प्रत्येकाची शरीरयष्टी ही वेगळी असते. काहींचे शरीर हे त्यांच्या जनुकांवर आधारीत असते. पण असे असले तरी तुमच्या आवडीची देहयष्टी तुम्हाला कधीही मिळवता येऊ शकते. त्यासाठी अपार अशी मेहनत करावी लागते. व्यायाम आणि आहार योग्य असेल तर तुम्हाला हवी असलेली अपेक्षित फिगर नक्कीच तुम्हाला मिळेल. सध्याचे लाईफस्टाईल आणि खाण्याच्या सवयी यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर परिणाम होत असतात. काही जणांच्या अशा सवयीमुळे त्यांच्या शरीराचा काही ठराविक भागच वाढतो. विशेषत:नितंबाचा भाग हा जास्त मोठा दिसू लागतो. याकडे दुर्लक्ष केले तर नितंब हे थुलथुलीत दिसू लागतात. तुमच्याही नितंबाचा आकार वाढू लागला असेल तर तुम्ही आहारातून काही पदार्थ आताच काढून टाकायला हवेत. ज्यामुळे तुमच्या नितंबाचा आकार सुटणार नाही.
नितंब आणि मांड्या सुटतायत? हे पदार्थ टाळलेत तर व्हाल बारीक
ब्रेड:
पाव हा हल्लीच्या खाद्यपदार्थांमधील अविभाज्य असा घटक आहे. पाव नसेल तर कोणताही पदार्थ चांगला लागत नाही. आता उदा. द्यायचे झाले तर वडा पाव, भजी पाव, पावभाजी, बर्गर, पिझ्झा या सगळ्यामध्ये पाव असतो. जो पाव पोटात जाऊन फुगतो. पावामुळे पचनशक्तीवर परिणाम होत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा साठा असतो. जो फॅटच्या रुपात शरीरात साचून राहतो. जर तुमचे काम सतत बसून असेल आणि तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल तर अशा पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या नितंबावरील फॅट वाढते.
तेलकट पदार्थ :
सतत तेलकट पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. तुम्ही सतत तेलकट पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमच्या वजन वाढीसाठी ती कारणीभूत ठरु शकतात हे अजिबात विसरु नका. तेलकट पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. फ्राईज, भजी किंवा सतत तर्रीवाले पदार्थ तुमच्या आहारात असतील तर तुम्हाला अगदी हमखास त्याचा त्रास होणार. वजनवाढीचा परिणाम तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या पायांवर म्हणजे मांडी आणि नितंबावर दिसून येतो. तेलकट पदार्थ हे जीभेला चमचमीत वाटत असेल तरी देखील त्याचा थेट परिणाम नितंबावर दिसून येतो. तुमचे नितंब यामुळे वाढू लागतात. त्यामुळे जर तुम्हाला जाड व्हायचे नसेल तर तुम्ही तेलकट पदार्थ हे टाळायला हवेत.
तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर (Dressing Tips In Marathi)
दुग्धजन्य पदार्थ :
दुधापासून बनवण्यात येणार दूध, दही, चीझ, लोणी हे पदार्थ जितके पौष्टिक असतात. तितकेच त्यांचे अति सेवन शरीरासाठी त्रासदायक ठरणारे असते. दूध आणि दही यांचा परिणाम वजनावर तितकासा पडत नाही. पण चीझ, लोणी हे असे पदार्थ आहेत ज्यामुळे शरीरात फॅट वाढण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही आहारात याचा समावेश कमीत कमी आणि योग्य पद्धतीने करा. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढणार नाही.
हे पदार्थ जर तुम्ही आहारातून कमी केले तर तुमच्या शरीरात अतिरिक्त फॅट वाढणार नाही. शिवाय जर व्यायाम योग्य ठेवला तर तुमच्या नितंबाचा आकारही मुळीच वाढणार नाही.
भुईमूगाच्या शेंगांचे अफलातून फायदे, वजन ठेवते नियंत्रणात