सध्या खूपच उन्हाचा झळ बसत आहे. घरात असूनही उन्हाच्या झळा नक्कीच बसत आहेत. उन्हाळ्यात कोणालाही घट्ट कपडे घालणे नक्कीच आवडत नाही. समर सीझन (summer season) अर्थात उन्हाळ्यात प्रत्येकालाच आरामदायक आणि तलम सुती कपडे घालणे आवडते आणि त्यात अधिक कम्फर्टेबल वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात महिलांसाठी ब्रा घालणे हा तर खूपच मोठा टास्क असतो. ब्रा घालणे कोणत्याच महिलांना आवडत नाही. पण स्टाईल आणि कम्फर्टेबल लुक साठी ब्रा घालावीच लागते. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात जर ब्रा घालयाची असेल तर इतर ब्रा बऱ्याचदा अंगाला घामामुळे टोचत राहतात. मग अशावेळी नक्की उन्हाळ्यात नक्की कोणत्या ब्रा घालायच्या आणि कम्फर्टेबल लुकसाठी वापरायच्या ते आपण पाहूया.
स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका
न्यूड शेड ब्रा
Freepik
उन्हाळ्यात न्यूड शेड ब्रा (Nude shade bra) एकदम परफेक्ट ठरते. अन्य गडद रंगाच्या ब्रा मुळे उष्णता शरीरात शोषून घेतली जाते. पण न्यूड शेड ब्रा मुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. उन्हाळ्याच्या दिवसात काळी ब्रा तर घालूच नका. कारण काळ्या रंगामुळे शरीराला उष्णतेचा अधिक त्रास होतो. तर न्यूड रंगाने तुमच्या शरीरात उन्हामुळे त्रास होत नाही. आरामदायी लुक साठीही याचा उपयोग होतो. न्यूड रंगामुळे तुम्ही अगदी तलम आणि पारदर्शी कपडेही घालू शकता. त्यामुळे तुम्ही याचा उन्हाळ्यात वापर करणे उपयुक्त ठरते.
रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?
टी शर्ट ब्रा
Freepik
उन्हाळ्याच्या दिवस टी शर्ट ब्रा (T – Shirt Bra) अगदी योग्य आहे. टी शर्ट ब्रा बनविण्यासाठी पातळ कपड्याचा वापर केला जातो. त्यामुळे ही घातल्याने अधिक गरम होत नाही. याचा कपडा जाड नसल्याने अंगाला घामामुळे टोचतही नाही. तसंच अत्यंत आरामदायी आणि घाम शोषून घेणारी ही ब्रा असते. याशिवाय टी शर्ट ब्रा या अत्यंत कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक तुम्हाला मिळवून देतात. त्यामुळे तुम्ही याचा उन्हाळ्याच्या दिवसात नियमित वापर करू शकता. याशिवाय तुमचे स्तन अत्यंत व्यवस्थित ठेवण्यासही याची मदत मिळते.
वर्षानुवर्षे ब्रा आणि अंडरगारमेंट्स राहतील टिकून, वापरा या सोप्या टिप्स
कॉटन ब्रा
Shutterstock
उन्हाळ्याच्या दिवसात घाम सर्वांनाच येतो. पण काही महिलांना खूपच घाम येतो आणि त्यांना साधारण हे दोन महिने अगदी पुरळ येण्यासारखेही त्रास होतात. दोन महिने ब्रा न घालता तर राहू शकत नाही. मग अशावेळी जसे आपण अन्य कॉटनचे कपडे वापरतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात कॉटन ब्रा (Cotton Bra) हादेखील उत्तम पर्याय आहे. कारण घामामुळे बऱ्याचदा छातीखाली जळजळ, खाज अशा समस्या निर्माण होऊन त्वचा लालसर होते. त्यामुळे अशावेळी कॉटनची ब्रा उपयुक्त ठरते. कॉटन ब्रा मुळे स्तनांखाली जास्त घट्ट न होता तुम्हाला अलर्जीपासूनही दूर राहता येते. स्टायलिश आणि कम्फर्टेबल लुकसाठी ही ब्रा उत्तम आहे. तसंच यामुळे त्वचा अधिक चांगली राखण्यास मदत मिळते.
किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)
लाईट शेड ब्रा
freepik
उन्हाळ्याच्या हंगामात महिला आपल्या वॉर्डरोबमध्ये लाईट ब्रा चा (Light shade bra) समावेश करून घेऊ शकतात. लाईट शेडमुळे कमी गरम होते. उन्हाळ्याच्या दिवसात गडद रंगाची ब्रा घालणे शक्यतो टाळा. तसंच उन्हाळ्यात अनेकदा महिला पारदर्शी आणि लाईट रंगाचे ड्रेस घालताना दिसतात. त्यामुळे तुम्ही ब्रा देखील तशाच लाईट रंगाची वापरावी. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन त्वचा चांगली राखण्यास मदत मिळते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक