'शुभ संध्याकाळ' म्हणत दिवसाचा शेवट करा गोड (Good Evening Quotes In Marathi)

Good Evening Quotes In Marathi

दिवसाची सुरुवात ही जशी सुंदर आणि आल्हाददायी व्हावी असे सगळ्यांना वाटते. अगदी त्याचप्रमाणे दिवसाचा शेवट हा देखील तितकाच समाधानाचा, चांगला आणि अनेक प्रसन्न आठवणींचा असायला हवा. सूर्योदय ही नव्या दिवसाची उमेद असते. तर सूर्यास्त तो दिवस चांगला गेल्याचे समाधान. सरत्या दिवसाचे आभार मानत त्या दिवसाची शोभा वाढवण्यासाठी आणि त्या दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शुभ संध्याकाळ मेसेज हे आपण एकमेकांना पाठवायला हवेत. हे मेसेज पाठवल्यामुळे दिवसभरातील थकवा एका मिनिटात दूर होण्यास मदत मिळेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या ओठांवर आनंदाचे हसू येण्यासाठी तुमचा एक मेसेज पुरेसा आहे.म्हणून खास तुमच्यासाठी संध्याकाळशी निगडीत अनेक मेसेजेस आम्ही संकलित केले आहेत. हे मेसेज तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तीला पाठवता येतील. चला तर जाणून घेऊया शुभ संध्याकाळ मराठी मेसेज (Good Evening Message In Marathi)

Table of Contents

  शुभ संध्याकाळ मराठी मेसेज (Good Evening Messages In Marathi)

  कधी कधी संध्याकाळी आपल्या जवळच्या व्यक्तींची आठवण आपल्याला खूप येते. अगदी काहीच तासांत आपण त्यांना बघणार असतो पण तरीही भेटीची ती ओढ लागून राहते. मावळता सूर्य तुमच्या आयुष्यात आणो आनंद म्हणून शुभ संध्याकाळ मराठी मेसेज. या शिवाय सूर्यास्त कोट्स पाठवूनही तुम्ही दिवस आनंदी करु शकता.

  Good Evening Messages In Marathi

  • चहाचा एक घोट घेतल्यानंतर आणि ज्यांची आठवण येते, अशा सगळ्यांना शुभ संध्याकाळ
  • दिवस मावळला पण  आयुष्य नाही.. उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही… पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही, शुभ संध्याकाळ!
  • जशी मनाची भावना मनालाच कळते, तशी मैत्रीची भावना मैत्रीलाच कळते, शुभ संध्याकाळ!
  • चुकीच्या दिशेने भरभर जाण्यापेक्षा… योग्य दिशेने हळुहळू गेलेले कधीही बरे.. शुभ संध्याकाळ!
  • दिवस हा संपू लागला तशी आठवण तुझी तीव्र होते,
   माझ्या मनाला या सुंदर संध्याकाळची कायम ओढ असते,
   शुभ संध्याकाळ!
  • तुझ्या मिठीत आता मला फक्त विसावयाचे आहे,
   आता विरह सहन होत नाही, फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहात आहे, शुभ संध्याकाळ!
  • सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या, शुभ संध्याकाळ!
  • काम करुन आलाय का थोडासा कंटाळा, मग मस्त चहाचा घोट घ्या आणि संध्याकाळचा आनंद घ्या
  • पाहायला गेलं तर सूर्योदयापेक्षा सूर्यास्त बरा… कारण तो काहीतरी नवी शिकवण नक्कीच देतो, शुभ संध्याकाळ
  • मावळतीचा सूर्य जणू तो, पाहून माझ्याकडे हसला,
   म्हणाला उद्या पुन्हा भेटू , तुला नवा धडा द्यायला,
   शुभ संध्याकाळ!
  • दिवस हा विरह देतो, तर संध्याकाळ विरहातून प्रियजनांकडे जाण्याची आशा,
   शुभ संध्याकाळ!
  • माणसाने साखरेसारखं गोड असलं की, कडू चहा ही चांगलाच लागतो,
   शुभ संध्याकाळ!
  • चला आता उद्या भेटू,
   असे म्हणण्याची एक संधी देतो,
   ती असते एक सुंदर संध्याकाळ!
  • संध्याकाळच्या या रम्य प्रहरी साथ असावी तुझी
   हीच अपेक्षा आहे माझी तुझ्यापाशी,शुभ संध्याकाळ!
  • प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा
   स्वभावाने जवळ येणारी लोक नेहमीच चांगली,
   अशांनाच कायम जवळ करा, शुभ संध्याकाळ!

  शुभ संध्याकाळ कोट्स (Good Evening Quotes In Marathi)

  संध्याकाळ ही वेळ दिवसाचा शेवट करणारी असली तरी नव्या दिवसाची उमेद देणारी आणि झालेल्या दिवसांच्या चांगल्या आठवणी देणारी असते. अशी ही संध्याकाळी चांगली आणि आनंदता घालवण्यासाठी शुभ संध्याकाळ कोट्स.

  Good Evening Quotes In Marathi

  • जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नये,
   कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
   चांगले दिवस आनंद देतात,
   वाईट दिवस अनुभव देतात,
   आणि अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात
   शुभ संध्याकाळ!
  • संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
   एक छोटासा विश्राम असते,
   ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत
   आनंदाने उपभोगा,
   शुभ संध्याकाळ!
  • संध्याकाळचा थंड वारा,
   आणि बुडणाऱ्या सूर्याची लाली,
   यात विसरुन जा सारे दु:ख,
   आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी
   सज्ज व्हा!, शुभ संध्याकाळ
  • मावळणारा सूर्य हा किती
   छान पुरावा आहे,
   माणूस हा एकटा कसा राहणार,
   कारण त्यालाही मैत्रीचा
   नवा गंध हवा आहे, शुभ संध्याकाळ!
  • सत्य ही अशी श्रीमंती आहे की,
   एकदाच गुंतवणूक
   करुन आयुष्यभर उपभोगता येते,
   पण असत्य हे असं कर्ज आहे,
   ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं,
   परंतु आयुष्यभर त्याची परतफेड
   करावी लागते,शुभ संध्याकाळ!
  • आकाशात कितीही भरारी घ्या,
   पण संध्याकाळ झाल्यावर,
   पक्ष्यांसारखं शेवटी
   घराकडे परतावंच लागतं
   शुभ संध्याकाळ!
  • प्रत्येक गोष्टीचा शेवट
   हा संध्याकाळ सारखा
   सुंदर व्हायला हवा,
   आणि त्यामध्ये येणाऱ्या
   नव्या दिवसाची उमेद ही असायला हवी, शुभ संध्याकाळ!
  • गरम इस्त्री या कपड्यांवरच्या चुरगळ्या घालवतात,
   तसे थंड पाणी हे मन शांत करतात,
   आणि उबदार मन हे आयुष्यातील चिंता मुक्त करतात,
   शुभ संध्याकाळ!
  • परिस्थिती नाही तर माणसाची मन:स्थिती चांगली असावी लागते,
   तेव्हाच माणूस हा समाधानी राहू शकतो, शुभ संध्याकाळ!
  • झालेल्या वेदना विसरत,
   दिवसाची करा गोड सांगता
   तुम्हाला शुभ संध्याकाळ!
  • अंधारात जसा उजेड
   तसाच असतो काळोख,
   त्या काळोखाचे स्वागत करा, शुभ संध्याकाळ!
  • कायम लक्षात ठेवा, अंधारातूनच प्रत्येक वाट
   ही प्रकाशाकडे जात असते, शुभ संध्याकाळ!
  • योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी
   संयम हा असावा लागतो,
   प्रत्येक संध्याकाळनंतर उगवणारा एक नवा सूर्योदय नक्की असतो.
  • आयुष्य नेहमी एक नवी संधी देत असते
   सरळ भाषेत सांगायचे त्याला आज म्हणतात,
   पण आजचा शेवट हे सुंदर संध्याकाळने व्हायला हवा
  • दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे,
   त्यांना हसवावे,
   या आनंदासारखा दुसरा आनंद नाही,
   शुभ संध्याकाळ!

  शुभ संध्याकाळ विचार (Good Evening Thoughts In Marathi)

  दिवसभरात येणाऱ्या अनुभवातून नव्या गोष्टी शिकणे हे फारच गरजेचे असते. जर तुम्ही त्यातून काही शिकवण घेतली तरच तुम्हाला दिवस धन्य झाल्यासारखा वाटेल. संध्याकाळच्या या प्रहरी तुम्ही चांगले विचार शेअर करुन एकमेकांना प्रेरणा द्यायला हवी. या शिवाय सकाळ शुभ करण्यासाठी पाठवा शुभ सकाळ संदेश.

  Good Evening Thoughts In Marathi

  • कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर,
   कधीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा,
   कारण मनं हे आपल्याबरोबर नेहमी सोबत असतं.
   शुभ संध्याकाळ!
  • स्वत:च्या चुका शोधण्यात इतके व्यग्र व्हा
   की, दुसऱ्यांच्या चुका शोधायलाही
   तुम्हाला वेळ मिळायला नको, शुभ संध्याकाळ!
  • चुकले निर्णय जरी तू घाबरु नकोस
   तुझ्या पाठीशी मी आहे दिवसा अखेरीस
   शुभ संध्याकाळ!
  • स्वत:ला मोठे व्हायचे असेल, तर इतरांना मोठे होताना बघा
   शुभ संध्याकाळ!
  • स्वप्न छोटं असलं तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचं मन मोठं असायला पाहिजे,शुभ संध्याकाळ!
   ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो घाव,
   आपल्याच जवळच्यांनी केला आहे, शुभ संध्याकाळ!
  • सूर्य मावळतो तो केवळ तुम्हाला आराम देण्यासाठी,
   हा आराम करुन दुसऱ्या दिवसासाठी तयार व्हा,शुभ संध्याकाळ!
  • यशाचा मार्ग कठीण आहे, कदाचित तो पार करताना दिवस संपतील,
   पण तुमच्या आशा- अपेक्षा आणि जिद्दीचा मार्ग हा तसाच राहिला पाहिजे, शुभ संध्याकाळ!
  • कोणं म्हणतं, दिवस संपला आयुष्य संपलं,
   सूर्य मावळतो तो वाईट गोष्टींना घेऊन आणि नव्या गोष्टीची उमेद घेऊन
  • अपयश आले तरी खचून जाऊ नका,
   मावळत्या सूर्याकडे पाहून उद्याची तयारी करा, शुभ संध्याकाळ

  शुभ संध्याकाळ स्टेटस (Good Evening Status In Marathi)

  तुम्हाला सगळ्यांना मेसेज पाठवणे शक्य नसेल तर तुम्ही स्टेटस ठेवूनही आपल्या भावना व्यक्त करु शकता. त्यासाठीच निवडले आहेत शुभ संध्याकाळ स्टेटस. सूर्योदय कोट्स तुमच्या जीवनात आनंद आणते. अगदी तशीच संध्याकाळ ह

  Good Evening Status In Marathi

  • चांगले मन व चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक असतात,
   चांगल्या मनाने काही नाती जुळतात,
   आणि चांगल्या स्वभावाने नाती टिकतात
  • आयुष्य एक यात्रा आहे, याला जबरदस्ती नव्हे,
   याला जबरदस्त बनवा, शुभ संध्याकाळ!
  • आठवण पण काय शब्द आहे ना..
   ज्याची येते त्याला जाणवत नाही,
   ज्याला येते त्याला राहावत नाही,
   शुभ संध्याकाळ!
  • मावळणारा सूर्य हा एक छान पुरावा आहे,
   की एखादी गोष्ट आयुष्यातून निघून जात असली
   तरी, शेवट हा चांगलाच असतो याची जाणीव करुन देतो,
   शुभ संध्याकाळ!
  • तो म्हणाला तिला बघ,
   प्रेमाची संध्याकाळ झाली,
   आवाज दिला चहाला
   प्रेमाची कॉफी मिळाली!
  • आपली सकाळ भारी, दुपार त्याहून भारी
   आणि संध्याकाळ एकदम भारी,
   च्यामारी आपला सगळा दिवसच एकदम भारी
  • चला आजचा दिवस चांगला संपला,
   आता उद्याच्या दिवसाची आस आहे,
   शुभ संध्याकाळ!
  • दिवे लागणीच्या वेळी मला येते तुझी आठवण
   तुझ्या शिवाय नाही माझ्या आयुष्यात आठवणीचे कोंदण
  • दिवसभर कुठेही फिरा, पण दिवस मावळताना घरी या
   कारण प्रत्येक हरवलेल्या पिल्लाची अन्य कोणी नाही पण आई वाट पाहात असते.
  • संध्याकाळ झाली, दिवस संपला,
   घराकडे परतू चला आता, शुभ संध्याकाळ

  शुभ संध्याकाळ मराठी शायरी (Good Evening Marathi Shayari)

  शायरी स्वरुपातही तुम्ही संध्याकाळच्या शुभेच्छा देऊ शकता. हे शुभ संध्याकाळ शायरी मेसेजही तुम्हाला नक्कीच आवडतील.

  Good Evening Marathi Shayari

  • सांजवेळी नभे बहरली!,
   पाखरे फिरली घरटी,
   रंग अनेक पसरलेले,
   तांबडे पिवळे गगनी,
   - म. ग. कुळकर्णी
  • अशी ही एक संध्याकाळ यावी,
   अथांग सागराच्या साक्षीने,
   मैत्रिणींच्या सोबत रंगूनी जावे,
   मी तुला सांगावे, मी तुला जपावे,
   अनोख्या नात्याचे मैत्र… तू स्मरावे- प्रमिला सरणकर
  • आदर हा व्यक्तिमत्वातील महत्वाचा गुण आहे
   जो त्याला त्याच्या उगवत्या आणि विशेषत:मावळत्या काळात
   अधिक जवळ करतो, शुभ संध्याकाळ!
  • संध्याकाळचा गारवा होता,
   मनात आठवणींचा पारवा होता,
   एकटाच होतो म्हणून काय झाले,
   सूर्याच्या सोबतीत श्वास बेधुंद होता, शुभ संध्याकाळ
  • आयुष्य मिळणं हा नशीबाचा भाग आहे,
   मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे,
   दिवस चांगला जाणे हा केवळ आपल्या हातात आहे, शुभ संध्याकाळ!
  • जीवनात कधी काय बदलेल सांगता येत नाही,
   पण तुम्ही कधीच बदलू नका,
   तुम्ही जसे आहात तसे राहाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल
  • डोळ्यातून डोकावते
   चांदण्यांची माळ,
   काळजाला साद घाली
   तुझी संध्याकाळ, शुभ संध्याकाळ!
  • दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित
   उनं पडतं, तसचं काहीसं पाऊल,
   न वाजवता, आयुष्यात प्रेम घडतं, शुभ संध्याकाळ
  • पापण्यात लपलेली तुझी नजर,
   माझ्याकडे बघून लाजत आहे,
   तुझ्या पायातील पैंजणसुद्धा,
   माझ्या नावाने वाजत आहे
  • संध्याकाळच्या या रम्य वेळी असावी सगळ्यांची सोबत
   तर आयुष्याला येईल खरी रंगत, शुभ संध्याकाळ

  आता दिवसाचा शेवट करण्यासाठी तुमच्या आप्तेष्टांना पाठवा गोड  शुभ संध्याकाळ मेसेज आणि त्यांचा येणारा दिवस करा आशांनी भरलेला