण आहार म्हणून ओळखलं जातं. कारण दूधात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, लोह, प्रोटीन्स भरपूरप्रमाणात असतात. दुधात अनेक पोषक घटक असल्यामुळे तान्हा बाळापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींच्या आहारात दूध असणं गरजेचं आहे. खरंतर दूध तुम्ही दिवसभरात अगदी कधीही पिऊ शकता. सकाळी नाश्ता करण्यापूर्वी एक ग्लास दूध पिल्यास तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास थकवा कमी जाणवतो आणि शांत झोप लागते. दुपारी भुक लागल्यास तुम्ही दूध पिऊ शकता. मात्र जेवताना कधीच दूध पिऊ नये कारण इतर खाद्यपदार्थांसोबत दूध पिण्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. यासाठी कोणताही आहार घेण्यापूर्वी दोन तास आधी अथवा जेवणानंतर दोन तासांनी तुम्ही दूध घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

Shutterstock

दही, ताक, ताकाची कढी कधी प्यावी

आयुर्वेद शास्त्र सांगते की दही नेहमी सुर्यास्त होण्याआधीच खावे म्हणजेच सुर्यास्ताआधी तुम्ही दिवसभरात कधीही दही खाऊ शकता. सकाळी नाश्ता करताना दह्याचा वापर केलेले पदार्थ अथवा दही खाणे नेहमीच फायदेशीर ठरू शकते. शिवाय दुपारी दही खाण्याने तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटू शकते. मात्र रिकाम्या पोटी दही कधीच खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. त्याचप्रमाणे रात्री सुर्यास्तानंतर दही कधीही खाऊ नका. काही जणांना रात्रीच्या जेवणात दही खाण्याची सवय असते ती फार चुकीची सवय असते म्हणूनच ती वेळीच सोडा. कारण रात्रीचे दही खाण्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. दही हा थंड पदार्थ असल्यामुळे तुम्हाला त्यामुळे सर्दी, खोकला अथवा फुफ्फुसांचे विकार होऊ शकतात. रात्री दही खाण्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये दही खाण्यामुळे थकवा, अती झोप, आळस या आरोग्य समस्या जाणवतात. याचप्रमाणे दही कधीच गरम करून खाऊ नका. कारण असे दही शरीरासाठी बाधक असते. 

ताक हा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. दही घुसळून त्यात भरपूर पाणी टाकून ताक केले जाते. ज्यामुळे ताक हा पचनास अतिशय हलका पदार्थ आहे. दोन जेवणाच्या मधल्या वेळेत ताक पिण्यामुळे तुम्हाला उत्साही आणि तरतरीत वाटते. जेवणासोबत ताक पिण्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. दिवसभरात तुम्ही कधीही ताक पिऊ शकता. मात्र थंडीच्या दिवसात आणि थंड प्रदेशात सुर्योदयानंतर दह्याप्रमाणेच ताकाचे सेवन करू नये. रात्रीच्या वेळी ताकाला फोडणी देऊन अथवा त्याची कढी करून ते पिण्यास काहीच हरकत नाही. सकाळी रिकाम्या पोटी ताक पिल्यास तुमच्या पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

ADVERTISEMENT

त्यामुळे यापुढे दूध, दही, ताक, ताकाची कढी पिताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा. 

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

सावधान! एसी लावल्यामुळे वाढू शकतो कोरोना संक्रमणाचा धोका

ADVERTISEMENT

मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा

सुरक्षित राहायचं असेल तर घरातील ‘या’ गोष्टी त्वरीत करा सॅनिटाईझ

 

29 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT